Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 24, 2016
Visits : 2466

आस्तित्व   समोर ये तूं केंव्हा तरी, बघण्याची मज ओढ लागली, फुलूनी गेली बाग कशी ही, बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।   कल्पकता ही अंगी असूनी, दूरद्दष्टीचा लाभ वसे, अंधारातील दुःखी जनांची, चाहूल तुज झाली असे ।।२।।   शीतल करुनी दुःख तयांचे, जगण्याचा तो मार्ग दाखविला, सोडूनी सारे वाटेवरी, आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।   आस्तित्वाची चाहूल येते, आज इथे केंव्हातरी, तव आशीर्वादे जगतो सारे, हीच पावती त्याची खरी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५०Read More

April 24, 2016
Visits : 5191

शांत निद्रा   शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी लोळत होतो कुशी बदलीत,  निद्रेची मी प्रतीक्षा करी....१, निरोगी माझा देह असूनी,  चिंता नव्हती मम चित्ताला अकारण ती तगमग वाटे,  बघूनी दिशाहिन विचारमाला....२, प्रयत्न सारे निष्फळ जावूनी,  निद्रा न येई माझे जवळी धूम्रपान ते करण्यासाठी,  उठूनी सेवका हाक मारली....३, बऱ्याच हाका देवून झाल्या,  परि न सेवक तेथे आला मागील दारी जावूनी बघता,  दिसला तो मज शांत झोपला....४ कांहीं क्षण मी बघत राहीलो,  शांत शरिरी शांत झोपRead More

April 24, 2016
Visits : 3149

दुर्बल मन नको   सारेच आहेत दुबळे     कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे     जे सबळ समजती  ।।१।।   विचार मनी येतां      दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां     हार तुमची झाली ।।२।।   मनाची सबलता     हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह     दुर्बल असतां मन ।।३।।   सुदृढ देह व मन      यांची मिळून जोडी जीवनातील यश     तुमच्या पदरीं पाडी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 24, 2016
Visits : 3882

बदलती पिढी   पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  मन चकित करणारे....१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंतीचा थाट....२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असुनी....३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश....४, ओबड धोबड बटबटती ते,  रंग पसरवी सारे, कुणा न कळे आधुनिक कला,  ही फसती ज्याला बिचारे....५, नाद मधूर हा प्रवाह वाहे,  हRead More

April 24, 2016
Visits : 3564

आठवावे मृत्यूसी निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना, गती देई जीवन चक्रांना,  ईश्वरी शक्ती  १ उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती याच तत्वे निसर्ग चालती,  अविरत   २ ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने   ३ वस्तूचे निरनिराळे आकार,  चेतना देवूनी करी साकार यास जीवन संबोधणार,  आपण सारे   ४ मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती वापरून तीच ती माती,  आकार देई पुन्हा पुन्हा   ५ दिसेल भांडी फुटलेली,  अथवा नवी बनलेली हीच हात चलाखी,  सगळीRead More

April 24, 2016
Visits : 5006

देवाचिया दारीं   देवाचिया दारीं, मनाचा मुजरा,  झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।। जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।। नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।२।। दु:खी – कष्टी दुबळा, दीनवाणा  दिसे, प्रभूच्याच आज्ञेने, भोग भोगीत असे, जातांRead More

April 24, 2016
Visits : 3495

सासरची आठवण   ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ// बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची खट्याळ भाऊबहीण येथें दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या दुजे नव्हते पदोपदीं करुन देई, आठवण भावंडाची   //२// ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची संसार दुःखे स्वशिरींRead More

April 24, 2016
Visits : 3881

घास घास घेणे   लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप  त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ती खाण्यामध्यें रेंगाळतात. लहान बालकांना जेवण भरविणे ही अत्यंत आवघड कला असते. सहनशिलता फक्त आईला समजलेली दिसते. मुल उपाशी राहू नये म्हणून ती सतत त्याच्या पाठीमागे राहून ते भरविते. आईच्या मुलाना जेवण खावू घालण्याच्या अनेक युक्त्या असतात. येनकेन प्रकारे घास भरवणे व त्याच्या पोटांत तो जाईल याचा तीचा प्रयत्न असतो.                जेऊRead More

