Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 27, 2015
Visits : 4654

बंदीस्त करा मनाला   वातावरणी वस्तू पडतां,   नाश पावते लवकर ती, हवा पाण्याच्या परिणामानें,   हलके हलके दूषित होती ।।१।।   ठेवूं नका उघडयावरती,   वस्तू टिकते निश्चितपणे, दूषितपणाला बांध घालता,   कसे येई मग त्यात उणे ।।२।।   बाह्य जगातील साऱ्या शक्ती,   आघात करती मनावरी, दूषिततेचे थर सांचूनी,   मनास सारे दुबळे करी ।।३।।   देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला, कांहीं न करता येते तेव्हां, राग लोभादी बाह्य गुणाला ।।४।।   डॉ. भगवान नाRead More

December 27, 2015
Visits : 1748

जीवन मार्गातील अडसर   जीवनातील वाटे वरती,   कडेकडेने उभे ठाकले, परि वाटसरूंना सारे ते,   यशातील अडसर वाटले ।।१।।   वाट चालतां क्रमाक्रमानें,   बाधा आणून वेग रोकती, ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करीती ।।२।।   षडरिपूचे टप्पे असूनी,   भावनेवर आघांत होतो, सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो ।।३।।   पवित्र निर्मळ भावनेमध्ये,   रंगाच्या त्या छटा उमटती, गढूळपणाच्या वातावरणीं,   सारे कांहीं गमवूनी बसती ।।४।।   थोडेRead More

December 27, 2015
Visits : 1833

नाम घेण्याची वृत्ती दे   सतत नाम घेण्यासाठीं,  बुद्धी दे रे मजला, आठवण तुझी ठेवण्याची,  वृत्ती दे रे मनाला ।।धृ।। श्वासात प्राण म्हणूनी,  अस्तित्व तुझेच जाणी, श्वास घेण्याची शक्ती,  तुझ्याचमुळे असती, जीवनातील चैतन्य,  तुजमुळेच मिळते सर्वांना ।।१।। सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला,   अन्नामधले जीवन सत्व,  तूच ते महान तत्व, सुंदर अशी सृष्टी,  बघण्या ते दिली दृष्टी, आस्वाद घेण्या जगताचा,  जागृत ठेवी भावनेला ।।२।। सतत नाम घेण्यासाठी,  बुद्धी दे रे मजला   निनादाच्याRead More

December 27, 2015
Visits : 2640

विनम्रता   लीन दीन ती होऊन पुढती, झुकली होती त्यावेळी । हात पुढे आणि नजर खालती,   ज्यांत दिसे करूणा सगळी  ।।१।।   लाचार बनूनी पोटासाठी,   हिंडे वणवण उन्हांत सारी । वादळ वारा आणिक पाऊस, संगत घेवून फिरे बिचारी  ।।२।।   मदतीचा हात दिसे, जागृत होता भूतदया । जनसामान्यात असती मानवतेतील ही माया  ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 27, 2015
Visits : 2863

हट्टी अनु   एक होती अनु, फुलासारखी जणू, डोळे फिरवी गर्र गर्र, पाऊल टाकी भरभर, तिला लागली भूक, गडू दिला एक, बघितला रिकामा गडू, तिला आले रडूं, आईने दूध भरले, कांठोकांठ ओतले, तिला हवे होते जास्त, दूध होते मस्त, रडरड रडली, आदळ आपट केली, सांडूनी गेला गडू, पाठींत बसला मात्र धम्मक लाडू ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 27, 2015
Visits : 3503

प्रेमाचा उगम   दाखवू नकोस प्रेम  उपरेपणाच्या भावनेने  । तसेच मिळेल परत केवळ वाणीच्या शब्दाने  ।।   कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी  । प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी  ।।   शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी  । आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी  ।।   खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो  । सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 27, 2015
Visits : 2718

अहं ब्रह्मास्मि एके काळीं हवे होते, मजलाच   सारे कांहीं आज दुजाला मिळतां आनंद मनास होई   माझ्यातील   'मी ' पणानें विसरलो सारे जग तुझ्यामध्येंही ' मी '  आहे, जाण येई कशी मग   जेंव्हा उलगडा झाला साऱ्या मध्ये असतो 'मी' आदर वाटू लागला, जाणता  'अहं  ब्रह्मास्मि'   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 27, 2015
Visits : 2675

