Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 31, 2016
Visits : 3482

कष्टाचे मोल   कष्ट करुनी घाम गाळीतो,   शेतामध्यें शेतकरी, समाधानाने मिळते तेंव्हा,  त्यास एक भाकरी ।।१।।   त्याच भाकरीसाठी धडपडे,  नोकर चाकर, कष्टामधूनच जीवन होते,  तसेच साकार ।।२।।   कष्ट पडती साऱ्यांना,   करण्या जीवन यशदायी, विद्यार्थी वा शिक्षक असो,  अथवा आमची आई ।।३।।   अभ्यासातील एकाग्रता,   यास लागते कष्ट महान, त्या कष्टाचे मोल मिळूनी,   यशस्वी होईल जीवन ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 31, 2016
Visits : 5075

आनंदमय जाग   हलके हलके निशा जाऊनी,   उषेचे ते आगमन होई, निद्रेमधल्या गर्भामध्यें,   रवि किरणांची चाहूल येई ।।१।।   त्या किरणांचे कर पसरती,   नयना वरल्या पाकळ्यावरी, ऊब मिळता मग किरणांची,   नयन पुष्पें फुलती सत्वरी ।।२।।   जागविती ते घालवूनी धुंदी,   चैत्यन्यमय जीवन करी, जादूचा हा स्पर्श असूनी,   न भासे किमया दुजापरी ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 31, 2016
Visits : 4596

दु:खात सर्व शिकतो   दु:खातची शिकतो सारे, उघडोनी मनाची द्वारे  । दु:खा परी नसे कुणी,   जो सांगे अनुभवाने  ।।१।।   दु:ख मनावरी बिंबविते, वस्तुस्थितीची जाणीव देते  । दुसऱ्या परि आस्था देई, जाणीव ठेवूनी कार्य करते  ।।२।।   अधिकाराने माज चढतो,   खालच्यांना तुच्छ लेखतो  । जाता हातातूनी अधिकार, माणूसकी काय? हे कळणार  ।।३।।   कष्ट करण्याची वृत्ती येते,    सर्वांना समावून घेते  । श्रीमंतीमध्ये वाहून जाती, आरामाची नशा चढती  ।।४।।   गरीबी शिRead More

July 31, 2016
Visits : 4029

मिष्किल तारे   चमकत होते अगणित तारे, आकाशी लुकलुकणारे । लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,   फसवित होते आम्हांस सारे ।।१।।   कधी जाती चटकन मिटूनी,   केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी । खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी ।।२।।   एक एक जमती नभांगी,   धरणीवरल्या मांडवी अंगीं । संख्या त्यांची वाढतां वाढतां,   दिसून येती अनेक रांगांनी ।।३।।   हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा बिचारा । स्थिर राहूनी लपतां लपतां,   खेळांचा वाढवी पसारा ।।४Read More

July 31, 2016
Visits : 4447

आयुष्य लढा   चोखपणे हिशोब राहू दे,   आपल्या जीवन कर्माचा, कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा ।।१।।   घीरट्या घालीत फिरत राही,  आवतीभवती काळ, क्षणात टिपून उचलून घेतो,   साधूनी घेता अवचित वेळ ।।२।।   सदैव तुमच्या देहाभवती,   त्या देहाचे कर्मही फिरते, आत्मा जाता शरीरही जाई,   कर्मवलय परि येथेच घुमते ।।३।।   पडसाद उमटती त्या कर्माचे,   सभोवतालच्या वातावरणी, वेचूनी त्यातील भलेबुरे ,   मागे राहतील विविध आठवणी ।।४।।   हाRead More