April 17, 2016
Visits : 5019

अनुभव   सुख दुःखाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे, जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे ।।१।।   पोहणे जगणे कला असूनी, अनुभव हा शिकवूनी जातो, जागरुकतेने कसे जगता, यशही त्याला तसेच देतो ।।२।।   जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान, परि केवळ एक अनुभवी प्रसंग, सारे देतो मिळवून ।।३।।   अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणोक्षणी, सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या घटनामधूनी ।।४।।   बोल सारे अनुभवाचे, त्या बोलीची भाषाच न्यारी सुRead More

April 17, 2016
Visits : 4397

काळ व कार्याची सांगड   मानव जीवन तुम्हां लाभले,    महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या,   सद्उपयोगी यांसी करावे....१,   जीवन रेखा मर्यादेतच,    ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी,   कर्म कार्ये जेव्हां करिती...२,   हाती घेतल्या कार्यामध्ये,   एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी,   याचा विचार सतत यावा...३,   कार्ये राहता अपूर्ण अशी,   वेळ न उरे तुमचे हाती अभाव असता योजनेचा,   अपयश ते पदरी पडती....४Read More

April 17, 2016
Visits : 2518

स्मृति   जीवनाचा प्रवाह हा     भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं     काहीं राहती आठवणी  ।।१।।   बिजे ज्यांची खोलवर     रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।।   काळाचा असे  महिमा     आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी     विसरुनी जातात स्मृति  ।।३।।   प्रसंगी त्या अवचित     जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो     जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 17, 2016
Visits : 5407

काव्य कलश   ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत,   होत नसे निचरा....१,   गोड पाणी शब्दांचे,   ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ,   काव्य हृदयी उमटे....२,   पेला पेला जमवूनी,   कलश भरून आला, नाहून जाता त्यात,   देह भान विसरला....३,   सांडता पाणी वाहे,   पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे....४   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 17, 2016
Visits : 4947

जादूगार तूं देवा  ।   जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।।   ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   कड्याक्याची थंडी भरुनी हुडहुडीRead More

April 17, 2016
Visits : 3309

झगडणारे जीवन   गर्भामधूनी बाहेर पडतां,   स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती,   आजवरी त्याची मुळे  ।।१।।   निघून गेला पदर मायेचा,   डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला,   पोकळीत नभाच्या  ।।२।।   दु:ख क्लेशाचे वार झेलले,   कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता  सारे पडती पाठी  ।।३।।   तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने जे मिळे त्याला,   जीवन झगडा देणारे  ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkarRead More

April 17, 2016
Visits : 2520

बाळकृष्ण   रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी   //धृ//   काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं    //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी   //२//   रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   मुरली वाजे मधूर नृत्य ते बहरदार खेळातील तुझ्या लीला छबी राही मनावरी   //३//   रंगलेRead More

April 17, 2016
Visits : 4532

जग आणि देह – एक साम्य   शरीरावरील एक मोठे ऑपरेशन ( Major Surgery ) बघत होतो. छातीचा व पोटाचा भागावरील कातडी- मासाचे आवरण काढताच देहामधले निरनिराळे अवयव दिसू लागले. निरनिराळ्या आकाराचे, लहान मोठे, वझनानी कमी जास्त दिसत होते. देहामध्ये वेगवेगळ्या पोकळ्यामध्ये प्रत्येकाला पातळ पडद्यामध्ये गुंडाळून, एकमेकाजवळ  ठेवलेले होते. प्रत्येक अवयवामध्ये पोकळ्या , वाहीन्या दिसत होत्या. देहाबाहेरील नैसर्गिक रचनाचे ह्या सर्व आतल्या आवयाचे  विलक्ष साम्य असल्याचे जाणवले. पर्वत, नद्या, जंगले, तलाव, प्राण्यांची हलचRead More

April 10, 2016
Visits : 2978

चि. मानसीस ( दीड वर्षाच्या नातीस )   थांबव मानसी, चक्र वाढीचे, कळ्यातूनी तू फुलतांना, हासत खेळत तुरु तुरु चालणे, शिशू म्हणूनी जगतांना ।।१।।   कौतुकाने ऐकतो तुज, शब्द बोबडे बोलतांना, हरखूनी जातो चाल बघूनी, हलके पाऊल पडतांना ।।२।।   आनंद पसरे सभोवताली, इवल्या त्या प्रयत्नांनी, बदलूनी जाईल क्षणात सारे, रुळलेल्या तव हालचालींनी ।।३।।   तुझ्यासाठी जे नवीन होते, प्रयत्न तुझा शिकून घेणे, अपूर्णतेची आमुची गोडी, लोप पावेल पूर्णत्वाने ।।४।।   डॉ. भगवRead More

