Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 31, 2014
Visits : 2390

कृष्ण कमळ-   आरसा   दाखवितोस हूबेहूब रुप    आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी    चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी    दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां   तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे    मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी    हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे    मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी   चांगला बनवी माणसा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 31, 2014
Visits : 2012

बागेतील तारका-   अजाणतेतील अपमान   स्फुर्ति येऊन कविता केली   आनंद झाला मनीं   । चटकन कागदावरी लिहीली   शब्द येतां ध्यानी   ।।   कवितेतील शब्दरचना   झाली बहरदार   । कौतूकाची येई भावना   बघुनी शब्द भांडार   ।।   पुर्ण करुनी कविता    टिपूनी घेतली वहीत   । काव्य रचना परत वाचतां   मग्न झालो आनंदात   ।।   फेकूनी दिला कागद    ज्यावरी रचिली  कविता   । विचारांत होतो धुंद    कृत्य केले मी अजाणतां   ।।   अघटित घटना झाली   काव्य स्फुर्ति गेली निघूनी   । नंतरRead More

August 31, 2014
Visits : 1617

जीवनाच्या रगाड्यातून   ऑपरेशन थियेटरमधला १ ला दिवस   मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी  M.B.B.S.  पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे प्राथमिक विषय ( Anatomy-Physiology ) व नंतरचे ३ वर्षे, क्लिनिकल विषय सर्जरी-मेडिसीन गायनिक इत्यादी. स्टेथॉसकोप प्रथमच गळ्यांत लटके. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला आपण डॉक्टर होत असल्याचची जाणीव त्याक्षणीच होत असे.रोग, निदान, आणि उपाय ह्या मालिकांना आरंभ होत असे. सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया ह्या विषया बद्दल एक वेगळेच कुतRead More

August 24, 2014
Visits : 1593

कृष्ण कमळ-   धन्य ती महाराष्ट्र माऊली !   धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//   ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली     //२// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   संवाद करुन विठोबाशी,Read More

August 24, 2014
Visits : 3514

बागेतील तारका-   व्यर्थ झगडे   सारे धर्म मानव निर्मीत त्यांतच आणली जात पात   ।। सर्व धर्म महान तत्वज्ञानाची असे खाण   ।। प्रत्येकाचा धर्म निराळा जन्मताचि मिळाला   ।। व्यर्थ का भांडता धर्मावरुन तो तर मिळाला जन्मापासून   ।। भेदभाव जावे विसरुन त्यातच सर्वांचे कल्याण   ।। स्वधर्म तत्वे पाळा घरांत बाहेर एक मानवधर्म सर्वांत   ।। मानवधर्म फक्त मानवता त्यांतची मानवाची श्रेष्ठता   ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 24, 2014
Visits : 3075

जीवनाच्या रगाड्यातून   वाचनाललयाचा एक अप्रतीम अनुभव   अमेरिकेत बराच काळ वास्तव्यात होतो. मुलाकडे कांही महिने राहण्यासाठी गेलो होतो. दुरदर्शनावरिल बातम्यावरुन महाराष्ट्रामध्ये घडणारय़ा घटना कळत होत्या. Shiwaji Hindu King in Islamic India by James W. Laine  ह्या पुस्तकाच्या लिखानावरुन सामान्य जनतेमध्ये संतापाची भवना निर्माण झाली होती. मी पण हे सारे वाचून बेचैन झालो होतो. एका परकिय लेखकाने शिवाजीमहाराजा संबंघी लिहीलेले वादग्रस्त लिखान काय असावे हे समजण्याची उत्सुकता वाटू लागली. मी जवळच अRead More

August 18, 2014
Visits : 1596

कृष्ण कमळ-   मुंगी   मग्न राही सतत   आपल्याच कामीं अन्नासाठी तूं    फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण    एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव    दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला   वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे     राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण    दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय      नसे ह्या जीवना   डॉ. भगवान नागापूरकर ६७- ०३०१८४Read More

