Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 27, 2016
Visits : 4593

बहिणीची हाक   राखण करीतो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा, विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते ।।१।।   आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून, हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।   प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे, मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।   अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होऊन जाते बघ मी, दिसत  नाही कुणा हे बंधन,  जीव श्वासाचे अतूट स्पंदन ।।४।।   भांडत रूसत हासत होतो,  जगण्यामधला भाग असे तो, खेचRead More

March 27, 2016
Visits : 3735

वेडी   रस्त्यावर उभी राहूनी,   हातवारे ती करीत होती, मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती ।।१।।   गर्दी जमली खूप बघ्यांची,   कुत्सीतपणे न्याहळू लागली, 'शिपाई आणा जावूनी कुणी',   ठाण्यात नेण्यास सांगू लागली ।।२।।   जीवनातील दु:खी चटका,   सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील ताबा सुटूनी,   वेडेपणा हा दिसून येतो ।।३।।   इतकी गर्दी जमून कुणीही,   तिच्या मनीचा ठाव न जाणला, रूख रुख वाटली ती बघोनी,   सहानुभुती शून्य समाजाला ।।४।।Read More

March 27, 2016
Visits : 2531

दु:खी अनुभवी   दु:ख जाणण्या दु:खी व्हावे,   या परि अनुभव दुजा कोणता  । सत्य समजण्या कामी न येई,   तेथ कुणाची कल्पकता  ।।१।।   धगधगणारे अंगारे हे,   जाळती काळीज  । शब्दांचे फुंकार घालूनी,   येईल कधी का समज  ।।२।।   मर्मा वरती घाव बसता,   सत्य येते उफाळूनी  । चेहऱ्यावरले रंग निराळे,   हलके हलके जाती मिटूनी  ।।३।।   त्या दुःखीताला जाणीव असते,   जीवनामधली निराशा कशी  । झेप घेवूनी समरस होतो,   इतर जणांच्या काळजाशी  ।।४।।   सुख दु:खातRead More

March 27, 2016
Visits : 3468

प्रतिक्रिया   क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी  । तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी  ।।१।।   फेकतां जोराने,   आदळे भिंतीवरी  । प्रवास परतीचा,   होई तुमचे उरीं  ।।२।।   शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी  । येऊनी धडकतील,   तुमचेच पाठीं  ।।३।।   प्रेमाने बोलणे,   सुंगध आणिते  । आनंदी लहरी,   मनां सुखावते  ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 27, 2016
Visits : 2886

स्फूर्ती दाता   तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य, समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य ।।१।।   तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती, प्रफुल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती ।।२।।   कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी, मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी ।।३।।   हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी, दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ।।४।।   गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी, स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचRead More

March 27, 2016
Visits : 5030

आला  !   आला रे पाऊस !   आला  !   आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस    //धृ//   गेली होती तापूनी      रखरखली सारी, अंग जाता वाळूनी     भेगा पडती शरीरी  ।। थकली ती सोसूनी     उकाड्याचे चार मास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    ।।१।।   पाणी गेले आटूनी     नदी नाले कोरडे, पहाटेच्या दवातूनी   झाडे जगती थोडे  ।। गेली हरळी जळूनी   बीजे टाकूनी आसपास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस   ।।२।।   आता येईल वनीं     चैतन्य लपलेले, तRead More

March 27, 2016
Visits : 3158

संधी   गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे   ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी   चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी   धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो   यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा सRead More

March 27, 2016
Visits : 4942

निसर्गाची ध्यान प्रक्रिया   खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही हालचाल न करता  ते बराच वेळपर्यन्त तेथे बसले होते. कबूतराचे शांत डोळे मिटून बसणे, मला त्याची त्याच्याच पद्घतीने केलेली ध्यान धारणा, वा समाधीयोग वाटला. ध्य़ान प्रक्रिया साध्य होण्यासाठी गुरुची अवशक्ता लागते कां ?  सर्व साधारण साधकासाठी, व्यक्तिसाठी निश्चीत. परंतु शेवटी ही एक नैसर्गिक क्रिया ठरते. ज्याना उत्स्फूर्त शांतता प्राप्त करायची असते, तेRead More

March 20, 2016
Visits : 2525

गतकाळ विसर   विसरून जा भूतकाळ तो,   नजर ठेवूनी भविष्यावरी, वर्तमानी राहून प्रवाही,   जीवन सारे यशस्वी करी ।।१।।   व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,   उगाळता गत आठवणी, खीळ पडेल उत्साहाते,   अपयश आले हे जाणूनी ।।२।।   ज्ञान जगाचे मिळूनी तुला,   जन्म जहाला आजच खरा, अनुभवी नव बालक तूं,   वाहून नेई जीवन धुरा ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 20, 2016
Visits : 2651