July 31, 2016
Visits : 5000

मशाल   श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर  । विविध नामे परि,  दुर्बलांची करण्या कामे  ।१। अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी  । दैवी शक्ती अंगी,  अंधारी चमकली ठिणगी  ।२। मशाल घेवून हाती,  आला धावत पुढती  । अति वेगाने, सर्वांची उजळीत मने  ।३। कर्म योग आणि भक्ती,  ह्या तीन ईश्वरी शक्ती  । एकत्र जाहल्या,  मशालीत त्या समावल्या  ।४। वाहत्या काळाच्या ओघात,  ते शरीर झाले शांत  । जग सोडूनी, परि मशालीत शक्त ठेऊनी  ।५। ही तीच मशाल घेवूनी,  पुढती चाले दूजा कुणी  ।Read More

July 31, 2016
Visits : 4164

समाधानाची बिजे   दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती   धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा   देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे   भावनेमधली विविध अंगे येऊं लागली मनीं दाटूनी उसंत मिळता थोडी तेव्हां उतरत होती काव्य रुपानी   धुंदीमध्यें सदैव राहूनी लिहीत गेलो सुचले जे जे कRead More

July 31, 2016
Visits : 3970

अशीही एक भेट   १९९७ सालच्या जुन-जुलै चा काळ. आम्ही उभयता कैलास-मानसरोवरच्या यात्रेला गेलो होतो. एकूण ३० दिवसांची खडतर यात्रा झाली. परंतु जीवनामध्ये एक जबरदस्त आठवण निर्माण करुन राहिली. आपल्या धार्मिक द्दष्टीकोणातून ज्या अनेक यात्रांचे वर्णन केले गेले, त्यामधील सर्व श्रेष्ठ अशी ही समजली जाते. आजच्या अधुनिक युगांत देखील, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणे म्हणजे एक भाग्यच वाटते. एक निसर्गरम्य साईटसीईंग ह्या दृष्टीकोणातून ती यात्रा खूपच महत्वाची वाटली. कैलास पर्वताच्या २२ हजार फूट उंचीवर आम्ही गेलो होRead More

July 24, 2016
Visits : 4119

चि. पल्लवीस   भरून आले डोळे जेंव्हां,   कढ मायेचे उचंबळले, हृदयामधल्या भावनेला,   अचानकपणे मार्ग मिळाले ।।१।।   प्रेमळ निर्मळ तसेच सात्वीक,   लोभसवाणे रूप मनोहर, आपुलकीने मने जिंकलीस, आनंदूनी सान थोर ।।२।।   वागणुकीत दिसते किमया,   हवी हवीसची तू सर्वांना, टिकवूनी ठेव गुणविशेष हा,   यशस्वी करील तव जीवना ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 24, 2016
Visits : 4214

आत्म्याचे बोल   काय आणि कसे बोलतो,   त्यांना माहीत नव्हते, सहजपणे सुचणारे,    संभाषण ते असते ।।१।।   शिक्षण नव्हते कांहीं,   अभ्यासाचा तो अभाव, परि मौलिक शब्दांनी,   दुजावरी पडे प्रभाव ।।२।।   जे कांहीं वदती थोडे,   अनुभवी सारे वाटे, या आत्म्याच्या बोलामध्ये,   ईश्वरी सत्य उमटे ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 24, 2016
Visits : 3320

तुझे तुलाच देवून मोठेपण   वेडे आम्ही सारे, तुझेच घेवूनी तुला देतो,    त्यातच मोठेपण मिरवितो...१,   जाण आहे याची सर्व जगाला चकमा देतो,   स्वत:लाही फसविता असतो....२,   फुले बागेमधली तोडून तुजला वाहतो,    हार त्यांचे करूनी घालतो....३,   गंगेतील थोडे पाणी, अर्घ्य आम्ही तुला देतो,    भक्तीभावाने अर्पण करितो....४,   सारे असूनी तुझे, मीपणा हा सतत राहतो,     परी हा भाव दुजासाठी असतो...५   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmailRead More

