Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 31, 2016
Visits : 1273

दर्पण   चित्र दिसते दर्पणी ,   जसे असेल तसे, धूळ साचता त्यावरी,   अस्पष्ट ते होतसे ।।१।।   दर्पणा परि निर्मळ मन,   बागडते सदैव आनंदी, दूषितपणा येई त्याला,   भावविचारांनी कधी कधी ।।२।।   निर्मळ ठेवा मन आपले,   झटकून द्या लोभ अहंकार, मनाच्या  त्या पवित्रपणाने,   जीवन होत असे साकार ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 31, 2016
Visits : 1731

विधी कर्मांना सोडा   रूद्राक्षाच्या माळा घालूनी,   भस्म लाविले सर्वांगाला, वेषभूषा साधू जनाची,   शोभूनी दिसली शरीराला ।।१।।   खर्ची घातला बहूत वेळ,   रूप सजविण्या साधूचे, एक चित्त झाला होता,   देहा भोंवती लक्ष तयाचे ।।२।।   शरीरांनी जरी निर्मळ होता,   चंचल होते मन त्याचे, प्रभू मार्गास महत्त्व देतां,   विसरे तोच चरण प्रभूचे ।।३।।   विधी कर्मात वेळ दवडता,   प्रभू सेवेसी राहील काय ?, देहाच्या हालचाली बघूनी,   समाधानी तुम्हीं  होत जाय ।।४।Read More

January 31, 2016
Visits : 1208

सुदाम्याला ऐश्वर्य   गरीब सुदामा बालमित्र ,   आला हरीच्या भेटीला, बालपणातील मित्रत्वाची,   ओढी मनाला ।।१।।   छोटी पिशवी घेवून हाती,    पोहे घेतले त्यात, फूल ना फुलाची पाकळी घ्यावी,   हीच भावना मनांत ।।२।।   काय दिले वहिनींनी मजला,  चौकशी केली कृष्णाने, झडप घालूनी पिशवी घेई,   खाई पोहे आवडीने ।।३।।   बालपणातील अतूट होते,   मित्रत्वाचे त्यांचे नाते, मूल्यमापन कसे करावे,  उमगले नाही कृष्णाते ।।४।।   समोर असता सुदामा,  काही न दिले त्याते, द्विधा होऊनी मन:स्थिती,  परतRead More

January 31, 2016
Visits : 4179

काव्यातील गुरु   एकलव्यापरीं शिकलो विद्या,  गुरुद्रोणा विना  । काव्यामधल्या जाणून घेतल्या,  साऱ्या खाणाखुणा  ।।१।।   शोधू लागलो प्रथम गुरुला,  पद्य रचनेसाठीं  । कुणी न शिकवी कला श्रेष्ठ ही,  राहून माझे पाठी  ।।२।।   उठत होती भाव तरंगे,   अन आकाशी भिडती  । शब्दांनी परि पकड न येता,  निष्टूनी ती जाती  ।।३।।   मार्गदर्शक तो भेटत नाही,  खंत लागे मना आता  । व्याकूळ झाला जीव बघूनी,  मनाची ही दुर्बलता  ।।४।।   गोविंदाग्रज नि केशवसूत,  आणिक ग.दि.मा.  । तांबे- बोरकर- यशवंRead More

January 31, 2016
Visits : 2831

ईश्वराची बँक   प्रभूंने बँक काढली    उघडा खाते, ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित, दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे, धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक, जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे आपल्याच हातीं, परि कामीं येणें पुण्य     हें प्रभूचे इच्छांती  ।।५।। जमता पुण्याच्या राशी     चांगली कर्मे करुनी, नाते जडतांRead More

