Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 28, 2016
Visits : 2253

सत्य जीवन   हिशोब तुजला घ्यावयाचा,  मानव दरबारी थोडा, दृष्य केले जे का येथे,  मानव वाचील त्याचा पाढा ।।१।।   अदृष्य सारे कोण जाणती तुजवीण,  ना  कोणी येथे, खरा हिशोब तोच कर्माचा,  पाप असो वा पुण्य मग ते ।।२।।   नीती अनीतीच्या चाकोरीतून,  जाई कुणीतरी असा एकटा, मानवनिर्मित असेल बघून, उचलील तो मग त्यातील वाटा ।।३।।   बाह्यांगाचे कर्म निराळे,  शरिरमनाशी निगडीत ते, अंतकर्मे आत्म्याची जाणे,  बंधन त्यावरी कुणाचे नसते ।।४।।   असेल जे का सत्य तेवढे,  चिटकूनी राही आतRead More

August 28, 2016
Visits : 2802

तृप्त मन   एक भिकारी लीन-दीन तो,   भीक मागतो रस्त्यावरी, फिरत राही एकसारखा,   या टोकाकडून त्या टोकावरी ।।१।।   दिवस भराचे श्रम करूनी,   चारच पैसे मिळती त्याला, पोटाची खळगी भरण्या,   पुरून जाती दोन वेळेला ।।२।।   मिठाई भांडारा पुढती,   उभा ठाकूनी खाई भाकरी, केवळ मिठाईचा आस्वाद,   त्याच्या मनास तृप्त करी ।।३।।   देहाखेरीज कांहीं नव्हते,   त्याचे 'आपले' म्हणण्यासाठी, परि समाधानी वृत्ती असूनी,   कल्पनेतील आनंद लुटी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकरRead More

August 28, 2016
Visits : 251

तृप्त मन   एक भिकारी लीन-दीन तो,   भीक मागतो रस्त्यावरी, फिरत राही एकसारखा,   या टोकाकडून त्या टोकावरी ।।१।।   दिवस भराचे श्रम करूनी,   चारच पैसे मिळती त्याला, पोटाची खळगी भरण्या,   पुरून जाती दोन वेळेला ।।२।।   मिठाई भांडारा पुढती,   उभा ठाकूनी खाई भाकरी, केवळ मिठाईचा आस्वाद,   त्याच्या मनास तृप्त करी ।।३।।   देहाखेरीज कांहीं नव्हते,   त्याचे 'आपले' म्हणण्यासाठी, परि समाधानी वृत्ती असूनी,   कल्पनेतील आनंद लुटी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकरRead More

August 28, 2016
Visits : 3506

विचार, भावना व अंतरज्ञान   विचार, भावना अंतरज्ञान,    संगत असते तिन्हीची यशस्वी करण्याजीवन,    मदत लागते सर्वांची....१   तर्कशुद्धता ठरण्यासाठी,    विसंगतीचा घेई आधार जीवनाचे सत्य उकलण्या,    बुद्धी करीत राही विचार...२,   राग लोभ प्रेमादी गुण,  जीवनाची चमकती अंगे, ‘भावनेचा’ आविष्कार होतां,    एकत्र सर्वां चालण्या सांगे....३,   शोध घेत असता सत्याचा,     अनेक अडचणी येती, सत्य हेच असूनी ईश्वर,    अंतरज्ञान तेच पटविती....४   डॉ. भगवान नागापूरकRead More

August 28, 2016
Visits : 3078

मातृत्वाची कन्येस जाण   आई होऊन कळले मजला,   कष्ट आईचे आज खरे  । स्वानुभवे जे जाणूनी घेई,   तुलना त्याची कोण करे ।।१।।   नऊमास तू जपला उदरी,   क्षणाक्षणाला देऊनी शक्ती  । बाह्य जगातून शोषून सारे,   सत्व निवडूनी गर्भा देती ।।२।।   देहावरी आघात पडता,   झेलूनी घेई सारे कांहीं  । बाळ जीवाला बसे न धोका,   हीच काळजी सदैव राही ।।३।।   संगोपन  करीता करीता,   हासत होती अर्धपोटी तू  । सुखी ठेवण्या सोशीली दु:खे,   कधी न कळला उद्दात हेतू ।।४।।Read More

