Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 26, 2017
Visits : 752

सूड वलय   उत्साहाने आला होता,  मुंबई बघण्याकरिता, रम्य स्थळांना भेट देणे,  ही योजना मनी आखता ।।१।।   मान्य नव्हती त्याची योजना,  नियतीच्या चाकोरीला, पाकीट पळवूनी त्याचे,  घाला कुणीतरी घातला ।।२।।   धन जाता हाता मधले,  योजना ती बारगळली, अवचित त्या घटनेने,  निराशा तेथे पसरली ।।३।।   जात असता सरळ मार्गी,  दुष्टपणाला बळी गेला, समाजाला धडा शिकवण्या,  सूडाने तो पेटून गेला ।।४।।   वाम मार्गी जावून त्याने,  तेच धन पुन्हा कमविले, सूड घेतला असून देखील,  समाधान तेRead More

February 26, 2017
Visits : 2160

सुखाचे मृगजळ   धांवत असे मन आमचे,  शोधण्या नेहमीं सुखाला सुख तर आहे मृगजळ,  फसवित राही सर्वाला...१ मृगजळाचे  धावूनी पाठी,  निराशा हाती येत असे, वेडी आशा मनीं बाळगुनी,  सुखासाठी तडफडत असे...२, आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे जवळ जातां प्रयत्न करूनी,  सुख नसूनी दुःखची भासे...३, खरे सुख कशांत बघतां,  तें तुमच्या मनींच वसत बाह्य जगी शोधत असतां   दुःख तुमचे हातीं लागते...४, दुःख असे अंवती भंवती,   सुख तुमच्या अंतर्यामीं बाह्य जगातील सुख परि  कधीं न येती तुमचे कामींRead More

February 26, 2017
Visits : 1675

निरागस जीवन   प्रफुल्लित भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं...१ खेळत होता दिवसभर , इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे...२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या  आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या  दिवसा विषयी,  अजाण होता संपूर्णपणे....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapRead More

February 26, 2017
Visits : 1071

रिक्त प्रेमाचा घट   रिक्त प्रेमाचा घट रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट  //   भावंडाचे संगोपन रमवूनी त्यांचे मन आईच्या  कामी मदत देऊन आनंदिले बालपणी, गीत गावूनी नीट  //१// रिक्त झालीस तू , लुटवूनी प्रेमाचा घट   लक्ष्य संसारी प्रेम पतीवरी मुलांची जोपासना करी संसार सुखाचे प्याले, भरी काठोकांठ //२// रिक्त झालीस तू ,  लुटवूनी प्रेमाचा घट   होता मुले मोठी संसार त्यांचा थाटी राहुनी त्यांचे पाठी सुखासाठी त्यांच्या,  करी देहकष्ट   //३// रिक्त झालीसRead More

February 26, 2017
Visits : 971

ईश्वरी इच्छेनेच   वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन  । घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण  ।। चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची  । स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची  ।। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो  । फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो  ।। कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें  । भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें  ।। असेच घडते जीवनीं सदा,  अघटीत-अवचित  । समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा,  स्वीकारी आनंदात  ।।Read More

February 26, 2017
Visits : 467

उधळण   परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचा रचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले. जे वाईट गुणधर्म जाणवले,ते देखील त्या परमेश्वरांतच असल्याचे म्हटले. म्हणून तो एक परिपूर्ण शक्तीस्वरुप असल्याचे व्यक्त झाले. अनेक विचार अनेक धर्म,पंथ,ग्रंथ इत्यादींचा विचार केला तर सर्वजण एक मतानी हेच मानतात की वरील प्रमाणे त्याचे सर्व गुणधRead More

February 19, 2017
Visits : 489

ममतेतील खंत   भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.  //धृ//   आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता  //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.   रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता  //२ // भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता.   उचलून नेई बाल प्रभूला नंदाRead More

February 19, 2017
Visits : 571

ज्ञान साठा   जमीन खोदतां पाणी लागते,  हीच किमया निसर्गाची, कमी अधिक त्या खोलवरती,   साठवण असे जलाशयाची ।।१।।   प्रत्येक जणाला ज्ञान देवूनी,   समानता तो दाखवितो, अज्ञानाचा थर सांचवूनी,   आम्ही आमचे ज्ञान विसरतो ।।२।।   एक किरण तो पूरे जाहला,   अंधकार तो नष्ट करण्या, ज्ञान किरण तो चमकूनी जातां,  फुलून येते ज्ञान वाहण्या.....३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