January 31, 2016
Visits : 2604

साक्षीदार   'घटना' जेव्हां घडली अघटित  । कुणीही नव्हते शेजारी  ।। कां उगाच रुख रुख वाटते  । दडपण येवूनी उरीं  ।।   जाणून बुजून दुर्लक्ष केले  । नैतिकतेच्या कल्पनेला  ।। एकटाच आहे समजूनी  । स्वार्थी भाव मनी आला  ।।   नीच कृत्य जे घडले हातून  । कुणीतरी बघत होता  ।। सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे  । हेच सारे सुचवित होता  ।।   कोण असावा हा गुप्त साक्षीदार  । नितिमत्ता शिकवी त्याला  ।। बाह्य जगातील द्रष्टा असूनी  । अंतर्यामीही बसलेला  ।।   त्याRead More

January 31, 2016
Visits : 1039

वेडा अहंकार ! एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला   जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती   किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.   विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर   पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते   संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी परिसर तो निरRead More

January 31, 2016
Visits : 1498

भाकरीसाठी मिळाला मार्ग.   रेल्वे स्टेशनलगतच्या पाऊल वाटेवरुन जात होतो. एका वयस्कर माणसाने माझे लक्ष्य वेधून घेतले. त्याच्या हातात मोठी प्लास्टीकची थैली होती. तो रेल्वेच्या मार्गावर पडलेल्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या वेचून, त्या थैलीमध्ये जमा करीत होता.माझी ऊत्सुकता जागी झाली. त्या माणसाला थांबवून मी चौकशी केली. अनेक प्रवाशी आजकाल पाण्याच्या बाटल्या खरेदी करतात. रिकाम्या झालेल्या बाटल्या चक्क रेल्वे मार्गावर फेकून देतात. हा त्या रिकाम्या झालेल्या बाटल्या, भंगारच्या दुकानाला नेऊन विकत असे. तRead More

January 24, 2016
Visits : 3016

सद्‌गुरु   भटकत जातो वाटसरू ,   जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता,   दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।।   मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी,   निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील,   मार्गामुळे अडून पडतो ।।२।।   अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्‌गुरुचे,   न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।।   वाट दाखवी सद्‌गुरु ,   प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो आमच्यामध्ये,   त्यात एकरूप होण्याचा ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपRead More

January 24, 2016
Visits : 4735

वेळेची ढिलाई ,  काळाची किमया   हपालेल्या निष्ठूर काळा,   समाधानी तू कसा होशील, बळी घेण्याचे सत्र तुझे ते,   केंव्हां बरे तू थांबवशील ? ।।१।।   नित्य तुला भक्ष्य लागते,   वेध घेई टिपूनी त्याचा, मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई  स्वकृत्याचा ।।२।।   अवचित कशी ही भूक वाढली,   मात करूनी त्या वेळेवरी, सूडानें पेटूनी जावूनी,   बळी घेतले गरीबांचे परी ।।३।।   काळ येई परि वेळ न आली,   म्हणून सदा हताश होतो, वेळेची  ढिलाई बघूनी,   तांडव नृत्य  कRead More

January 24, 2016
Visits : 4655

भावशक्तीची देणगी   भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले, करण्यास तव जवळीक,  कामास तेच आले ।।१।।   जिंकून घेई राधा तुजला,  उत्कठ करुनी प्रेम, उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म ।।२।।   भक्तीभावाची करीता बात, ती तर असे आगळी, पावन करण्या धाऊन जाती,  सर्व संत मंडळी ।।३।।   भजनांत मिरा रंगली,  ध्यास तुझा घेऊन, नाचत गांत राहिली,  केले तुज पावन ।।४।।   दया क्षमा शांतीचे भाव,  करुणेमध्ये भरलेले, त्यांत शोधता तुझा ठाव,  आनंदी मन झाले ।।५।।   सर्वस्व तुजला अर्पिRead More

January 24, 2016
Visits : 2831

सासरी जाताना   हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला विसरावी मी ओढ येथली,  जाता सासरला.... ।। धृ ।।   खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी, पंखांना परि शक्ती देवूनी,  सांग मला ग घेण्या भरारी सैल कर तू पाश आपला...१, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,   संसारातील धडे देवूनी,  केलीस तयार कष्ट घेवूनी कुठे लोपला आज विश्वास तो,  जागृत होता सदैव मनी नकोस देऊ वाव शंकेला...२, हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,   ते तर केवळ घर निराळे, मायेने भरलेले, जसेRead More

