Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 30, 2015
Visits : 772

त्यांची शाळा   आंस लागली मजला, बघून याव्या त्या शाळा ।। देहू, आळंदी, परिसर, जाऊनी तो धुंडाळला ।।१।।   कोठे शिकले तुकोबा, ज्ञानोबांना ज्ञान मिळे ।। साधन दिसले नाहीं, परि तेज भासे आगळे ।।२।।   विचार झेंप बघतां, आचंबा आम्हां वाटतो ।। कोठून शिकले सारे, मनी हा प्रश्न पडतो ।।३।।   त्यांची शाळा अतर्मनीं, गंगोत्री ज्ञानाची ती ।। वाहात होती बाहेरी, पावन करी धरती ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 30, 2015
Visits : 3472

सदृढ शरीरी चिंतन   योजना तुमची चुकून जाते,  जीवनाच्या टप्प्याची  । अखेरचा क्षण जवळीं येतां,  आठवण होते त्याची  ।। जोम असतां शरीरीं तुमच्या,  करीता देहासाठीं  । वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता,  ईश चिंतना पोटीं  ।। गलित होऊनी गेली गात्रे,  अशांत करी मनां  । एकाग्रचित्त होईल कसे तें,  मग प्रभू चरणां  ।। दवडू नका यौवन सारे,  ऐहिक सुखामागें  । त्या काळातील प्रचंड ऊर्जेस,  लावा सत्कर्मे  ।। सदृढ असते शरीर जेव्हां,  एकाग्र करा चित्त । मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांतRead More

August 30, 2015
Visits : 4644

यशासाठी प्रयत्नाची दिशा प्रयत्न करितां जीव तोडून,  जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२ चूक दिशेने प्रयत्न होतां,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन...३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले तुमचे हातीं प्रयत्नाची दिशा बदलतां,  जुळून सहजच सारे येती...४ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९Read More

August 30, 2015
Visits : 940

संशयी मन   भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट  चालत होता  । कुणीतरी आहे मार्गदर्शक,  यापरी अजाण होता  ।। बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी  । आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी  ।। संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें  । विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे  ।। ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुराऊनी  । जागृत होता पुनरपि विश्वास,  संशय जाई दूर पळूनी  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 30, 2015
Visits : 3000

ध्यानाने काय साधले   ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।।   संसारांत रमलो    मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे   समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी   जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी   धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।। हेच साधले ध्यान लावूनी   एकाRead More

August 30, 2015
Visits : 537

सदैव नामस्मरण   प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा  । ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा  ।। चमत्कार दिसून आला एके दिवशी  । राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी  ।। विज्ञानाने उकल केली या घटनेची  । खात्री करिता सत्यता पटली याची  ।। चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे  । त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे  ।। शब्दांचे वलय फिरती देहाभोवती  । शरीरासाठी तेच शब्द कवच बनती  ।। जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत  । शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत  ।। हुंRead More

August 30, 2015
Visits : 568

ज्ञानाग्नि पेटवा   हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी   लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो   चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत   संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे   उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 30, 2015
Visits : 990

जगरहाटी !   काळचक्रामध्ये  दैनंदिनीच्या अनेक गोष्टीत बदल  होत चाललेले दिसतात. काही बदलांनी  तर वेगळ्याच वातावरणाची निर्मिती झाल्याचे दिसून येते. केव्हा केव्हा काही गोष्टी फक्त एक इतिहास म्हणून शील्लक राहतो. असल्या काही गोष्टी पूर्वी झालेल्या असतील, व होऊ शकतात ही शंका देखील मनांत येत नाही. कारण समाज कौटुंबिक रचना, व बाह्य  वातावरण  बदलले असते.   साधी बाब बघा. मुलांची नावे. ही ठेवताना साधारण पौराणिक कथामधील देवादिकांची नावे ठेवण्याची प्रथा होती. जसे नारायण, त्रिंबक, भास्कर, भगवान, महादेव, अथवा साविRead More

August 23, 2015
Visits : 2219

जीवन परिघ   एक परिघ ते आंखले आहे विधात्याने विश्वाभोवतीं जीवन सारे फिरत असते एक दिशेनें त्या वरती   १ वाहण्याची क्रिया चालली युगानुयुगें या जगतीं कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा एकांच परिघात सारे फिरती   २ जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी   ३ मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित कुणी करी जगाला परिघ सोडूनी जाण्यासाठीं दिसत नसे मार्ग कुणाला   ४ प्रयत्न तुमचा सदा असावा मध्यबिंदूकडे तो सरकण्याचा शक्Read More

