Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 25, 2014
Visits : 4378

कृष्ण कमळ-  चंद्राचे कायम स्वरूप                                                     ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू            शोध घेण्या अंतरीचे // तेचRead More

May 25, 2014
Visits : 894

बागेतील तारका - वलय   सतत फिरत राही, चक्र जीवनाचे   । विविधता पाही ,  रंग आयुष्याचे   ।।१।। सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी   ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार   ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय   ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.comRead More

May 25, 2014
Visits : 3715

जीवनाच्या रगाड्यातून- निसर्गाची ध्यान प्रक्रिया   खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही हालचाल न करता  ते बराच वेळपर्यन्त तेथे बसले होते. कबूतराचे शांत डोळे मिटून बसणे, मला त्याची त्याच्याच पद्घतीने केलेली ध्यान धारणा, वा समाधीयोग वाटला. ध्य़ान प्रक्रिया साध्य होण्यासाठी गुरुची अवशक्ता लागते कां ?  सर्व साधारण साधकासाठी, व्यक्तिसाठी निश्चीत. परंतु शेवटी ही एक नैसर्गिक क्रिया ठरते. ज्याना उत्स्फूर्त शांततRead More

May 18, 2014
Visits : 2808

कृष्ण कमळ-                                                              बहिणीची एक इच्छा   विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया  नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी  आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्Read More

May 18, 2014
Visits : 2038

बागेतील तारका- भावनेच्या आहारीं  ।   नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।।   प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी   प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी   बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं नकोस विसंबून    आत्मविश्वास गमवूनी नको जाऊस दारोदारी   ।।३।।Read More

May 18, 2014
Visits : 3762

जीवनाच्या रगाड्यातून- काळपुरुष   शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता.                   भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला  शिथील करण्यासाठी त्याने तोंड उघडून वर बघत जांभई दिली. अचानक त्Read More

May 11, 2014
Visits : 1819

कृष्ण कमळ- द्रौपदी वस्त्रहरण   ह्रदयद्रावक प्रसंग आला   द्रौपदीवरी विटंबना करुं लागले   कौरव जमुनी सारी  ।।१।। द्युतामध्यें हरले होते   पांडव बंधू सारे द्रौपदीस लावले पणाला   जेव्हां कांहीं न उरे  ।।२।। वस्त्रहरण करीत होता    दुष्ट तो दुर्योधन हताश झाले होते पांडव   हे सारे बघून  ।।३।। ' द्वारकेच्या कृष्णा '  धावूनी ये    मी दुःखत पडे मदतीचा केला धांवा    कृष्ण बंधूकडे  ।।४।। धावूनी आला कृष्ण    द्रौपदीचे मदतीसाठी लाज राखली द्रपदीची   उभे राहूनी पाठीं  ।।५।। कां उशीRead More

May 11, 2014
Visits : 3197

बागेतील तारका-   मानवता धर्म   परमेश्वर अगाध ।  त्याच्या शक्तीचा नसे वाद ।। मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक  ।। नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।। प्रभु निराकार ।  निर्गुण असुनी होई साकार ।। आस्तिक प्रभु मानती ।  नास्तिक समजती शक्ति ।। ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।। ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।। वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती ।। धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक ।। हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां ।। झगडे मार्गासाठींRead More

May 11, 2014
Visits : 1501

जीवनाच्या रगाड्यातून-   मच्छरांचे साम्राज्य     नुकत्याच एका बातमीने संपूर्ण मुंबईकरांना हादरुन सोडले. डासांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वत्र मलेरीयाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मृतांची संख्याही खूप वाढलेली आहे. सर्व अधुनिक वैद्यकिय शास्त्र आपल्या शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करताना दिसला. कांही दिवस यश, वा कांही दिवस अपयश अर्थात रोगाचा फैलाव जास्त झाल्याचे कळून येते. जागतीक आरोग्य संघटना ( World Health Organization ) हीने देखील मलेरीयाच्या प्रसारा बद्दल चिंता व्यक्त केली. आपल्यापरी मदतRead More

May 04, 2014
Visits : 2815

कृष्ण कमळ- श्री कृष्णाची भक्ताला मदत   घटना घडली एके दिवशी    प्रभू बसले जेवण्या रुख्मिणी त्यांचे जवळी    होती वाढण्या  ।।१।। चट्कन उठूनी ताटावरुनी    धावत गेले दारीं क्षणिक थांबूनी तेथे    येऊनी बसले पाटावरी  ।।२।। प्रश्न पडला रुखमिणीस   काय गडबड झाली श्रीकृष्णाची धावपळ    तिजला नाही कळली  ।।३।। चौकशी करतां कृष्ण बदले    कहानी एका भक्ताची हरिनाम मुखी नाचत होता    काळजी नव्हती लोकांची  ।।४।। वेडा समजोनी त्यासी    दगड होते मारीत हरिनाम नाही सोडले     वाहात असूनी रकRead More

May 04, 2014
Visits : 2469

बागेतील तारका-   हें माणसा !   मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ 'विवेकशक्ति' असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न कळे श्वास घेऊनी वस्तू शोधतो  मानवाला चकीत करतो श्वानाचा तूं घेसी उपRead More

May 04, 2014
Visits : 2563

जीवनाच्या रगाड्यातून- मला देव दिसला  भाग ३ पुढे भाग ३ वर चालू-  000 परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जावून त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणीक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुणRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 31959 hits