Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 31, 2015
Visits : 727

चक्र   मरूनी पडला एक प्राणी,  जंगलामधल्या नदी किनारी कोल्ही कुत्री आणि गिधाडे,  ताव मारती त्या देहावरती...१, एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरती आज गमवूनी प्राण आपला,   तोच दुजाची भाकरी बनती....२, निसर्गाचे चक्र कसे हे , चालत असते सदैव वेगे एक मारूनी जगवी दुजाला,  हीच तयाची विशेष अंगे...३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 31, 2015
Visits : 1506

तू लपलास गुणांत कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी   इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती   ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी   फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना   फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद   वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी देई देहा सुख,    अल्हाद्कारी   रंग, गंध, रस, स्पर्शात,    तुझ्या अस्तित्वाची जाणRead More

May 31, 2015
Visits : 3890

सोनेरी तसवीर ! त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या       ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते.  भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके  मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती.  मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद  चिकटवलेला  होता. त्यावर चार रेघोट्या आखRead More

May 24, 2015
Visits : 1698

विनाश – ईश्वरी व मानवी   संतुलन हे करूनी चालवी,  निसर्गाचा हा खेळ सतत जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत....१, जन्म घटाना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी...२, मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होवूनी दु:ख करी, मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त ती येई शिसारी....३, पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही संकटे मानव निर्मित युद्ध दंगली,  सूड भावना ही तेथे पेटे...४, विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढेRead More

May 24, 2015
Visits : 3010

निसर्ग व्याप्ती उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   किती घेशी झेप मानवा,       उंचRead More

May 24, 2015
Visits : 3061

जीवनाच्या रगाड्यातूनआनंद लुटणारे मन !    सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु  माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही  वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालूRead More

May 17, 2015
Visits : 4524

कृष्ण कमळध्यान स्थिती   जेव्हां मजला कळत होते,  निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची,  शरिर होते निकामीं....१, निद्रेमधल्या स्थितीत जाता,  जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं,  एकत्र न येते...२, निद्रावस्था नि जागेपणा,  याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी,  मध्य बिंदू साधते...३, देह मनाला विश्रांति देई,  ध्यान अवस्था ही ध्यानामधली ऊर्जा सारी,  ईश्वरार्पण होई...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 17, 2015
Visits : 5995

बहिणीची एक इच्छा विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया  नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी  आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून  एके दिवशी    बांध राखी प्रेमाची स्वार्थी आहे रे मी      काढते तुझाRead More

May 17, 2015
Visits : 5132

जीवनाच्या रगाड्यातून- चिखलातले कमळ जव्हार (  ठाणे  )   ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात  Medical Superintendent   म्हणून कार्यारात होतो.  रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली   की  दोन  दिवसापूर्वी  ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता,  ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती. धावपळ झाली.  सर्वांनी शोधा शोध केली. शासकीय स्थरावर जे करावयाचे ते केले गेले.  अतिशय दु:खद व मनास निराश करणारी घटना होती.  त्या बाईने हे सारे योजूनच केले असल्यामुRead More

May 10, 2015
Visits : 3937

व्यर्थची यात्रा   जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना कांहीं तरी ते मागत होते,  हात जोडूनी चरणा...१, दयावान ती आहे समजता,  गर्दी होते तिजपाशीं कधी न दिले काहींहीं तिजला,  मग ही मागणी कशी ?....२, जावू नका दर्शनास तिच्या,  रिक्त अशा त्या हाताने तिला पाहीजे ताट पूजेचे,  भरले भक्ती भावाने...३, व्यर्थ होवून जाती ते श्रम,  भक्तीभावाच्या अभावी उभे आयुष्य ते वाऱ्या करूनी,  हाती काही न येई...४, मानव रूप देवूनी तिजला,  धनादी वस्तू अर्पिती पूजाविधींचा थाट करूनी,Read More

May 10, 2015
Visits : 2143

पडछाया! चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला पडू लागले पावूल माझे मंद मंद आता श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी काळोखाच्या गर्भामघ्ये, गेली ती विरुनी एकटाच मी होतो तेथे, अRead More

May 10, 2015
Visits : 7246

अंगठ्याचा ठसा गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये  पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा   फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का?” “किती रुपये काढायचे आहेत?” मी विचारले. “पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.”  मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले.   त्या बाईंचा पेहेराव, अशिक्षितपणाची  झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याची माझ्यामनावर त्या बाई  विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण  झाली होती, त्याला केवळ त्याRead More

May 04, 2015
Visits : 1876

ज्ञान देणारे सर्वच गुरू   अवतीभोवती सारे तुझ्या,   आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी,   प्रभूसी मी विनविले  ।।   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,   काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे,   घेण्यास ते समजून  ।।   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,   बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते,   वस्तूच्या त्या गुणापरी  ।।   सारे सजिव निर्जिव वस्तू,   गुरू सारखे वाटावे तेच आहेत ईश्वरमय,   तुम्हीच ते समजावे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर मो. ९००४०७९८५० bknagapurkar@gRead More

May 04, 2015
Visits : 2352

बागेतील्या तारका बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      १   बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे           २   अगणित बघुनी  संख्यावरी     प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला        राहिले नाहीं भान         ३   शितलेतेच्या  वातावरणीं           शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी      पहांट ती झाली           ४   गेल्या निघूनी सर्व तारका       आकाशाला सRead More

May 04, 2015
Visits : 5380

गायीचे प्रेम रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती.  फक्त मानेची व शेपटीची   हालचाल अधून मधून चालू होती.  कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा  येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व  अंगाला  हात लावून तिला नमस्कार करू बघत  होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या   त्या गायीला,  प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल  काय वाटत असावे,  हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून,   जणू तेहतीसRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 52477 hits