July 24, 2016
Visits : 4929

स्वच्छंदी जीवन   चिमण्या आल्या दोन कोठूनी,   बांधून गेल्या घरटे  । खेळूनी नाचूनी,  चिव चिव गाणे गात वाटे  ।।१।।   झाडावरती उंच बसूनी,   रात्र घालवी हलके हलके  । दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके  ।।२।।   संसार चक्र  भोवती पडता,   गेल्या दोघी त्यातच गुंतूनी  । नव पिल्लाच्या सेवेसाठी,   घरटे केले काड्या आणूनी  ।।३।।   पिल्लांना त्या पंख फुटता,   उडूनी गेल्या घरटे सोडूनी  । अल्प काळाचे बंधन तोडीत,   जगण्या पुनरपी स्वच्छंदानी  ।।४।।Read More

July 24, 2016
Visits : 4387

तल्लीनतेत आहे ईश्वर   श्रीकृष्णाचे जीवन  बनली एक गाथा, यशस्वी होई तुमचे जीवन  चिंतन त्याचे करिता ।।१।। तल्लीनतेच्या गुणामध्यें   लपला आहे ईश्वर, तल्लीनतेचा आनंद लुटा  शिकवी तुम्हा मुरलीधर ।।२।। बालपणीच्या खेळामध्ये   जमविले सारे सवंगडी, एकाग्रतेने खेळवूनी    आनंद पदरीं पाडी ।।३।। मुरलीचा तो नाद मधूर    मन गेले हरपूनी, डोलूं लागले सारे भवतीं    मग्न झाल्या गौळणी ।।४।। टिपऱ्या घेवूनी नाच नाचला    गोपी साऱ्या जमवूनी, लय लागूनी जातां सारी    संसार गेली विसरूनी ।।५।। राधा तरRead More

July 24, 2016
Visits : 4728

आज-उद्या   'उद्या' साठी जगतो आम्हीं   राहून मृत्युच्या दाढी  । भविष्यांतील सुख कल्पूनी   आज सारे कष्ट काढी  ।।   'आज' राहतो नजिक सदैव    'उद्या' चालतो पुढे पुढे  । आज नि उद्या यांची संगत     कधीही एकत्र न पडे  ।।   कष्ट 'आज' चे शिरीं वाहूनी   ध्येय 'उद्या' चे बघती  । हातीं न कांही पडते तेव्हां     निराश सारे होती  ।।   समाधान  चित्तीं आणण्या   प्रयत्न सारे 'आज'  व्हावे  । 'आज क्षणाला' अस्तित्व असतां   भविष्याला सोडून द्यावे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९०Read More

July 24, 2016
Visits : 3141

चांदण्यातील आठवणी   हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।   आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे सोयरे मित्रमंडळी परसदारी तुळशीजवळी गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घाRead More

July 24, 2016
Visits : 5728

विश्वासातील खोडसाळपणा ?   आमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्या वाचीत असे.              मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार म्हणजे काय ? त्याची अनुभूती, व फळ हे सारे संस्काराने मनावर बिंबवलेले विचार हRead More

July 17, 2016
Visits : 3524

देह देव   हाडे, मांस, रक्ताने, शरीर बनविले छान, सौंदर्य खुलते त्या देहाचे, जर असेल तेथे प्राण ।।१।।   प्राण नसे कुणी दुजा हा, परि आत्मा हेची अंग, विश्वाचा जो चालक, त्या परमात्म्याचा भाग ।।२।।   ईश्वरी सेवा, संकल्प मनीं, प्रेमभरे देह भजावा, अंतर बाह्य शुद्धता राखी, समर्पणाचा भाव असावा ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 17, 2016
Visits : 3702

'अ' ते 'ज्ञ'  चा मार्ग'   अ,आ,इ,ई,उ,ऊ, गिरवित, पाटी पुस्तक हातीं घेतले । ह,ळ,क्ष,ज्ञ, करुनी शेवटीं, खरेच मजला ज्ञान मिळाले ।।१।।   आरंभातील ' अ ' शिकूनी, अहंकार  जागृत झाला । तो तर राजा षडरिपूंचा, ज्ञानास त्याने दूर सारला ।।२।।   अज्ञान- राज्यामघ्यें भटकतां, स्वतःशी गेलो विसरुनी । ज्ञानी झालो आहोंत आपण, समजे चार पुस्तके वाचूनी ।।३।।   हलके हलके पुढे चाललो, 'अ' 'आ'  सोडूनी 'क्ष' ज्ञ' पर्यंत । ज्ञान प्राप्त  मज जहाले, अंहंकाराचा होऊनी अंत ।।४।।Read More

