Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 31, 2011
Visits : 4123

नदीच्या पाण्यातील ओंडके. अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. नजरा नजर झालीच तर हाय म्हणणे. एकदम एकलकोंडे. स्वतःमध्येच राहून मनाला बंदीस्त कप्यात ठेवण्याची, कुणीही कांही न बोलण्याची विलक्षण स्वभRead More

October 27, 2011
Visits : 4345

चि. मानसीस ( दिड वर्षाच्या नातीस ) थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने ( कविता ) डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

October 24, 2011
Visits : 2879

मानव-जग-परमेश्वर शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते. एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर घरांत पेटीत डबीत आणि सुक्ष्म अशा अणूमध्येही. पोकळी तेथे हवा अर्थात आकाश. विशाल वा सुक्ष्म. ह्याच माध्यमातून जगातल्या सर्व वRead More

October 20, 2011
Visits : 5214

आनंदात गाऊं प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ// बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य आकाशांत पाहूं //३// प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ निरभ्र आहे आकाश पौर्णिमेचा पडे प्रकाश एक दिलानें एक मनानें नाचत ताल धरूंRead More

October 15, 2011
Visits : 3404

अमेरिकेतील एक - - Dating Center (डेटींग --- मनाची उकल संकल्पना )                             अमेरीकेत मुलाकडे सहा महीन्याचा मुक्काम होता. रोज सकाळी मुलगा ऑफिसला जाताना मला जवळच्या वाचनालयांत सोडून देत असे. माझी सून मला तीन तासाने घेण्यासाठी येई. दररोजचा हा कार्याक्रम शिस्तबध्द चालू होता. एक दिवस कादंबरी वाचून संपली. वाचण्याचा कंटाळा आला. आणखी एक तास तेथेच थांबणे गरजेचे होते. थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. समोर बाग होती. तेथे फेर फटका मारला.                 बागेच्या दुसऱ्या टोकाRead More

October 11, 2011
Visits : 4872

आनंदी किटक.   सहसा घर सोडून जाण्याचा प्रसंग येत नसे. त्यामुळे दैनंदिन चालणारय़ा गोष्टीमध्ये बाधा येते ही खंत. असेच १५ दिवस घर बंद करुन सर्वानाच गांवाकडे जाणे भाग पडले. आज घरी परत आलो. घर सारे कड्या कुलपे लाऊन बंद करुन गेलो होतो. दारे उघडताच एक उग्र वास दरवळत असल्याचे जाणवले. थोडीशी मोकळी हवा येताच सर्व हवेचे वातावरण पूर्ववृत होऊ लागले.                     वयानुसार दररोज देवपूजा हा एक परिपाठ होता. जीवनाच्या व्यवहारामध्ये अर्धातास देवपूजेसाठी राखून ठेवला होता. केवळ समाधान व मनःशांती मिळण्यासाठीRead More

October 07, 2011
Visits : 4953

खोटा शिक्का कसे आले कुणास ठाऊक, नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगीं, खोटा खिक्का येती // प्रयत्न सारे व्यर्थ जाऊणी, कुणी घेइना त्यातें कसा आला नशिबी, निराशा मनीं येते // अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी, तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपाया, अंधाचे हाती दिले // मनी चरकलो शब्द ऐकूनी, त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी, यश येईल तिकीटाचे // केवळ त्याने स्पर्श करुनी, जाणले माझे नशीब भाग्यवान ठरवूनी सांगे, मिळेल धनलाभ // खोटा शिक्का घेऊन देखील, शब्द बोलला प्रेमRead More

October 03, 2011
Visits : 3079

मी हे करीत नव्हतो   चार वर्षानंतर माझी मुलगी माहेरी आली होती. व्यवसायात व्यस्त असल्यामुळे तीला येणे जमले नव्हते. माझ्या नातीला म्हणजे तीच्या मुलीला घेऊन ती येणार असल्यामुळे, आम्ही सर्वजण उत्सुक होतो. मी आरामखुर्चीवर बसून त्यांची वाट बघत होतो. बेल वाजली. त्या दोघी सामानासहीत आल्या.                      नातीने आत येताच माझ्याकडे कटाक्ष टाकून " हाय " म्हणत स्मित केले व ती आत बाथरुममध्ये गेली. हात पाय धुऊन Fresh झाली व बाहेर आली. " हाय आजोबा "  म्हणत माझ्या जवळ आली. आपला हात पुढे करीत शेक हँडRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 32869 hits