February 19, 2017
Visits : 677

दुःख कसे विसरलो   काय केले दुःख विसरण्याला युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।।   निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।। युक्ति जमली नामीं आनंद आणण्याला   एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन गेलो जगाला   ।।३।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   सारी ऊर्Read More

February 19, 2017
Visits : 988

जीवन म्हणती याला   त्याची ऐकूनी करूण कहाणी,  डोळे भरून आले पाणी हृदय येता उंचबळूनी,  निराश झाले मन  ।।१।। आघात होता त्याच्या जीवनी,  तो तर नव्हता माझा कुणी तरी का आले प्रेम दाटूनी,  उमजेना काही ।।२।। दु:ख दुजाचे समोर आले,  मनास ज्याने कंपीत केले दोन जीवांच्या हृदयामधले,  अदृष्य हे धागे ।।३।। मानव धर्म एक बिजाचा,  वाढत गेला गुंता त्याचा ओढत असता धागा टोकाचा,  दुजा हळहळतो ।।४।। राग लोभ वा प्रेम भावना,  बांधूनी ठेवते एकमेकाना हिच असे निसर्ग योजना,  जीवन म्हणती याला ।।Read More

February 19, 2017
Visits : 505

बदलते भाव   कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येते राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटते....१ देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले....२ देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी...३ जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून भावांचे  रंग बदलती,  अंतर बाह्यावरून...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

February 19, 2017
Visits : 1415

दुःख कसे विसरलो   काय केले दुःख विसरण्याला युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।।   निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।। युक्ति जमली नामीं आनंद आणण्याला   एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन गेलो जगाला   ।।३।। युक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   सारी ऊर्Read More

February 19, 2017
Visits : 483

देहाला कां शिणवितां ?   शरीरातील अवयव सारे, यंत्रवत् असती  । आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती  ।। यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी  । अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी  ।। शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती  । त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम  होती  ।। खाणें शुद्ध पिणे शुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते  । संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते  ।। उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला  । हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला  ।। देह असRead More

February 19, 2017
Visits : 1742

कोलीडोस्कोप   नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य "  सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच वRead More

February 14, 2017
Visits : 995

मीरेची तल्लीनता   नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   - - -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  -  -  - २ चित्त ते हरीमय जाहाले   विषाचा घेता प्याला हरि तो त्यातची दिसला झेपावूनी गेली त्याच क्षणी घट घटा प्राशन केले. - - -  ३ चित्त ते हरीमय जाहाले   जहाल होते विष मृRead More

February 14, 2017
Visits : 1780

त्यांचे नाते   कोण लागतात माझे, नाते ते ठाऊक नाहीं, देऊनी जातात मात्र, बरेच मजला काहीं ।।१।।   विठ्ठल- रामाचा नाद,   गुंजन करितो येथें, पवित्र वातावरण,   येण्यानी होवून जाते ।।२।।   देवाण घेवाण आत्म्याची,   आपसामध्यें चालती, शब्द फुलांची गुंफण,  त्वरीत होऊन जाती ।।३।।   फुले देऊनी मजला,  हार गुफूंन घेतात, दोघे मिळूनी तो हार,   प्रभूस अर्पूं सांगतात ।।४।।   अदृश्य असले नाते,   असावे दोघांमध्ये, भाषा आत्म्याची जाणतां, मन नाचते आनRead More

February 14, 2017
Visits : 652

वासनेतील तफावत   विपरित वागूनी मन,  नाश करीते शरीराचा  । वासनेतील तफावत,  काळ बनतो इंद्रियाचा...१, उदर भरले असताना,  अन्नाला विरोधते पोट  । परि अतृप्तता जिभेची,  घालते आग्रहाचा घाट....२, मद्य सेवन करीता,  झिंग ती येवून जाते  । मेंदूतील चेतनेसाठीं,  यकृत बिघडूनी जाते...३, नाच गाणे देत असते,  सूख नयनां – कर्णाला  । शरीर वंचित होते,  मिळणाऱ्या त्या विश्रांतीला....४ एक इंद्रियाची वासना,  असती पूरक दुजाला  । साध्य करण्यासाठीं हेच,  जागृत ठेवावे मनाला...५   डॉ. भगवान नागापूRead More

