Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 30, 2013
Visits : 2367

कृष्ण कमळ- ५५   तुझे तुलाच अर्पण !   तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,  भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,  तुझीच असतां सृष्टी सगळी वाहणाऱ्या संथ नदीतील,  पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,  गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,  नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,  ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,  साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,  हाच मिळवित असे एक   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@ gmail.comRead More

July 30, 2013
Visits : 642

बागेतील तारका- ७२  भिकारीण   मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    // हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    // परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    // जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी   //   डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bbbknagapurkar@gmail.com bRead More

July 30, 2013
Visits : 1714

जीवनाच्या रगाड्यातून- *   " पश्चाताप ” – - एक जाणीव !  संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर  डॉक्टर  देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी  ते घडणे म्हणजे केवळ  चमत्कार होता.  डॉक्टर देशमुख शासनाचे  वरिष्ठ  अधिकारी  होते.  त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच  प्रशासकीय अधिकार प्राप्त.  ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि  अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते.                  मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानRead More

July 25, 2013
Visits : 6706

कृष्ण कमळ- ५४  गीता – जीवनाची एक उकल   रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी           //धृ//   अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी   कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते त्याचीRead More

July 25, 2013
Visits : 1136

बागेतील तारका- ७१  चंद्राचे कायम स्वरूप                            ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू            शोध घेण्या अंतरीचे // तेच आहे मधुर चांदणेRead More

July 25, 2013
Visits : 1760

जीवनाच्या रगाड्यातून- *   बहिरा ऐके कीर्तन गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्यRead More

July 20, 2013
Visits : 1117

कृष्ण कमळ-  ५२  देवकी माता !   काय म्हणू ग तुजला देवकी   भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी    सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी     मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची     तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला  // राज वैभवी वरात निघता      कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी      दुःखी सारे जीवन गेले  // कंसाने तव मुले मारीली      निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु गिळून घेशी दुःखे सारी    आगमन प्रभूचे होण्यासाठी // ईश्वर येता तव उदरी     भाRead More

July 20, 2013
Visits : 1922

बागेतील तारका- ७०  बहिणीची एक इच्छा विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया  नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी  आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून  एके दिवशी    बांध राखी प्रेमाची स्वार्थी आRead More

July 20, 2013
Visits : 2620

कुपोषण हे पोषणाचे साधन ?   रेल्वेने औरंगाबादला जाण्यासाठी उभा होतो. एक भिकारीन, अंदाजे दोन वर्षाच्या लहानग्या मुलाला कडेवरती घेऊन, भिक मागत होती. मजजवळ ती आली. मुलगा  खूपच  रोड अशक्त व नजरेत भरेल इतका कुपोषित  होता. निस्तेज व अस्वच्छ चेहऱ्यामुळे  माशा  बसलेल्या होत्या. मुलाची काहीच  हालचाल दिसत नव्हती. त्या मुलाकडे  बघून  मला  त्याची सहानुभूती वाटली.  मी पाच रुपयाचे नाणे तिच्या हाती दिले. ती तशीच पुढे भिक मागत गेली.  गाडी लेट होती. मी वाट बघत इकडून तिकडे फिरत होतो.  थोड्या वेळाने  माझी  नजर  एका वRead More

July 15, 2013
Visits : 1021

कृष्ण कमळ- ५२  सु्र्य-चंद्राचा लपंडाव   बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें   । पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने   ।।   युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे   । भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे   ।।   मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई   । लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई   ।।   संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी   । परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी   ।।   लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता   । नभीं न येतां घरींच झोपे, थकRead More

July 15, 2013
Visits : 3165

बागेतील तारका- ६९   थांबव, विज्ञाना तुझे शोध   थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद   / धृ /   उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद     १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू,  निसर्गातील सुगंध     २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   नदीतील संथता ओढ्यातील चपळता धबधब्यातील प्रचंडता रोखलास प्रवाह तू, घालूनी बांध      ३Read More

July 15, 2013
Visits : 2610

जीवनाच्या रगाड्यातून- मेडीकल येथिक्स !   अमेरिकेतील अरीझोना स्टेट मधील फिनिक्स हे सुंदर व प्रशस्त  वसलेले शहर. स्वछता शिस्त व नियमांचे काटेकोर पालन ह्याचा अनुभव  तीव्रतेने  तेथील वास्त्व्यात आला. प्रत्येक संस्थांचे नियम  असतात  ते सहसा मोडले जात नाहीत.  तेथे एक मजेदार अनुभव आला. मुलगा एका कंपनीत कामाला होता. त्याच्याकडे  आम्ही दोघे गेलो होतो. त्याची बायको अर्थात माझी सून गर्भवती होती. सात  महिने झालेले. त्याच  शहरात  नजीकच्या मोठ्या रुग्णालयात तिची रीतसर नोंदणी केलेली होती. संबंधित स्त्री डॉक्टरRead More

