Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 29, 2012
Visits : 1259

*   चुकलेला अंदाज!   रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो.  घराच्या  जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, ह्याची वाट बघत होतो. रिकाम्या रिक्षा उभ्या नव्हत्या. काही रिक्षा भरलेल्या येत वा निघून जात. जवळच असलेल्या पानाच्या टपरीवर चार पाच सोसायटीतील मुले गप्पा मारीत उभी होती. दोन रिक्षा रिकाम्या आल्या, पण न थांबतच निघून गेल्या. एका पाठोपाठ तीन रिकाम्या रिक्षा आल्या.  परंतु जवळच बागेत जायचे म्हणून त्या निघून गेल्या. आमच्या विनंतीला दुर्लक्ष करीत होतRead More

September 25, 2012
Visits : 2077

प्रेम-स्वभाव   प्रेम-स्वभाव    असे ईश्वरी गुण मनीं ठसला हा    आत्म्यांत राहून प्रेम करावे वाटे    आंतरिक ही ओढ ज्याची मुळे खोल   पडने अवघड आपसांतील प्रेम    आत्म्यातील नाते न दिसता देखील    बांधलेले असते सर्व जीवाविषयीं    सहानुभूती भासे ह्रदयामध्ये ती     सुप्तावस्थेत दिसे आमचे राग लोभ    बाह्य संबंधामुळें षडरिपू विकार    शारीरिक सगळे वाईट गुणधर्म   देहाशीं निगडीत चांगले जे कर्म    आंतरीक इच्छेत राग येऊन केंव्हां    दुष्कृत्य घडते पश्चाताप वाटता    मन शांत होतेRead More

September 21, 2012
Visits : 906

*   नातीच्या खोड्या सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या कडून करून घेत असतो. ह्यात शंकाच नाही. लगेच सून बाहेर आली. ती मानसीची तक्रार  करु लागली.   ” बाबा हिने आज खूपRead More

September 17, 2012
Visits : 1201

श्री गणेश जन्मकथा   श्री गणेशा नमुनी तुला    नंतर नमितो कुलस्वामिनीला मातापूरवासिनी रेणूकेला    कृपा प्रसादे   ।१। तुझा महिमा असे थोर    दुःख नष्ट होती सत्वर कृपा करिसी ज्याचेवर    पावन होत असे   ।२। गणेश जन्मकथा सांगतो    तयाचा महिमा वर्णितो आनंदीभाव समर्पितो    तुम्हासाठी   ।३। सर्व दुःखे दुर कराया    तुम्हांसी सुखे द्यावया जन्म घेती गणराया    तुम्हां करिता   ।४। असतील देव अनेक    देवाधीदेव महादेव एक सर्व विश्वाचा अधिनायक    तयामध्ये कैलासपती   ।५। शिवपत्नी पार्वतीRead More

September 13, 2012
Visits : 2521

*  स्वाईन फ्लूचा भस्मासुर ! सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान  घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला.   मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.  ” हे परमेश्वरा  काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ?  ” बघ किती माणसे  दगावलीत,  त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळेRead More

September 09, 2012
Visits : 4962

प्राणीमात्रा विषयी दया   चाललो होतो मित्रासह, सहल करण्या एके दिनीं आनंदाच्या जल्लोषांत, गात होतो सुंदर गाणीं वेगामध्ये चालली असतां, आमची गाडीं एक दिशेनें लक्ष्य आमचे खेचले गेले, अवचित् एका घटनेनें चपळाईने चालला होता, एक नाग तो रस्त्यामधूनी क्षणांत त्याचे तुकडे झाले, रस्त्यावरी पडला मरुनी काय झाले कुणास ठाऊक, सर्व मंडळी हळहळली जीव घेणाऱ्या प्राण्यालाही, सहानुभूती ती लाभली अंतःकरणी दयाभाव हा, असतो ईश्वरी गुणघर्म जीवमात्री वसला असूनी, निर्मितो आपसातील प्रेम   डॉRead More

September 05, 2012
Visits : 1097

*  झाडावरले निर्माल्य ! रोज सकाळी सूर्योदयाच्या समयी फेरफटका मारणे व नंतर घराजवळच्या बागेत जाऊन शांतपणे चिंतन करीत बसने,  हे नित्याचेच व नियमित झाले होते. सकाळच्या प्रसन्न वातावरणात शरीर व मन ताजे तवाने ठेवण्यात खूप आनंद वाटत असे. बागेमध्ये विविध  रंगांची  अनेक फुलझाडे होती. प्रातःसमयी उमलणाऱ्या त्या फुलांचे सौंदर्य मनास मोहून टाकीत होते. एक दिवस माझे मित्र श्री एकनाथराव  यांची भेट झाली.  हातात पिशवी घेऊन ते हलके हलके फुले तोडून जमा करु लागले होते.  माझे लक्ष जाताच मी त्यांच्याजवळ गेलो.     ” काय पूजRead More

September 01, 2012
Visits : 1291

चिंतन !   ज्याचे आम्ही चिंतन करतो तोच '' शिव '' चिंतन करतो स्वानुभवे चिंतन करुनी चिंतन शक्ति दाखवितो   ।१।   जीवनाचे सारे सार्थक लपले असते चिंतनांत चिंतन करुनी ईश्वराचे त्याच्यांत एकरुप होण्यांत    ।२।   सारे ब्रह्मांड तोच असूनी अंश रुपाने आम्ही असतो जेव्हां विसरे बाह्य जगाला तेव्हांच तयांत समावतो   ।३।   चिंतन असे निश्चीत मार्ग प्रभूजवळ तो जाण्याचा लय लागुनी ध्यान लागतां ईश्वरमय होण्याचा ।४।   (कविता)   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 15314 hits