August 23, 2015
Visits : 3936

रावण वृत्ती   रावण नव्हता कुणी राजा,  ती होती व्यक्ति  ।   व्यक्तीचा तो इतिहास नव्हता,  ती होती प्रवृत्ति....१, आजही दिसती कित्येक आम्हा,  रावण या जीवनीं  । कशी रंगेल जीवन कथा,  रावणा वांचूनी...२, विरोधात्मक बुद्धी तुमची,  अडथळे आणते  । क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते...३, सद्‌गुणांचा पाया खोलवर,  जेवढा तो गेलेला  । रावण वृत्ति हार जाईल,  त्याच मग वेळेला....४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 23, 2015
Visits : 1035

विधी लिखीत   विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।।   राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।।   नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।।   आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या झडप घातली    प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी   ।।४।।   दुर्दैवी होते विधी विधान   हरिश्चंद्र तारामतRead More

August 23, 2015
Visits : 6000

आधुनिकता   नवलाईचे विश्व सारे,  नवलाईतच जगते  । आगळ्याच्या शोधामध्यें,   नव-नवीन इच्छीते  ।।   ताजे वाटते आज जें,   शिळे होई उद्यांच ते  । प्रवाही असूनी जीवन,   बदल घडवीत जाते  ।।   मुल्यमापन बदलांचे,   संस्कारावरी अवलंबूनी  । परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें,  विचार फिरे क्षणोंक्षणीं  ।।   मुळतत्व ते राही कायम,   आकार घेई जसा विचार  । ताजा शिळा भाव मग तो,   ठरविला जाई वेळेनुसार  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 23, 2015
Visits : 1691

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी   मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला  ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला  ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत  ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे  ।।५।। जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशRead More

August 23, 2015
Visits : 944

ज्ञानेश्वराची चेतना   जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।। संचार त्यांच्या आत्म्याच्या ,  सदैव होत राही  । ज्ञान भुकेल्या भाविकाला, चेतना ते देई  ।।   डॉ. भRead More

August 23, 2015
Visits : 3162

गीता – जीवनाची एक उकल   रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी           //धृ//   अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी   कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते त्याची तूं आहेस अर्जुनRead More

August 23, 2015
Visits : 1119

" पश्चाताप ” – - एक जाणीव !    संध्याकाळची वेळ होती. दारावरची बेल वाजली. दारासमोर  डॉक्टर  देशमुख यांना बघून आश्चर्याचा धक्का बसला. माझ्यासाठी ते घडणे म्हणजे केवळ  चमत्कार होता.  डॉक्टर देशमुख शासनाचे  वरिष्ठ अधिकारी होते. त्यांना निवृत्त होऊनही दहा वर्षे झाली होती. बरेच  प्रशासकीय अधिकार प्राप्त.  ते स्वत: एक कर्तबगार, हुशार, प्रामाणिक आणि  अतिशय शिस्तप्रिय व्यक्तीमत्व होते. सर्व संबधित त्यांना वचकून होते.                  मला एक प्रसंग आठवला. त्यावेळी ” कैलास मानसरोवर “   ही यात्रा केवळ भारतीय शRead More

August 16, 2015
Visits : 4972

हे कराल का ?   कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे,  हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेऊन ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे कळूनी वळत नसते, तत्व हे जाणून घ्याल कां ? उपयोग करूनी ज्ञानाचा, जीवन चांगले कराल कां ? सारे आहे प्रभूचे समजून,  शांत चित्ताने जगाल कां ? दया क्षमा शांती हRead More

August 16, 2015
Visits : 4750

यश येईल मागे मागे   नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे  । येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे  ।। निराशूनी जावू नकोस रागें रागें  । हिंमत बांधूनी जावेस  आगे आगे  ।। विणाविस यशाची शाल धागे धागे  । सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे  ।। सतत रहावे जीवनी जागे जागे  । तेव्हाच यश येत असते भागे भागे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 16, 2015
Visits : 931

योग्यतेनुसार यश   उंचावून झेप, नको घेवू उडी खोल आहे दरी, पाय तुझा मोडी...१ अंदाज घे तूं,  खोलीचा प्रथम यश येई तुला,  तया मध्यें ठाम...२ अनुमान काढ,  आपल्या शक्तीचे झेपेल कां ते,  विचार युक्तीचे...३ निर्णय घ्यावेस,  सदा विचारांनी निराश न होई,  त्यामध्ये कुणी....४ जाणून घे तूं, स्वत:ची पात्रता यश असे पाठी,  ज्याची जी योग्यता...५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 16, 2015
Visits : 2097