February 14, 2017
Visits : 2114

ऋतूचे चक्र आणि मन   कडाक्याची थंडी, दात कुडकडुती, हात-पाय गार, काटे अंगी येती नकोसा वाटतो,  मजला हिवाळा, वाट मी बघतो,  येण्या तो उन्हाळा   सुकूनची जाते,  हिरवे  रान शरिर राहते,  घाम निथळून लाही लाही होता,  त्रस्त होई जीव, शोधण्या  ढग,  मन घेई धाव   थांबवितो कामे,  वादळी वारा, पर्जन्याचा मारा,  पडताती गारा पाणी चहूकडे,  वाटते सुकावे, वर्षा  जावूनी,  सुक्यात खेळावे   आपल्या जे हातीं  मन नसे त्यांत सुख त्यांच्यांत पाही,  नसे जे हातात डॉ. भगवाRead More

February 14, 2017
Visits : 2045

संस्कारा प्रमाणे   समान बल ते असतां समोर, टक्कर त्याची होई सबळ दुर्बल याचा संघर्ष,  टळत नेहमी जाई....१, मर्दूमकीचा विचार ठेवूनी,  मैदानी उतरी त्याच स्थरावर सारे घडते,  मुरले जे शरिरी....२, ज्ञानी लढतो ज्ञानी जनाशी, वाद-विवाद करूनी हात घाईची सिमा परि,  तो टाळी विचारांनी.....३, मस्तावले शरिर असतां,  धक्का-बुक्की होते देहामधली जमली शक्ती,  बाह्य मार्ग शोधते....४, दिसून येतो ऊर्जा वापर,  देह बुद्धी वा मनी संस्काराचे बीज अंकूरते, परिस्थिती बघूनी...५   डॉ. भगवान नRead More

February 14, 2017
Visits : 838

दुःख विसर बुद्धी   कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता, विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां निसर्गाची रीत, दुःख तोची काढी करता दुःखावर मात, दुःखाचा विसर पाडी दुःख होते दुर, हेच आणिल समाधान दुःख बुद्धि विसर, असे तत्व महान   डॉ. भगवान नागापूरकRead More

February 14, 2017
Visits : 1680

शोधूं कोठें त्यास ?   शोधत होतो रुप प्रभूचे,   एक चित्त लावूनी  । अवंती भवंती नजर फिरवी,   श्वास रोखूनी  ।।     शांत झाले चंचल चित्त,   शांत झाला श्वास  । ह्रदयनाडी मंद होऊनी,   चाले सावकाश  ।।     पचन शक्ती  हलकी झाली,   जठराग्नीची  । शिथील झाली गात्रे सारी,   देह चैतन्याची  ।।     देहक्रियांतील प्राणबिंदू ,  असे ईश्वर  । समरस होतां त्याच शक्तिशीं,   होई स्थिर  ।।    शोधामध्यें चिंतन करतां,   ध्यान परी लागते  । समाधी स्थितीत येतां प्राण,   अनंतात मिसळतRead More

February 14, 2017
Visits : 2227

मला भाराऊन टाकल याने   बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक  लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा. हे सारRead More

February 05, 2017
Visits : 1159

वळून पहा   उडून गेली दूर दूर तू झेप घेउनी आकाशी बघू लागलो चकीत होऊनी पंखामधली भरारी कशी   नाजूक नाजूक पंखाना आधार होता मायेचा चिमुकल्या त्या हालचालींना पायबंध तो भीतीचा   क्षणात आले बळ कोठून विसरुनी गेलीस घरटे आपुले बंधन तोडीत प्रेमाचे आकाशासी कवटाळले   कधीतरी उडणे, आज उडाली बघण्या साऱ्या जगताला किलबिल करून वळून पहा दाणे भरविल्या चोचीला   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

