Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 30, 2013
Visits : 4920

कृष्ण कमळ- 65  वियोग   सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते फुग्यापरी ते जातां फूटूनी,  आणिते दुःख सारे जीवनीं दाखव प्रेम त्याच ठिकाणीं, बघणार नाही वियोग कुणी केवळ प्रभूचा सहवास दिसे, वियोगरहीत तेच असे प्रेम वाढते प्रभूसहवासे,  निस्वार्थी भक्ती त्यांत वसे समरस होता एक रुपानेRead More

September 30, 2013
Visits : 643

बागेतील तारका- 82  भरताचा जाब   ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।।   आम्ही बंधू चौघेजण झालो एका पिंडातून कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चारी शरिरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।।   वचनपूर्ति ब्रीद ज्याचे आदर्श जीवन रघूवंशाचे कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी कैकयीला भरत विचारी   ।।२।।   सर्व जणांचे प्राण होता जगणे कठीण झाले आतां रोष कशाला घेसी त्याचे ?Read More

September 30, 2013
Visits : 2210

जीवनाच्या रगाड्यातून- बहिणीची एक ईच्छा विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया  नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी  आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून  एके दिवशी    बांध राखी प्रेमाची स्वार्Read More

September 25, 2013
Visits : 698

कृष्ण कमळ- ६४   ईश्वरी इच्छेनेच   वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें असेच घडते जीवनीं सदा,  अघटीत-अवचित समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा,  स्वीकारी आनंदात   डॉ. भगवानRead More

September 25, 2013
Visits : 655

बागेतील तारका- ८१  तमोगुण   राज्य तमाचे येथें    बाह्य जगावरती म्हणून दिसे आम्हां   विध्वंसक प्रवृती   नाश करण्यासाठीं   शक्तिच हवी येथे हेच रुप शिवाचे   समजण्या अवघड जाते   जागा करु देई   नविन घटनाना चक्र कसे चालेल   न मिटवता त्यांना   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail -  bknagapurkar@gmail.comRead More

September 25, 2013
Visits : 1739

जीवनाच्या रगाड्यातून-                                                       आठवण चाळवणारे अनामिक ! एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला  मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे  मिटून चिंतन करीत, शांत बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच आकृती तीच चेहऱ्याची  ठेवण,  तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते. पंचवीस  वर्षापूर्वीच ते वारले.  ज्यांनी माझ्या  स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच  छबी जागृत झाल्याचे  जाणवले. दूर बसून मी त्यांना  बराच  वेळपर्यंत  न्याहाळले.  कांही वेळानRead More

September 20, 2013
Visits : 2274

कृष्ण कमळ- ६३   प्राण ज्योत   दिवा होता छोटासा, एक मजकडे इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे तळांत होती योजना, तेल सांठवण्याची शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं तीच उर्जा प्राRead More

September 20, 2013
Visits : 1592

बागेतील तारका- ८०  भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी   युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।। आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी विषाचा तो पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविलेस विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी,   दाह त्याचा सहन करी   ।।२।। कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांRead More

September 20, 2013
Visits : 2061

जीवनाच्या रगाड्यातून- सब खाओ ! मगर मेरा भेजा मत खाओ   डॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय   कीर्तीचे चीकीत्सक   Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले. त्यांच्या सुरवातीच्या सेवेच्या काळांत  ते औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  प्राध्यापक होते.  ते अतिशय उत्तम शिक्षक  होते. प्रत्येक  विषयाची उकल अगदी सहजतेने व विद्यार्थ्याला  व्यवस्थित  लक्षांत यईल ह्या पद्धतीने त्यांची शिकवण्याची हातोटी होती. विषयाला  कंटाळवाणे न होऊ देता  अधRead More

September 15, 2013
Visits : 1189

कृष्ण कमळ- ६२   देहाला कां शिणवितां ?   शरिरातील अवयव सारे, यंत्रावत् असती आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम तो होती खाणें शुद्ध पिणेशुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला देह असे साधन केRead More

September 15, 2013
Visits : 4484

बागेतील तारका-   ७९   प्रभाते नाम घ्या जगदंबेचे   प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।   कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   गेल्या होत्या स्मृRead More

September 15, 2013
Visits : 5359

जीवनाच्या रगाड्यातून-                                              ३१०  * काळाची काठी! एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दRead More

September 10, 2013
Visits : 631

कृष्कमळ- ६१  चांदण्यातील आठवणी   हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।   आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे सोयरे मित्रमंडळी परसदारी तुळशीजवळी गप्पा टप्पा विनोRead More