August 28, 2016
Visits : 1553

दिव्यत्वाची झेप   पंख फुटता उडूनी गेला,   सात समुद्रा पलीकडे, आकाशातील तारका होत्या,  लक्ष्य तयाच्या नजरेपुढे ।।१।।   निसर्गाने साथ देवूनी,  दणकट दिले पंख तयाला, झेप घेत जा दाही दिशांनी,  मनी ठसविले त्या पक्षाला ।।२।।   आत्मविश्वास  जागृत होता,  चिंता नव्हती स्थळ काळाची, कुठेही जाईन झेपावत ,  ओढ त्याला दिव्यत्वाची ।।३।।   निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या, देईन अंगच्या छटा निराळ्या,  चमक दाखवित या जगताला ।।४।।   स्वच्छंदाची नशा मनस्वी,  विसरRead More

August 28, 2016
Visits : 2971

आत्म्याची हाक   उचंबळूनी येतील शब्द,  हृदयामध्ये दडले जे  । संदेश असता सर्वांसाठी,  कुणी न म्हणतील ते माझे  ।। जे जे काही स्फूरूनी येते,  जेव्हा अवचित समयी  । हृदयामधली हाक असे,  ठरते आनंद दायी  ।। ‘आनंद’ आहे कोणता हा,  अन् येई कोठूनी  । अंतर्यामी सर्वांच्या ,  सदैव राही  बैसूनी  ।। बाहेर पडूनी झेप घेई   दूजा हृदयावरी  । तेथेही जो आनंद बैसला.  स्वागत त्याचे करी  ।। पटे मनाला विचार ,  रूचणारा जो असे  । हृदयामधला हाच आनंद,  स्फूर्ती देवता भासे  ।।   डॉ. भगवानRead More

August 28, 2016
Visits : 2322

विश्वामित्राची देणगी   छम छम बाजे पैंजण माझे मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची  ।। धृ ।।   स्वर्गामघुनी आले भूवरी धडधड होती तेव्हां उरी तपोभंग तो करण्यासाठीं आज्ञा होती इंद्राची ।। १।। मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची    तपोबलाच्या सामर्थ्यानी प्रतिसृष्टी बनविली ज्यांनी सत्वहरण ते अशा ऋषीचे परीक्षा ठरली दिव्यत्वाची  ।। २ ।। मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची    भाग्य माझे थोर कसे विश्वामित्राना जिंकले असे मात्रत्वRead More

August 28, 2016
Visits : 2754

अप्पा असे कां वागले ?   खूप जुनी गोष्ट आठवली. मी शाळकरी विद्यार्थी होतो. माझा मित्र दिनू यांच्याकडे माझे जाणे-येणे सतत होते. बाहेर त्याची खोली. आम्ही दोघे मिळून अभ्यास करीत असू. दिनूचा मोठा भाऊ तहसील कार्यालयांत लिपीक होता. त्याच्या घरी आई वडील वहीनी व छोटा पुतण्या होता. वडील बबनराव ज्याना सर्व अप्पा म्हणत. ते शिक्षक म्हणून निवृत्त झालेले होते. शिस्तप्रिय, प्रचंड ज्ञान व माहिती असलेले. सतत जो भेटेल त्याच्याशी गप्पा गोष्टी करणे, तत्वज्ञान सांगणे, नविन गोष्टीवर चर्चा करणे, ह्याची त्याना आवड होती.Read More

August 21, 2016
Visits : 2918

खरे श्रेष्ठत्व   कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला   ।    मानव हा आत्मस्तुती करतो   । कुणा न येती भाषा बोली    ।    हीच गोम हा जाणून घेतो  ।। निसर्गाने उधळण केली  ।  अनेक गुणांची   । मानवाच्या हाती लागली   ।   'कला' कल्पकतेची   ।। विचारांच्या झेपामधूनी  ।    आकाश पातळ गाठले   । प्रगतीच्या ह्या छलांगानी  ।    श्रेष्ठत्व  ठरविले   ।। दुर्बल केले इतर प्राणी  ।   आणि त्यांच्या कलेला   । विचारांना प्राधान्य देऊनी  ।  ज्ञानी तो समजला   ।। मानवा लाभले विचार कल्पना  ।  त्यातून आले शRead More

August 21, 2016
Visits : 4300

झीज   रात्रंदिनी कष्ट करूनी,   झिजवत होता आपले हात, जीवनांतल्या धडपडीमध्यें,   दिसे त्याची स्थितीवर मात ।।१।।   पर्वा नव्हती स्व-देहाची,   झिजवत असता हात ते, जाण होती परि ती त्याला,   हेच कष्ट  जगवित होते ।।२।।   श्रम आणि भाकरी मिळूनी,   ऊर्जा देई तिच शरीराला, ऊर्जेनेच तो देह वाढवी,   समाधान जे मिळे त्याला ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 21, 2016
Visits : 2178