July 10, 2013
Visits : 1550

५२  दयेची कसोटी   करुनी दयेची बरसात पावन करीतो दुष्टाला तुझ्या मनाचा ठाव उमजला नाहीं कुणाला   वाल्या होता खूनी पापांनी भरले रांजण परि तुझ्या दयेद्वारे गेला तो उद्धरुन   कालीदास होता ऐष आरामी राहात होता वेश्येघरीं महाकवी बनवूनी त्याला किमया तूंच करी   बहकला होता पुंडलीक पत्नीच्या विपरीत नादानें उभे केले तुला विटेवरी आईबाप सेवा शक्तिनें   क्षमा करुनी पाप्यांना पावन तूं करितो कळले नाहीं आम्हांला काय कसोटी लावतो.   डॉ. भगवान नागापRead More

July 10, 2013
Visits : 1965

६८  रिक्त प्रेमाचा घट   रिक्त प्रेमाचा घट रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  // भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट   लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीसRead More

July 10, 2013
Visits : 966

एकत्र सर्पालय व बेडूकालय !   दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची  वेगवेगळी  दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते.  अति विशाल हौद, तळामध्ये  दोन  भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे,  दगडाच्या शीला, काही ठिकाणी  कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर  मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे त्या पाण्यात  खूप मासे  सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य.Read More

July 05, 2013
Visits : 1089

कृष्ण कमळ- ५०  पिंडीतील ब्रह्मांड   विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती   सुक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं   विचार मनीं येई ,    कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली   समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता   जीव देहाचे पिंड,   जीवंततेतील सुक्ष्मता बाळगी ते ब्रह्मांड,   हीच त्याची मRead More

July 05, 2013
Visits : 1926

बागेतील तारका- ६७   समाधानी वृत्ती   कशांत दडले समाधान ते शोधत असतो सदैव आम्ही धडपड सारी व्यर्थ होऊनी प्रयत्न ठरती कुचकामी   बाह्य जगातील वस्तू पासूनी देह मिळवितो सदैव सुख क्षणीकतेच्या गुणधर्माने निराशपणाचे राहते दुःख   'समाधान' ही वृत्ती असूनी सुख दुःखातही दिसून येती चित्त तुमचे जागृत असतां समाधान ते सदैव मिळते   सावधतेने प्रसंग टिपता समाधान ते येईल हाती सुख दुःखाला दुर सारता अंतरभागी समाधान दिसती   डॉ. भगवान नागापूरकर 900407Read More

July 05, 2013
Visits : 2051

जीवनाच्या रगाड्यातून- बघून सूर्यपूजा पावन झालो हांसत  आली सूर्य किरणे झरोक्यातून देव्हारयांत नाव्हू घालूनी जगदंबेला केली किरणांची बरसात   पूजा केली किरणांनी जगन्माता देवीची प्रकाश  स्पर्शुनी  चरणाला केली उधळण सुवर्णांची   तेजोमय दिसू लागले मुखकमल जगदंबेचे मधुर हास्य केले वदनी पूजन स्वीकारते  सूर्याचे   रोज सकाळी प्रात:काळी येउनी पूजा तो करितो भाव भक्तीने दर्शन देउन स्रष्टीवर किरणे उधळतो   कोटी कोटी किरणांनी तो देवीची पूजा करितो केवळ त्यRead More

July 01, 2013
Visits : 2172

Normal 0 false false false MicrosoftInternetExplorerRead More

July 01, 2013
Visits : 1703

बागेतील तारका- * ६६  अजाणतेतील अपमान   स्फुर्ति येऊन कविता केली   आनंद झाला मनीं   । चटकन कागदावरी लिहीली   शब्द येतां ध्यानी   ।।   कवितेतील शब्दरचना   झाली बहरदार   । कौतूकाची येई भावना   बघुनी शब्द भांडार   ।।   पुर्ण करुनी कविता    टिपूनी घेतली वहीत   । काव्य रचना परत वाचतां   मग्न झालो आनंदात   ।।   फेकूनी दिला कागद    ज्यावरी रचिली  कविता   । विचारांत होतो धुंद    कृत्य केले मी अजाणतां   ।।   अघटित घटना झाली   काव्य स्फुर्ति गेली निघूनी   । नंतर मजलRead More

July 01, 2013
Visits : 1690

जीवनाच्या रगाड्यातून- * भिकाऱ्याची अनमोल मदत ! संध्याकाळी फिरण्यास निघालो. बागेच्या दारापाशी एक ग्रंथ विक्रेत्याचे वाहन उभे होते. विशेष पुस्तकांची विक्री चालू होती. माझी नजर एका दुर्मिळ ग्रंथावर पडली. गेली कित्येक दिवस ते पुस्तक मी मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रकाशक, ग्रंथ भांडार, यांच्याकडून कळले होते कि त्याची नवीन आवृती येण्यास अवधी लागेल. मी ते विकत घेण्यासाठी पाकीट काढले. चार रुपये कमी पडत होते. हतबल झालो. पुस्तक विक्रेता नोकर माणूस होता. गाडी दूर गावची असून, लगेच जाणार होती. जवळपास कुणी परिचRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 41892 hits