प्राण ज्योत   दिवा होता छोटासा, एक मजकडे  । इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे  ।। तळांत होती योजना, तेल सांठवण्याची  । शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची  ।। छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन  । मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी  ।। देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे  । प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे  ।। केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं  । व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती  ।। ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं  । तRead More

August 16, 2015
Visits : 1590

अर्पण   आशिर्वाद श्री जगदंबेचा,  सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला   १ विचारांच्या उठल्या लहरी,  शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी,  ती अर्पितो मी तुजला   २ प्रभूचा असावा सहवास,  हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला   ३ प्रभू नसे जन्ममरण व्यथा,  अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त करी कविता,  ती अर्पितो मी तुजला   ४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 16, 2015
Visits : 2208

संकोचलेले मन   मध्य रात्र झाली होती,  सारे होते शांत  । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती,  वाटला एकांत  ।। एक गाडी मंदिरीं थांबली,  त्याच शांत वेळीं  । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी  ।। सारे होते नशिबात त्याच्या,  धन संपत्तीचे सुख  । दिवस घालवी मग्न राहूनी,  कार्ये पुढती अनेक  ।। तर्कज्ञान  तीव्र असूनी,  आगळा बाह्य चेहरा  । परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा  ।। केव्हां केव्हां विजय होई,  सुप्त त्या विचारांचा  । संकोचल्या मनीं गाभारा बघे ,  रात्री मंदिराचा  ।।Read More

August 16, 2015
Visits : 3597

देवकी माता !   काय म्हणू ग तुजला देवकी   भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी    सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी     मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची     तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला  // राज वैभवी वरात निघता      कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी      दुःखी सारे जीवन गेले  // कंसाने तव मुले मारीली      निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु गिळून घेशी दुःखे सारी    आगमन प्रभूचे होण्यासाठी // ईश्वर येता तव उदरी     भाग्यवान तू ठरलRead More

August 16, 2015
Visits : 1656

कुपोषण हे पोषणाचे साधन ?   रेल्वेने औरंगाबादला जाण्यासाठी उभा होतो. एक भिकारीन, अंदाजे दोन वर्षाच्या लहानग्या मुलाला कडेवरती घेऊन, भिक मागत होती. मजजवळ ती आली. मुलगा खूपच रोड अशक्त व नजरेत भरेल इतका कुपोषित  होता. निस्तेज व अस्वच्छ चेहऱ्यामुळे माशा बसलेल्या होत्या. मुलाची काहीच  हालचाल दिसत नव्हती. त्या मुलाकडे बघून मला त्याची सहानुभूती वाटली.  मी पाच रुपयाचे नाणे तिच्या हाती दिले. ती तशीच पुढे भिक मागत गेली.  गाडी लेट होती. मी वाट बघत इकडून तिकडे फिरत होतो.  थोड्या वेळाने  माझी नजर एका वडापावच्याRead More

August 09, 2015
Visits : 2528

सार्थकी जीवन   सारे जीवन जाते आपले, अन्न शोधण्याकडे । काय उरते आमच्या हाती, विचार करा थोडे ।।१।। जीवनाची मर्यादा ठरली, आयुष्य रेखेमुळे । आज वा उद्या संपवू यात्रा, हेच आम्हांस कळे ।।२।। धडपड करी आम्ही सारी, देह सुखापाठी । विचार ही मनांत नसतो, इतरांच्यासाठी ।।३।। वेळ काढावा जीवनामधूनी, इतरांकरीता थोडा, सार्थकी लावा आयुष्य,  जीवन शिकवी धडा ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 09, 2015
Visits : 4548

दुष्टपणा   दगड टाकतां पाण्यावरी,  तरंगे त्याची दिसून आली  । दगड होई स्थीर तळाशी,  बराच वेळ लाट राहीली...१,   जेव्हा कुणीतरी क्रोध करी,  वातावरण दूषित होते  । क्रोध जातो त्वरीत निघूनी,  दूषितपणा कांहीं काळ राहते...२,   निर्मळपणा दिसून येई,  स्थिर होवून जातां जल  । पुनरपि पडता खडा क्रोधाचा,  सारे होवून जाते गढूळ...३,   स्थिर होण्यास वेळ लागतो,  गढूळ होई क्षणांत मन जिंकणे कठीण असता,  वैमनस्य  सहज होत...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmaRead More