कर्ममुक्ती   न राही तुमचे ते कर्म, ज्यात प्रभू इच्छा अंतीम....१,   प्रत्येक घटनेचे अंग, त्यात मुख्य ईश्वरी भाग....२   तुमच्या मार्फतच होई त्याचा इशारा कोण पाही....३,   सर्व समजे मीच केले अहंकाराने मन भरले....४,   षडरिपू असे साधन खेळविता यावे म्हणून...५,   राग,लोभ, मोह मायादी ठेवती वाटते आनंदी....६,   परि याच्याच शक्तीने प्रभू खेळ चाले युक्तीने....७,   षडरिपू सारे टाळून मुक्ती मिळेल खेळातून.....८   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९Read More

August 21, 2016
Visits : 3161

आठवण   अनामिक जे होते पूर्वी,   साद प्रेमाची ऐकू आली  । योग्य वेळ येतां क्षणी,   हृदये त्यांची जूळूनी गेली  ।।१।।   शंका भीती आणि तगमग,   असंख्य भाव उमटती मनी  । विजयी झाले ऋणानुबंध,   बांधले होते हृदयानी  ।।२।।   उचंबळूनी दाटूनी आला,   हृदयामधला ओलावा  । स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा  ।।३।।   मनी वसविल्या घर करूनी,   क्षणीक सुखांच्या आठवणी  । जगण्यासाठी उभारी देतील,   शरीर मनाच्या दु:खी क्षणी  ।।४।।   डॉ. भRead More

August 21, 2016
Visits : 2319

शबरीचे निर्मळ प्रेम   ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी   ।।धृ।।   व्याकूळ होती राम भेटी, रात्रंदिनी नाम ओठी, नाचूनी गाऊनी भजन करी, ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी ।।१।।   बोरे जमवित चाखूनी वेचली, अंबट तुरट दूर फेकली, भोळ्या भक्तांची प्रभू कदर करी, ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी ।।२।।   उष्टी बोरे प्रभू चाखती, शोषूनी त्यातील रसभक्ती, शबरी त्यांत जी जमा करी, ठेवूनी भक्तिभाव उरी  अर्पिती बोरे शबरी ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपRead More

August 21, 2016
Visits : 2510

देह एक बदलणारे घर   बदलत गेलो घरे मी माझी,   आज पावतो कितीक तरी  । पोटासाठीं नोकरी करतां, भटकत होतो आजवरी  ।।   बालपण हे असेंच गेले,   फिरता फिरता गावोगावी  । वडिलांची  नोकरी होती,   धंदा करणे माहीत नाही  ।।   पाऊलवाट तीच निवडली,   मुलाने देखील जगण्यासाठी  । तीन पिढ्या ह्या चालत राही,   एका मागून एकापाठी  ।।   गेले नाहीं आयुष्य सारे, स्थिर राहूनी एके जागी  । देश वेळ आणि घरे निराळी,   जगलो होतो विविध अंगी  ।।   शरीर देखील असेच आहे, आत्मRead More

August 21, 2016
Visits : 2040

डाग!   कितीही देशी शीतल चांदणेX आनंदाचा ठरुनी मेरुमणी काट्यापरि हा मध्येंच बोचतो डाग तुझा लक्ष्य खेचूनी   ठाऊक नाहीं कधीं कुणाला कसा लागला डाग उरीं पडला असेल चुकून देखील कुणी रंग उधळतां वेड्यापरि   शुभ्रपणाचा मानबिंदू हा डागरहित जीवन त्याचे केवळ एका डागापायीं सत्य झांकाळते कायमचे   मिटून जातां डागही मिटतो उरते मागें सत्य तेवढे परि पुसण्यासाठी डाग एक तो मिटणे उपाय जहाल केवढे   जोवरि जीवन चंद्रा तुझे डाग दिसेल माथ्यावरचा दुग्धामृताच्Read More