February 05, 2017
Visits : 1051

अमर काव्य   विसरून गेलो सारे कांहीं,   आठवत नाही मला, रचली होती एक कविता,   त्याच प्रसंगाला ।।१।।   जल्लोषांत होतो आम्हीं,   दिवस घातला आनंदी, खिन्नतेचा विचार त्या दिनीं,   शिवला नाही कधीं ।।२।।   नाच गावूनी खाणेंपिणें,   सारे केले त्या दिवशीं, बेहोशीच्या काळामध्यें,   कविंता मजला सुचली कशी ।।३।।   छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते, प्रसंग जरी तो मरून गेला,  कविता जिवंत राहते ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५०Read More

February 05, 2017
Visits : 1301

तन मनातील तफावत   देह मनातील,  तफावत  दिसून येते  । चंचल असूनी मन सदैव,  शरीर परि बदलत राहते...१,   चैतन्ययुक्त मन सदा,  स्थिर न राहते केव्हांही  । जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,   परिस्थितीच्या चौकटीमध्यें,   विचारांचा दबाव राहतो  । शरीराच्या सुदृढपणाचा,  मनावरती परिणाम होतो...३,   दिसून येते केव्हां केव्हां,  मन अतिशय उत्साही  । परि शरीराचा अशक्तपणा,  मनास त्याक्षणी साथ न देई....४   विचित्र होते वातावरण ते,  जेव्हां मनास साथ ना मिळे  । विRead More

February 05, 2017
Visits : 2229

खोडकर कृष्ण   किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां,  ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी...१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडतां फस्त करशी कांहीं मोदक,  ताटामधले तूंच खाऊनी....२, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,Read More

February 05, 2017
Visits : 978

भास   चमचम चमकते नाणें    दूरी वरुनी दिसले  । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले  ।।   निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा  । खोटी चमक बाळगुनी    फसविणे  गुणधर्म तयाचा  ।।   भास ही चेतना  ती    तर्क वाढीवी कसा  । दिसून येई  सदैव   मनावर जो उमटे ठसा  ।।   ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे  । मनावर बिंबून जाते    आणि भासते तेच खरे  ।।   दिसून येतो ऊर्जा वापर    देह, बुद्धी वा मनीं  । संस्काराचे बीज अंकुरते    परिस्थिती बघूनी  ।।   डॉ. भगवाRead More

February 05, 2017
Visits : 857

अनुभवाचे शहाणपण   बदलून गेले जीवन अर्थ कळल्यानंतर परिस्थितीची आली जाण जाग आल्या नंतर  ।।१।।   श्रीमंतीच्या नादानें ऐषआरामी झालो पैशाच्या गर्वाने माणुसकी विसरलो   ।।२।।   तारुण्यातील उर्मीने अहंकारी बनविले शरिरातील गुर्मीने निर्दयी मज ठरविले   ।।३।।   धंद्यामध्ये येता खोट निराश अति झालो गरिबीची चालतां वाट प्रेमळ मी बनलो   ।।४।।   देह बनला दुर्बल विकार तो जडूनी जर्जर- पिडीतां बद्दल सहानुभूती आली मनी   ।।५।।   अनुभवासारखा शिक्षRead More

February 05, 2017
Visits : 536

शारदेस विनंती   हे शारदे ! रूसलीस कां तू,  माझ्या वरती  । लोप पावली कोठे माझी,  काव्याची स्फूर्ती  ।। दिनरात्रीं तव सेवा केली,  मनोभावें  । कळले नाहीं आज शब्द ओठचे,  कोठे जावे  ।। दिसत होते भाव मजला,  साऱ्या वस्तूमध्यें  । उचंबळूनी जाई मन तेव्हां,  नाचत आनंदे  ।। तेच चांदणे तारे गगनी,  आणिक लता वेली  । पकड येईना टिपण्या सौंदर्य,  परि या वेळी  ।। जागृत केली मम हृदयांतील,  सुप्त जी शक्ति  । अखंडित वाहूं दे शब्द प्रवाह,  हे श्री सरस्वति  ।।   डॉ. भगवान नागापूरRead More

February 05, 2017
Visits : 884

माना न माना !    हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या. त्याचे संकलन व आकलन करणे बुद्धीमान समजल्या गेलेल्या माणसाला देखील आवघड जाऊ लागले. परंतु मानव हा सदा प्रयत्नशील व चौकस असून त्यRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 35292 hits