August 09, 2015
Visits : 3880

भावनेस हसती विचार भावनेच्या जावूनी आहारीं,  नुकसान करतात सारे, तर्कशुद्धता विसरून जाते,  अंगात भरूनी वेडे वारे ..१, भावनेची लाटच उठता,  मती होते एकदम गुंग, बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२ आपले सारे खरे असावे,  हाच होत असे अट्टाहास, आपण केल्या कर्मावरच,  बसतो आपला विश्वास..३ इंद्रीय आणि भावना यांची,  जमुनी जात असतां जोडी तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४ काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून विचार मात्र मिश्कीलतेनें,  हसती पश्चRead More

August 09, 2015
Visits : 2438

वर्षाचे भगिनी प्रेम   तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती,   आंतूनी त्या मातीला.....१, जलमय होती नदी नाले,  दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा,  वर्षामुळेंच दिसती...२, हिरव्या रंगीं शाल पसरते,  धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे,  आच्छादन ती करी....३, वर्षा धरती बहिणी असूनी,  प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां,  धावून येते तिजकडे....४.   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 09, 2015
Visits : 3916

स्वप्न आणि जागेपण   एक ती झोप     स्वप्न बघत राही, शिणवून शरीर ताप   जीवास सुख देई ।।१।।   स्वप्न जाई विसरुन    जाग येता मनां, जागे मन   स्वप्नांत भासवी वेगळेपणा ।।२।।   एकाच मनाच्या दिसे   ह्या दोन भुमिका, भिन्नता त्यांत भासे     जाऊन दोन टोकां ।।३।।   स्वप्न आणि जागेपण   देहाच्या दोन स्थिती, नाण्याच्या बाजू दोन  एकमेका न मिळती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 09, 2015
Visits : 2476

कळसूत्री बाहुल्या   नाचत होत्या दोन बाहुल्या, इकडून तिकडे  । टकमक पाहात हांसत  होत्या,   चोहीकडे  ।।१।।   झीम्मा खेळे, फुगडी खेळे,   गरगर फिरती  । हातवारे करुन त्या,   माना डोलावती  ।।२।।   जवळ येवून गुजगोष्टी,   सांगे एकमेकींना  । सासू नणंद यांच्या,   कुलंगड्या काढतांना  ।।३।।   सुख दुःखाच्या कथा,   सांगितल्या त्यांनीं  । कांहीतरी करुन दाखवूं, वदल्या दोघीजणी  ।।४।।   अज्ञानी गरीब बिचाऱ्या,   जेंव्हा संकल्प करती  । कळसूत्री बाहुल्या तRead More

August 09, 2015
Visits : 6448

सु्र्य-चंद्राचा लपंडाव   बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें   । पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।।१।।   युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे   । भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।।२।।   मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई   । लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।।३।।   संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी   । परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी ।।४।।   लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता   । नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीतRead More

August 09, 2015
Visits : 2582

मेडीकल येथिक्स ! अमेरिकेतील अरीझोना स्टेट मधील फिनिक्स हे सुंदर व प्रशस्त  वसलेले शहर. स्वछता शिस्त व नियमांचे  काटेकोर पालन ह्याचा अनुभव  तीव्रतेने  तेथील वास्त्व्यात आला. प्रत्येक संस्थांचे नियम  असतात  ते सहसा  मोडले जात नाहीत.  तेथे एक मजेदार अनुभव आला. मुलगा एका कंपनीत कामाला होता.त्याच्याकडे आम्ही     दोघे   गेलो होतो. त्याची बायको अर्थात माझी सून गर्भवती होती. सात  महिने झालेले. त्याच शहरात  नजीकच्या मोठ्या रुग्णालयात तिची रीतसर नोंदणी केलेली होती. संबंधित स्त्री डॉक्टर  तज्ञाकडून नियमित  तपासणी कRead More

August 02, 2015
Visits : 5215

चारोळ्या      १   काळी बायको  (वात्रटिका) काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान.   कसे काय बुआ  ?   असे विचाराल     तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून          २   सारेच चोर  (वात्रटिका)    हासतात तुला वेड्या ते,       पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात,   चोर आहेस म्हणून      ३  माझी नोकरी (वात्रटिका) नकार देत होती माझ्या प्रेमाला,   बघून,  मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते तिच्या विणा माझे शरीर सर्व शांत झाले आता,Read More

August 02, 2015
Visits : 4426

सुक्ष्मात अनंत   एकटाच बसलो होतो,  खोलीमध्यें शांत करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,   दूरीवरील व्यक्ती बघूनी,  शब्द त्याचे ऐके केवळ चावी फिरवितां क्षणी,  दृष्य दुजे देखे...२,   जगामधली सर्व ठिकाणें,  खोलीत अदृष्य तीं साधनांचा उपयोग करीता,  जाण त्याची येती....३,   वातावरण निसर्गाने,  व्यापले सर्व जगी सुक्ष्मापासूनी अनंततेचे,  गुण एकाचे अंगी....४,   तेथे आहे जे येथेही,  व्यापूनी सर्व स्थळी ब्रह्माडांची व्यापकता,  बिंदूत एका सगळी....५   डॉ. भगवानRead More