August 21, 2016
Visits : 3016

असेही एक गणेश विसर्जन   अमेरिकेतील मिनियापोलीस शहर. अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि अद्यावत अशी बांधणी. नवीन पद्धतीने आखीव असे वसलेले शहर. मोठाले प्रशस्त रस्ते, अनेक सुंदर व आकर्षक बागा, शहराच्या मुख्य भागांत उंच उंच इमारती, स्वच्छपाण्याचा भरपूर साठा असलेले तलाव, शाळा, कॉलेजेस. व्यापारी संकुले, इत्यादी. शहराचा फेरफटका मारताना मनास खुप आनंद होतो. माझा एक मुलगा, कांही वर्षापासून एका कंपनीत तेथे कामाला आहे. पत्नी व दोन मुले हा त्याचा संसार. त्याने त्या ठिकाणी स्वतःला राहण्यासाठी नुकतीचएक वास्तू खरेदी केRead More

August 14, 2016
Visits : 1960

अविवेकी कष्ट   विश्वास होता एक मनी, ते घरटी बांधीत असतांना, कसे सुंदर होईल घरटे,  रंगवित होते कल्पना ।।१।।   खिडकीवरल्या कपारीमध्ये,  शोधला होता एक निवारा, निवाऱ्यात त्या घरटी बांधण्या,  आणीत होते काडीकचरा ।।२।।   उजाडता कुणी खिडकी उघडे,  चिमण्या बांधीत घरटी, सांज समयी बंद झापडे,  ठेवी त्यांना एकटी ।।३।।   नित्य दिनी प्रात: समयी,  कुणीतरी फेकी कचरा समजूनी, चिमण्या बांधीत घरटे पूनरपी,  दिवसभरीचे कष्ट करूनी ।।४।।   किती काळ हे असे चालले,  गेल्या थकूनी चिमण्यRead More

August 14, 2016
Visits : 3591

निनावी गुरू   नव्हतो कधीही चित्रकार,   परि छंद लागला, रंगाच्या त्या छटा पसरवितां,   मौज वाटे मनाला ।।१।।   रंग किमया दाखविण्या,   नव्हता मार्गदर्शक कुणी, गुरुविना राहते ज्ञान अपूरे,   याची खंत मनी ।।२।।   नदीकाठच्या पर्वत शिखरी,   विषण्ण चित्त गेलो, मन रमविण्या कुंचली घेवून,   चित्र काढू लागलो ।।३।।   निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य,   रंग छटा शिकवी, गुरू सापडला चित्र कलेतील,   हाच तो निवावी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknRead More

August 14, 2016
Visits : 2935

पाप वा पुण्य काय ?   काय पुण्य ते काय पाप ते,    मनाचा  खेळ हा ज्यास तुम्ही पापी समजता,    कसा तो तरूनी गेला....१,   कित्येक जणाचे बळी घेवूनी,    वाल्या ठरला होता पापी मनास वाटत होते आमच्या,    उद्धरून न जाई कदापी....२,   मूल्यमापन कृतीचे तुमच्या,    जेव्हा दुसरा करतो, सभोवतालच्या परिस्थितीशी,   तुलना त्याची तो करतो .....३   तेच असते पाप वा पुण्य,    आमच्या अंत:करणा वाटे आतील आवाज सत्यचा,    तोच तुमच्या मनास पटे....४   डॉ. भगवान नागापूरकरRead More

August 14, 2016
Visits : 2747

जीवन प्रवासी   तुझ्या घरी आले विसंबूनी,   तव प्रेमाचे पडतां बंधन  । सात पाऊले टाकीत टाकीत,   सोपविले तव हातीं जीवन  ।।१।।   सरितेमध्ये नौका सोडली, वल्हविण्या हाती दिली  । घेवूनी जा ती नदी किनारी, अथवा डुबूं दे याच जळी  ।।२।।   ऋणानुबंधाच्या या गांठी,   बांधल्या गेल्या पडतां भेटी  । जन्मो जन्मीचा प्रवास सारा, पुनरपि चाले यौवन काठी  ।।३।।   असेच जाऊ दोघे मिळूनी, कांही काळ  एक होऊनी  । काळाच्या ओघामध्ये, हलके हलके जाय मिटूनी  ।।४।।   गतजन्Read More

August 14, 2016
Visits : 2122

शिळा झालोल्या अहिल्या   आजही बऱ्याच अहिल्या,    पडल्या शिळा होऊनी, कांहीं पडल्या वाटेवरी      कांही गेल्या उद्धरुनी ।।१।।   कित्येक होती अत्याचार,     अबला स्त्रीयांवरी, उध्वस्त करुनी जीवन,   शिळा त्यांची करी ।।२।।   काय करील ती अबला,   डाग पडता शीलावरी, दगड होऊनी भावनेचा,   फेकला जातो रस्त्यावरी ।।३।।   भेट होता तिची अवचित् ,   कुण्या एखाद्या रामाची, शब्द मिळता सहाऱ्याचे,    अंकुरे फुटती आशांची ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००Read More

