Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 28, 2014
Visits : 3283

कृष्ण कमळ-   श्री कृष्णाच्या हातांतील जादू   हे घनश्यामा श्रीकृष्णा कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   ।।धृ।।   बोटे फिरवूनी मुरलीवरी सप्तसुरांची वर्षा करी सर्वा नाचवी तालावरी रंगून जाती हे श्रीहरी बोटांमधली किमया तुझी,    नाहीं कळली कुणा   ।।१।। कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   बोटांत बोटे गुंतवी राधेला तूं नाचवी गोपींना तूं गुंगवी गोपांना तू खेळवी कशी लागते ओढ तुझी,    कळले नाही सर्वाना   ।।२।। कोणती जादू तुझ्यां हातीं    सRead More

September 28, 2014
Visits : 3153

बागेतील तारका-   स्वप्न आणि जागेपण   एक ती झोप     स्वप्न बघत राही शिणवून शरीर ताप   जीवास सुख देई   स्वप्न जाई विसरुन    जाग येता मनां जागे मन   स्वप्नांत भासवी वेगळेपणा   एकाच मनाच्या दिसे   ह्या दोन भुमिका भिन्नता त्यांत भासे     जाऊन दोन टोकां   स्वप्न आणि जागेपण   देहाच्या दोन स्थिती नाण्याच्या बाजू दोन  एकमेका न मिळती   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

September 28, 2014
Visits : 1327

जीवनाच्या रगाड्यातून   अशीही एक भेट   १९९७ सालच्या जुन-जुलै चा काळ. आम्ही उभयता कैलास-मानसरोवरच्या यात्रेला गेलो होतो. एकूण ३० दिवसांची खडतर यात्रा झाली. परंतु जीवनामध्ये एक जबरदस्त आठवण निर्माण करुन राहिली. आपल्या धार्मिक द्दष्टीकोणातून ज्या अनेक यात्रांचे वर्णन केले गेले, त्यामधील सर्व श्रेष्ठ अशी ही समजली जाते. आजच्या अधुनिक युगांत देखील, ती यात्रा यशस्वीपणे पूर्ण करणे म्हणजे एक भाग्यच वाटते. एक निसर्गरम्य साईटसीईंग ह्या दृष्टीकोणातून ती यात्रा खूपच महत्वाची वाटली. कैलास पर्वताच्या २२Read More

September 21, 2014
Visits : 3190

कृष्ण कमळ-   निसर्गाचे चक्र   सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे  ।।धृ।। एक एक पाकळी लहानशी कळी जाई उमलून फूल त्याचे बनून सुगंधी टपोरे फूल कांही वेळ राहील कोमेजून जाई देऊनी रुप बीजाचे परत अंकूरण होई दुजा एका झाडाचे  ।।१।। सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे एक एक पाऊल टाकते मुल वाढते हसून बनते यौवन एटदार तो दहधारी कांही काळाची उभारी देह होई विलीन पेटवूनी दिवे वंशाचे होई अवतरण नव्या एका मानवाचे   ।।२।।Read More

September 21, 2014
Visits : 1017

बागेतील तारका-   उर्जा अर्पण   करा सर्वस्व प्रभूसी अर्पण    त्यांतच मिळेल समाधान जीवन अग्नी पेटत राही       उर्जा निघे त्याचे ठायीं उर्जेचे होते रुपांतरण       साधत असे कार्य त्यातून भावनेचा आविष्कार        देई जीवना आकार व्यक्त करण्या भावना       उर्जा लागे त्यांना एकाग्र करा मना       सोडूनी सारी भावना एकाग्र चित्त हेच ध्यान     प्रभू मिळण्याचे साधन सारी उर्जा ध्यानांत जाई    तीच प्रभूसी अर्पण होई   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.cRead More

September 21, 2014
Visits : 4096

जीवनाच्या रगाड्यातून   विश्वासातील खोडसाळपणा ?   आमच्या शेजारी वयोवृद्ध ताराबाई, ज्याना आम्ही मावशी म्हणत असू रहात होत्या. निवृत्त शिक्षिका, वय ९८ पूर्ण. जीवनाचे शतक पूर्ण करण्याचा आत्मविश्वास. ह्या वयांत देखिल आनंदी व समाधानी राहण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. स्मरणशक्तीपण त्याना साथ देत होती. वर्तमानपत्रातील फक्त ठळक हेडलाईन्स त्या वाचीत असे.              मी अनेक वर्षे पूजाअर्चा व ध्यानधरणा ह्या दैनदिन विधी करीत असतो. ईश्वरी साक्षात्कार म्हणजे काय ? त्याची अनुभूती, व फळ हे सारे संस्कRead More