खरे ग्रह   तुमचे जीवन अवलंबूनी,    ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या,    जसे ग्रहमंडळ फिरती...१,   मित्र मंडळी सगे सोयरे,   शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी,    परिणाम ते होई सर्वांचे...२,   हेच सर्व ते ग्रह असूनी,   सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची,    वागण्यात तो फरक करती...३   अपयशाला कारणीभूत तो,   असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ,   ग्रहमान बनतो त्या घडीचा...४,   यशाची चालता घौडदौड तीRead More

March 20, 2016
Visits : 4867

आनंद घट   देहमनाचा आनंद औरची,   नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे,    न तेथे कसली तुलना  ।।१।।    आनंदाचा घट भरूनी हा,   तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग,   अनेक घट अन् अनेक पाठी  ।।२।।   एक घटातूनी आनंद मिळता,   दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा,   लुटाल कसा तृप्त होवूनी  ।।३।।   दुजामध्ये समरस होवूनी,   लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा  । ‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो,   आनंद घटाचा भव्य पसारा  ।Read More

March 20, 2016
Visits : 3382

चिमणीची निद्रा मोड   चिंगी 'पहाट झाली, चिव चिवते चिमणी उमज येईना, उठविले तिजला कोणी.....१, आई आहे कां ? जी उठवी शाळेसाठी, गुदगुदल्या करूनी कुरवाळिते हळूंच पाठी....२, घड्याळ उठवी घण घण करूनी नाद घरट्यामधुनी, नाही ऐकला असा निनाद.'..३,   चिमणी – ' उषाराणी  येते, साऱ्यांची आई बनूनी प्रेमानें मोडी झोंप, नाजूक करकमलांनी.....४, घड्याळ आमचे, दवबिंदू पडतां पानावरूनी चाळविती निद्रा, टपटप आवाज करूनी' .....५   डॉ. भगवान नागापूरकर संपर्कRead More

March 20, 2016
Visits : 2787

उदबत्ती एक आत्मसमर्पण   उदबत्तीचा सुगंध    दरवळे चोहोकडे, कोठे लपलीस तूं       प्रश्न मजला पडे ।।१।।   मंद मंद जळते      शांत तुझे जीवन, धुंद मना करिते     दूर कोपरीं राहून ।।२।।   जळून जातेस तूं     राख होऊनी सारी, तुझे आत्मसमर्पण    सर्वत्र सुगंध पसरी ।।३।।   तुझेपण वाटते क्षुल्लक     दाम अति कमी, आनंदी होती अनेक      जेव्हां येई तूं कामीं ।।४।।   लाडकी तूं भक्तांना     तुजवीण पूजा नाहीं, प्रफुल्ल करुन चेतना     प्रभू भाव मना येRead More

March 20, 2016
Visits : 2204

कठीण खेळ   चंचल केलंस मन,    स्थिर करण्यासांगे  । दिलेल्या गुणाची मग,   बदलेल कशी अंगे ? निसर्ग नियमाच्या,   कोण विरूद्ध जाईल  । फायद्याचे ते का त्याचे परि होईल ? चपळता जसा गुण,  स्थिरपणा असे दुजा  । आगळ्यातील आनंद,  हिच त्यातील मजा  ।। देहा ठेवून चंचल,  सांगे स्थिरावण्या मन  । हा उलटा खेळ कसा,  खेळण्या भासे कठीण  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 20, 2016
Visits : 2581

राधेचे मुरली प्रेम मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला कुज  बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला   त्या सुरात कोणती जादू ती किमया कशी मी वदू सप्त सुरांचा निनाद उठुनी खेचून घेती चित्ताला – - - विसरली राधा सर्वाला   धेनु वत्से बावरली बाल गोपाल आनंदली रोम रोम ते पुलकित होऊनी माना डोलती सुरतालाला – - - विसरली राधा सर्वाला   प्रभूचा होता ध्यास मनी ती बघे हरिला रात्रन दिनी जे शब्द निघाले मुरलीतूनी हाका मारती  ते तिजला  – - - विसरली राधा सर्वाला   हरिचRead More

March 20, 2016
Visits : 3790

काळपुरुष   शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता.                   भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला  शिथील करण्यासाठी त्याने तोंड उघडून वर बघत जांभई दिली. अचानक त्याचक्षणी हवेमुळे उडत आलेRead More

March 13, 2016
Visits : 3199

मिठापरी जीवन   खारेपणा हा अंगी असतां,   कोण खाईल केवळ मीठ, परि पदार्थाला चव येई,   मिसळत असता तेच नीट ।।१।।   जीवन सारे खडतर ते,   भासते मिठासम मजला, केवळ जीवन बघता तुम्हीं,  पेलणें अवघड सर्वाला ।।२।।   तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते, हर घडीच्या प्रसंगामध्ये,   समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 13, 2016
Visits : 4127