सनसेट अपियरन्स ( sun - set appearance )   डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व  शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते.  रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे. एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये दोन तीन महिन्याच्या बालकाला आणले गेले. मुलाचे डोके खुपच मोठे होते. कपाळ भव्य, परंतु नाक तोंड डोळे त्यामानाने लहान होते.  जन्मत: हा  दोष त्या मुलामध्ये असल्याचे त्यांना कळले. त्Read More

December 20, 2015
Visits : 2142

सारेच खेळाडू   खेळाच्या त्या मैदानीं,    रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।।   खेळाच्या कांहीं क्षणी,   टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत,   काही जण नाचती ।।२।।   निराशा डोकावते,   क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते,   खेळा मधल्या अंगी ।।३।।   सूज्ञ सारे प्रेक्षक,   टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते,   होते खेळाचे ज्ञान ।।४।।   मैदानी उतरती,   ज्यांना असे सराव, जीत त्यांचीच होते,   ज्यांच्यात खिलाडू भाव ।।Read More

December 20, 2015
Visits : 2964

मोहमाया दलदल   दलदल होता चिखल मातीची,   पाय जाती खोलांत, प्रयत्न व्यर्थ जाऊनी ,  न होई त्यावर मात ।।१।।   सावध होऊनी प्रथम पाऊली,   टाळावे  संकट, मध्यभागी शिरल्यानंतर,   दिसत नाही वाट ।।२।।   मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली, चुकूनी पडतां पाऊल , खेचला जातो खाली ।।३।।   जागृतपणाचा अभाव असतां,   गुरफूटत जातो, मोहमायेच्या आकर्षक गुणाला,   बळी तोच पडतो ।।४।।   वेगवान जीवन प्रवाही,   खिळ बसे मोहाने, क्षणीक सुखाच्या मागे जातRead More

December 20, 2015
Visits : 4328

निसर्गावर अवलंबून   कितीही सारी धडपड करशी, लाचार ठरतो अखेरी, जाण माणसा मर्यादा तव, आपल्या जीवनी परी ।।१।।   क्षणाक्षणाला अवलंबूनी, जीवन असे तुझे सारे, पतंगा परि उडत राहते, जसे सुटत असे वारे ।।२।।   निसर्गाच्याच दये वरती, जागत राहतो सदैव, कृतघ्न असूनी मनाचा तूं, विसरून जातो ती ठेव ।।३।।   निसर्गाच्या मदती वाचूनी, जगणे शक्य नसे तुजला, जीवन कर्में करीत असतां, आठवित जा प्रभूला ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५०Read More

December 20, 2015
Visits : 4493

निसर्गाचे खेळणे   धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ती ज्यांचे पाठी ।।१।।   बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे , यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे ।।२।।   नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने, सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे ।।३।।   जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी । पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी ।।४।।   प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची । आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची ।।५।।   मृत्यूच्या दाढे मधूनी,  एक सुटून जाताRead More

December 20, 2015
Visits : 4078

मयुरा तूं आहेस गुरु   मयुरा तूं आहेस गुरु,  तुला आम्हीं वंदन करु   ।।धृ।।   नदी कांठच्या वनीं, थुई थुई नाचूनी, पिसारा फुलवुनी, तुझे पाहूनी नृत्य, ताल धरु   मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु ।।१।।   मोरपिसे सुंदर, रंग बहारदार, दिसे चमकदार, बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं,   मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु ।।२।।   रुप डौलदार, चाल ऐटदार, भासे रुबाबदार, बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगीकारुं,   मयुरा तूंRead More

December 20, 2015
Visits : 6216

प्रभू दर्शन   महिमा कसा प्रभू तुझा आगळा, पावन करसी तूं भक्ताला, नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   ।।धृ।।   पुंडलीकाची महान भक्ती, माता पित्याचे चरणी होती, त्याची सेवा तुजसी खेचती, कसा उकलू मी ह्या कोड्याला,   ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   पातिव्रत्य हे दैवत समजूनी, पतिसेवेला घेई वाहुनी, सावित्रीने दिले दाखवूनी, प्रभू वाकती सती शब्दाला,   ।।२।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   कांहीं कRead More