April 10, 2016
Visits : 4495

मिळविण्यातील आनंद   आस राहते सतत मनी,    मिळत नसते त्याचेसाठी प्रयत्न सारे होत असती,   हाती नाही ते मिळविण्यापोटी....१,   प्रयत्नात आनंद होता,   धडपड होती, होती शंका मिळविण्याच्या लयीमध्यें,   जिद्द मनाची आणिक हेका....२,   यश मिळते जेंव्हां पदरी,   धडपड सारी थंडावते ज्याच्या करिता सारे सोशीले,    त्यातील उर्मी निघून जाते....३,   यशांत नाही आनंद तेवढा,    मिळविण्यात जो दिसून येई कांहींतरी ते मिळवायचे,    याच विचारी रमून जाई....४Read More

April 10, 2016
Visits : 3645

जीवन आनंद   ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे,  ध्येय कोणते खरे  । उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे  ।। संतसाधू आणि ज्ञानीजन,  बहूत ते झाले  । समाधानी परि एक मताचे,  उत्तर नाही दिले  ।। खेळखेळणे उड्या मारणे,  अन् खाणे पिणे  । बालपणीच्या आनंदाला,  नव्हते काही उणे  ।। विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो  । यौवनाच्या उंबरठ्यावरी,  बहरून गेलो  ।। संसार करिता कळले आम्हा,  जीवन दुजासाठी  । प्रौढवयाची वर्षे घालविली,  समाज सेवेपोटी  ।। वृद्धत्वाचा काळ येता,  ओढ लRead More

April 10, 2016
Visits : 4156

आनंदात गाऊं   प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ//   बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान  गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं     आनंदात न्हाऊ   कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss  कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची  उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ   श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य  आकाशांत पाहूं //३// प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ   निरभ्र आहे आकाश पौर्णिमेचRead More

April 10, 2016
Visits : 5421

आरसा   दाखवितोस हूबेहूब रुप     आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी     चमत्कार वाटला   सत्य स्थितीचे द्दष्य करुनी     दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां    तसाच दिसे आम्हाला   गुणदोष बघूनी देहाचे     मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी     हीच युक्ती नामी   कांचेच्या आरशापरीं असे     मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी    चांगला बनवी माणसा   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 10, 2016
Visits : 2844

भरताचा जाब   ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी, कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।।   आम्ही बंधू चौघेजण, झालो एका पिंडातून, कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चार शरीरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।।   वचनपूर्ती ब्रीद ज्याचे, आदर्श जीवन रघूवंशाचे, कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी, कैकयीला भरत विचारी   ।।२।।   सर्व जणांचे प्राण होता, जगणे कठीण झाले आतां, रोष कशाला घेसी त्याचे, अकारण ते आपल्या शिरावRead More

April 10, 2016
Visits : 2420

पेराल तसे उगवते रुजविता बियाणें    अंकूर फुटती असतील दाणे जसे    तेच उगवती पेरता आनंद      आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें    प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी    आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे     मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी      कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे   शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें    नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण   स्वभाव ज्याचा त्याचा   डॉ. भगवान नागापूरकर   ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

April 10, 2016
Visits : 3662

एक समाधानी योनी   रस्त्यावरील एका पुलावर बसलो होतो. एक मेंढ्या बकरय़ांचा कळप समोर चरत होता. तो कळप साधारण ३० ते ४० बकरय़ांचा असावा. एक मेंढपाळ त्याना मार्गदर्शन करीत होता. तो कांही वेळा झाडावर चढून बरीचशी पाने फान्ट्या तोडून त्या बकरय़ाना चरण्यासाठी टाकीत होता. बराच वेळपर्यंत ते दृष्य बघत मी आनंद घेत होतो. त्यांची पळापळ, बागडणे, खेळणे, एकमेकाना ढूसण्या देणे, सारे चालले होते. चरणे हा प्रमुख कार्यक्रम त्या पार पाडीत होत्या. कांही बकरय़ा आपल्या पिल्लाना चाटीत होत्या. प्रेम व्यक्त करीत होत्या. त्यातीलRead More

April 03, 2016
Visits : 2024

जीवन ध्येय   प्रभूची लीला न्यारी   विश्वाचा तो खेळ करी कुणी न जाणले तयापरी   हीच त्याची महिमा ।।१।।   जवळ असूनी दूर ठेवितो   आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो   कोणी न समजे त्यासी ।।२।।   मोठे मोठे विद्वान   त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन   विश्लेषण करिती प्रभूचे ।।३।।   कांहीं असती नास्तिक   कांही  असती आस्तिक त्यांत कांही ज्ञानी मस्तक   चर्चा करिती प्रभूची ।।४।।   सत्य परिस्थीती ऐसी   कुणी न जाणले प्रभूसी सर्वांची चालना तर्कासी   प्रभूRead More