September 15, 2014
Visits : 895

कृष्ण कमळ-   आठवावे मृत्यूसी निसर्गाची रचना, जन्म मृत्यृची योजना, गती देई जीवन चक्रांना,  ईश्वरी शक्ती II १II उत्पत्ती लय स्थिती, या त्रिगुणात्मिक शक्ती याच तत्वे निसर्ग चालती,  अविरत II २II ईश्वरी योजना महान, खेळ जीवनाचा चालवून घडवी शक्तीचे दर्शन, निसर्ग रूपाने II ३II वस्तूचे निरनिराळे आकार,  चेतना देवूनी करी साकार यास जीवन संबोधणार,  आपण सारे II ४ II मातीची भांडी असती, विभिन्न रूपे मिळती वापरून तीच ती माती,  आकार देई पुन्हा पुन्हा II ५II दिसेल भांडी फुटलेली,  अथवा नवRead More

September 15, 2014
Visits : 1398

बागेतील तारका-   जीवन ध्येय   प्रभूची लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी,  हीच त्याची महीमा II१ II जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी II २ II मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून,  विश्लेषण करती प्रभूचे II३ II कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी मस्तिक,  चर्चा करिती प्रभूची II ४II सत्य परिस्थिती ऐसी,  कुणी न जाणले प्रभूसी सर्वांची चालना तर्कासी,Read More

September 15, 2014
Visits : 1592

जीवनाच्या रगाड्यातून   मृत्युची चाहूल                         मृत्युबद्दल अनेक प्रचलीत समज वा गैरसमज आहेत. मुख्यतः मृत्युच्या भयानकते विषयी बरेच कांही ऐकले होते. मृत्युसमयी व्यक्ती अत्यंत त्रासाने ग्रासलेला असतो. एक हजार विंचवांचा दंश व्हावा, इतक्या  वेदना ग्रस्त होतो. शिवाय मृत्युचा त्रास हा त्याच्या पाप-पुण्याच्या ( ?) तथाकथीत हीशोबोशी संबंधीत असतो. यमदूत येतात, यमाचा फास अवळला जातो. प्राण खेचला जातो.  ... इत्यादी .. इत्यादी. सर्व साधारण सामान्यजन मृत्यु प्रक्रियेबद्दल खऱ्याअर्थाने अज्ञRead More

September 07, 2014
Visits : 2650

कृष्ण कमळ-   जादूगार तूं देवा  ।   जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   ।।धृ।।   ढग काळे काळे जमवितोस सगळे गर्जती वादळे कडाडूनी विजा,  पर्जन्य होई भयंकर   ।।१।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   तळपते ऊन दग्ध होई जीवन जाई वाळून तेज वाढूनी सूर्याचे,  दाह करी फार   ।।२।। जादूगार तूं देवा,  दाखवी चमत्कार आठवण येण्या तुझी,  करितो हाः हाः कार   कड्याक्याची थंडी भरुनी हुRead More

September 07, 2014
Visits : 1978

बागेतील तारका-   पिंडीतील ब्रह्मांड   विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ति प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती   सुक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ति अंगीं प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं   विचार मनीं येई ,    कोठून शक्ति ही आली निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली   समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता   जीव देहाचे पिंड,   जीवंततेतील सुक्ष्मता बाळगी ते ब्रह्मांड,   हीच त्याचRead More

September 07, 2014
Visits : 1372

जीवनाच्या रगाड्यातून   दहा बोटे- दहा वर्षे !   आम्ही सकाळी उठतांच ईश्वराचे स्मरण करतो. रात्रभर त्याने आमचे संरक्षण केले ह्याचे आभार मानतो. आम्ही आपली बोटे चाळवतो. ' कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम प्रभाते कर दर्शनम '  ही प्रार्थना म्हणतो. एक समज आहे की ईश्वराने आपणास प्रत्येकाला शंभर वर्षाचे आयुष्यमान दिलेले असते. खाणे, पिणे, झोपणे, फिरणे, गप्पा करणे, व्यायाम, दुखणे-खुपणे, शिक्षण, शाळा कॉलेज, नोकरी, व्यवसाय, संसार, मुले, नातवंडे, इत्यादी हे सर्वसाधारण जीवनाचRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 25951 hits