Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 26, 2016
Visits : 813

भाकरी   भाकरीच्या पाठीवर     ठसे दिसती हातांचे जातां तव्यावर भाजूनी    निशाण राहते कष्टांचे एका भाकरीच्या पाठीं     हात कितीक गुंतले कण कण देती ग्वाही      मन भरुनी कसे आले उन्हां पावसात फिरे      शेतामधीं शेतकरी टप् टप् घाम गाळी      उभी करितो जवारी पोती पोती उचलूनी      वाहून नेई मजूर दमछाक होऊनी ही      मिळत नाहीं पोटभर ओवी म्हणत मुखानें       आई थापिते भाकरी साऱ्यांच्या कष्टामध्यें    तिच्या मायेची भागीदारी धरणीच्या पोटातून      जीवन रस येई वर दुजासाठी जगा तRead More

December 26, 2016
Visits : 723

दिवसां दिसणारा चंद्र   रे चंद्रा तू कसा दिसतो,   अवचित ह्या वेळीं, भास्कराच्या ह्या साम्राज्यीं,   दूर अशा त्या स्थळीं ।।१।।   कोठे आहेत असंख्य सैनिक,   जे तुला साथ देती, कां असा तूं एकटाच आहे,   दिवसा आकाशांती ।।२।।   शांत असूनी तुझा स्वभाव,   फिरे त्याच्या राज्यांत, एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात ।।३।।   कडक स्वभाव तो भास्कराचा,   नियमानें चालतो, चुकून देखील तुझ्या राज्यीं,   कधी येत नसतो ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९Read More

December 26, 2016
Visits : 1174

एका मनाचे हे भाग   एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक  । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक...१, छोट्या भागावरी,  वेष्टण शरीराचे  । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे...२, मनाचे स्वभाव,  सारखेच असती  । फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती...३, अगणीत  मनें, कोठे नसे फरक  । अनेक बनली, जनक तिचा एक....४,   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 26, 2016
Visits : 2244

'आनंद '   भावना   ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे 'आनंद ' हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  'सुख '  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते 'दुःख '  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   'आनंद ' भावना असे एकटी नसे तेथे दुजी भावना 'मोक्ष' तयाला म्हणती कुणी आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां   ।।४।।   व्यर्थ जातील प्रRead More

December 26, 2016
Visits : 2044

सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश-   कोणते दुःख तुला छळते अकारण  कां व्यथित होते  ।।धृ।।   प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सारे याच क्षणीं ते  ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते   बांधून घेतां राखी हातीं आश्वासन तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तुजसाठीं धावूनी  कसली शंका मनांत येते  ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते   संसार भरला सुख-दुःखानी घे शिरावर तुझ्याच समजूनी जीवन मार्गी होRead More

December 26, 2016
Visits : 1708

जीवन ध्येय   प्रभूची लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी,  हीच त्याची महीमा  १ जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी   २ मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून,  विश्लेषण करती प्रभूचे  ३ कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी मस्तिक,  चर्चा करिती प्रभूची   ४ सत्य परिस्थिती ऐसी,  कुणी न जाणले प्रभूसी सर्वांची चालना तर्कासी,  प्रभूच्या अस्तित्वाविषयी   ५Read More

December 26, 2016
Visits : 1595

आमचे खेळ या मित्रांनो सारे या,    सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे  । मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते  ।।  खेळांना त्या    समजून घ्या- १---  या मित्रांनो सारे या,  हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा  । स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी  ।। एकाच दमात   भिडू मारू या -२--- या मित्रांनो सारे या,  खो खो मध्ये चपळाई      चकमा देण्याची घाई  । उलट सुलट बसे           एकाच रांगेत दिसे  ।।  मिळता खो    भिडूला पकडूRead More

December 26, 2016
Visits : 2041

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?   ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.  व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या  विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.               ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुखRead More

December 18, 2016
Visits : 2219

निवृत्तीच्या उंबरठ्यावर !   कां व्हावे निवृत्त मी ?    कुणी सांगतो म्हणूनी निसर्गालाच सांगू द्या      वय झाले समजूनी   कार्यक्षमता माझ्या मधली    मोजमाप हे कुणी करावे ? विकलांग होईल केंव्हा शरीर    निसर्गालाच हे ठरवूं द्यावे   सहजची जगतो ऐंशी वर्षे      संसार सागरी पोहता पोहता स्थिरावले मन विचार करुनीं     निवृत्तीची जाणीव येता   सर्वासंगे जगता जगता      शेवटचा तो श्वास ठरु दे हासत खेळत आनंदाने      ह्या जगाचा निरोप घेऊं दे   डॉ. भगवान नागापRead More