April 03, 2016
Visits : 2744

दृष्टी बदल   नवा चित्रपट बघण्या गेलो,   कुटुंबासह चित्र मंदिरी चित्रगृह ते भरले असतां,   प्रवेश मिळाला कसातरी....१, चित्रपट तो बघत असतां,  आश्चर्य वाटले जल्लोशाचे टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक,  कौतूक करी नटनट्यांचे....२ वास्तवतेला सोडूनी,   रटाळपणे वाहत होते, वैताग येवूनी त्या चित्राचा,   सोडून आलो मधेच मी ते....३, घरी येवूनी शांत जाहलो,  आठवू लागलो बालपण अशीच होती छायाचित्रे,  ज्यांत आमचे रमले मन....४ जीवनामधल्या चक्रामध्ये,  बदल फारसा होत नसतो वयातल्या पायरRead More

April 03, 2016
Visits : 4461

श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा   चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची....।।धृ।।   निशाराणी संचारी निद्रीत जाई पहारेकरी खट्याळ वारे धावूनी दारे दिली उघडूनी विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची....१ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   पावसाच्या पडती सरी पक्षी नाचती तालावरी कोकीळेचे सुरेल गान आनंदाने वातावरण नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची....२ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   स्पर्श होता पायाचे पाणी दुRead More

April 03, 2016
Visits : 7051

जीवन मृत्यू खेळ   सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी,  माहीत असते सर्वांना....२, अविरत चालू लपंडाव ,  जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला,  हक्क तुम्हां खेळण्याचा....३, खेळती काही तन्मयतेने,  रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४   डॉ. भगवान नागापूरकर 90040798509004079850 bknagapurkar@gmail.com       CallSend SMSCallRead More

April 03, 2016
Visits : 4930

मुंगी   मग्न राही सतत   आपल्याच कामीं अन्नासाठी तूं    फिरे दाही दिशानी जमवितेस कणकण    एकत्र करुनी दूर द्दष्टीचा स्वभाव    दिला तुज कुणी सुंदर तुझी वास्तूकला   वारुळ केले छान सहस्त्रांच्या संखे     राहतेस आनंदानं कष्ट करण्याचा गुण    दाखवी साऱ्याना कष्टाला पर्याय      नसे ह्या जीवना   डॉ. भगवान नागापूरकर 90040798509004079850 bknagapurkar@gmail.com     CallSend SMSCall from mobileAdd to SkypeYou'll need Skype CreditFree via SkypeRead More

April 03, 2016
Visits : 3387

पुण्य संचय करा   ज्या ज्या वेळी येई संकट,    धांव घेत असे प्रभूकडे  । संकट निवारण करण्यासाठीं,   घालीत होता सांकडे  ।।१।।   चिंतन पूजन करूनी,   करीत होता प्रभू सेवा  । लाभत होती त्याची दया,   त्याला थोडी केव्हां केव्हां  ।।२।।   संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा  । कामी येईल पुण्य ,   विचार करीतां भविष्याचा  ।।३।।   संचित पुण्य आजवरचे,   कार्य सिद्धीला लागते  । सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते  ।।४।।   डॉ. भगवान नागापूरRead More

April 03, 2016
Visits : 2946

सोड मागणी   मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे    सांगे सोड मागणे न मागतां मिळाले जे    आनंदी केले जगणे.   डॉ. भगवान नागापूरकर 90040798509004079850 b bknagapurkar@gmRead More

April 03, 2016
Visits : 3557

माईल स्टोन्स ( Mile Stones )   श्री वसन्तराव  व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार कसे शिकवले जातील ह्याबद्दल फार चोखंदळ होते. एकदा ते मुलासह आमच्याकडे आले. अंगणांत खुर्च्या टाकून आमच्या गप्पा चालू होत्या. मुले आपली करमणुक स्वतःच करण्यात व्यस्त झाली होती. मोठा मुलगा तेथेच पडलेले कॉमिक पुस्तक घेऊन झोपाळ्यावर बसून वाचत होता. लहान मुलगा अंगणामधील बागेत फुलझाडे बघण्यांत व खडेवाळू गोळा करुन खेळत होता. वसंRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 124004 hits