Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 30, 2013
Visits : 2151

कृष्ण कमळ- २८  दिव्य शक्ति व्याकूळ झाला जीव     प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव          तुझीया चरणा   ।।१।। तेजांत लपले             तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले         टिपण्या ते रुप   ।।२।। निनादाच्या स्वरी      तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी    ऐकण्या तुझे गीत   ।।३।। पुष्पातील सुवास      तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास     ओळखता तो आनंद   ।।४।। मधुर रसाची फळे     सर्वात तु बसलास जिव्हेला मात्र न कळे   तुझा सहवास   ।।५।। स्पर्शांत आहेस तूं     माझ्या अRead More

March 30, 2013
Visits : 2054

बागेतील तारका-   ४५  स्वप्न मजला आवडते   ये प्रियकरा, स्वप्नांत माझ्या स्वप्न मजला आवडते कल्पनेचे राज्य जरी असे आनंददायीं वाटते  ।।धृ।।   तव प्रतिमा ही मनी बसविली आठवण सदैव येऊं लागली जागेपणी जे मिळे न मजला स्वप्नी सारे तेच अनुभवते   ।।१।। स्वप्न मजला आवडते   पुर्णत्वाचे सुख आगळे जीवन प्रवाही येती अडथळे हवे हवेसे मनीं ठरवी जे केवळ स्वप्नचि मिळवूनी देते   ।।२।। स्वप्न मजला आवडते   कल्पना भाव तरंगे उठूनी रात्री गेल्या कितीक रंगूनीRead More

March 30, 2013
Visits : 1851

जीवनाच्या रगाड्यातून - वेळेची एक संकल्पना   वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी वेळ लागते. त्यामुळे वेळ व हालचाल अर्थात Time and Movement ह्या एकच समजल्या गेल्या. हे शारीरिक                स्थरावर. मानसिक स्थरावर ही संकल्पना वेगळी ठरते. दोन प्रश्न आहेत. १) काय ?   अर्थात काय असावे .   २)  कसे ?   अर्थात कसे असावे.  स्वच्या ( Self   )  वा मनाच्या ( Mind   )  गरजा, वासना, इच्छा सतत  "काय आहे"Read More

March 25, 2013
Visits : 645

कृष्ण कमळ- २७  आज-उद्या   'उद्या' साठी जगतो आम्हीं   राहून मृत्युच्या दाढी भविष्यांतील सुख कल्पूनी   आज सारे कष्ट काढी   'आज' राहतो नजिक सदैव    'उद्या' चालतो पुढे पुढे आज नि उद्या यांची संगत     कधीही एकत्र न पडे   कष्ट 'आज' चे शिरीं वाहूनी   ध्येय 'उद्या' चे बघताती हातीं न कांही पडते तेव्हां     निराश सारे बनताती   समाधान ते चित्तीं आणण्या   प्रयत्न सारे 'आज' च व्हावे 'आज क्षणाला' अस्तित्व असतां   भविष्याला सोडून द्यावे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५Read More

March 25, 2013
Visits : 1081

बागेतील तारका-                                                       ४४   चि. मानसीस ( दिड वर्षाच्या नातीस )   थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना   कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना   आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी   तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडीRead More

March 25, 2013
Visits : 1539

जीवनाच्या रगाड्यातून- *  निसर्ग व्याप्ती उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   कितीRead More

March 21, 2013
Visits : 2032

कृष्ण कमळ- २६  चाकोरी   नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे   कसा आलो ह्या जगतीं    ठावूक नव्हते कांही मजला कसा वाढलो हलके हलके     जाण आहे ह्याची मला   जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे   परिस्थितीच्या काठामधूनी    जीवन सरिता वाहात जाते वाहात असता त्याच दिशेनें    इच्छीत ध्येय हातीं नसते   होते सारे अखेर तेचि    आखून ठेवते नियती जRead More

