Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 26, 2011
Visits : 4328

गीता – जीवनाची एक उकल रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ// अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते त्याची तूं आहेस अर्जुना सोंगटीRead More

March 23, 2011
Visits : 5553

वेळ- ( TIME ) वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो. वर्तमान काळाला वेळेत मोजता येते कां? वर्ष, महीना, आठवडा, दिवस, तास, मिनीटे, सेकंद, वा सुक्ष्म असे मायक्रो सेकंद यांत. नाही. कोणत्याही वेळेच्या परिमाणांतRead More

March 20, 2011
Visits : 9662

होळीत जाळा दुष्ट भाव एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ// ऐष आरामांत राहून देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती नाना खटपटी आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१// मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार टाकता मलीनता मनाची पेटलेल्या होळीकडे, घे धांव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //२// विसरुनी चाललो मानवता प्रRead More

March 17, 2011
Visits : 5644

दिव्य शक्ति व्याकूळ झाला जीव प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव तुझीया चरणा //१// तेजांत लपले तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले टिपण्या ते रुप //२// निनादाच्या स्वरी तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी ऐकण्या तुझे गीत //३// पुष्पातील सुवास तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास ओळखता तो आनंद //४// मधुर रसाची फळे सर्वात तु बसलास जिव्हेला मात्र न कळे तुझा सहवास //५// स्पर्शांत आहेस तूं माझ्या अवती भवती समज न येई परंतु तुझी अस्तित्व शक्तिRead More

March 15, 2011
Visits : 2090

एक अफलातून व्यासंग एक ज्येष्ठ नागरिक सकाळींच माझ्या घरी आले. मी त्यांचे स्वागत केले. त्यानी आपल्या पिशवीतून एक लहान कुंडी व रोपन केलेले तुळशीचे झाड मला देऊं केले. त्याबरोबर एक छापलेले भेट कार्ड देखील होते. " मला हा छंद आहे. मी हे विकण्यासाठी तुम्हाला देत नाही. एक सदिच्छा भेट म्हणून ही स्वीकारा. मला समाधान वाटेल. माझे सर्वाना आशिर्वाद व शुभेच्छा असतील. " त्यानी कुंडी व कार्ड ठेवले. घायीत असल्याचे सांगुन ते निघून गेले. मी त्या तुळशीच्या रोपाकडे बघू लागलो. ते कार्ड मी वाचले. "तुळशीच्या झाडाचे घरांRead More

March 13, 2011
Visits : 3609

कृष्णजन्मी देवकीची खंत भरल्या ह्रदयी ओल्या नयनी निरोप देई देवकी माता भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. //धृ// आकाशवाणीने बोले श्रीहरी देवकीचे तो येईल उदरी संहार करण्या दुष्टजनाचा ईश्र्वर अवतरे ह्या जगता //१// भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. रक्षक सारे निद्रिस्त केले कारागृहाचे दार उघडले मार्ग दिसे वसुदेवाला परि प्रभू शक्तीचे दर्शन धडता //२ // भगवंताचे रक्षण करण्या, विनवी वेडी माया ममता. उचलून नेई बाल प्रभूलाRead More

March 11, 2011
Visits : 4485

परमेश्वराचे स्वरूप -२ त्या परमेश्वराचे स्वरूप कसे असेल ? हा सर्वसाधारण विचार येत होता. वाचन,मनन आणि चिंतन करीत गेलो. ध्यान धारणेत लक्ष दिले. जो अनुभव मिळाला, जे ज्ञान मिळाले त्याने सर्व प्रश्न तर सुटले नाहीत, परंतु बरेचसे समाधान- आनंद-व शांतता मिळाली. परमेश्वर अनंत, अविनाशी, संपूर्ण आणि सर्वत्र चराचरामध्ये पसरलेला आहे. त्याचे हे वर्णन सर्वांनी एकमुखाने मानले आहे. त्याचे स्वरूप आकाराने वर्णन केलेले नाही. तो निराकार निर्गुण आहे. जे सगुण रूप वर्णन केले ते केवळ मनाच्या केंद्रीत होण्यासाठीचे लक्षRead More

March 09, 2011
Visits : 3483

चंद्राचे कायम स्वरूप ठेवून पाऊल चंद्रावरी अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू शोध घेण्या अंतरीचे // तेच आहे मधुर चांदणे चंद्रातील शितलतेचे / आजही वाटतो आल्हाद बघता रूप पौर्णिमेचे //Read More

March 07, 2011
Visits : 1801

मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप - १ परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे. श्री. भगवद् गीतेमध्ये ईश्वराविषयी जे वर्णन श्री. कृष्णानी केले आहे ते सर्व हिंदू मानतात. तो एक शास्त्रीय दृष्टीकोन असल्यामुळे सर्वत्र मान्यता पावू लागला आहे. एक सत्य (ONE REALITY) हे सर्वोच्च कारण बनले आहे. यातूनच ह्Read More

March 05, 2011
Visits : 2696

थांबव, विज्ञाना तुझे शोध थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद / धृ / उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू, निसर्गातील सुगंध २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध नदीतील संथता ओढ्यातील चपळता धबधब्यातील प्रचंडता रोखलास प्रवाह तू, घालूनी बांध ३ थांब विज्ञाना, नको लावूस शोध शरिराची योजना गुंतागुंतीची रचनRead More

March 03, 2011
Visits : 6640

अन्नासाठी दाही दिशा बास्केट बॉलच्या मैदानावर कुणीही नव्हते. सिमेंटचे साफ प्रशस्त मैदान, सर्व बाजूनी गवताची हिरवळ. नुकतेच पाण्याचे फवारे मारल्यामुळे टवटवीत वाटत होते. मी त्या मैदानावर शतपावली करीत होतो. गवताच्या कडेपासून सिमेंटच्या भागांत एक लांब आळी चालली होती. गवतापासून ती बरेच अंतर दूर गेली होती. त्या सिमेंटच्या भागांत तिला कांही खाण्यासारखे असेल असे वाटत नव्हते. तीच्या चालीप्रमाणे पलिकडचा गवताचा भाग बराच दुर अंतरावर दिसला. मी विचार करु लागतो. अन्न शोधण्याच्या प्रयत्न्यात ती आळी मार्ग भटकली असेल. तीलRead More

March 01, 2011
Visits : 1503

चिमण्यांची भाषा. चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली कौतूक करणारी शब्द मोजके असून देखील भाव दाखविणारी (कविता)Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 51494 hits