Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 29, 2012
Visits : 3445

मुक्तीसाठीं   रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत   जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे   स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे   बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई   (कविता)   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

January 24, 2012
Visits : 2179

दासी मंथरेमधला विकल्प                        रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां कोणत्याही कथानकातील करमणूक व योजना हाच आनंदाचा गाभा असतो, तेंव्हाच त्या प्रसंगाना पुढे पुढे नेत जाणे योग्य ठरते. फक्त घटनेतील मानसिकता उलगडली पRead More

January 19, 2012
Visits : 3492

सोड मागणी   मागत होता प्रभूला    हात जोडूनी कांही भक्तिभाव बघूनी त्याचे     मिळत ते जाई एका मागून एक मिळे    मागणी होता त्याची निराश करणे न लगे     इच्छा होता भक्ताची जे जे बघे भोवती       घेतले होते मागुनी कशांत दडले सुख     उमज येईना मनीं देरे बुद्धि देवा मजला    योग्य मागण्यासाठी समाधानी मी होईन      तुझ्या कृपे पोटी ज्ञान झाले गंमतीचे   ' सांगे सोड मागणे ' न मागतां मिळाले जे    आनंदी केले जगणे. (कविता)   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

January 15, 2012
Visits : 4602

सासरची आठवण   ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   //धृ//  बाळ चिमुकले गोजिरवाणे, त्यांना दाखविण्याची   धन दूज्याचे म्हणूनी घेतले परके त्यासी नाही समजले बालपणीं जे प्रेम जमविले क्षणांत मजला तेच मिळाले भासली नाहीं उणीव तेथे, आईच्या मायेची   //१//  ओढ लागली आतां मजला, माझ्या सासरची   खट्याळ भाऊबहीण येथें  दिर नणंद तसेच तेथे बहीण वहीनी एकच नाते हट्ट पुरविण्या दुजे नव्हते पदोपदीं करुन देई, आठवण भावंडाची   //२//  ओढ लागली आतां मजला, माझ्या साRead More

January 11, 2012
Visits : 2614

बाळकृष्ण   रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी   //धृ//   काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं    //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी   //२//   रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   मुरली वाजे मधूर नृत्य ते बहरदार खेळातील तुझ्या लीला छबी राही मनावरी   //३//   रंगले मRead More

January 08, 2012
Visits : 2093

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी               रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव  निर्माण होतो. त्याच वेळी    त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.           आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, बरीच करमणूक, अनेक गुंता गुंतीच्या घटनांची उकल होती. त्यातून सर्वास मिRead More

January 05, 2012
Visits : 5555

शांतता ( Silence )   शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांतताRead More

January 02, 2012
Visits : 2938

भिकारीण   मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    // हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    // परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    // जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी   //   (कविता)   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 26918 hits