Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
January 25, 2014
Visits : 1297

कृष्ण कमळ- ८८  वियोग   सहवासाचे सुख जेवढे,  वियोगाचे दुःखही तेवढे बांधल्या प्रेम बंधन गाठीं,  तुटता विसरुन जाती लपुन बसती दुःख खुणा, समज न येई त्याची कुणा उडून जातां शाल सुखाची,  व्यक्त होई मग दुःखे जीवाची कशास करितो प्रेम असे ते,  सहवासाने वाढत जाते फुग्यापरी ते जातां फूटूनी,  आणिते दुःख सारे जीवनीं दाखव प्रेम त्याच ठिकाणीं, बघणार नाही वियोग कुणी केवळ प्रभूचा सहवास दिसे, वियोगरहीत तेच असे प्रेम वाढते प्रभूसहवासे,  निस्वार्थी भक्ती त्यांत वसे समरस होता एक रुपानेRead More

January 25, 2014
Visits : 1555

१०६   प्रभू दर्शन   महिमा कसा प्रभू तुझा आगळा पावन करसी तूं भक्ताला नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   ।।धृ।।   पुंडलीकाची महान भक्ति माता पित्याचे चरणी होती त्याची सेवा तुजसी खेचती कसा उकलू मी ह्या कोड्याला   ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   पातिव्रत्य हे दैवत समजूनी पतिसेवेला घेई वाहवूनी सावित्रीने दिले दाखवूनी प्रभू वाकती सती शब्दाला   ।।२।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेलाRead More

January 25, 2014
Visits : 6245

जीवनाच्या रगाड्यातून- दृष्टीची भ्रमंति   बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला      ४   दृष्टRead More

January 20, 2014
Visits : 2270

कृष्ण कमळ- ८७   ईश्वरी इच्छेनेच   वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन घटना घडल्या जीवनामध्यें,  राही त्यांची आठवण चालत असतां पाऊल वाट,  जीवन रेषे वरची स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा,  भावी आयुष्याची परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें,  पुरता गुरफटलो फिरणाऱ्या त्या  वर्तुळातूनी,  बाहेर येवूं न शकलो कल्पिले होते नियतीनें,  तेच घडविले तिनें भंग पावले स्वप्नचि सारे,  तिच्याच लहरीनें असेच घडते जीवनीं सदा,  अघटीत-अवचित समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा,  स्वीकारी आनंदात   डॉ. भगवानRead More

January 20, 2014
Visits : 1691

बागेतील तारका-    १०५  शोधूं कोठे त्यास ?   शोधत होतो रुप प्रभूचें,  एक चित्त लावूनी अंवती भंवती नजर फिरवी,  श्वास रोखूनी   ।।१।।   शांत झाले चंचल चित्त,  शांत झाला श्वास ह्रदयनाडी मंद होऊनी,  चाले सावकाश   ।।२।।   पचनशक्ती हालकी झाली,  जठराग्नीची शिथील झाली गात्रे सारी,  देह चैत्यन्याची   ।।३।।   देहक्रियांतील प्राण बिंदू तो,  असे ईश्वर समरस होतां त्याच शक्तीशीं,  होई तो स्थिर   ।।४।।   शोधामध्ये चिंतन करतां,  ध्यान परि लागते समाधी स्थितीतRead More

January 20, 2014
Visits : 2205

जीवनाच्या रगाड्यातून- व्यस्त राहण्याचा मार्ग   मराठी ब्लॉगची पध्दत, संगणाकावर नुकतीच सुरु झाली होती. थोडक्यांत वर्णन करायाचे म्हणजे हे एक प्रकारे आपल्या नावाचे एक खाते काढणे असते. ह्य़ाला करआकारणी वा फी नव्हती. आपल्या नावाचा ई-मेल काढून  ब्लॉग काढणे. एक प्रकारे वेबसाईट काढण्यासारखेच आहे. ह्य़ा खात्यावर तूम्ही लेख, कविता, माहिती, फोटो इत्यादी देऊ शकतात. वाचक वर्ग ती वाचतात. जर कुणी प्रतिक्रीया दिल्या तर त्या तुम्हास कळतात. कोणता लेख, वा साहित्य किती जणानी वाचले, ह्य़ाची जाणीव येते. मी हे सर्व जाणRead More

January 15, 2014
Visits : 2004

८६   प्राण ज्योत   दिवा होता छोटासा, एक मजकडे इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे तळांत होती योजना, तेल सांठवण्याची शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं व्यय टाळून प्रवाही करा, तीच प्रभूवरती ऐहिक सुखाच्या जातां मार्गीं, गुरफटतो संसारीं तीच उर्जा प्राणास मिळतां, चRead More