July 17, 2016
Visits : 3177

नाभी केंद्रांत आत्मा   आत्मा कोठे असतो,      नाभी केंद्रात शोधाल का ? तो तर दिसत नसतो,      मग त्यास जाणाल का ?....१,   सर्व इंद्रिये वापरली,      परि न झाला बोध, कोठे लपला आहे,    न लागे कुणा शोध....२,   विचार आणि भावना,      संबंध त्याचा ज्ञानाशी मेंदूत आहे इंद्रिय,     संपर्क त्यांचा सर्वांशी....३,   मेंदूवरी ताबा असे,   नाभीतील मध्य बिंदूचा समजून घ्या सारे,   तेथेच आत्मा देहाचा...४,   मातेचे अपूर्व देण,     बाळाच्या नाभीत जमते,Read More

July 17, 2016
Visits : 4949

निसर्गाचे मार्ग   आखून देतो निसर्ग सदा, मार्ग जीवनाचे  । त्या वाटेवरी चालत रहा,   आवाहन त्याचे ।।१।।   चालत राहती जे जे  कुणी, त्यावरी विसंबूनी  । यशस्वी होती तेच जीवनी,   समाधान लाभूनी ।।२।।   कर्ता समजूनी काही काही,   अहंकारी होती  । सुख- दु:खाच्या चक्रामध्ये,   तेच सापडती ।।३।।   भटकत जाती भिन्न मार्ग,   काही कळापरि  । परिस्थितीचे चटके बसता,   येती वाटेवरी ।।४।।   हिशोबातील तफावत ही,   दु:खाचे कारण  । नजीक जाता आखल्या मार्गी,Read More

July 17, 2016
Visits : 4659

श्रीकृष्णाचे जीवन   जीवन होते कृष्णाचे आगळे    विविधतेनें भरलेले सगळे, गूढ, घनदाट जंगलापरी    सारे पैलू साकार करी ।।१।।   जंगलामध्यें झाडे वाढती    छोटी छोटी झुडुपे उगवती, पसरे सर्वत्र वेलींच्या जाळी   जल सांचूनी बनली तळी ।।२।।   गोड, आंबट, तुरट फळे    सुंगधी तशीच उग्र फुले, राघू, मैना, ससे, हरणे    तसेंच हिंस्र पशूंचे फिरणे ।।३।।   जंगल दिसते भरलेले पूर्ण    बरे वाईट यांचे चूर्ण, कृष्णाचे जीवन तसेंच नटलेले    चोर ते संतापर्यत गेलेले ।।४।।   चोरी केली, खोडRead More

July 17, 2016
Visits : 3725

चाकोरी   नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  । कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।।   कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  । कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।।   जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  । काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  ।।   परिस्थितीच्या काठामधूनी    जीवन सरिता वाहात जाते  । वाहात असता त्याच दिशेनें    इच्छीत ध्येय हातीं नसते  ।।   होते सारे अखेर तेचि    आखून ठेवते नियती जेRead More

July 17, 2016
Visits : 3138

हें माणसा !   मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ 'विवेकशक्ति' असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न कळे श्वास घेऊनी वस्तू शोधतो  मानवाला चकीत करतो श्वानाचा तूं घेसी उपयोग    हाच तुझा पराजयाRead More

