Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 26, 2014
Visits : 2507

कृष्ण कमळ-   सत्कारणी वेळ   करू नकोस विचार त्याचा,  करणे नाही जेंव्हां तुजला मोलाचे हे जीवन असता,  व्यर्थ दवडशी वेळ कशाला....१ दोन घडीचे जीवन सारे,  क्षणा क्षणाने जाईल निघूनी कुणासाठी हा काळ थांबला,  उत्तर याचे घे तू शोधूनी....२ लहरी उठतील विचारांच्या,  आघात होता जेंव्हां मनी विवेक बुद्धीने शांत करावी,  भाव तरंगे त्याच क्षणी....३ मर्यादेचे आयुष्य असता,  वाहू नकोस विचार प्रवाही भगवंताचे स्मरण करण्या वेळेची परि बचत करावी....४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

October 26, 2014
Visits : 3937

बागेतील तारका- अनुभवाचे शहाणपण   बदलून गेले जीवन अर्थ कळल्यानंतर परिस्थितीची आली जाण जाग आल्या नंतर  ।।१।।   श्रीमंतीच्या नादानें ऐषआरामी झालो पैशाच्या गर्वाने माणुसकी विसरलो   ।।२।।   तारुण्यातील उर्मीने अहंकारी बनविले शरिरातील गुर्मीने निर्दयी मज ठरविले   ।।३।।   धंद्यामध्ये येता खोट निराश अति झालो गरिबीची चालतां वाट प्रेमळ मी बनलो   ।।४।।   देह बनला दुर्बल विकार तो जडूनी जर्जर- पिडीतां बद्दल सहानुभूती आली मनी   ।।५।।   अRead More

October 26, 2014
Visits : 2164

जीवनाच्या रगाड्यातून   अप्पा असे कां वागले ?   खूप जुनी गोष्ट आठवली. मी शाळकरी विद्यार्थी होतो. माझा मित्र दिनू यांच्याकडे माझे जाणे-येणे सतत होते. बाहेर त्याची खोली. आम्ही दोघे मिळून अभ्यास करीत असू. दिनूचा मोठा भाऊ तहसील कार्यालयांत लिपीक होता. त्याच्या घरी आई वडील वहीनी व छोटा पुतण्या होता. वडील बबनराव ज्याना सर्व अप्पा म्हणत. ते शिक्षक म्हणून निवृत्त झालेले होते. शिस्तप्रिय, प्रचंड ज्ञान व माहिती असलेले. सतत जो भेटेल त्याच्याशी गप्पा गोष्टी करणे, तत्वज्ञान सांगणे, नविन गोष्टीवर चर्चाRead More

October 19, 2014
Visits : 1968

कृष्ण कमळ- जरा धीर ठेव ज्या ज्या वेळी धीर ठेवशी मिळेल कांहीतरी गडबड मनां होऊन जातां निराशाच पदरीं ।।१।। शांत चित्त आपुले तूं ठेव प्रत्येक समयी मिळेल यश पदरी तुझ्या खात्री याची घेई ।।२।। आत्मविकास तूं सोडूं नको आपल्या कामाचा मोबदला मिळेल तुजला योग्य प्रयत्नाचा ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.comRead More

October 19, 2014
Visits : 2983

बागेतील तारका- ध्यानाने काय साधले ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।। संसारांत रमलो मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी धानाची समज उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।। हेच साधले ध्यान लावूनी एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति समाRead More

October 19, 2014
Visits : 714

जीवनाच्या रगाड्यातून असेही एक गणेश विसर्जन अमेरिकेतील मिनियापोलीस शहर. अतिशय सुंदर, विस्तीर्ण आणि अद्यावत अशी बांधणी. नवीन पद्धतीने आखीव असे वसलेले शहर. मोठाले प्रशस्त रस्ते, अनेक सुंदर व आकर्षक बागा, शहराच्या मुख्य भागांत उंच उंच इमारती, स्वच्छपाण्याचा भरपूर साठा असलेले तलाव, शाळा, कॉलेजेस. व्यापारी संकुले, इत्यादी. शहराचा फेरफटका मारताना मनास खुप आनंद होतो. माझा एक मुलगा, कांही वर्षापासून एका कंपनीत तेथे कामाला आहे. पत्नी व दोन मुले हा त्याचा संसार. त्याने त्या ठिकाणी स्वतःला राहण्यासाठी नुकतीचएकRead More