January 15, 2014
Visits : 2256

बागेतील तारका- १०४  इंद्रियें सेवकासम   खिडकीमधूनी टिपत होतो बाह्य जगाचे द्दष्य आगळे लोभसवाणें चित्र बघण्या आतूर होऊन गेले डोळे   नयन नव्हते बघत ते बघत होतो मीच खरा खिडकीसम नयनातूनी द्दष्य उमटते आंत जरा   संगीताचे सूर निनादूनी लहरी त्यांच्या उठताती कर्णा मधल्या पडद्यायोगे आनंद मजला देवून जाती   मालक असूनी मी देहाचा इंद्रिये सारी असती सेवक ती केवळ साधने असूनी आंतील 'मीच' असे साधक   मालक असूनी ताबा नसणें स्वच्छंदी बनवी  सेवकालाRead More

January 15, 2014
Visits : 2167

जुळे   दोघे मिळून आलां               हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात   दोघांची मिळूनी शक्ति         दुप्पट होत असे सहभागी होतां,युक्ति           यशाची खात्री दिसे   एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे                 प्रकाशमान बनती   ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत   एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची मिळे एकत्र मिळूनी काम करा        तRead More

January 10, 2014
Visits : 1522

कृष्ण कमळ- ८७   देहाला कां शिणवितां ?   शरिरातील अवयव सारे, यंत्रावत् असती आपल्यापरी कार्य करुनी, कार्यारत राहती यंत्रामधल्या मुख्य गाभ्याला, आत्मा म्हणती कुणी अविरत मिळे चैत्यन्य शरीराला, त्याचे कडूनी शुद्ध अशुद्ध संस्कार सारे, अवयवी घडती त्याच रुपें आत्म्याकरवी, परिणाम तो होती खाणें शुद्ध पिणेशुद्ध विचार निर्मळ, पवित्र ते संगम होता योग्य साऱ्यांचा, शुद्धीकरण घडते उपास तापास करुनी कांहीं, शिणविती देहाला हट्टयोग साधूनी कित्येक, दमविती शरीराला देह असे साधन केRead More

January 10, 2014
Visits : 1801

बागेतील तारका-     भावशक्तीची देणगी   भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले करण्यास तव जवळीक,  कामास तेच आले   जिंकून घेई राधा तुजला,  उत्कठ करुनी प्रेम उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म   भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी पावन करण्या धाऊन जाती,  सर्व संत मंडळी   भजनांत मिरा रंगली,  ध्यास तुझा घेऊन नाचत गांत राहिली,  केले तुझ पावन   दया क्षमा शांतीचे भाव,  करुणेमध्ये भरलेले त्यांत शोधता तुझा ठाव,  आनंदी मन झाले   सर्वस्व तुजला अर्पिता,Read More

January 10, 2014
Visits : 6188

जीवनाच्या रगाड्यातून- दुर्वांच्या जुड्या   संध्याकाळचे फिरणे झाल्यानंतर शेजारच्या बागेत जावून शांत बसणे हे नित्याचे झाले होते.  एक प्रकारचा आनंद व समाधान मनाला त्यामुळे लाभत असे. शांत झोप मिळण्यासाठी ते गरजेचे वाटत होते.                    एक गोष्ट माझ्या दररोज बधण्यात येवू लागली होती. एक वयस्कर गृहस्थ नियमीत त्याच वेळी मला बागेत दिसत होते. ते सहसा कुणाशी बोलत नसत. एकटेच शांत बसून बागेतल्या गवतातील दुर्वा काढीत असत. पिशवीत एक दोऱ्याचे रिळ असे. जमविलेल्या दुर्वांची ते जुडी बांधून ती त्याRead More

January 05, 2014
Visits : 1067

कृष्ण कमळ- 86  चांदण्यातील आठवणी   हवाच मजला तोच चंद्रमा तेच नभी चांदणें गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।   आजीसंगे गच्चीवरती फुलराण्यांच्या कथा ऐकती बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   फुलले होते यौवन सारे अंगी झोंबे शितल वारे पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।। गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें   सगे सोयरे मित्रमंडळी परसदारी तुळशीजवळी गप्पा टप्पा वRead More

January 05, 2014
Visits : 4384

बागेतील तारका- 103  कृष्ण बाललीला   चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें उखळाला बांधले उखळासहीत झाडे पाडूनी चकीRead More

January 05, 2014
Visits : 5127

जीवनाच्या रगाड्यातून- आईचे ऋण   मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी          प्रेमळ स्वरूप माझे आई धन्य जहलो जन्म मिळूनी       उदरामाजी तुझिया ठायी प्रेमाचा तो सागर देखिला      तुझ्याच ह्रदयाजवळी जावूनी निकटपणाचा आनंद घेत         नऊ मास मी उदरी राहुनी दुग्धामृत पाजून मजला            वाढवी अंकुर काळजीने घास भरवण्या काढून ठेवी         उपाशी राहून आनंदाने निद्रा न लागे तुजला तेंव्हा           आजारी जेंव्हा मी पडलो पाणी दिसले तुझ्या नयनी           दु:खाने जेंव्हा हळहळलो   अनंत ऋRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 41779 hits