August 18, 2014
Visits : 2575

बागेतील तारका-   भावनांची घरें   घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी   ।।धृ।। वास्तुकला सुंदर   रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार  परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी   ।।१।। ही घरे भावनांची    त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची    जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो  निरखूनी   ।।२।। राग लोभ अहंकार   मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार   शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी    ।।३।। दया क्षमा शांति   प्रेम आनंद उल्हासती आदर भावांची वसती   विवेक बुद्धीने शोRead More

August 18, 2014
Visits : 1750

जीवनाच्या रगाड्यातून   जेव्हां शिष्य गुरुची भूमिका करतो.   वैद्यकीय क्षेत्रातील अँलोपँथिक ( Allopathic Medical Science ) शास्त्राच्या डिगरय़ा व शासकीय रजिस्ट्रेषन झालेले होते. नुकताच मी दवाखाना सुरु केला होता. रोगांची हजेरी व वरदळ चांगला आकार घेऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगा माझ्या दवाखान्यांत आला. " माझ नांव तरुणकुमार तिवारी. माझे वडील येथे मॉडेला कंपनीत नोकरीला आहेत. मला तुमच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम मिळेल कां ? "  मी त्याच्याकडे बारीक नजरेने बघीतले. चेहरय़ावरुन मला तो अतिशय सज्जन, समजदारRead More

August 10, 2014
Visits : 1372

कृष्ण कमळ-   स्फूर्ती दाता   तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी     डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gRead More

August 10, 2014
Visits : 1346

बागेतील तारका-   प्रभू मिळण्याचे साधन   ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।।   अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।।   अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।।   सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।।   यंत्र असे साधन   जाणण्या कांहीं गोष्टी इंद्रियाना मर्यादा असूनRead More

August 10, 2014
Visits : 3982

जीवनाच्या रगाड्यातून-   भूतदया   एका थोर विचारवंताचे पुस्तक वाचत होतो.  दया  ह्या गुणधर्मावर त्यांचे भाष्य मनाचा ठाव घेणारे होते. सर्व प्राणीमात्र जीवजंतू झाडे झुडपे वृक्षलता इत्यादी. ज्यांच्यामध्ये जीवंतपणाचे लक्षण असते त्यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये दयाभाव खोलवर रुजला असतो. ह्य़ाच भावनेमधून प्रेम जिव्हाळा सख्य ह्यांचे अंकूरण होत असते. समाधान तेथेच मिळते.                   अचानक एक प्रसंग डोळ्यासमोर आला. गावाकडे जात असतांना, आमची गाडी नादुरुस्त झाली. रस्त्याच्या एका झाडाखाली जवRead More

August 03, 2014
Visits : 766

कृष्ण कमळ-   स्फूर्ती दाता   तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी     डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gRead More

August 03, 2014
Visits : 726

बागेतील तारका-   संतुलन   आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास पुरक निसर्गचक्र शोधते   संतुलन त्यांत एक   ।।   डॉ. भRead More

August 03, 2014
Visits : 4920

जीवनाच्या रगाड्यातून- आषाढी एकादशी यात्रा- एक विचार.   आषाढी एकादशी. पंढरपूरची एक भव्य दिव्य यात्रा. पावसाळ्याची सुरवात. कदाचित् त्यावेळी मुसळघार पाऊस पडण्याची शक्यता असते. त्या वातावरणांत दिवस काढण्याची, राहण्याची अत्यंत गैरसोय, सर्वत्र ओलावा असतो. कॉलरा हगवण ह्या रोगांच्या फैलावाची भिती. सर्व कांही भयावह आणि निराशजनक परिस्थिती. तरी देखील ह्या सर्व बाबिना तोंड देत, प्रचंड जनसागर कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता पंढरपूरला जमा होतो. केवळ त्या विठोबाचे दर्शन घेण्यासाठी. काय मिळते त्याना शRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 33234 hits