January 24, 2016
Visits : 1917

चेतना   ओठावरले गीत माझे,  आज कसे हे रुकून गेले, गीतामधले शब्द रूकता,  ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।   आकाशातील थवे पाहूनी, चंचल माझी नजर झाली, भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर असंख्य चित्रे उमटूनी गेली । चित्र बघूनी जे मन नाचे, पाषाणा परी स्थिर कां झाले....१ ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले   झूळझूळ वाहे सरिता पाणी, पाण्यावरती दिसे तरंग, हलके हलके भिजवी अंग, पुलकीत करी रोम रोम जे थंड आज परि होताRead More

January 24, 2016
Visits : 1374

आत्मविश्वास   आत्मविश्वास जागृत ठेवूनी,   कार्य घेवूनी तडीस नेती  । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती  ।।   ईश्वर करीतो मदत तयांना,   मदत करी जे आपले आपण  । आपल्यातची तो ईश्वर आहे,   असते याची जयास जाण  ।।   विश्वासाने हुरूप येई,   जागृत करीती अंतर चेतना  । लक्ष्य सारे केंद्रीत होता,   यश चमकते प्रयत्नांना  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 24, 2016
Visits : 2519

खोटा शिक्का   कसे आले कुणास ठाऊक    नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी    खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी    कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी     निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी     तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया    अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी     त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी     यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श करुनी      जाणले माझे नशिब भाग्यवान ठरवूनी सांगे       मिळेल धनलाभ खोटा शिक्का घेऊन देखील    शRead More

January 24, 2016
Visits : 3285

निर्णय   रसत्यावरच्या हातगाडीवरील केळीवाल्याकडे मी केळी घेत होतो. त्याला पैशांची मोड देत असताना, त्याचे लक्ष्य नाही, हे बघून एका ९-१० वर्षाच्या मुलाने, त्याच्या गाडीवरील दोन केळी उचलून घेतली. मुलगा लपून जाऊ लागला. "बघ त्या मुलाने तुझी केळी घेतली व तो चालला."   सामाजिक जाणिवेने एकदंम प्रेरीत होऊन, मी ते त्या केळीवाल्याच्या  निदर्शनास आणून दिले. केळीवाला धावत गेला. त्याने त्या मुलास पकडून एक शिवी हसडली. व केळी हिसकाऊन परत आला. "फार हरामखोर असतात हो ही मुले." पुटपुटत माझे आभार मानले. मी कRead More

January 17, 2016
Visits : 2646

निरोगी  देही नामस्मरण    निरोगी असतां तुम्ही,   नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता,   महत्व जाणा वेळेचे ।।१।।   शरिराच्या नसता व्याधी,   राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते,   चित्त एकाग्र ते ।।२।।   व्याधीने जरजर होता ,   चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 17, 2016
Visits : 5842

जातीमधील उद्रेक   लाट उसळतां क्रोधाची,  बळी घेतले कित्येकांचे, हिंसाचाराच्या लाटेमध्यें,  सर्वस्व गमविले कांहींचे ।।१।।   फार पुरातन काळीं आम्हीं,  चालत होतो एक दिशेनें, कुणीतरी पाडुनी वाटा तेव्हां, विखरूनी टाकिली कांहीं मने ।।२।।   त्याच क्षणाला बीज रूजले,  धर्मामधल्या विषमतेचे, ईश्वराकडे जाण्याकरितां,  मार्ग पडती विविधतेचे ।।३।।   विविधतेनें संघर्ष आणिला,  भेदभावाची भिंत उभारूनी, विवेकाला गाडून टाकले,  उफाळणाऱ्या भावनांनी ।।४।।   चूक कुणाची सजा कुणाला,  कRead More

