Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 30, 2013
Visits : 6221

कृष्ण कमळ - 15  रामाची व्याकूळता   सीतेकरता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी अजब ही रामप्रभू कहानी  ।।धृ।।   पत्नीहट्ट हा त्याला सांगे कांचनमृग शोभेल अंगे मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहानी   रावण नेई पळवूनी सीता दिसेन रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रु नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहानी   बाणी ज्याच्या शक्ती शिवाची ह्रदयामाजी दया सागराची त्यालाही दिसे नियती खेची सामान्यतेच्या मRead More

January 30, 2013
Visits : 1789

बागेतील तारका- 32  प्राण्यांचे मोल समजा   खरेदी केला सुंदर पक्षी दाम देवूनी योग्य असे ते नक्षिदार तो पिंजरा घेवूनी शोभिवान मी केले घरातें   प्रातःकाळी उठोनी बघतां चकीत होऊनी गेलो मनीं पक्षाने त्या मान टाकली पडला होता तळांत मरुनी   क्षणभर मनीं खंत वाटली राग आला स्वकृत्याचा आकारण ती हौस म्हणूनी खरेदी केला पक्षी याचा   किती बरे निच मन हे ? निराशा त्याला धन हानीची पक्षाने तो प्राण गमविला विषण्णता परि दुय्यम याची   डॉ. भगवान नागापूRead More

January 30, 2013
Visits : 13836

कैलास मानसरोवर यात्रा देवाधिदेव महादेव श्री शिवशंभू आणि जगनमाता पार्वतीदेवी यांचे परमपवित्र निवास स्थान म्हणजेच कैलास पर्वत. जगामध्ये अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या धार्मिक पवित्र स्थळांमध्ये कैलास पर्वत आणि त्याच्या नजिकच पसरलेले मानसरोवर ही दोन तीर्थक्षेत्रे सर्वाधिक महत्त्वाची, मोठी आणि प्रथम क्रमांकाची मानली गेली आहेत. शिवपुराणामध्ये असा उल्लेख आहे की कैलास दर्शन आणि मानसरोवर स्नान ज्याला नशिबाने प्राप्त झाले त्या व्यक्तीच्या सात पिढ्यांचा उद्धार होऊन जातो. अर्थात हा श्रद्धा व भावनेचा भाग आहRead More

January 25, 2013
Visits : 3571

कृष्ण कमळ- साक्षीदार   'घटना' जेव्हां घडली अघटित कुणीही नव्हते शेजारी कां उगाच रुख रुख वाटते दडपण येवूनी उरीं   जाणून बुजून दुर्लक्ष केले नैतिकतेच्या कल्पनेला एकटाच आहे समजूनी स्वार्थी भाव मनी आला   नीच कृत्य जे घडले हातून कुणीतरी बघत होता सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे हेच सारे सुचवित होता   कोण असावा हा गुप्त साक्षीदार नितीमत्ता शिकवी त्याला बाह्य जगातील द्दष्टा असूनी अंतर्यामीही बसलेला   त्या साक्षीदाराची जाणीव होता कचरुनी जाRead More

January 25, 2013
Visits : 1909

बागेतील तारका- ३१  एक वर्षाची चिमुरडी बघते वाट   भिरभिरणारे डबडबलेले नेत्र भरले दाट   । अतूरतेने शोधीत होते आपल्या आईची वाट  ।। कासाविस तो झाला जीव तळमळत राही प्राण   । एकच ध्यास मनी लागला कोठे गेली आई म्हणून   ।। क्षणाचाच होता विरह तेथे न झाला तो ही सहन    । आई हाच जर प्राण असेल, तर तिजवीन ठरे जगणे कठीण   ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

January 25, 2013
Visits : 1046

जेलची हवा   आजकाल निरनिराळ्या गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत चालले आहे. सरकार, समाज आणि कुटुंब घटक हतबल झालेला दिसत आहे. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या उक्ती प्रमाणे किंवा बळी तो कान पिळी, या तत्त्वाने प्रत्येक जण वागत आहे. संस्कार, नितीमत्ता, चांगुलपणा असले गुणधर्म फक्त पुस्तकातच बंदीस्त झालेले आहेत. न ते कुणी वाचत, न ते ऐकू येतात न ते सांगितले जातात. लोकांनादेखील असल्या महान तत्त्वज्ञानाचा कंटाळा आलेला दिसतो. कारण एकच. असले तत्त्वज्ञान जीवनात आणले जाऊच शकत नाही, ही धारणा. जर ईश्वराच्या अस्तित्वाविषयRead More

January 20, 2013
Visits : 1026

कृष्ण कमळ- ११  वातावरण   विचारांची उठूनी वादळे अशांत होते चित्त सदा आवर घालण्या चंचल मना अपयशी झालो अनेकदां   विष्णतेच्या स्थितीमध्यें नदीकांठच्या किनारीं गेलो वटवृक्षाच्या छायेखालच्या चौरस आसनावरी बसलो   डोळे मिटूनी शांत बसतां अवचित घटना ती घडली विचारांतले दुःख जावूनी आनंदी भावना येऊं लागली   एक साधूजन ध्यान लावीत बसत होता त्या आसनावरी पवित्र्याची वलये फिरती आसन दिसले रिकामें जरी   वातावरणाची ही किमया अनुभवते ती प्रखरतेनेंRead More