March 21, 2013
Visits : 909

बागेतील तारका- ४३  आनंदात गाऊं   प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ//   बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान  गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं     आनंदात न्हाऊ   कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss  कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची  उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ   श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य  आकाशांत पाहूं //३// प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ   निरभ्Read More

March 21, 2013
Visits : 2282

जीवनाच्या रगाड्यातून - सेल्स   " पिंडी ते ब्रह्माडी״   वैद्यकीय शिक्षण काळातील सुरवातीच्या शैक्षणिक वर्षांची अचानक आठवण झाली. प्राध्यापक  शरिर रचना शास्त्र व त्याच्या क्रिया यावर भाष्य करीत होते. देह त्यातील अनेक अवयवांनी बनलेली असतात. अनेक टिशूंच्या समूहातून प्रत्येक टिशूमध्ये प्रचंड प्रमाणात सेल्स असतात. सेल्स या शरिराचा अत्यंत सूक्ष्म व शेवटचा भाग समजला गेला आहे. ज्यांची गणती करता येणे केवळ अशक्य असते. इतक्या प्रचंड प्रमाणात त्यांची संख्य असते. एका मानवाच्या देहातील सेल्सची संख्या या जगातRead More

March 15, 2013
Visits : 690

कृष्ण कमळ- 25  बीज वृक्षाचे चक्र कुणाचे ?   सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  फळांत असते बीज फिरवी कोण चक्र सहज ?     डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@mail.com 98Read More

March 15, 2013
Visits : 739

बागेतील तारका - 42  खोटा शिक्का   कसे आले कुणास ठाऊक    नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी    खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी    कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी     निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी     तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया    अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी     त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी     यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श करुनी      जाणले माझे नशिब भाग्यवान ठरवूनी सांगे       मिळेल धनलाभ खोटा शRead More

March 15, 2013
Visits : 3427

जीवनाच्या रगाड्यातून- निसर्गाची अशी ही खेळी   एक आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता.            पुरुष बीज आणि स्त्री बीज ह्यांच्या संयोगाने, स्त्रीच्या गर्भांत नवीन जीवाची उत्पत्ती व वाढ होऊ लागते.  त्यांत दोन्ही लिंगांचे समसमान गुण एकत्रीत होतात. बस फक्त येथपर्यंतच दोन्ही बीजांचा सहभाग. नंतर मात्र गर्भ -- बीजधारणा, बीजांकुर, त्यांची वाढ, नवजीवाला जन्मला घालणे, त्याला जRead More

March 10, 2013
Visits : 2274

कृष्ण कमळ-                                                २४   दुष्टाचा मृत्यु   सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली त्याच्या देहा भोवती जRead More

March 10, 2013
Visits : 1681

बागेतील तारका- ४१  दृष्टीची भ्रमंति   बालपणीच्या काळामध्यें,  दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारें बघतां,   गम्मत वाटे मनीं कशी   १ चमके केव्हां मिटे कधी कधी,   लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी,     वेड तयांचे आम्हास मोठे   २ वाटत होते भव्य नभांगण,     क्षितीजाला जे जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां,    सर्व दिशांनी नयनी भरले   ३ मोहक भासे विश्व भोवतीं,    भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला स्थिरावली ना दृष्टी तेव्हां,    क्षणभर देखील एका बिंदूला   ४ दृष्टीला परि पडलेRead More

March 10, 2013
Visits : 2761

जीवनाच्या रगाड्यातून- अशा ह्या दोन पुजा -2 १ -- पुढे चालू-- दुसऱ्या मित्राची पुजा--- ५              वसंतराव माझे दुसरे मित्र. त्याचे सर्व विचार पुरोगामी होते. जे जे नाविण्य समोर येत असे, ते आत्मसात करण्याचा त्यांचा प्रयत्न असे. माणसाने सतत नवीन कल्पना,           योजना यांचा प्रथम अभ्यास करावा.  होवू घातलेला बदल हा कसा आहे, यावर निरीक्षण करावे. तो फक्त केवळ बदल करावे म्हणून नसावा. कांही तरी वेगळेच करावे हा हेतू नसावा. बदलाकरीता बदल ही संकल्पना नसावी. कारण कोणतीही कित्येक वर्षे चालत आलेली कRead More