August 02, 2015
Visits : 1797

खरे सुख अंतरी   सुख हे मृगजळ,  फसविते सर्वांला खेळ चालतो त्याचा,  चकविणे मनाला ...१, बाह्य वस्तूंचे सुख,  क्षणिक  असते, मोहून जाता सर्व,  लक्ष्य तेच वेधते...२, खरे सुख अंतरी,  परि शोधी बाहेरी, चुकीचा हा हिशोब,  निराशा करी...३, अंतरातील सुख, नितांत  असते एकाच अनुभवाने,  जग विसरविते...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 02, 2015
Visits : 2140

फूलपाखरे नि फुले   रंगबिरंगी सुंदर ठिपके,  पंखावरी आकर्षक छटा त्या,  मनास मोहीत करी...१, नृत्य पहा कसे चालते,  तालबद्ध होवूनी फूलपाखरे बागडती,  फुलाफुला वरूनी...२, नृत्याचे आंगण त्यांचे,  ते ही सुंदर नि मोहक मखमालीच्या पाय घड्या,  दरवाळताती सुवासिक...३, दोघांमधली चढाओढ,  नर्तक आणि नृत्यांगणा कोण असे अधिक मोहक, प्रश्न सोडविल कोण ?....४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 02, 2015
Visits : 2144

उर्जा अर्पण   करा सर्वस्व ईश्वरासी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान, जीवन अग्नी पेटत राही    उर्जा निघे त्याचे ठायीं । उर्जेचे होते रुपांतर       साधत असे कार्य त्यातून, भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार । व्यक्त करण्या भावना       उर्जा लागे त्यांना, एकाग्र करा मना       सोडूनी सारी भावना । एकाग्र चित्त हेच ध्यान     प्रभू मिळण्याचे साधन, सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच ईश्वरार्पण होई ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

August 02, 2015
Visits : 3859

श्री सरस्वतीची तसवीर   जीवनांतले चित्र पालटूनी,  रंग ते बदलले जनी जनार्दन ठरविले,  सारे काय मिळविले  ।१। सुंदर तसबीर एक आणली,  देवी श्री लक्ष्मीची श्रद्धेचे भाव गुंतविले,  पूजा करूनी तिची  ।२। शिक्षण घेवूनी ज्ञान मिळविले,  कष्टानें सारे शरीर होते चैतन्यमय,  आणि धडपडणारे  ।३। रंग बधितले जीवनांतील,  विविध छटांचे सजविण्यास लागते त्या छटांना,  बळ संपत्तीचे  ।४। ज्ञान आणि प्रयत्न जेव्हां,  एक ठिकाणी असे प्रसन्न करण्या धन लक्ष्मीला,  अडचण येत नसे  ।५। शक्ति, युक्ति, बुद्धी एRead More

August 02, 2015
Visits : 7264

होळीत जाळा दुष्ट भाव   एकत्र येऊं सारेजण   विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ// ऐष आरामांत राहून     देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती    नाना खटपटी आज आहे सण होळीचा   नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //१// मन असे चंचल भारी   सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार      मनाचे तर हे विकार टाकता मलीनता मनाची   पेटलेल्या होळीकडे, घे धांव जाळून टाकू होळीमध्यें     दुष्ट असतील ते स्वभाव   //२// विसरुनी चालRead More

August 02, 2015
Visits : 1739

एकत्र सर्पालय व बेडूकालय ! दक्षिण आफ्रिकेत एक प्राणी संग्रहालय बघण्यात आले. निरनिराळ्या प्राण्यांची वेगवेगळी दालने बघितली. एकप्रचंड असे सर्पाचे दालन होते.  अति विशाल हौद, तळामध्ये दोन भाग केलेले. पाणी व जमिनिसाठ्यी. लहान मोठी झाडे,  दगडाच्या शीला, काही ठिकाणी कृत्रिम वारुळे, आणि निरनिराळे खांब रोवले होते. अनेक जातीचे सर्प, पाणी व जमिनीवर मुक्त हालचाली करताना दिसत होते. अश्च्यर्याची गोष्ट म्हणजे  त्या पाण्यात खूप मासे सोडलेले होते, तसेच बऱ्याच संखेने बेडूक देखील होते. दोन्हीही सापांचे खाद्य. परंतु त्याRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 114230 hits