Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 27, 2011
Visits : 2446

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !   श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. श्वासोछ्वास क्रिया म्हणजे प्राणवायू घेणे व कार्बंडाय ऑक्साईड मिश्रीत वायू शरीरावाटे बाहेर सोडणे.Read More

May 24, 2011
Visits : 2029

कोणती स्फूर्ति देवता ?   मजला नव्हते ज्ञान कशाचे पद्यामधल्या काव्य रसांचे कोठून येते सारी शक्ती काव्यरचना करवून घेती   अवचितपणें विचार येतो भावनेशी सांगड घालितो शब्दांचे ते बंधन पडूनी पद्यरुप ते जातो देवूनी   सतत वाटे शंका मनीं हे न् माझें परि येई कोठूनी असेल कुणी महान विभूति माझे कडून करवून घेती   तळमळ आतां एक लागली जाणून घ्यावी ती शक्ती आगळी अर्पिन माझे प्राण तयाला स्फूर्तिदेवता जो मजसी झाला.   (कविता)Read More

May 20, 2011
Visits : 4887

घास घास घेणे   लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप  त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ती खाण्यामध्यें रेंगाळतात. लहान बालकांना जेवण भरविणे ही अत्यंत आवघड कला असते. सहनशिलता फक्त आईला समजलेली दिसते. मुल उपाशी राहू नये म्हणून ती सतत त्याच्या पाठीमागे राहून ते भरविते. आईच्या मुलाना जेवण खावू घालण्याच्या अनेक युक्त्या असतात. येनकेन प्रकारे घास भरवणे व त्याच्या पोटांत तो जाईल याचा तीचा प्रयत्न असतो. जेऊ घालताना गोष्टीRead More

May 18, 2011
Visits : 4567

बाळाची निद्रा   चिंव चिंव करुं नकोस चिमणे,  बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग,   देईन मी सगळे   कपाट सारे उघडून ठेवले,   समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे,   डाळ दाणे पोटभरी   घरटी बांध तूं माळ्यावरती,   काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही,   ही घे माझी वाणी   नाचून बागडून खेळ येथे,    निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं तर,   जागेल बाळ तान्हें   चिंव चिंव करणे गीत आहे कां ?   अंगाई तुमची गावूनी आपल्या पिल्ला करीतां    रमवी मने त्यांची   अRead More

May 15, 2011
Visits : 4518

जग आणि देह – एक साम्य   शरीरावरील एक मोठे ऑपरेशन ( Major Surgery ) बघत होतो. छातीचा व पोटाचा भागावरील कातडी- मासाचे आवरण काढताच देहामधले निरनिराळे अवयव दिसू लागले. निरनिराळ्या आकाराचे, लहान मोठे, वझनानी कमी जास्त दिसत होते. देहामध्ये वेगवेगळ्या पोकळ्यामध्ये प्रत्येकाला पातळ पडद्यामध्ये गुंडाळून, एकमेकाजवळ  ठेवलेले होते. प्रत्येक अवयवामध्ये पोकळ्या , वाहीन्या दिसत होत्या. देहाबाहेरील नैसर्गिक रचनाचे ह्या सर्व आतल्या आवयाचे  विलक्ष साम्य असल्याचे जाणवले. पर्वत, नद्या, जंगले, तलाव, प्राण्यांची हलचRead More

May 13, 2011
Visits : 3073

भाकरी भाकरीच्या पाठीवर ठसे दिसती हातांचे जाता तव्यावर भाजूनी निशाण राहते कष्टांचे एका भाकरीच्या पाठी हात कितीक गुंतले कण कण देती ग्वाही मन भरुनी कसे आले उन्हा पावसांत फिरे शेतामध्ये शेतकरी टप् टप् घाम गाळी उभी करीता जवारी पोती पोती उचलूनी वाहून नेई मजूर दमछाक होऊनी ही मिळत नाही पोटभर ओवी म्हणत मुखाने आई थापिते भाकरी सारय़ांच्या कष्टामध्ये तिच्या मायेची भागीदारी धरणीच्या पोटातून जीवन रस येई वरी दुजासाठी जगा तुम्ही बघा सांगते भाकरी (कविताRead More