July 17, 2016
Visits : 3487

मृत्युची चाहूल                         मृत्युबद्दल अनेक प्रचलीत समज वा गैरसमज आहेत. मुख्यतः मृत्युच्या भयानकते विषयी बरेच कांही ऐकले होते. मृत्युसमयी व्यक्ती अत्यंत त्रासाने ग्रासलेला असतो. एक हजार विंचवांचा दंश व्हावा, इतक्या  वेदना ग्रस्त होतो. शिवाय मृत्युचा त्रास हा त्याच्या पाप-पुण्याच्या ( ?) तथाकथीत हीशोबोशी संबंधीत असतो. यमदूत येतात, यमाचा फास अवळला जातो. प्राण खेचला जातो.  ... इत्यादी .. इत्यादी. सर्व साधारण सामान्यजन मृत्यु प्रक्रियेबद्दल खऱ्याअर्थाने अज्ञानी असतो, असे दिसून येते. त्यRead More

July 10, 2016
Visits : 3591

संत संगती   ललाटी ज्यांच्या जे जे लिहिले, संत जाणती दिव्य दृष्टीने, नियतीच्या ह्या हलचालींना, दिली जाती आवाहने ।।१।।   जाणून घेता भविष्यवाणी, जीवन मार्ग हे ज्यांना कळती, तपशक्तीने संत महात्मे, योग्य मार्ग ते दाखवूनी देती ।।२।।   कर्माने जरी भाग्य ठरते, सुख दुखःच्या गुंत्या भोवती, त्या गुंत्यातील धागा शोधूनी, सुसाह्य त्याचे जीवन करीती ।।३।।   कृपा होता संत जनाची, चुकला-मुकला जाई ठिकाणी, घनदाट त्या जंगलामधली, पाऊलवाट ते देई दाखवूनी ।।४।।   डRead More

July 10, 2016
Visits : 5215

विस्तृमी जगवी आनंद   स्मृतिदोषचि आम्हां शिकवी,  जीवन सुसह्य बनविण्याते, अटळ असूनी प्रसंग कांहीं,   दुर्लक्ष करीतो त्याते ।।१।।   माझ्यातची ईश्वर आहे,  आम्हास जाणीव याची नसते, शोधांत राहूनी त्याच्या,  जीवन सारे फुलत राहते ।।२।।   मृत्यू घटना कुणा न चुकली,  परि आठवण येई न त्याची, विस्तृत योजना मनी आंखतां,  काळजी नसते पूर्णत्वाची ।।३।।   विसरूनी जाऊनी त्या मृत्यूला,  जीवनांत तो रंग भरी, प्रेम करीतो जीवनभर,   देह असला नाशवंत जरी ।।४।।   डRead More

July 10, 2016
Visits : 4920

प्राणवायू – शिवशक्ती   सारेच आहे प्रभूमय, अणूपासून ब्रह्मांड होय...१, ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा, आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२, सर्वत्र व्यापले आकाश, न जाणती त्याचे पाश, ....३, वायूचा होवून संचार, जीव जंतू जगविणार....४ वायू असे शक्तीचे रूप, पेटवी तो प्राणदीप....५, प्राण आपल्या अंतरी, तेच असे रूप ईश्वरी....६ जसे शिव आणि शक्ती, तसे प्राण व वायू असती...७, बाहेरची वायू शक्ती, अंतरिच्या प्राणास भेटती....८, जाता दोन्ही एक होवूनी, चेतना मिळते जीवनी...९   डॉ. भगवान नागापूरकरRead More

July 10, 2016
Visits : 5222

निसर्गाचे मार्ग वेगळे   मार्ग निसर्गाचे सदा, निश्चित आणि अढळ  । चालतो त्याच दिशेने,  जसजशी येते वेळ ।।१।।   चालत आसता थांबे,  भटके वाट सोडूनी  । करूया काही आगळे  ठरवी  विचारांनी ।।२।।   आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे  । नियतीची वाट मात्र,  त्या दिशेने जात नसे ।।३।।   परिस्थितीचे कुंपण,  टाकले जाते भोवती  । कळत वा नकळत,  मार्गी त्यास खेचती ।।४।।   करून घेतो निसर्ग,  वाटते त्याला हवे जे  । अकारण तुम्हा वाटते,  हे तर आहे माझे ।।५।।   जीवनाच्या सांजवेळी,Read More