August 14, 2016
Visits : 2369

मन तन बंधन   चंचल मन हे चंचल धारा,  पंख पसरीत उडे भरारा  । झेप घेवूनी उलटी सुलटी,  लक्ष तयाचे चमकत तारा  ।। लुकलुकणारे तारे अगणित,  नभांग सारे प्रसन्न चित्त  । ताऱ्यावरूनी ताऱ्यावरती,  झोके घेते सहज अविरत  ।। वेळ क्षणाचा पुरतो त्याला,  टिचक्या टपल्या मारीत गेले  । आवर घालणे कठीण होता, चटकन निसटून हातून गेले  ।। कोठून येते त्याला शक्ती,  सटकून जाण्याची ही युक्ती  । अन्न पाणी हे कसे घेई ते,  पचनी सारे कसे पडते  ।। हटवादी हे असे केवढे,  नको तिथेची जाय बापडे  । देहाला त्या भRead More

August 14, 2016
Visits : 2774

मन तुझे कां गहिवरले ?   भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ?   शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ?   देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ?   सुर्वणाक्षरीं वाचून गाथा आदर्शमार्गी पडतील पाऊले तव रक्ताचे नाते उसळतां मन तुझे कां गहिवरले ?   डॉ. भगवान नागापूरकर संपरRead More

August 14, 2016
Visits : 2275

क्लिनिकल कॉन्फरन्स Clinical Conference  ही संकल्पना मेडीकल कॉलेज परिसरांत विद्यार्थ्याची सर्वांत आवडती आणि आनंद देणारी. मेडीकल कॉलेजचे स्वतःचे एक हॉस्पिटल असते. अद्यावत, भव्य आणि रोग्यांच्या सर्व सोईनी परिपूर्ण. अनेक वैद्यकीय विषयातील तज्ञ डॉक्टर मंडळी हे प्रमुख आकर्शन असते. ह्या लोकांचा सतत जगातील इतर आरोग्य समस्यांच्या सोडवणूकीतील अभ्यासक्रमाचा संपर्क असतो. ही मंडळी Updated latest medical knowledge बाळगून असतात. रुग्णालयाच्या अनेक वॉर्डामध्ये विवीध प्रकारचे रुग्ण उपचार घेत असतात. रुग्ण, त्यांच्याRead More

August 07, 2016
Visits : 3403

आईच्या प्रेमाचा निरोप   आई तुझे प्रेम, अनंत त्याचे दाम । तुलनेसी ब्रम्हांडी,  जड तुझीच पारडी ।।१।।   पुंडलीक तुझ्यासाठी, विसरला जगत् जेठी, कळण्या तुझ्या प्रेमाचा अर्थ, शब्दांत नाही सामर्थ्य ।।२।।   बलीदानाची तू मूर्ती, 'प्रेमाचे प्रतिक' हीच तुझी कीर्ती, कष्ट करुनी वाढविले छोटे, विसरती तुला होऊन मोठे ।।३।।   सोडीनी एकटे तुजसी, पंख फुटता उडे आकाशी, निरोप देऊन प्रेमाचा, कळस गाठला महानतेचा ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५०Read More

August 07, 2016
Visits : 3957

स्वभाव मालिका   रक्तातुनी गुण-दोष उतरतो,   वंश परंपरेने, व्यक्तीतील स्वभाव धर्म,   जाणता येतो रक्ताने ।।१।।   मनांतील विचार मालिका, कृत्य करण्या लाविती, सभोवतालच्या परिस्थिती रूपे,   रक्ताला जागविती ।।२।।   कर्म फळाच्या लहरींना,    रक्त शोषून घेई, याच गुणमिश्रीत रक्तामधूनी,   बीजे उत्पन्न होई ।।३।।   बीजांचे मग रोपण होऊनी,   नव जीवन येते, स्वभाव गुणांची मालिका,   अशीच पुढे जाते ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkRead More