December 20, 2015
Visits : 4653

नदीवरील बांध विषण्यतेने  बघत होतो       भिंतीवरच्या खुणा काळ जाऊन वर्षे लोटली     आठवणी देती पुन्हा   बसत होतो नदीकांठी        बालपणीच्या वेळी पात्र भरुनी वहात होती     गोदावरी त्या काळी   सदैव पूर येउनी तिजला       गावास वेढा पडे गांव वेशीच्या घरांना मग     पाण्याचे बसती तडे   चित्र बदलले आज सारे       पात्र लहान होई बांध घातला धरणावरी      पाणी अल्पसे येई   खिन्नपणे खूप भटकलो        भोवतालच्या भागी चकित झाले मन बघूनी         हिरवळ जागोजागी   इच्छित दिशेने पाRead More

December 20, 2015
Visits : 2040

चक्षु पटलावरील ती छबी   पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंत प्रधान असतानाचा एक छोटासा परंतु माझ्या जीवनातला महान ऐतिहासिक  प्रसंग आठवतो. गुबर्ग्याला  पंडितजी  कोणत्यातरी भव्य वास्तूच्या संकल्पित  इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या उद्घाटनासाठी आलेले होते. आजकालचा दहशतवाद तेंव्हा मुळीच नव्हता. कुणीही पंत प्रधानाच्या जवळ जाण्यास फारशी आडकाठी नसे.  माझे वडील तेथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते.  फक्त  निमंत्रीतानाच  आत प्रवेश दिला जात होता. तीन स्त्रीयांना तीन रंगाच्या ( भगवा पांढरा नी हिरवा ) साड्या परRead More

December 13, 2015
Visits : 2436

वेळेचे मूल्य   मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे, गमावून टाकी,  जाणूनी फुकाचे ।।१।।   लागत नसते,    दाम वेळेसाठीं, म्हणून दवडे,   अकारणा पोटीं ।।२।।   वस्तूचे मूल्य ते,   पैशांनीच ठरते, परी वेळेची किंमत, कुणा न समजते ।।३।।   वेडे आहोत सारे,    कसे होई मूल्य वेळ जातां मग,   आयुष्य जाईल ।।४।।   आयुष्य खर्चणे, हेच वेळेचे मुल्य ठरते, जीवनांतील यश, त्यावरुन कळते ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurRead More

December 13, 2015
Visits : 2546

उपयोगीता हेच मूल्य   चष्मा लावूनी करीत होतां,   ज्ञानेश्वरीतील पारायण, दृष्टीमधले दोष काढले,   चाळशीचा आधार घेवून ।।१।।   फुटूनी गेला एके दिवशीं,   चष्मा त्याच्या हातामधूनी, पारायणे ती बंद पडली,   दृष्टीस त्याच्या बाध येऊनी ।।२।।   चालत असता सरळपणे,   दैनंदिनीचे कार्यक्रम, खीळ पाडूनी बंद पाडी,   क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम ।।३।।   वस्तूचे मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती, तोलण्यास धन न लागे,   मूल्य मापन जेंव्हां होती ।।४।।   डॉ. भगवान नागाRead More

December 13, 2015
Visits : 907

अपूर्ण जीवन   सोडून दे अहंकार तुझा, लाचार आहेस आपल्या परि, पूर्ण जीवन तुला न मिळे, न्यूनता राहते कांहीं तरी ।।१।। धनराशी मोजत असतां, वेळ तुजला मिळत नसे, शरीर संपदा हाती नसूनी, मन सदा विचलित असे ।।२।। शांत झोपला कामगार , दगडावरी ठेवूनी डोके. देह सुदृढ असूनी त्याचा, पैशासाठी झुरतां देखे ।।३।। उणीवतेचा कांटा सलूनी, बाधा येत असे आनंदी, म्हणून खरे समाधान , लाभत नसते मग कधी ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagRead More