October 12, 2014
Visits : 3641

कृष्ण कमळ-   तिचा पहिला नंबर   आदले दिवशी येऊनी,  तिजला अभिनंदन दिले पास झालीस सांगुनी,  मित्रांनी पेढे मागितले हास्यवदन करुनी,  साखर हातीं दिली हाती मिळतां निकाल,  पेढे देईन वदली आंत जाऊनी खोलीमध्यें,  बंद केले दार दुःख आवेग येऊनी,  रडली ती फार वरचा मिळेल नंबर,  तिजला होती आशा रात्र रात्र जागूनही,  मिळाली तिज निराशा खूप कष्ट करुनी,  अपयश येता पदरीं दुःख तया सारखे,  नसते ह्या संसारी समजूनी सांगूनी तिजला, सान्तवन केले मी पुष्कळ येतील परीक्षा,  श्रम येRead More

October 12, 2014
Visits : 2002

बागेतील तारका-   मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी   मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला  ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला  ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत  ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे  ।।५।। जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि मान्य मजलाRead More

October 12, 2014
Visits : 938

जीवनाच्या रगाड्यातून   क्लिनिकल कॉन्फरन्स Clinical Conference  ही संकल्पना मेडीकल कॉलेज परिसरांत विद्यार्थ्याची सर्वांत आवडती आणि आनंद देणारी. मेडीकल कॉलेजचे स्वतःचे एक हॉस्पिटल असते. अद्यावत, भव्य आणि रोग्यांच्या सर्व सोईनी परिपूर्ण. अनेक वैद्यकीय विषयातील तज्ञ डॉक्टर मंडळी हे प्रमुख आकर्शन असते. ह्या लोकांचा सतत जगातील इतर आरोग्य समस्यांच्या सोडवणूकीतील अभ्यासक्रमाचा संपर्क असतो. ही मंडळी Updated latest medical knowledge बाळगून असतात. रुग्णालयाच्या अनेक वॉर्डामध्ये विवीध प्रकारचे रुग्ण उपचRead More

October 05, 2014
Visits : 4342

कृष्ण कमळ-   कोण आहेस तूं कृष्णा ? सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? ।।धृ।।   जीवन तूझे 'बहूरंगी' सर्व क्षेत्री अग्रभागीं आवडतोस तूं सर्वाना   ।।१।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   दहीं दूध खाई लपून तूप लोणी नेई पळवून 'खादाड' वाटलास सर्वांना   ।।२।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   फळे चारली बागेमधली गोपींची शिदोरी नेली 'चोर' वाटलास सर्वांना   ।।३।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   गौळणीचे उचली कपडे दगड मारुनRead More

October 05, 2014
Visits : 1164

बागेतील तारका-   अर्पण   आशिर्वाद श्री जगदंबेचा,  सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला II १II विचारांच्या उठल्या लहरी,  शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी,  ती अर्पितो मी तुजला II२ II प्रभूचा असावा सहवास,  हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला II३ II प्रभू नसे जन्ममरण व्यथा,  अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त करी कविता,  ती अर्पितो मी तुजला II४ II   II शुभं भवतू II   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०Read More

October 05, 2014
Visits : 3706

जीवनाच्या रगाड्यातून   निसर्गाची अशी एक चेतावणी   दररोज आम्ही वयस्कर म्हणजे सर्वजण सत्तरीच्या पुढे गेलेली, एकत्र जमत असू. गप्पा टप्प्पा होत. आज एकनाथराव फारच मुढमध्ये होते. ते गप्पीष्ट, विनोदी व टर्रेबाज. ते फुलवून  सांगू लागले  " मी आज दोन तरुण स्त्रीया बघीतल्या. अत्यंत सुंदर आकर्षक व नाजूक. माझ्या दुकानांत आल्या होत्या. मला एकदम फक्कड वाटल्या. काय करणार म्हातारे झालो ना. जेष्ठांचे लेबल पाठीमागे निसर्गाने चिटकवले आहे. ते काढू शकत नाही. "  सर्वजण दिलखुलास हासले. मी त्यांच्या गमतीदार प्Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 30066 hits