August 07, 2016
Visits : 2527

ज्ञान देणारे सर्वच गुरू   अवतीभोवती सारे तुझ्या,   आहेत गुरू बसलेले, जाण तयांची येण्यासाठी,    प्रभूसी मी विनविले  ।।१।।   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,    काही तरी असे गुण, आपणासची ज्ञान असावे,    घेण्यास ते समजून  ।।२।।   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,    बघाल जेंव्हां शेजारी, काही ना काही ज्ञान मिळते,    वस्तूच्या त्या गुणापरी  ।।३।।   सारे सजीव निर्जीव वस्तू,    गुरू सारखे वाटावे, तेच आहेत ईश्वरमय,    तुम्हीच ते समजावे  ।।४।।   डॉ. भगवान नागापूरRead More

August 07, 2016
Visits : 2966

बचाव   सरडा चढला झाडावरती, सर् सर् सर्, करीत  । लक्ष्य त्यांचे फूलपाखरू,   फुलाभोवती होते खेळत ।।१।।   भक्ष्यकाची चाहूल मिळतां, भर् भर् भर् गेले उडूनी  । शोषीत असता गंध फुलांतील,   चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।   व्याघ्र मावशी मनी  , म्याँव म्याँव करीत आली  । उंदीर मामा दिसता तिजला,   झेप घेण्या टपून बसली ।।३।।   शंका येता त्याला किंचित,   झर् झर् झर् तो बिळांत गेला  । केवळ चित्त सावध असतां,   प्राण आपले वाचऊ शकला ।।४।।   निसर्ग देतो कला आगळRead More

August 07, 2016
Visits : 2427

तुमचे यशस्वी कर्म   कसा, काय, कोण खेळला    बघत नाही कुणी खेळातील यश अपयशच्या    राहतात फक्त आठवणी   ||१|| मरून गेला नाटककार     नावही गेले विसरूनी जिवंत आहे आजही नाटक    रचिले होते, त्यांनी    ||२|| जगास हवे कर्म तुमचे    नको तुमचे जीवन पशूसही जीवन असते    मरुन जातो तसाच येवून    ||३|| वाल्याने केले खून    लोक विसरूनी जाती रामायण वाचता आज    कौतूक त्याचे करिती    ||४|| वेश्ये घरी राहीलेला,    गेला कालीदास विसरुनी मेघदूत, शाकूंतल वाचता,    महाकवीच्या येई आठवणी    ||Read More

August 07, 2016
Visits : 2491

दर्शनाची ओढ   पांडूरंगाचे दर्शन घेण्या,  गेला पंढरपूरी  । चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी  ।।   आजपरी शरीर दुबळे साथ देईना  । मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना  ।।   आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी  । भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी  ।।   आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे  । अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते  ।।   चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी  । फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी  ।।   गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी  । धRead More

August 07, 2016
Visits : 2319

क्रौंच पक्षाला मुजरा   कारूण्यामधूनी उगम पावला   आद्य काव्याचा झरा वदन करितो क्रौंच पक्षा तुज घे,  मानाचा मुजरा....१, गमविले नाही व्यर्थ प्राण ते,  व्याध बाणा पोटीं टिळा लावला काव्यश्वरीने,  मानाने तुझ्या ललाटी...२, हृदयस्पर्शी जी घटना घडली,  तडफड तव होता कंठ दाटूनी शब्द उमटले,  पद्य रूप घेता....३, उगम पावता काव्य गंगा ही,  वाहू लागली भूलोकी वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा, तुका,  अशांचे आली मुखी....४, काव्य प्रवाह हा सतत वाहे,  किती जणांच्या शब्दामधूनी अंशरूपाने काव्यश्वरी ही,  बRead More

August 07, 2016
Visits : 3732

निसर्गाची अशी एक चेतावणी   दररोज आम्ही वयस्कर म्हणजे सर्वजण सत्तरीच्या पुढे गेलेली, एकत्र जमत असू. गप्पा टप्प्पा होत. आज एकनाथराव फारच मुढमध्ये होते. ते गप्पीष्ट, विनोदी व टर्रेबाज. ते फुलवून  सांगू लागले  " मी आज दोन तरुण स्त्रीया बघीतल्या. अत्यंत सुंदर आकर्षक व नाजूक. माझ्या दुकानांत आल्या होत्या. मला एकदम फक्कड वाटल्या. काय करणार म्हातारे झालो ना. जेष्ठांचे लेबल पाठीमागे निसर्गाने चिटकवले आहे. ते काढू शकत नाही. "  सर्वजण दिलखुलास हासले. मी त्यांच्या गमतीदार प्रसंगावर चिंतन करीत बसलो. हा आणRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 88527 hits