May 10, 2011
Visits : 1821

एक समाधानी योनी रस्त्यावरील एका पुलावर बसलो होतो. एक मेंढ्या बकरय़ांचा कळप समोर चरत होता. तो कळप साधारण ३० ते ४० बकरय़ांचा असावा. एक मेंढपाळ त्याना मार्गदर्शन करीत होता. तो कांही वेळा झाडावर चढून बरीचशी पाने फान्ट्या तोडून त्या बकरय़ाना चरण्यासाठी टाकीत होता. बराच वेळपर्यंत ते दृष्य बघत मी आनंद घेत होतो. त्यांची पळापळ, बागडणे, खेळणे, एकमेकाना ढूसण्या देणे, सारे चालले होते. चरणे हा प्रमुख कार्यक्रम त्या पार पाडीत होत्या. कांही बकरय़ा आपल्या पिल्लाना चाटीत होत्या. प्रेम व्यक्त करीत होत्या. त्यातील तरुण बRead More

May 07, 2011
Visits : 5765

श्रेष्ठ कोण?   स्तुती मी देवा करुं कुणाची चित्र बनविले अतिशय सुंदर सौदर्य वाटते लोभसवाणे खिळून राहते जेथे नजर   तू तर असशील कलाकार तो ह्या विश्वाचा कर्ता महान जिवंत चित्र जे एक बनविले दाद तयाची देईल कोण ?   जमता चित्र अतिशय रेखीव मनास घेई मोहून ते ह्यात चित्राची आपती किमया मला न कांही दिसून येते   कला पुजारी रसीक मीच तो सौंदर्य टिपती माझे नयन मुल्यमापन ते अचुक करिती कलाकार, कला, रसिक ह्यातून   परि मी तरी आहे कोण खरा नसा नसाRead More

May 04, 2011
Visits : 4610

माईल स्टोन्स ( Mile Stones ) श्री वसन्तराव व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार कसे शिकवले जातील ह्याबद्दल फार चोखंदळ होते. एकदा ते मुलासह आमच्याकडे आले. अंगणांत खुर्च्या टाकून आमच्या गप्पा चालू होत्या. मुले आपली करमणुक स्वतःच करण्यात व्यस्त झाली होती. मोठा मुलगा तेथेच पडलेले कॉमिक पुस्तक घेऊन झोपाळ्यावर बसून वाचत होता. लहान मुलगा अंगणामधील बागेत फुलझाडे बघण्यांत व खडेवाळू गोळा करुन खेळत होता. वसंतरावांचे लक्षRead More

May 04, 2011
Visits : 4204

माईल स्टोन्स ( Mile Stones ) श्री वसन्तराव व्यवसायाने शिक्षक होते. त्याना दोन मुले. एक दहा वर्षाचा व लहान चार वर्षाचा. स्वतः शिक्षकी वृत्तीचे. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार कसे शिकवले जातील ह्याबद्दल फार चोखंदळ होते. एकदा ते मुलासह आमच्याकडे आले. अंगणांत खुर्च्या टाकून आमच्या गप्पा चालू होत्या. मुले आपली करमणुक स्वतःच करण्यात व्यस्त झाली होती. मोठा मुलगा तेथेच पडलेले कॉमिक पुस्तक घेऊन झोपाळ्यावर बसून वाचत होता. लहान मुलगा अंगणामधील बागेत फुलझाडे बघण्यांत व खडेवाळू गोळा करुन खेळत होता. वसंतरावांचे लक्षRead More

May 01, 2011
Visits : 1685

धन्य ती महाराष्ट्र माऊली ! धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली //धृ// ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली //२// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली संवाद करुन विठोबाशी, नामदेव नाचला तल्लीन होऊनी भजनासी, मधूर गाऊ लागलाRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 39605 hits