Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 28, 2015
Visits : 4138

कृष्ण कमळ-                                                                               एक शोषन   शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

February 28, 2015
Visits : 4660

बागेतील तारका-     मयुरा तूं आहेस गुरु   मयुरा तूं आहेस गुरु,  तुला आम्हीं वंदन करु   ।।धृ।।   नदी कांठच्या वनीं थुई थुई नाचूनी पिसारा फुलवुनी तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु   ।।१।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु   मोरपिसे सुंदर रंग बहारदार दिसे चमकदार बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं   ।।२।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु   रुप डौलदार चाल ऐटदार भासे रुबाबदार बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगRead More

February 28, 2015
Visits : 4087

जीवनाच्या रगाड्यातून-                                                    सिकंदरचे खंतावलेले मन राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे चालला होता. रस्त्यांत भेटणारे गांRead More

February 22, 2015
Visits : 3330

कृष्ण कमळ-   उगवत्या सूर्याला नमस्कार   उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर,  असुनीया शिरजोर हांजी हांजी करती, बघता सत्तेला    ।।३Read More

February 22, 2015
Visits : 3244

बागेतील तारका-   ऊर्जेचा करा योग्य उपयोग   खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता   ।।धृ।। बागेतील फुले सुंदर फुलपाखरांचे रंग बहारदार मोहक इंद्र धनुष्याकार निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता   ।।१।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता   भजन पुजन प्रभूचे भक्ति-भाव मनाचे उपवास करी देहशुद्धीचे तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता   ।।२।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता   गरिबासी मदतीचाRead More

February 22, 2015
Visits : 3215

जीवनाच्या रगाड्यातून-   जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?   ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.  व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या  विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.               ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतातRead More

February 15, 2015
Visits : 4616

कृष्ण कमळ-   श्रेष्ठत्वात न्युनता विसरते   विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग   नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते   अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी   सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार   आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे   कित्येक आहेत विशाRead More

February 15, 2015
Visits : 3459

बागेतील तारका-   जीवन मरणाची शर्यत   शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घोऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली,  हा विचार आला मनी जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना शर्यत किडे माशांची,Read More

February 15, 2015
Visits : 4717

जीवनाच्या रगाड्यातून-                                               विश्वासातील शंका           एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते. श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवण वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत  श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारलेRead More

February 08, 2015
Visits : 5236

कृष्ण कमळ-   निसर्ग स्वभावाचे दर्शन   बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव उमटविती भाव    मनावर आमच्या     ||१|| चांदण्याची शितलता,मनाची प्रफूल्लता देहाची आल्हादकता    लाभली चंद्राचे ठायी ||२|| नाजूक सहवास, मधूर मिळे वास, कोमलतेचा भास    जाणविला फूलांनी    ||३|| रंगाची विविधता, छटाची आकर्षकता, मनाची वेधता    इंद्रधनुष्य देई    || ४|| पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता, वेगाची तीव्रता,    भासे हरिणाच्या पायी    ||५|| प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता, स्वभावाचRead More

February 08, 2015
Visits : 5954

बागेतील तारका-   थांबव, विज्ञाना तुझे शोध   थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद   / धृ /   उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद     १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू,  निसर्गातील सुगंध     २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   नदीतील संथता ओढ्यातील चपळता धबधब्यातील प्रचंडता रोखलास प्रवाह तू, घालूनी बांध      ३Read More

February 08, 2015
Visits : 4334

जीवनाच्या रगाड्यातून-   अधुनिक सन्यास आश्रमी जीवन   एक अतिशय सुंदर व भव्य शिखर असलेले देवीचे मंदीर होते. सुरवातीच्या कांही पायऱ्या व मग मंदीरांत प्रवेश. मी त्या गांवी कांही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ, देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सुरवातीला दोन ओटे होते. मी एका बाजूने बसून बुट काढू लागलो. माझी नजर कोपऱ्यांत बसलेल्या एका वृद्ध माणसावर गेली. ते भिंतीला टेकून बसले होते. पांढरे कपडे, धोतर व झब्बा होता. कानटोपी घातलेली होती. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हती. त्यांच्या हातात एक पुसRead More

February 01, 2015
Visits : 3915

कृष्ण कमळ-                                     प्रभाते नाम घ्या जगदंबेचे   प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।   कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचेRead More

February 01, 2015
Visits : 4447

बागेतील तारका-   कलेचे खरे मुल्य   पर्वत शिखरीं जाऊन    खोदून आणली माती कौशल्य पणास लावून   केला मी गणपती   ।।१।।   मुर्ती बनली सुरेख    आनंद देई मनां दाम मिळेल ठिक   हीच आली भावना   घेऊन गेलो बाजारीं   उल्हासाच्या भरांत कुणी न त्यासी पसंत करी   निराश झालो मनांत   बहूत दिवस प्रयत्न केला    कुणी न घेई विकत कंटाळून नेऊन दिला    गणपती मी शाळेत   भरले होते भव्य प्रदर्शन   हस्तकला कौशल्याचे नवल वाटले गणपती बघून   दालनातील सुरवातीचे   चकीत झालो जाRead More

February 01, 2015
Visits : 4819

जीवनाच्या रगाड्यातून-     जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .                वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.                 मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो.  चाRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 64171 hits