Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 29, 2012
Visits : 1821

समाधान   दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती   धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा   देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे   भावनेमधली विविध अंगे येऊं लागली मनीं दाटूनी उसंत मिळता थोडी तेव्हां उतरत होती काव्य रुपानी   धुंदीमध्यें सदैव राहूनी लिहीत गेलो सुचलेRead More

May 25, 2012
Visits : 1529

उधळण   परमेश्वरला निर्गुण निराकार, सर्वशक्तीमान, जगाचा रचैता, सर्व व्यापी, अनंत,एक सत्य, एक आनंद इत्यादी गुणानी वर्णन करीत त्याचे महात्म गायले जातात. जे चांगल दिसल, वाटल, भावल, समजल, अनुभवल, ते सर्व गुणधर्म एकत्रीतपणे त्या परमेश्वराचेच असल्याचे सांगीतले गेले. जे वाईट गुणधर्म जाणवले,ते देखील त्या परमेश्वरांतच असल्याचे म्हटले. म्हणून तो एक परिपूर्ण शक्तीस्वरुप असल्याचे व्यक्त झाले. अनेक विचार अनेक धर्म,पंथ,ग्रंथ इत्यादींचा विचार केला तर सर्वजण एक मतानी हेच मानतात की वरील प्रमाणे त्याचे सर्व गुणRead More

May 21, 2012
Visits : 2557

अंतर्मनाची हांक   नसे कुणी मी श्रेष्ठ कवी, वा ज्ञानी या जगतीं अभिमान वाटतो त्याचा मजला, जे माझ्या ललाटीं कृपादृष्टी ही दिसून आली, काव्येश्र्वरीची थोडी रचून कांही कविता सेविली, धुंदीमधली गोडी आशिर्वाद जरी असला तिचा, माझी ती बालके पितृत्वाचे नाते समजूनी, त्याना मी देखे कौतुक करतील कांही मंडळी, ज्याना ही आवडे उणीव दिसता त्यांत कुणाला, बाजूला ती पडे जाईन जेंव्हा जग सोडूनी, राम राम म्हणतां जवळी ठेवा काव्य प्रत ही, देहा अग्नी देता विलीन होता अनंतात, मी नेईन संगे शब्दांना भूRead More

May 17, 2012
Visits : 2073

तुझे तुलाच अर्पण !   तुझेच घेऊनी तुलाच द्यावे,  भासते ही रीत आगळी उमजत नाही काय करावे,  तुझीच असतां सृष्टी सगळी              वाहणाऱ्या संथ नदीतील,  पाणी घेऊन अर्घ्य देतो सुंदर फुले निसर्गातील,  गोळा करुन चरणी अर्पितो अन्न ग्रहण करण्यापूर्वी,  नैवेद्य तुजला दाखवितो जगण्याचा तो मार्ग दोखवी,  ह्याचीच पोंच आम्ही देतो विचार ठेवूनी पदोपदीं,  साऱ्यांचा तूं असशी मालक दुजास देण्यातील आनंद,  हाच मिळवित असे एक   कविता डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

May 13, 2012
Visits : 1725

कोलीडोस्कोप   नातवाच्या खेळणीमधील एक खेळणी हाती लागली. एक गोल पुंगळी दोन्हीकडे पारदर्शक काचा.एका बाजूने बघीतले तर दुसऱ्या बाजूला अनेक लहान लहान रंगीत काचांचे तुकडे. त्यामधून अनेक कलापूर्ण डिझाईन दिसायचे. अतीशय मनोहर व मनास आनंदीत करणारे प्रक्षेपण असे. मात्र गमतीचा भाग असा की आतील रंगीत तुकड्याची हालचाल झाली की दिसणाऱ्या डीझाईनमध्ये त्वरीत बदल होत असे. प्रत्येक डिझाईन तसेच मनोहर व आकर्षक. फक्त एक गोष्ट प्रखरतेने लक्षांत आली की "दृष्य "  सतत बदलत, मनोहर असे परंतु एकदा बघीतलेले दृष्य पून्हा तेच वRead More

May 10, 2012
Visits : 1409

पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते.   " मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् " (जगातले तेच प्रथम पद्यकाव्य समजले गेले.)   क्रौंच पक्षाला मुजरा   कारुण्यामधूनी उगम पावला आद्य काव्याचा झरा वंदन करितो क्रौंच पक्षा घे मानाचा मुजराRead More

May 04, 2012
Visits : 2416

मला भाराऊन टाकल याने   बी हंग्री, बी फूलिश! हा आत्मचरित्रात्मक  लेख वाचीत होतो. मनाला खूप भाराऊन गेला. परमेश्वर कांहीना ह्या जगांत पाठवतो असे म्हणतात. ते एक नमुन्यासाठी असते. These are the Sample people. म्हणतात. अशीच माणसे जगांत एक वेगळांच इतिहास करतात. निरनीराळ्या प्रंतातल्या अशा व्यक्ती आपण जगायच कशासाठी हे फक्त न बोलता करुन दाखविण्यासाठीच असतात. एकदम वेगळेच व्यक्तीमत्व. वेगळी जीवन कथा. आणि वेगळाच संदेश जगाला देत निघून जातात. मी मला आवडलेल्या टीपण्या देत आहे. तूम्हीपण आनंद लूटा. हे सारेRead More

May 01, 2012
Visits : 5584

माना न माना !    हजारो वर्षाचा काळ चालत आहे व पुढे चालत राहील. हे एक सत्य आहे. ही पृथ्वी हे आकाश, वायू मंडळ, हे तेज पाणी ज्याना पंचमहाभूते म्हणून संबोधले गेले आहे. ह्यातून त्याचा कर्ता करविता ईश्वर असावयास हवा ही संकल्पना पूढे आली. जीव सृष्टीचे पसरलेले अथांग रुप प्रत्येकजण जाणतोच आहे. अनेक जीवसृष्टीचे घटक दिसले. जसे प्राणीजीव, वनस्पतीजीव. ह्याच्या संख्या खूप वाढत गेल्या. त्याचे संकलन व आकलन करणे बुद्धीमान समजल्या गेलेल्या माणसाला देखील आवघड जाऊ लागले. परंतु मानव हा सदा प्रयत्नशील व चौकस असून त्Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 19114 hits