January 20, 2013
Visits : 1478

बागेतील तारका- ३०  खरे ग्रह   तुमचे जीवन अवलंबूनी ग्रहराशींच्या दशेवरती तेच होई जीवनीं तुमच्या जसे ग्रहमंडळ फिरती   मित्र मंडळी सगेसोयरे शत्रु असोत वा प्रेमाचे जीवनांतल्या हालचालीवरी परिणाम ते होई सर्वांचे   हेच सर्व ते ग्रह असुनी सतत स्थान ते बदलती परिस्थीती बघूनी तुमची वागण्यांत तो फरक करती   अपयशाला कारणीभूत तो असतो कुणीतरी नजीकचा राहू केतू शनि वा मंगळ ग्रहमान बनतो त्या घडीचा   यशाची चालता घोडदौड ती मदत लाभते कांही जणांचीRead More

January 20, 2013
Visits : 2388

देव ही संकल्पना   अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना त्याने आखलेली आहेत. सुक्ष्मापासून प्रचंड देहधारी व ज्ञानाच्या प्रातांत अत्यल्प ज्ञानापासून प्रचंड ज्ञान प्राप्त रचना निसर्गाने आखलेली आहेत. प्रत्येक सजीव हा आपापल्यापरी एक सर्वक्षम, परिपूर्ण असतो. स्वत:च्या जीवनाची चाकोरी व चक्र अतिशय काटेकोरपणे पूर्ण करण्याची  क्षमता प्राप्त अशी ही रचना आहे. जर अत्यंत बारकाईने त्याच्या ह्या जीवRead More

January 15, 2013
Visits : 2197

कृष्ण कमळ- १०  भरताचा जाब   ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।।   आम्ही बंधू चौघेजण झालो एका पिंडातून कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चारी शरिरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।।   वचनपूर्ति ब्रीद ज्याचे आदर्श जीवन रघूवंशाचे कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी कैकयीला भरत विचारी   ।।२।।   सर्व जणांचे प्राण होता जगणे कठीण झाले आतां रोष कशाला घेसी त्याचे ? अकाRead More

January 15, 2013
Visits : 2451

बागेतील तारका - २९  सासरी जाताना   हास्यमुखानें निरोप दे ग, प्रेमानें भरला विसरावी मी ओढ येथली, जांता सासरला   ।।धृ।।   खूप दिले तूं प्रेम आजवरी सदैव ठेवित पदर शिरीं पंखांना परि शक्ति देवूनीं सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तूं पाश आपला हास्यमुखानें निरोप दे ग, प्रेमानें भरला   ।।१।। विसरावी मी ओढ येथली, जांता सासरला   संसारातील धडे देवूनी केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो जागृत होता सदैव मनीं नकोस देवूं वाव शंकेला हास्यमुखानें नRead More

January 15, 2013
Visits : 1118

*   आफ्रिकन स्त्रीचे आभूषण प्रेम!  नुकताच  दक्षिण  आफ्रिकेला  जाण्याचा  योग  आला  होता. निसर्गच वरदान लाभलेली  भूमी.  असे वर्णन तिचे करता येईल. ऊतम हवा, भरपूर पाणी, नद्या नाले आणि नेत्रदीपक धबधबे दिसत होते. त्याच प्रमाणे प्रचंड झाडेझुडपे, वेली, क्षितिजा पर्यंत  पसरलेली जंगले,  आणि त्या जंगलात साम्राज्य गाजवणारी अनेक जंगली जनावरे. बळी तो कान पिळी, ह्या तत्वाने जगणारे पशु, काळपा काळपाने आनंद घेताना दिसत होती.  सर्व  बघताना हृदय भरून येत होत. ह्यात भर पडली ती तेथील  अतिशय प्रेमळ, लाघवी, माणुसकीने भरलRead More

January 10, 2013
Visits : 1085

कृष्ण कमळ   ९  तमोगुण   राज्य तमाचे येथें    बाह्य जगावरती म्हणून दिसे आम्हां   विध्वंसक प्रवृती   नाश करण्यासाठीं   शक्तिच हवी येथे हेच रुप शिवाचे   समजण्या अवघड जाते   जागा करु देई   नविन घटनाना चक्र कसे चालेल   न मिटवता त्यांना   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail -  bknagapurkar@gmail.comRead More