January 17, 2016
Visits : 5199

ध्यान   ध्यान कसे लावावे,  मार्ग असे मनोहर, सुलभ ते समजावे, त्याचे मिळण्या द्वार ।।१।।   स्वच्छ एक आसन,  शांत जागी असावे, मांडी त्यावर घालून,  स्थिर ते बसावे ।।२।।   लक्ष्य केंद्रीत करा,  तुमच्या श्वासावरी, कसा फिरे वारा,  आत आणि बाहेरी ।।३।।   साक्षी तुम्ही बना, श्वासाच्या हालचालीत, शांत करील मना, बघून प्राण ज्योत ।।४।।   काहीही न करावे, यालाच म्हणती ध्यान, करण्यास तुम्ही जावे,  जाईल सारे बिघडून ।।५।।   ध्यानात झोपे शरीर,  शांत करूनी मन, आंत शोधते ईश्Read More

January 17, 2016
Visits : 3162

परमार्थ व संसार आहेत एकच   उपास तापास करुनी,   शिणवित होतो देहाला, भजन पूजन करुनी,   पूजीत होतो देवाला ।   कथा कीर्तनें ऐकूनी,   पुराण मी जाणिले, माळ जप जपूनी,   प्रभू नामस्मरण केले ।  वेचूनी सुमनें सुंदर,   वाही प्रभूचे चरणीं, फुलांचे गुंफूनी हार,   अर्पण केले कंठमणीं ।   जाऊनी तीर्थ यात्रेत,   दर्शन घेतले तीर्थांचे, प्रसिद्ध देवालयांत,   चरण स्पर्षिले मूर्तीचे । मनामध्यें ठेऊन शांती,   मूल्यमापन केले जीवनाचे, कांहीं न मिळाले हातीं,   व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे ।Read More

January 17, 2016
Visits : 1492

वचन   वाणी मधूनी शब्द निघाला,  कदर त्याची करीत होते  । मुखावाटे बाहेर पडे जे,  वचन त्याला समजत होते  ।। दिले वचन पालन करण्या,  सर्वस्व पणाला लावीत होते  । प्राणाची लावून बाजी,  किंमत शब्दांची करीत होते  ।। स्वप्नामध्ये दिले वचन,  हरिश्चंद्र ते पालन करी  । राज्य गमवूनी सारे आपले, स्मशानी बनला डोंबकरी  ।। प्राण आहूती देई दशरथ, वनी धाडूनी राम प्रभूला  । पालन केले तेच वचन, रणांगणी दिले जे कैकयीला  ।। आज लोपूनी तेज वाणीचे, तुटले विश्वासाचे नाते  । बदलूनी जाती क्षणात सारे, घटRead More

January 17, 2016
Visits : 4149

आईचे ऋण मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी          प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी       उदरामाजी तुझिया ठायी प्रेमाचा तो सागर देखिला   तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत     नऊ मास मी उदरी राहुनी दुग्धामृत पाजून मजला      वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी   उपाशी राहून आनंदाने निद्रा न लागे तुजला तेंव्हा    आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या नयनी     दु:खाने जेंव्हा हळहळलो अनंत ऋणे करुनी ठेवसी      तुच  माझ्या शिरावरीRead More

January 17, 2016
Visits : 2028

व्यस्त राहण्याचा मार्ग   मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून  ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर त्या तुम्हास कळतात. कोणता लेख, वा साहित्य किती जणानी वाचले, ह्य़ाची जाणीव येते. मी हे सर्व जाणल्या नंतर  आपणही आपल्याRead More

January 10, 2016
Visits : 3100

तेज   किरणात चमक ती असूनी,   तेजोमय भासे वस्तूंचे अंग, सूक्ष्म अवलोकन करीता,   कळे तेज ते, वस्तूचाच भाग ।।१।।   जसे तेज असे सूर्यामध्यें, पत्थरांतही तेज भासते दृष्टी मधले किरणे देखील,   सर्व जनांना हेच सांगते ।।२।।   तेजामुळेंच वस्तू दिसती,   विना तेज ती राहील कशी, तेज रूप हे ईश्वरी असूनी, तेज चमकते वस्तू पाशी ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

