Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 26, 2011
Visits : 3615

भाकरीसाठी मिळाला मार्ग. रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. हा त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, भंगारच्या दुकानाला नेऊन विकत असे. त्याने सांगिRead More

February 25, 2011
Visits : 2624

मीरेची तल्लीनता नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले - - -१ चित्त ते हरीमय जाहाले न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले. - - - २ चित्त ते हरीमय जाहाले विषाचा घेता प्याला हरि तो त्यातची दिसला झेपावूनी गेली त्याच क्षणी घट घटा प्राशन केले. - - - ३ चित्त ते हरीमय जाहाले जहाल होते विष मृत्युचा तो पाश प्रभूभक्तीच्या शक्तीने परि अमृत ते बनले - -Read More

February 23, 2011
Visits : 5456

रसत्यावरच्या हातगाडीवरील केळीवाल्याकडे मी केळी घेत होतो. त्याला पैशांची मोड देत असताना, त्याचे लक्ष्य नाही, हे बघून एका ९-१० वर्षाच्या मुलाने, त्याच्या गाडीवरील दोन केळी उचलून घेतली. मुलगा लपून जाऊ लागला. "बघ त्या मुलाने तुझी केळी घेतली व तो चालला." सामाजिक जाणिवेने एकदंम प्रेरीत होऊन, मी ते त्या केळीवाल्याच्या निदर्शनास आणून दिले. केळीवाला धावत गेला. त्याने त्या मुलास पकडून एक शिवी हसडली. व केळी हिसकाऊन परत आला. "फार हरामखोर असतात हो ही मुले." पुटपुटत माझे आभार मानले. मी केळी घेऊन निघालो. मनाला एक सRead More

February 21, 2011
Visits : 4458

दृष्टीची भ्रमंति बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १ चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २ वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३ मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४ दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे व्यवहारातील जगामध्ये, पRead More

February 21, 2011
Visits : 1574

संध्याकाळचे फिरणे झाल्यानंतर शेजारच्या बागेत जावून शांत बसणे हे नित्याचे झाले होते.  एक प्रकारचा आनंद व समाधान मनाला त्यामुळे लाभत असे. शांत झोप मिळण्यासाठी ते गरजेचे वाटत होते.                   एक गोष्ट माझ्या दररोज बधण्यात येवू लागली होती. एक वयस्कर गृहस्थ नियमीत त्याच वेळी मला बागेत दिसत होते. ते सहसा कुणाशी बोलत नसत. एकटेच शांत बसून बागेतल्या गवतातील दुर्वा काढीत असत.Read More

February 19, 2011
Visits : 3151

मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर त्या तुम्हास कळतात. कोणता लेख, वा साहित्य किती जणानी वाचले, ह्य़ाची जाणीव येते. मी हे सर्व जाणल्या नंतर आपणही आपल्या नावाने एक ब्लॉग काढवा ही ईच्छा प्रदर्Read More

February 17, 2011
Visits : 2381

दोघे मिळून आलां हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे सहभागी होतां,युक्ति यशाची खात्री दिसे एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे एकत्र मिळूनी काम करा तुम्ही आहांत जुळे (कविता)Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 23259 hits