July 10, 2016
Visits : 3132

मग्न असलेले जग   मलाच वाटे - - जग मजलाच हांसते, विचार करिता कळले,  --  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग, ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी, आपल्यातच जग जगते, विचार करिता कळले,  --   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे, उगाच होई भास मजला,    मनाचा हा खेळ जहाला, बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते, विचार करिता कळले ,  --  जगास फुरसत नसते  ।।२।।   श्रीमंतीची कुठे झलक,Read More

July 10, 2016
Visits : 4355

तूच माझा ईश्वर   मनांत ठसले रूप तुझे,  येते नयना पुढे  । रात्रंदिन मज चैन ना पडे.....।।धृ।। शरीर जरी सुंदर मिळे  । प्रयत्नांनी तूंच कमविले  ।। चपलता ही छाप पाडीते  । लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे  ।१। हासणे खेळणें आणि चालणें  । 'ढंगदार'  तुझे बोलणे  ।। शरीरामधल्या हालचालींना  । सहजपणाचे वळण पडे मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे....।२। स्वभाव आहे जरी मृदू तो  । प्रसंग पडतां कठीण भासतो  ।। सज्जना पुढती नम्र दिसूनी  । दुर्जना शिरीRead More

July 10, 2016
Visits : 3989

उदरांतील शेषशायी   मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन   शेषशायीचे चित्र बघतां,  साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल   शेषापरी वेटोळे असुनी,  ' नाळ ' तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें,  बालक ते निद्रिस्त असती   बालकाच्या नाभी मधुनी,  येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी,  ब्रह्मापरी दिसे अंग   ' सो हं ' निनादुनी सांगे,  ' मीच तोच ईश्वर आहे ' चुकीचा समज करुनी,  तयास सागरीं पाहे   विवीधतेनें सुचवी,Read More

July 10, 2016
Visits : 5177

दहा बोटे- दहा वर्षे !   आम्ही सकाळी उठतांच ईश्वराचे स्मरण करतो. रात्रभर त्याने आमचे संरक्षण केले ह्याचे आभार मानतो. आम्ही आपली बोटे चाळवतो. ' कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम '  ही प्रार्थना म्हणतो. एक समज आहे की ईश्वराने आपणास प्रत्येकाला शंभर वर्षाचे आयुष्यमान दिलेले असते. खाणे, पिणे, झोपणे, फिरणे, गप्पा करणे, व्यायाम, दुखणे-खुपणे, शिक्षण, शाळा कॉलेज, नोकरी, व्यवसाय, संसार, मुले, नातवंडे, इत्यादी हे सर्वसाधारण जीवनाचे चक्र. त्यातील त्याच्याचRead More

July 03, 2016
Visits : 3259

आत्म्याचे मिलन   आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 03, 2016
Visits : 4744

सर्वांची काळजी   मुसळधार वर्षा चालली,   एक सप्ताह  होऊन गेला, पडझड दिसली चोहीकडे,   भरुन वाहे नदी-नाला ।।१।।   काय प्रयोजन अतिवृष्टीचे ?   हानीच दिसली ज्यांत खरी, निसर्गाच्या लहरीपणानें,   चिंतीत झाली अनेक बिचारी ।।२।।   दूरदृष्टी माझी मर्यादेतच,   विचार तिजला अल्प घटकांचा, विश्वचालक काळजी करि,   साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 03, 2016
Visits : 4935

सुख दु:खाचे चक्र   सतत फिरे चक्र निसर्गाचे सुख दु:खाचे...१, एका मागूनी दुसरा असती पाठोपाठ येती...२, प्रत्येक वस्तूची छाया असते पाठलाग करीते....३, सुखाचे जाता काही क्षण आनंदी समाधानाची होई गर्दी....४ लगेच अनुभव येतो दु:खाचा काळ जाई निराशेचा...५, पुनरपी येता सारे सुख विसरूनी जातो दु:ख....६, जे होत असते ते बऱ्यासाठी म्हणती समाधाना पोटी...७, समाधान शोधणे हेही सुख त्यातच  जगती अनेक...८   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 03, 2016
Visits : 5376