January 10, 2016
Visits : 2011

भिकाऱ्याचे पुण्य   रखरखत्या उन्हांत बसूनी,   भीक मागतो एक भिकारी, जगदंबेचे नाम घेवूनी, भजन देवीचे सदैव करी ।।१।।   नजीक येत्या वाटसरूंना,   आशीर्वाद तो देत असे, ‘प्रभू तुमचे भले करील’    हेच शब्द उमटत असे ।।२।।   अन्न न घेता दिवस जाई,   खात भाकरी एकच वेळां, दिवसभरीचे श्रम होऊनी,   उपवास सदैव घडला ।।३।।   पूर्व जन्मीच्या कर्मफळाने,   दीनवाणी जीवन मिळाले, आज पुण्य जमवूनी, जीवन उद्धरू लागला सगळे ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपRead More

January 10, 2016
Visits : 3504

इतरांतील लाचारी बघे   शक्तीच्या जोरावरती,  बघतो इतरांत लाचारी विसरून जातो वेड्या,  स्वत:तील न्यूनता खरी ....।।धृ।।   पैसे ओढती खोऱ्यानें,  परि शरीर भरले रोगानें श्रीमंतीत वाढली कांहीं,  गरिबाची लाचारी पाही विसरून देह दुर्बलता,  धनाचा अहंकार धरी...१ शक्तीच्या जोरवरती बघतो इतरांत लाचारी   शरीर संपदा मिळे,  परि अडते पैशामुळे देहाचा ताठा फार, इतरां तुच्छ लेखणार विवंचना ती पैशाची,  विसरे शरीर सौख्यापरि....२ शक्तीच्या जोरावरती बघतो इतरांत लाचारी   ज्ञानीजन ते असती,  अगRead More

January 10, 2016
Visits : 4634

कर्तृत्वाचे कल्पतरू   जीवन गंगा वहाते ,  फुलवित सारी जीवने  । पडेल प्रवाहीं कुणी,  लागते त्याला वाहणे  ।।१।।   काही काळ वाहतो देह, डुबून जाणे अंतीम, कसा वाहतो केंव्हा डुबतो,    प्रवाही वेगाचे हे काम   ।।२।।   बुडूनी जाती देह प्रवाही, कर्मे आतील तरंगती । वाहत वाहत नदी किनारी, स्थीर होऊन काठी राहती  ।।३।।   देह क्षणाचा जरी,  कर्मे राहती निरंतर । कर्तृत्वाच्या कल्पतरूची,   आठवण काढती इतर ।।४।।   त्या कर्माच्या राही आठवणी,  मार्गदर्शक बRead More

January 10, 2016
Visits : 4123

पूजाविधी गाभा     सोडूनी दिली पूजाअर्चा,  समाधान मज ज्यात न लाभले, दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,  एक भाग तो सदैव वाटले ।।१।।   बालपणी कुणी शिकविले,  पूजाअर्चा आन्हकी सारे, ठसले नाही मनात कधीही,  भक्तीला हे पोषक ठरे ।।२।।   पूजाअर्चा  विधीमध्ये,  लक्ष केंद्रीत होते, हळदी कुंकू गंध फुलें आणि,  दीपधूप हे मधूर जळते ।।३।।   सुबकतेच्या पाठी लागूनी,  यांत्रिकतेसम आम्ही झालो, अर्थ ज्याचा कधी न कळला,  मंत्र मुखोदगत वदू लागलो ।।४।।   वास्तव्य ज्याचे सदैव सागरी,  स्नान तयRead More