December 18, 2016
Visits : 1713

प्रवाही जीवन   वाहत असते जीवन सारे,   वाहणे जीवनाचा गुणधर्म, स्तब्ध राहता जीवन आपले,   कसे घडेल हातून कर्म ।।१।।   वाहत होते, वाहत आहे, भविष्याते वहात जाईल, सतत चाले ही प्रक्रिया,   जीवन करण्यास सफल ।।२।।   आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो,   निर्जीव वस्तूसुद्धा प्रवाही, अणूची ती बनली असूनी,   प्रचंड हालचाल आत होई ।।३।।   अणूत असूनी तीन भाग,   अतिशय वेगाने फिरती, केवळ त्यातील वेगामुळे,   स्थिर साऱ्या वस्तू त्या भासती ।।४।।   डॉ. भगवान नागापूRead More

December 18, 2016
Visits : 1565

प्रेम नाणे   तसेंच वागा इतरजणांशी,   वाटत असते ,तुमच्या मनीं   । अपेक्षा करता प्रेमाची,   सदैव इतरांकडूनी...१,   सहानूभुतीचा शब्द लागतो,   दैनंदिनीच्या जीवनीं  । क्षणा क्षणाला भासत असते,   जीवन तुमचे अवलंबूनी...२,   प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला  । प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला...३,   याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे  । दोन मनें सांधली जाऊनी,   आनंद सर्वत्र दिसत असे...४,   राग लोभ हे शत्रू आपलRead More

December 18, 2016
Visits : 2110

आधार   वेलींना आधार होता,   वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला,   कोसळणार मग कधीतरी   नष्ट करिल तरूवेलींना,   धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी,   सारे कांहीं विसरूनी जाता   वेलींनो आणि झुडपानों,   सोडूनी घ्या आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,   स्वावलंबनाचे टाका पाऊल   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 18, 2016
Visits : 1166

संस्कारमय मन   प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा....१, मनी आस ती राहत असते,  उचलून त्यास न्यावे शिखरावरती जाता क्षणी,  स्थितीरूप घ्यावे...२, प्रयत्नात साथ न मिळता,  खाली कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते...३, विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते,  अवलंबूनी विचारे...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 18, 2016
Visits : 1768

पिंडीतील ब्रह्मांड   विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती   सुक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं   विचार मनीं येई ,    कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली   समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता   जीव देहाचे पिंड,   जीवंततेतील सुक्ष्मता बाळगी ते ब्रह्मांड,   हीच त्याची महानता   डॉ. भगवानRead More

December 18, 2016
Visits : 1165

शुद्धीसाठी गुरू   कितीक वेळा धुतला कोळसा,  रंग न बदले त्याचा  । उगाळता झिजून जाई,  परि काळेपणा कायमचा  ।। भट्टीत घालून त्यास जाळता,  घेई रंग लाल कसा  । शुभ्रपणा हा दिसून येतो,  राही न जेंव्हा कोळसा  ।। मलीनता ही मनामधली,  खोल  रूजली असे  । विचारांतील तर्कज्ञान ,  शुद्धीसाठी पुरे नसे  ।। गुरू लागतो अग्नी सारखा,  चित्त शुद्धी करिता  । ज्ञानभट्टी  पेटवून देई,  जाळण्या अशुद्धता  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 18, 2016
Visits : 1431

विश्वासातील शंका           एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते. श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत  श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले. श्रीकृष्ण हसून म्हणाले   " दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्त मRead More

December 11, 2016
Visits : 2292

चंद्राचे कायम स्वरूप    ठेवून पाऊल चंद्रावरी      अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली       वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड      तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी         हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे      चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण              असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप             ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू            शोध घेण्या अंतरीचे // तेच आहे मधुर चांदणे        चंद्रातील शितलतेचे / आजही वाटतो आल्हादRead More

December 11, 2016
Visits : 1760

जागृत आंतरात्मा   कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।   चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।   निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले, प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।   नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।   तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला, कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला ।।५।।   तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,Read More