December 13, 2015
Visits : 906

त्यागवृत्ती   जीवनाच्या सांज समयीं ।  उसंत मिळतां थोडीशी  ।। हिशोब केला स्वकर्माचा ।  वर्षे गेली कशी  ।।१।।   दिवसामागून वर्षे गेली ।  नकळत अशा वेगानें  ।। सुख दुःखाच्या मिश्रणीं ।  जीवन गेले क्रमाक्रमानें  ।।२।।   आज वाटे खंत मनीं ।  आयुष्य वाया दवडिले  ।। ऐहिक सुखाच्या मागे जातां ।  हातीं न कांहीं राहिले  ।।३।।   ' घेणे ' सारे आपल्यासाठीं ।  करीत जीवन घालविले  ।। ' देण्या '  मधल्या आनंदाला । मन सदा वंचित राहिले  ।।४।।   सुधारुन घे आतां तरी ।  अनुभवाने चूक आRead More

December 13, 2015
Visits : 1129

ऊर्जेचा करा योग्य उपयोग   खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता, शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरीता  ।।धृ।।   बागेतील फुले सुंदर, फुलपाखरांचे रंग बहारदार, मोहक इंद्र धनुष्याकार, निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता,   खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरीता ।।१।।   भजन पूजन प्रभूचे, भक्ति-भाव मनाचे, उपवास करी देहशुद्धीचे, तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता ,  खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता ।।२।।   गरिबासी मदतीचा भाRead More

December 13, 2015
Visits : 1334

संशयाचे भूत   हे भूत संशयाचे छळते कसे मनाला  । करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला  ।। एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे  । डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते  ।। गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा  । कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा  ।। येता मनी संशय आपलाच ज्या घडीला  । शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 13, 2015
Visits : 2622

निसर्ग सुख!   आनंदाचे झरे वाहतां, आवती भवती सारे रे माणसा खिन्न वाटतो, जीवन उदास कां रे?   निसर्गाच्या ठेव्या मधल्या,  सर्व वस्तू सुखदायीं निवडून घे तूं त्यातील,  आनंद देतील काहीं   केवळ तुझी दृष्टी हवी, टिपण्यास ते सौंदर्य आनंद तो देण्याकरितां, करिते सतत कार्य   मनाचा हा खेळ जहाला,  सुख दुःख समजणें निसर्ग प्रयत्न करितो,  सदैव सुख देत जाणें   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 13, 2015
Visits : 4636

सर्प आणि उंदीर यांचे द्वंद हैदराबाद येथे एक सर्पालय बघण्यास गेलो होतो. अनेक जातींचे सर्प कांच- घरात  ठेवलेले होते. त्यांना खेकडे, बेडूक, उंदीर, वा छोटे जिवंत  प्राणी  खाण्यासाठी सापाच्या  दालनात सोडले जात होते. फक्त भुकेला सर्प हा आपल्या भक्षावर तुटून  पडतो. नसता  तो भक्ष जीवना मारत नसतो. एक सर्प  दालनात  एका उंदराला सोडले होते.  सर्प बराच मोठा होता. सापाचे हालके  हालकेपुढे  जाणे, उंदराच्या दिशेने झेप घेणे, उंदराला दंश  करणे, त्याला जायबंद करणे, त्याच्यावर वेटोळे घालून त्याला खीळ खिळा करणे, व मग गिळणेRead More

December 06, 2015
Visits : 1711

नशीब   का असा धांवतोस तूं ,    नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी,   नशीब येईल संगे ।।१।।   प्रयत्न होतां जोमाने,   दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव,   योग्य मार्गानें मिळते ।।२।।   प्रयत्न करूनी बघा,  ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें,    नशीबही बदलेल ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 06, 2015
Visits : 1420

कवच   आघात होऊनी परिस्थितीचे,   सही सलामत सुटत असे, संकटाची चाहूल लागूनी,   परिणाम शून्य ठरत असे ।।१।।   दु:खाची चटकती उन्हे,   संरक्षणाची छत्री येई, कोणती तरी अदृष्य शक्ती,   त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।।   दूर सारूनी षडरिपूला,   मनावरती ताबा मिळवी, प्रेमभाव अंगी करूनी,   तपशक्तीला सतत वाढवी ।।३।।   तपोबलाचे बनूनी कवच,   फिरत होते अवती भवती, दु:खाचे वार झेलुनी,   रक्षण त्याचे सदैव करीती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००Read More