January 10, 2016
Visits : 2915

ईश अस्तित्वाची ओढ   उंच उंच जावूनी झाडे चुंबीत होती गगनाला  । चंद्र चांदणे, भव्य पर्वत आणिक नदी नाला  ।। किती आनंद तो मनी जहाला बघूनी निसर्ग शोभा  । गुंग होऊनी नाचू लागलो सुटला चित्त ताबा  ।। सुंदर वाटे रूप आपले बिंब बघता दर्पणी  । पोंच मिळते समाधानाची केवळ अंतर्मनातूनी  ।। पूजा करीता तल्लीन होई मूर्ती बघूनी देवाची  । शक्तीमान ते रूप समजूनी विस्मृती होई स्वत:ची  ।। निसर्ग, देह वा वस्तू असो, अस्तित्व ईश्वरी जेथे  । उचंबळती प्रेम भावना एकरूप होण्या त्याते  ।।   डॉRead More

January 10, 2016
Visits : 2552

दुष्टाचा मृत्यु   सारे दुर्गुण अंगी असूनी,  गुंड होता तो इतर जनांना त्रास देत,  तुच्छ लेखितो शक्ति सामर्थ्य त्यांत असतां,  फार मातला आया बहिणीना अपमानुनी,  त्रासू लागला बळजबरीनें पैसे घेई, स्वार्था करिता हतबल होऊनी देऊ लागली, निराश होता केवळ त्याच्या अस्तित्वाने,  सारे घाबरती पिसाट संबोधूनी तयाला,  दुर्लक्ष करिती एके दिवशीं अवचित ती,  दुर्घटना झाली उंचावरनी त्याची स्कूटर,  खाली कोसळली त्याच्या देहा भोवती जमले,  सारे गांवकरी आज शब्द जे बाहेर पडती,  स्तुती त्याची करीRead More

January 10, 2016
Visits : 1999

दुर्वांच्या जुड्या   संध्याकाळचे फिरणे झाल्यानंतर शेजारच्या बागेत जावून शांत बसणे हे नित्याचे झाले होते.  एक प्रकारचा आनंद व समाधान मनाला त्यामुळे लाभत असे. शांत झोप मिळण्यासाठी ते गरजेचे वाटत होते.                    एक गोष्ट माझ्या दररोज बधण्यात येवू लागली होती. एक वयस्कर गृहस्थ नियमीत त्याच वेळी मला बागेत दिसत होते. ते सहसा कुणाशी बोलत नसत. एकटेच शांत बसून बागेतल्या गवतातील दुर्वा काढीत असत. पिशवीत एक दोऱ्याचे रिळ असे. जमविलेल्या दुर्वांची ते जुडी बांधून ती त्या पिशवीत टाकीत असत. जवळ जवळRead More

January 03, 2016
Visits : 4583

कल्पकतेमुळे निराशा   निराशेचे बीज पेरतो,  आम्हीच आमच्या गुणानें, विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।।   जाणूनी ईश्वरी स्वरूप,  प्रतिमा ती मनीं बसवी, धडपड चालते सतत,  तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।   तपसाधना ती बघूनी,  कित्येकदा मिळे दर्शन, परि केवळ अज्ञानाने,  न होई त्याचे अवलोकन ।।३।।   सभोवतालच्या वस्तूंमध्यें,  जाण तयाची येते, निसर्ग रम्य सौंदर्यात,  भावना तशी उमटते ।।४।।   अस्तित्वाची जाणीव देतो,  हर एक घडीचा ठेवा, ध्यास लागतो आम्ही,  परी कल्पिलेल्Read More

January 03, 2016
Visits : 3046

देह बंधन – मुक्ती   बंधन मुक्तीसाठीं असतां,   बंधनात ते पाडी कर्मफळाचे एक अंग ते,   टिपे दुसरे बाकी ।।१।।   साध्य करण्या जीवन ध्येय,   देह लागतो साधन म्हणूनी, सद्उपयोग करूनी घेतां,   साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।।   हिशोब तुमचा चुकून जाता,   तोच देह बनतो मारक, विनाश करीतो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।।   बंधन पडते आत्म्याभोंवती,   शरिरांतल्या वासने पायी, वासनेच्या आहारी जातां,   बंधनास ती बळकटी येई ।।४।।   तपसाधनRead More