December 11, 2016
Visits : 504

मुरब्बी   लोणच्याला चव येते,   थोडे मुरल्यानंतर  । आंबाही स्वादिष्ट लागे,   आंबून गेल्यानंतर....१, विचारांची मजा वाटे,   ऐकता ज्ञानी विचार  । परिपक्वता त्यांच्यातील,   देई आनंदाला धार...२, परिपक्वता येण्यासाठीं,   अनुभवाची भट्टी हवी  । ज्ञान चमकते,   जेव्हां तर्कज्ञान पाही....३, विचारांत मुरलेला,   मुरब्बी तो असतो  ।। अनुभवाच्या शक्तीनें,   योग्य पाऊल टाकतो...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 11, 2016
Visits : 1450

सदैव जागृत रहा   झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी ...१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती...४ चित्त करूनी एकाग्र, दिशा त्यास या प्रभूसाठीं मिळेल सारे तुम्हां, जागृत राहण्या पोटीं...५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५०Read More

December 11, 2016
Visits : 1302

रचली जाते कविता   मिळता मजला बाह्य एकांत,  छळते गर्दी विचारांची मन गुंतविण्या कुणी नसता,  चलबिचल होते भावनांची...१, शब्द वर्णांचा घेवून आधार,  भावना काढी मार्ग आपला आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला...२, शब्दांना नटवी थटवी,  ध्वनी लहरी नि सूर गेयता अलंकार मिळता अंगी,  रचली जाते एक कविता...३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 11, 2016
Visits : 2216

अजाणतेतील अपमान   स्फुर्ति येऊन कविता केली   आनंद झाला मनीं   । चटकन कागदावरी लिहीली   शब्द येतां ध्यानी   ।।   कवितेतील शब्दरचना   झाली बहरदार   । कौतूकाची येई भावना   बघुनी शब्द भांडार   ।।   पुर्ण करुनी कविता    टिपूनी घेतली वहीत   । काव्य रचना परत वाचतां   मग्न झालो आनंदात   ।।   फेकूनी दिला कागद    ज्यावरी रचिली  कविता   । विचारांत होतो धुंद    कृत्य केले मी अजाणतां   ।।   अघटित घटना झाली   काव्य स्फुर्ति गेली निघूनी   । नंतर मजला काव्य सुचेना    बेचैन झालRead More

December 11, 2016
Visits : 2347

जीवन एक   “जाते”   जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  । दोन चाकांत येईल,  मोडेल त्याचा कणा  ।। जीवन मृत्यूची चाके,  सतत फिरत राही  । येई जो मध्ये त्याच्या,  मागे न उरेल काही  ।। मध्यभागी राही स्थिर,  आंस त्यास म्हणती  । वरचे चाक फिरे,  त्याच्या भोवती  ।। आंसाजवळील दाणा,  दूर तो चाकापासूनी  । परिणाम चाकाचा तो होईल,  मग कोठूनी  ।। जन्म मृत्यूची चाके,  ईश्वर हा फिरवतो  । जवळीक त्याची मिळता,  दु:खातून मुक्त होतो  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५०Read More

December 11, 2016
Visits : 2045

अधुनिक सन्यास आश्रमी जीवन   एक अतिशय सुंदर व भव्य शिखर असलेले देवीचे मंदीर होते. सुरवातीच्या कांही पायऱ्या व मग मंदीरांत प्रवेश. मी त्या गांवी कांही कामासाठी गेलो होतो. संध्याकाळची वेळ, देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. सुरवातीला दोन ओटे होते. मी एका बाजूने बसून बुट काढू लागलो. माझी नजर कोपऱ्यांत बसलेल्या एका वृद्ध माणसावर गेली. ते भिंतीला टेकून बसले होते. पांढरे कपडे, धोतर व झब्बा होता. कानटोपी घातलेली होती. त्यामुळे त्यांचा चेहरा दिसत नव्हती. त्यांच्या हातात एक पुस्तक होते. ते वाचत होते. हाती माRead More

December 11, 2016
Visits : 1165

ज्ञानाग्नि पेटवा   हातातील काडी    घासतां  पेटीवरी अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी   लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो   चितांत असतो     प्रभू सदैव शांत ओळखण्या त्यासी   लागताती संत   संत हाच गुरु        मार्गदर्शक असे चित्तातील प्रभूला     जागवित असे   उजळण्या मन   घर्षण लागे संताचे पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