जगणें अटळ असतां   वाट कुणाची बघतो आम्हीं,    ठाऊक असते सर्वांना, मृत्यू हा अटळ असूनी,   केव्हांही येई अवचित क्षणा ।।१।।   आगमनाचा काळ त्याचा,    कल्पनेनें ठरविला जातो, अचूक जरी शक्य नसले,    विचार त्यावरी करीता येतो ।।२।।   जीवन म्हणती त्या काळाला,    जगणे आले मृत्यू येई तो, जगण्यापुढे पर्याय नसतां,    सुसह्य करण्या प्रयत्न होतो ।।३।।   तन मनाला सुख देऊनी,    जीवन काल वाढविती कांहीं, सद्उपयोग तो केला जावा,    हीच इच्छा सदैव राही ।।४।।Read More

March 13, 2016
Visits : 4474

भावना उद्‍वेग   आकाशाला शब्द भिडले,   हृदयामधले  । भाव मनीचे चेतविता,   स्फोटक बनले  ।।१।।   देह जपतो हृदयाला,  सदा सर्व काळी  । धडकन त्या हृदयाची,  असे आगळी  ।।२।।   जमे भावना हलके तेथे,   एकवटूनी  । सुरंग लागता तीच येई,   उफाळूनी  ।।३।।   कंठ दाटता जीव गुदमरे आत  । रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात  ।।४।।   उद्‌वेग बघूनी शरीर,   कंपीत होते  । हृदयातील भाव जाऊनी,   मन हलके होते  ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर संRead More

March 13, 2016
Visits : 2198

स्थिर वा अस्थिर   स्थिर आहे जग म्हणूनी,   अस्थिर आम्ही जगू शकतो । अस्थिर आहे जग म्हणून,   स्थिर आम्ही जगू शकतो ।।१।।   पोटासाठी वणवण फिरे,   शोधीत कण कण अन्नाचे । थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे ।।२।।   धरणी फिरते रवि भोवतीं,   ऋतूचक्र हे बदलीत जाते । जगण्यामधला प्राण बनूनी,   चैतन्य सारे फुलवून आणते ।।३।।   पूरक बनती गुणधर्म,   स्थिर वा अस्थिर ते । विश्वचक्र फिरवित राहणे,   निसर्गाचे तत्वची असते ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्Read More

March 13, 2016
Visits : 2002

बाबांच्या रुपांत, तुम्ही काका   शंभर वर्षे जगा तुम्हीं,  काका आमच्यासाठीं, बाबांच्या रुपांत रहा,  तुम्ही सर्वांच्या पाठीं ।।१।।   भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे, तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे ।।२।।   उशीर झाला होता,  जेंव्हा जीवन उमगले, कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले ।।३।।   आंबा गेला मोहरुनी,  लाविली होती त्यांनी झाडे, दुर्दैवाने आमुच्या, नाही ते बघण्या फळाकडे ।।४।।   मध्येच सोडूनी गेले, नाटक चालू असतां, रंगवूनी बाRead More

March 13, 2016
Visits : 2170

गुणधर्म   करूं म्हटले करूं न शकलो    रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते     ठरले असते होईल ते ते   बघूनी बाह्य जगला ठरवी    मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी    उमज न येई ती सगळी   धडपड करीतो गडबड करीतो    त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले    उभारून ते येतील सगळे   मात करूनी विचारावरती     सुप्त गुण हे विजयी होती गुणधर्म ही ईश्वरी योजना    घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००Read More

March 13, 2016
Visits : 3089

मीरेची तल्लीनता   नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. - - - धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   - - -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  -  -  - २ चित्त ते हरीमय जाहाले   विषाचा घेता प्याला हरि तो त्यातची दिसला झेपावूनी गेली त्याच क्षणी घट घटा प्राशन केले. - - -  ३ चित्त ते हरीमय जाहाले   जहाल होते विष मृRead More

March 13, 2016
Visits : 3103

मला देव दिसला !  बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला. जन्म, संस्कार आणि कौटूंबीक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरीत पगडा बसू लागला. जे आहे, जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो आणि त्या वयात प्राप्त झालेल्या ज्ञानाने जे समजतो ते सारे मान्यता पावू लागले. कसलाही विRead More