September 10, 2013
Visits : 4225

बागेतील तारका- ७८  चिंतन   ज्याचे चिंतन आम्ही करतो तोच  'शिव' चिंतन करतो स्वानुभवे चिंतन करुनी चिंतनशक्ति दाखवितो   जीवनाचे सारे सार्थक लपले असते चिंतनात चिंतन करुनी ईश्वराचे त्यांच्यात एकरुप होण्यात   सारे ब्रह्मांड तोच असूनी अंश रुपाने आम्ही असतो जेव्हां विसरे बाह्य जगाला तेव्हांच तयांत सामावतो   चिंतन असे निश्चीत मार्ग प्रभूजवळ तो जाण्याचा लय लागूनी ध्यान लागतां ईश्वरमय होण्याचा   डॉ. भगवान नागापूरकर ९००५०७९८५० e-mail – bknaRead More

September 10, 2013
Visits : 1633

जीवनाच्या रगाड्यातून- *  अनुभव   सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे   पोहणे जगणे कला असुनी, अनुभव हा शिकवूनी जातो जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो   जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून   अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या घटनामधूनी   बोल सारे अनुभवाचे, त्या बोलीची भाषाच न्यारी सRead More

September 05, 2013
Visits : 2091

कृष्ण कमळ- ६० उदरांतील शेषशाही   मातेच्या उदरांत झोपला, शेषशाही भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशाहीचे चित्र बघतां,  साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी,  ' नाळ ' तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें,  बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी,  येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी,  ब्रह्मापरी दिसे अंग ' सो हं ' निनादुनी सांगे, ' मीच तोच ईश्वर आहे ' चुकीचा समज करुनी,  तयास सागरीं पाहे विवीधतेनें सुचवी,   'Read More

September 05, 2013
Visits : 2548

बागेतील तारका-   ७७  दानशूर कर्ण   महाभारतातील कर्णाचे स्थान   अद्विती असून मान जाई उंचावून    त्याला समजोनी घेता   ।।१।।   सुर्यपुत्र कर्ण    घनुर्धारी महान दानशुर तो असून   इतिहास घडविला   ।।२।।   सुर्य आशिर्वादे जन्मला  कवच कुंडले लाभती त्याला रक्षण वलय शरीराला   मिळती कर्णाच्या   ।।३।।   अंगातील कर्तृत्व शक्ती    माणसाला उंचावती शक्तीस वाट फुटती    शोधूनी त्याची योग्यता   ।।४।।   जन्मुनी प्रथम पांडव    सहवासांत सारे कौरव हेच त्याचे खरे दुर्दैवRead More

September 05, 2013
Visits : 1568

गांवमामा   हा  एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने  गांवमामा   झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय  प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव,  मदत  करण्याची आंतरिक  इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे  मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना  आपल्या वागनुकीने  सर्व समाज अर्थात  ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानRead More

September 01, 2013
Visits : 4012

कृष्ण कमळ- ५९  शोधूं कुठे त्यास ?   शोधत होतो रुप प्रभूचें, एक चित्त लावूनी अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी   १ शांत झाले चंचल चित्र, शांत झाला श्वास ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश   २ पचन शक्ति ती हलकी झाली, जठराग्नीची शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्यांची   ३ देहक्रियांतील प्राणबिंदू तो, असे ईश्वर समरस होतां त्याच शक्तिशीं, होई ते स्थिर   ४ शोधामध्ये चिंतन करतां, ध्यान परी लागते समाधी स्थितीत येंता प्राण, अनंतात मिसळते   ५ नाही दिसले रुप ईश्वरीं, आRead More

September 01, 2013
Visits : 1134

बागेतील तारका- ७६  ईश्वर शक्तीरुप   तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला विजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारी काळोख प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां झाडावरले पडता फळ,  भूमी घेई खेचुनी त्याला गुरुत्वाकर्षन शक्ति ही,   झलक दाखविते जगाला ईश्वरा अस्तित्व भासे,  अशाच शक्तिरुपानें अद्दष्य असुनीRead More

September 01, 2013
Visits : 6526

जीवनाच्या रगाड्यातून- माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा ! रविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी  आले होते.   त्यांनी घरांत पांच वर्षापर्यंत कुणी बालके आहेत कां ? म्हणून चौकशी केली.  मी लगेच  पुढे  झालो व माझ्या नातीस बोलावले.  तिने नुकतेच चार वर्षे पूर्ण केले होते. तिला त्यांनी पोलिओचा डोस पाजला. त्यांनी तिचे नांव   लिहून घेतले. पुन्हा त्यांनी विचरण केली की  ” घरांत आणखी कुणी लहान मुल  आहे कां?“     आम्हालाRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 52192 hits