December 06, 2015
Visits : 1543

देह मंदीर   शरीर एक साधन,  साध्य करण्या प्रभूला, शुद्ध देह- मनांत आठवा त्याला ।।१।।   व्यायाम आहार,  नियमित वेळी, शरीर तंदुरस्त, सुदृढ ठेवी  ।।२।।   सुदृढ असता देह, करावे मनाला शांत, टाळत असतां मोह, न येई तो भावनेत ।।३।।   षडरिपू हे विकार,  काढा विवेकांनी, निर्मळ ठेवा शरीर,  पवित्रता राखूनी ।।४।।   देह आहे मंदीर,  गाभारा तो मन, आत्मा तो ईश्वर,  आनंद देई आंतून ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 06, 2015
Visits : 1790

मेघ- गर्वहरण   अंहकाराचा पेटून वणवा,   थैमान घातिले त्या मेघांनी । तांडव नृत्यापरि भासली,   पाऊले त्यांची दाही दिशांनी ।।१।।   अक्राळ विक्राळ घन दाट,   नी रंग काळाभोर दिसला । सूर्यालाही लपवित असता,   गर्वाचा भाव चमकला ।।२।।   पृथ्वीवरती छाया पसरवूनी,   चाहूल देई आगमनाची । तोफेसम गडगडाट करूनी,   चमक दाखवी दिव्यत्वाची ।।३।।   मानवप्राणी तसेच जीवाणे,   टक लावती नभाकडे । रूप भयानक बघून सारे,   कंपीत त्यांची मने धडधडे ।।४।।   त्याच वेळी वादळ सुटूनRead More

December 06, 2015
Visits : 1681

जीवन मरणाची शर्यत   शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी, विविध वस्तू संग्रहिले, शोभा देण्या आले कामी ।।१।।   शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी, झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी ।।२।।   काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला, रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यांनी प्रकाशिला ।।३।।   रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती, नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती ।।४।।   खेळून भूक लागली,  हा विचार मनी आला, जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांनाRead More

December 06, 2015
Visits : 679

मर्यादा   मर्यादेचा बांध घालूनी,  मर्यादेतचि जगती सारे  । अनंत असता ईश्वर ,  मर्यादा घाली त्यास बिचारे  ।। जाण जगाची होई इंद्रियांनी,  त्याला असती मर्यादा  । विचार सारे झेपावती,  ज्ञान शक्ती बधूनी सदा  ।। अथांग वाटे विश्वमंडळ,  दाही दिशांचा भव्य पसारा  । ईश्वर आहे थोर त्याहूनी,  मोजमापाच्या उठती नजरा  ।। कशास करीतो तुलना सारी,  भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी  । अज्ञानाने पडती मर्यादा,  अनंत तत्वास त्याच क्षणी  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gRead More

December 06, 2015
Visits : 1230

प्राणिमात्रा विषयीं दया   चाललो होतो मित्रासह    सहल करण्या एके दिनीं आनंदाच्या जल्लोषात आम्हीं    गात होतो सुंदर गाणीं   १   वेगामध्यें चालली असतां    आमची गाडी एका दिशेने लक्ष्य आमचे खेचले गेले    अवचित एका घटनेने   २   चपळाईनें चालला होता    काळसर्प तो रस्त्यातूनी क्षणांत त्याचे तुकडे झाले    रस्त्यावरी पडला मरूनी   ३   काय झाले कुणास ठाऊक    सर्व मंडळी हळहळली जीव घेणाऱ्या प्राण्यालाही    सहानुभूती ती लाभली    ४   अंत:करणीं दया भाव तो    असतो ईश्ररी गRead More

December 06, 2015
Visits : 2028

शिकारी आणि शिकार यांच्या भूमिका            गिरनार हा सौराष्ट्र मधला जंगल पर्वतमय भाग. येथील अभयारण्यात  सहल  म्हणून अनेक यात्री बरोबर जाण्याचा योग आला होता.  सर्व परिसर शासनाचा संरक्षित ( Protected  area )  टापू म्हणून समजला गेला. प्रचंड जंगले आणि त्यात  सर्व प्रकारची जंगली जनावरे  यांचे स्वैर वास्तव्य  असलेला भाग. जंगलामधून जाण्यासाठी  कच्चा रस्ता केलेला होता. दुतर्फा घनदाट झाडी, सूर्य- प्रकश वा  उन्हे यांना रोकणारी दिसून आली. वळणा वळणाचे रस्ते. रस्त्यावर ठीकठीकानी सूचना फलक दिसून येत  होते.  फलकावर निRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 82146 hits