January 03, 2016
Visits : 1873

दयेची बरसात   समर्थ नाहीं कुणी,  जाणून घेण्या प्रभूला, थोटके पडतो सारे,  घेण्यास त्याच्या दयेला ।।१।।   बरसत असे दया,  प्रचंड त्या वेगाने, दुर्दैवी असूनी आम्हीं,  झेलतो फाटक्या झोळीने ।।२।।   असीम होते कृपा,  पात्र नसूनी कुणी, तो बरसत राही सतत,  परि आहे सारे अज्ञानी ।।३।।   दयेच्या तो प्रवाह,  वाहात राही नदीसारखा, डुबती कांहीं त्यांत,  परि न दिसे अनेकां ।।४।।   नशीब लागते थोर,  पेलण्यास दया ती, जलांत असूनी कांहीं   तहानलेली राहून जाती ।।५।।   शिवून तुमची झRead More

January 03, 2016
Visits : 3609

दैवी देणगी   लुळा पांगळा बसूनी एकटा,   गाई सुंदर गाणे  । आवाजातील मधूरता,   शिकवी त्याला जगणे  ।।१।।   जगतो देह कशासाठी,   हातपाय असता पांगळे  । मरण नसता आपले हाती,   जगणे हे आले  ।।२।।   लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते । जगण्यासाठी सदैव त्याला,   उभारी देत होते  ।।३।।   गीत ऐकता जमे भोवती,   रसिक जन सारे  । नभास भिडता सूर-ताना, शब्द उमटती “वाह ! वा रे”  ।।४।।   असमान्य ते एकचि मिळता,   उणीवतेची खंत कशी  । दुबळ्या देही कला श्रेष्ठ तीRead More

January 03, 2016
Visits : 4108

निसर्गाची आनंदासाठी मदत   कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं  जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान करी त्यास मदत, आनंदी होण्या जRead More

January 03, 2016
Visits : 1323

राजमाता कैकयी   अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला  । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला   ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई  । कैकयी त्याच्या सेवेत राही  ।। राजनीति अन् युद्धनीति ही  । अवगत झाली सारी तिजला   ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी  । रावणादी असुरी शक्ती वाढूनी  ।। सामान्य जनाला जर्जर करुनी  । हा हाः कार तो माजविला   ।।२।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला परिस्थितीला जाणून घेतां  । केवळ चौदा वर्Read More

January 03, 2016
Visits : 1144

बागेतील्या तारका बागेमधला निसर्ग सारा   टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी   बाग झाली रिकामी १   बाकावरती बसून एकटा   मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो    अंक चुकवी सारे  २   अगणित बघुनी  संख्यावरी   प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला  राहिले नाहीं भान  ३   शितलेतेच्या  वातावरणीं   शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी  पहांट ती झाली  ४   गेल्या निघूनी सर्व तारका   आकाशाला सोडूनी शोधूं लागले नयन माझे   त्यांना सर्व दिशांनी  ५   चकित झालो फुले बघुRead More

January 03, 2016
Visits : 1919

ऋणमुक्त आज मला वेगळेच समाधान व आनंद मनास वाटू लागला होता. ऋणमुक्ततेचा आनंद. उपकाराची   परत  फेड व्हावी आणि त्यासाठी  एखादी नैसर्गिक घटना घडावी   ह्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट असू शकत    नाही. कृत्रिमरित्या व आपल्या प्रयत्नाना  आपण एखद्या  गोष्टीचे ऋण फेडणे, वेगळे. ते फेडण्यासाठी  निसर्गाने तुम्हास मदत करणे ह्यात खूप फरक पडतो. तुमच्या  अपेक्षित  अंतर्मनाची तगमग ह्याची निसर्गाने दाद घेतली हा त्याचा अर्थ बनतो. ह्या ऋणमुक्तीच्या व्यहारात कुणी किती उपकार केले, आर्थिक  शारीरिक  वा भावनिक हा प्रश्न गौणRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 111656 hits