January 10, 2013
Visits : 575

२८  शब्दाची ठिणगी   ठिणगी पडूनी निघती ज्वाला आकाशाला जावूनी भिडती नष्ट करुनी डोंगर जंगल हाः हाः कार तो माजविती   शब्दांची ही ठिणगी अशीच क्रोधाचा तो वणवा पेटवी मर्मघाती तो शब्द पडतां अहंकार तो जागृत होई   सूड वृत्तीचा जन्म होऊनी वातावरण ते दूषित होते संघर्षाचा अग्नी पेटूनी जीवन सारे उजाड करिते   कारण जरी ते असे क्षुल्लक विनाश व्याप्ती होई भयंकर केवळ तुमचे प्रेमळ शब्द दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

January 10, 2013
Visits : 979

जीवनाच्या रगाड्यातून - *  चुकलेला अंदाज! रविवारचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती. मी नातवाना घेऊन बागें मध्ये चाललो होतो.  घराच्या  जवळच्या चौकामध्ये आम्ही आटोरिक्षा मिळेल का, ह्याची वाट बघत होतो. रिकाम्या रिक्षा उभ्या नव्हत्या. काही रिक्षा भरलेल्या येत वा निघून जात. जवळच असलेल्या पानाच्या टपरीवर चार पाच सोसायटीतील मुले गप्पा मारीत उभी होती. दोन रिक्षा रिकाम्या आल्या, पण न थांबतच निघून गेल्या. एका पाठोपाठ तीन रिकाम्या रिक्षा आल्या.  परंतु जवळच बागेत जायचे म्हणून त्या निघून गेल्या. आमच्या विनंतीRead More

January 05, 2013
Visits : 1776

कृष्णकमळ- ८  भक्तांसाठी कष्ट भोगतो श्रीहरी   युगानू युगें उभा राही,   एका विटेवरी कष्ट भोगतो भक्तांसाठी   पांडुरंग श्रीहरी   ।।धृ।।   आई वडिलांची सेवा पुंडलीक भक्तीचा ठेवा भक्तित होई तल्लीन जगास गेला विसरुन उभा करुनी तुजला,    गेला निघूनी चंद्रभागेतीरी   ।।१।। कष्ट भोगतो भक्तांसाठी    पांडुरंग श्रीहरी   विषाचा तो पेला मीरेनें प्राशन केला भजनांत गेली दंग होऊनी पचविलेस विष तूं घेऊनी दुधामधले विष शोषूनी,   दाह त्याचा सहन करी   ।।२।। कष्ट भोगतो भक्ताRead More

January 05, 2013
Visits : 1831

जीवनाच्या रगाड्यातून-                      हसत-खेळत म्हातारपण जीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”.  जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही. अथवा हे सिद्ध करु शकला नाही की जो आला आहे तो येथेच स्थिर आहे. वा मृत्यूच्या आहारी तो गेला नाही. हा एक मात्र खरं आहे की येण्या व जाण्यामधला काळ हा सर्वसाधारण सर्वांसाठी वेगळा वेगळा व अनिश्चित असल्याचे मात्र दिसून येते.  ह्याच काळाला ‘जीवन रेखRead More

January 05, 2013
Visits : 781

बागेतील तारका- २७  दिलासा   ज्योतिष्याची चढूनी पायरी जन्मकुंडली दाखवी त्याला अडले घोडे ते नशिबाचे कोणते अनिष्ट ग्रह राशीला   नशिबाची ती चौकट जाणूनी आशा त्याची द्विगुणीत झाली मनांत येता खात्री यशाची जीव तोडूनी प्रयत्ने केली   प्रयत्नांती असतो ईश्वर म्हणूनी मिळाले यश त्याला आत्मविश्वास जागृत करण्या 'भविष्य ' शब्द तो कामीं आला   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail – bknagapurkar@gmail.com ३०२Read More

January 01, 2013
Visits : 2571

कृष्ण कमळ                               ६  प्रभाते नाम घ्या जगदंबेचे   प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।   कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचेRead More

January 01, 2013
Visits : 795

बागेतील तारका -   २६  तुमचे यशस्वी कर्म   कसा, काय, कोण खेळला बघत नाही कुणी खेळातील यश अपयशाच्या राहतात फक्त आठवणी   मरुन गेला नाटककार, तो नांव ही गेले विसरुनी जिवंत आहे आजही नाटक रचिले होते त्यांनी   जगास हवे कर्म तुमचे नको तुमचे जीवन पशूसही जीवन असते मरतो तो तसाच येऊन   वाल्यानें केले खून लोक विसरुनी जाती आजही वाचतां रामायण कौतूक त्याचे करिती   वेशेघरी राहिलेला गेला कालीदास विसरुनी मेघदूत, शाकूंतल वाचतां महाकवीच्या येती आठवणीRead More

January 01, 2013
Visits : 1631

जीवनाच्या रगाड्यातून - आत्याआजी                            ९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती. मृत्यु आपल्या हाती नाही, म्हणून जगणे व जगावयाचे म्हणजे कष्ट करणे हे तीचे समिकरण होते. तसे तीचे आपले स्वतःचे कुणीही नव्हते. न मुलबाळ. नवरा तर ३०-३१ वर्षापुRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 51054 hits