Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 29, 2015
Visits : 3966

कृष्ण कमळ-                                     दोन मनें द्या प्रभू                                                 आपल्याला इच्छा आहे प्रभू तुमच्या नामस्मरणाची परंतू ऐकून घ्या कहाणी आमच्या अडचणींची   ।।   नाम घ्यावे मुखीं रात्रंदिनीं एकचित्ताने सार्थक होईल तेव्हां आमची तप:साधने   ।।   परि संसार पाठी, लावला आहेस तूं गुरफटल्यामुळें त्यांत साध्य न होई हेतू  ।।   मला पाहिजे दोन्हीं संसारात राहून ईश्वर एकात गुंततां मन दुसरे न होई साकार  ।।   दे मRead More

March 29, 2015
Visits : 3204

बागेतील तारका-   परमार्थ व संसार आहेत एकच   उपास तापास करुनी,   शिणवित होतो देहाला भजन पूजन करुनी,   पूजीत होतो देवाला   ।।१।। कथा किर्तनें ऐकूनी,   पुराण मी जाणिले माळ जप जपूनी,   प्रभू नामस्मरण केले   ।।२।। वेचूनी सुमनें सुंदर,   वाही प्रभूचे चरणीं फुलांचे गुंफूनी हार,   अर्पण केले कंठमणीं   ।।३।। जाऊनी तीर्थ यात्रेत,   दर्शन घेतले तीर्थांचे प्रसिद्ध देवालयांत,   चरण स्पर्षिले मूर्तीचे  ।।४।। मनामध्यें ठेऊन शांती,   मूल्यमापन केले जीवनाचे कांहीं न मिळाले हातीं,Read More

March 29, 2015
Visits : 3550

जीवनाच्या रगाड्यातून-   पुराणकाळातील अस्त्र   महाभारतातल्या महायुद्धाच्या कथा ऐकल्या. कौरव व पांडव ह्या दोन भावंडामध्ये झाल्या होत्या. ह्या अंगावर रोमांच उभे करतात. जर सुक्ष्म निरक्षण केले तर ते शस्त्र व अस्त्र यांचा उपयोग करुन लढले गेलेले युद्ध होते. थोड्याच लोकाबद्दल योध्याबद्दल विरा बद्दल त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नावे सांगीतली गेली. त्यांची रणांगणातील यश वा अपयश प्राप्त म्हणून ओळखली गेली. परंतु ह्या युद्धांत अनेक अनेक विर पराक्रमी लढवये लढले. बलीदान पावले. त्यांची नांवे आपRead More

March 22, 2015
Visits : 3681

कृष्ण कमळ-                               रेणूके जगदंबे आई                                               रेणुके जगदंबे आई    दर्शन दे मजला तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।।   तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक न होई चित्त एक तूंच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।। रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला   जमदग्नीची कांता    परशूरामाची तूं माता मनीं तुजला भजतां आशिर्वाद तूं देई     आनंदानें सर्वांला  ।।२।। रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजलाRead More

March 22, 2015
Visits : 5314

बागेतील तारका-     पूजाविधी गाभा     सोडूनी दिली मी पूजाअर्चा,  समाधान मज ज्यात न लाभले दैनंदिनीच्या कार्यक्रमातील,  एक भाग तो सदैव वाटले....१ बालपणी मज कुणी शिकविले,  पूजाअर्चा आन्हकी सारे ठसले नाही मनात कधीही,  भक्तीला हे पोषक ठरे पूजाअर्चा ह्या विधीमध्ये,  लक्ष आमचे केंद्रीत होते हळदी कुंकू गंध फूले आणि,  दीपधूप हे मधूर जळते सुबकतेच्या पाठी लागूनी,  यांत्रिकतेसम आम्ही झालो अर्थ ज्याचा कधी न कळला,  मंत्र मुखोदगत वदू लागलो वास्तव्य ज्याचे सदैव सागरी,  स्नान तयाला कRead More

March 22, 2015
Visits : 5259

जीवनाच्या रगाड्यातून-   मला कळलेला रावण   १)        आजीने सांगीतलेली कथा      आज मला अचानक माझ्या स्वतःच्या सत्तर वर्षे वयाच्या आजीची आठवण आली. अतिशय प्रेमळ व आम्हा नातवंडावर जीव लावणारी ती होती. माझ्या वयाच्या चौदा वर्षे पर्यंत मला तीचा सहवास लाभला.  आजींच्या दोन गोष्टी मला फार आवडायच्या. एक चांगले चटकमटक खावयास नेहमी देणे. दुसरे रोज रात्री झोपण्यापूर्वी कथा सांगणे. रामायण, महाभारत यातील छोट्या छोट्या अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या. दररोज  त्याच त्या कथा ऐकताना एक विलक्षण आनंद आम्हास हRead More

March 15, 2015
Visits : 3042

कृष्ण कमळ-   बीज - वृक्षाचे चक्र कुणाचे ?   सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  फळांत असते बीज फिरवी कोण चक्र सहज ?   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

March 15, 2015
Visits : 4083

बागेतील तारका-     निसर्गाची आनंदासाठी मदत   कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविलेस नृत्य राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां मैनेच्या उदरीं  जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देईRead More

March 15, 2015
Visits : 3667

जीवनाच्या रगाड्यातून-     शुर्पणखाची एक सुडकथा   रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट.                लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे अत्यंत थोर व्यक्तीमत्व होते. ब्रह्मदेवाच्या कल्पनेतून साकारलेल्या सप्त (सात) ऋषीRead More

March 09, 2015
Visits : 4607

कृष्ण कमळ आमचे ध्येय व दिशा   कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चाललो अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे   ।।६।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७Read More

March 09, 2015
Visits : 4441

बागेतील तारका-     हट्टी अनु ( बाल गीत )   एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

March 09, 2015
Visits : 4614

जीवनाच्या रगाड्यातून-                                                                   ह्रदयातील ईश्वर   महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला. द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानीRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 49428 hits