स्वप्न मजला आवडते   ये ! प्रियकरा स्वप्नात माझ्या, स्वप्न मजला आवडते भावते कल्पनेचे राज्य जरी, आनंददायी वाटते....II धृ II तव प्रतिमा मनी बसवली, आठवण सदैव येऊ लागली  । जागेपणी मिळे न मजला, स्वप्नी सारे तेच अनुभवते.......१               स्वप्न मजला आवडते , पूर्णत्वाचे सुख आगळे, जीवन प्रवाही येती अडथळे  । हवे हवेसे मनी ठरवी ते, केवळ स्वप्नची मिळवूनी देते....२                 स्वप्न मजला आवडते , कल्पना, भाव- तरंगे उठूनी, रात्री गेल्या कित्येक रंगूRead More

July 03, 2016
Visits : 3276

अतृप्त भूक   चंद्रा तुझे रूप कसे रे,   गोंडसवाणे छान, टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान ।।१।।   मधूर शुभ्र नभी चंद्र ,   जणू चांदीची थाळी, अगणीत वाट्या विखूरलेल्या,   दिसे भोवताली ।।२।।   टपोर चांदणे वाहूनी जाते,   त्या थाळीमधूनी, स्वाद लुटता धुंद होतो,   घेता झेलूनी ।।३।।   रिक्त होते एक वाटी, भरूनी जाई दुजी, प्राशन करीता सीमा नसे ,   आनंदा माजी ।।४।।   अतृप्त सदा मन तरीही,   त्या चांदण्यापाई, आतुरतेने दुजा रात्रीची,   सRead More

July 03, 2016
Visits : 5729

काव्य कलश   ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा  । उपसतो जरी सतत,   होत नसे निचरा  ।।   गोड पाणी शब्दांचे,   ओठी अमृत वाटे  । पेला भरता काठोकाठ,   काव्य हृदयी उमटे  ।।   पेला पेला जमवूनी,   कलश भरून आला  । नाहून जाता त्यात,   देह भान विसरला  ।।   सांडता पाणी वाहे,   परसते चोहीकडे  । आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर  ९००४०७९८५०  bknagapurkar@gmail.comRead More

July 03, 2016
Visits : 3087

ज्येष्ठांचा अनुभवी सल्ला   आम्ही ज्येष्ठ नागरिक. आयुष्याची ६०-७०-८० वर्षे वा त्याहून आधीक काळ जीवन यात्रेमध्ये घालविली. सुख दुःखाचे अनेक चढउतार बघीतले. प्रसंग अनुभवले. ज्ञानापेक्षाही अनुभव श्रेष्ठ असतो हे जाणले. बोल सारे अनुभवाचे     त्या बोलीची भाषाच न्यारी सुख दुःखाच्या गुंत्यामधला     अर्थ सांगतो कुणीतरी. काळाप्रमाणे व परिस्थितीनुसार विचार आणि वागणे बदलते. आमचा काळ व आजचा काळ ह्यातील तफावत जी जाणवली त्यावर  ज्येष्ठ नागरिकाचा अनुभवी सल्ला.   उगाच नाही झालेRead More

July 03, 2016
Visits : 3846

ऑपरेशन थियेटरमधला १ ला दिवस   मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी  M.B.B.S.  पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे प्राथमिक विषय ( Anatomy-Physiology ) व नंतरचे ३ वर्षे, क्लिनिकल विषय सर्जरी-मेडिसीन गायनिक इत्यादी. स्टेथॉसकोप प्रथमच गळ्यांत लटके. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला आपण डॉक्टर होत असल्याचची जाणीव त्याक्षणीच होत असे.रोग, निदान, आणि उपाय ह्या मालिकांना आरंभ होत असे. सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया ह्या विषया बद्दल एक वेगळेच कुतूहल होते. डॉ. विक्रम मारवा हेRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 169543 hits