March 05, 2013
Visits : 1324

कृष्ण कमळ- 23  देहातील शक्ति   नासिकेसमोर हात ठेवा    लागेल तुम्हां गरम हवा थंड हवा आंत जाते   गरम होऊन बाहेर येते अन्न पाणी घेतो आपण   ऊर्जा निघते त्याच्यातून आत्म्यापरि फुगते छाती   हवा आंत खेचूनी घेती आतल्या ज्वलनास मदत होते   उष्णता त्यातून बाहेर पडते भावना जेंव्हा जागृत होती   रोम रोम ते पुलकित होती अवयवे सारी स्फुरुन जाती   देहामधूनी वीजा चमकती धनको ऋणको विद्युतसाठे   अलग अलग दिसती मोठे विजातीय लिंग येतां जवळी   परिणाम दिसे विजेचा त्यावेळी प्रकाश आहे आपल्यRead More

March 05, 2013
Visits : 1540

बागेतील तारका - *   ४०  बाळाची निद्रा   चिंव चिंव करुं नकोस चिमणे,  बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग,   देईन मी सगळे   कपाट सारे उघडून ठेवले,   समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे,   डाळ दाणे पोटभरी   घरटी बांध तूं माळ्यावरती,   काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही,   ही घे माझी वाणी   नाचून बागडून खेळ येथे,    निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं तर,   जागेल बाळ तान्हें   चिंव चिंव करणे गीत आहे कां ?   अंगाई तुमची गावूनी आपल्या पिल्ला करीतांRead More

March 05, 2013
Visits : 706

जीवनाच्या रगाड्यातून- अशा ह्या दोन पुजा-१ एका मित्राची पुजा - प्रत्येक व्यक्तीला ईश्वर सानिध्य, ईश्वर प्राप्ती याची आस्था ही बालवयापासून असते. कौटुंबीक संस्कार, धर्म संकल्पना आणि पौराणिक कथा, यांचा त्याच्या मनावर एक प्रकारचा पगडा आलेला असतो. अविकसित विचार धारा, समोरच्याचा प्रभाव व नाविन्य यामुळे प्रथम तो सारे मान्य करतो. विश्लेषनात्मक त्याची विचारसरणी झालेली नसते, जे काही ऐकले, समजले हे तो कोणते ही प्रश्नचिन्ह न करता मान्य करतो. मात्र हेच सारे त्याच्या त्या स्तरावर, रक्तामध्ये एकरुप होते. वRead More

March 01, 2013
Visits : 2541

कृष्ण कमळ- 22 श्रेष्ठ कोण?   स्तुती मी देवा करुं कुणाची चित्र बनविले अतिशय सुंदर सौदर्य वाटते लोभसवाणे खिळून राहते जेथे नजर   तू तर असशील कलाकार तो ह्या विश्वाचा कर्ता महान जिवंत चित्र जे एक बनविले दाद तयाची देईल कोण ?   जमता चित्र अतिशय रेखीव मनास घेई मोहून ते ह्यात चित्राची आपती किमया मला न कांही दिसून येते   कला पुजारी रसीक मीच तो सौंदर्य टिपती माझे नयन मुल्यमापन ते अचुक करिती कलाकार, कला, रसिक ह्यातून   परि मी तरी आहे कोRead More

March 01, 2013
Visits : 1926

बागेतील तारका -   *  39   फुलझाडाचे स्वातंत्र्य   उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकषर्क फुलझाडांचे मन प्रसन्न करी // जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी // वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें // वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा// कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला // खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हतेRead More

March 01, 2013
Visits : 909

जीवनाच्या रगाड्यातून- वेडा अहंकार ! एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला   जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती   किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.   विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर   पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते   संकल्प केला त्याचक्षणी मी आपलRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 35062 hits