March 06, 2016
Visits : 3052

पुण्ण्याचा साठा   खिशांत माझ्या पडली होती,   सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या,  सर्व बाजार पाही ।।१।।   सराफ्याच्या दुकानी दिसला,   एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले,  फिरती गरगर ।।२।।   दाम विक्रीचे जाणूनी घेता,   हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।।   दोन वेळची पूजा करूनी,   जप माळ जपती, खूप साचले पुण्य आपले,  हे कांहीं समजती ।।४।।   कसा मिळेल ईश्वर त्यांना,   तपोबलाच्या अभावी, जन्मोजन्मीचे पुण्य साRead More

March 06, 2016
Visits : 4085

भक्ष्य   नदीकाठच्या कपारीमध्ये,    बेडूक बसला दबा धरूनी, उडणाऱ्या माशीवरते,   लक्ष सारे केंद्रीत करूनी ।।१।।   नजीक येऊनी त्या माशीचे,   भक्ष त्याने करूनी टाकले, परि दुर्दैव त्याचे बघा कसे,   सर्पानेही त्यास पकडले ।।२।।   बेडूक गिळूनी सर्प चालला,   हलके हलके वनामधूनी, झेप मारूनी आकाशी नेले,    घारीने त्याला चोंचित धरूनी ।।३।।   'भक्ष्य बनने' दुजा करीता,    मृत्यूची ही चालते श्रृखंला, जनक असता तोच सर्वांचा,   गमंत येई त्या खेळाला ।।Read More

March 06, 2016
Visits : 3109

दया प्रेम भाव   दया प्रेम हे भाव मनी,   जागृत कर तू भगवंता । तुला जाणण्या कामी येईल,   हृदयामधली आद्रता ।।१।।   शुष्क मन हे कुणा न जाणे,   धगधगणारे राही सदा । शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा ।।२।।   पाझर फुटण्या प्रेमाचा ,   भाव लागती एकवटूनी । उचंबळणारे ह्रदय तेथे,   चटकन येईल मग दाटूनी ।।३।।   दया प्रेम या भावांमध्ये,   दडला आहे ईश्वर । मनांत येता हेच भाव ,   घडवी त्याचे दर्शन ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९Read More

March 06, 2016
Visits : 2140

जाळी   धागा धागा विणून,   केली तयार जाळी । गोलाकार नि बहुकोनी घरे,   पडली निर निराळी ।।१।।   स्थिर सुबक घरे,   जसा स्थितप्रज्ञ वाटे । सर्व दिशांचा तणाव,   न दिसे कुणा कोठे ।।२।।   तुटेल फुटेल तरी,   सैलपणा येणे नाही । जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही ।।३।।   जगे तो अभिमानानें,   मान ठेवूनीया ताठ । संसारामधील क्लेश,   झेलीत होती त्याची पाठ ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 06, 2016
Visits : 1805

भिकारीण   मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर, सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर ।।१।।   हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला, कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला ।।२।।   परि ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत, उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत ।।३।।   जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी, मिळालेल्या आवाजाला, समजे ती ऋणी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 06, 2016
Visits : 1932

नियतीची चाकोरी   अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार  । कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार  ।। खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी  । वादळ वारा ऋतू बदले,  चूक न होई त्यांत जराशी  ।। घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत  । हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत  ।। प्रत्येक कालक्रमणाच्या आखून,  दिल्या मर्यादा  । ठेवी अडकवून त्यामध्ये, सर्वाना नियती सदा  ।। जरी भासे नवीन कुणा,  नाविन्य सारे त्याचेसाठी  । बघत नाही जूनेपण तो,  येई नंतर त्याचे पाठी  ।।   डॉ. भRead More

March 06, 2016
Visits : 3487

पतंग   एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी  ।।     भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा जाणीव होई येतां प्रसंग,  त्याला कटण्याचा  ।।   धरतीवरी कोसळत असतां,  दृष्टी टाकी आकाशीं इतर पतंग बघूनी बोलला,  तोच स्वतःशीं   ।।   " नभांग मोठे दाही दिशा त्या,  संचारा स्वैरपणें आठवण ठेवा त्या शक्तीची,  ज्याच्यामुळें जगणें " ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

March 06, 2016
Visits : 3040

मच्छरांचे साम्राज्य     नुकत्याच एका बातमीने संपूर्ण मुंबईकरांना हादरुन सोडले. डासांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वत्र मलेरीयाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मृतांची संख्याही खूप वाढलेली आहे. सर्व अधुनिक वैद्यकिय शास्त्र आपल्या शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करताना दिसला. कांही दिवस यश, वा कांही दिवस अपयश अर्थात रोगाचा फैलाव जास्त झाल्याचे कळून येते. जागतीक आरोग्य संघटना ( World Health Organization ) हीने देखील मलेरीयाच्या प्रसारा बद्दल चिंता व्यक्त केली. आपल्यापरी मदतही देवू केली.            जगाRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 102142 hits