December 11, 2016
Visits : 1293

गुणांची परंपरा   गादी चालविते माझी आई, माझ्याच आजीची, मला वाटते परंपरा,   ती चाले घराण्याची ।।१।।   रात्रंदिनीचे कष्ट करणे, हा तिचा स्वभाव, प्रेमळपणे खावू घालणें,   मनी तिच्या भाव ।।२।।   अधिकाराची नशा तिजला, शब्द तिचा कायदा, जुमानत नाही कुणाचाही,   शाब्दीक तो वायदा ।।३।।   प्रेमळपणा असूनी अंगी,   अहंकार युक्त ती, गुणदोषांनी भरले व्यक्तीत्व,   तसेच पुढे चालती ।।४।।   सोडून द्या तो अहंकारी भाव, टिकवा प्रेमळपणा, चक्रामधल्या गुणदोषातRead More

December 11, 2016
Visits : 1474

वातावरणाची निर्मिती   वातावरण  निर्मित होते,  जसे जातां वागूनी  । हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी...१, फिरत असती वलये ,  सारी अंवती भंवती  । चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती...२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी  । चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी....३, जाता दुष्ट व्यक्ती ,  आपल्या  जवळूनी  । चलबिचल मन होते,  केवळ सानिध्यानी.....४, याच लहरी घुसुनी शरीरि, मनी आघांत करती  । मनामध्ये बदल करूनी, तीच वृत्ती बनविती...५, विहीरी वरच्या दगडांनाही, खुणाRead More

December 11, 2016
Visits : 1527

भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी   युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।।   आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी   विषाचा  पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविले विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी,   दाह त्याचा सहन करी   ।।२।। कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरीRead More

December 11, 2016
Visits : 1328

बंधनातील चिमणी   चिव चिव करीत,  एक चिमणी आली  । दर्पणाच्या चौकटीवरती,  येवून ती बसली  ।। बघूनी दूजी चिमणी दर्पणी,  चकीत झाली होती  । वाटूं लागले या चिमणीला,  आंत अडकली ती  ।। उत्सुकता नि तगमग दिसे,  चेहऱ्यावरी  । चारी दिशेने बघत होती,  आंतल्या चिमणी परी  ।। औत्सुक्याचे भाव सारे दिसती,  आतील चिमणीतही  । कशी करूं तिची बंधन मुक्ती,  काळजी लागून राही  ।। चोंच मारीते आवाज करिते,  यत्न्य केले सारे  । श्रम होवूनी थकूनी गेली,  हातीं न कांहीं उरे  ।। चिंता लागली चिंता बघूनी,Read More

December 11, 2016
Visits : 1579

भावनांची घरें   घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी   ।।धृ।। वास्तुकला सुंदर   रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार  परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी   ।।१।। ही घरे भावनांची    त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची    जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो  निरखूनी   ।।२।। राग लोभ अहंकार   मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार   शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी    ।।३।। दया क्षमा शांति   प्रेम आनंद उल्हासती आदर भावांची वसती   विवेक बुद्धीने शोधा जाणूनी, घ्याहो निरखूनीRead More

December 04, 2016
Visits : 2057

'शक्ती' हेच  ईश्वरी रुप   तप्त सळई स्पर्ष करीतां ,   चटका देई शरीराला  । सुप्त अशी औष्णिक शक्ति,   आस्तित्व दाखवी त्या वेळेला  ।। वीजा चमकूनी गर्जती मेघ,   लख्ख उजेड सारते काळोख  । प्रकाश नि ध्वनीच्या लहरी,   आस्तित्वाची दाखवी झलक  ।। साधी असे तार तांब्याची,   झटका देई विद्युत असतां  । विद्युत शक्तीचा परिणाम,  जाणवी देहा प्रवेश करतां  ।। झाडावरले पडता फळ,  भूमी घेई खेचूनी त्याला  । गुरुत्वाकर्षण शक्ति ही,   झलक दाखविते जगाला  ।। ईश्वर अस्तित्व भासे,  अशाच शक्तीरुपानें  । अदRead More

December 04, 2016
Visits : 912

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .                वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.                 मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो.  चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्यRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 50730 hits