Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 30, 2016
Visits : 2295

वेडा अहंकार !   एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला । शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला ।। जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती । झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती ।। किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे । रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते ।। विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर । राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर ।। पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे । पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते ।। संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी । परिसरRead More

October 30, 2016
Visits : 789

सत्व रज तमो गुण   त्रिभाव युक्त जीवन,  सत्व रज तमो गुण, स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती ।।१।।   कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी, काही मध्ये तमोगुणी   दिसे निराळ्या प्रमाणीं ।।२।।   प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती, सत्वगुण लक्षणें ती,   कांहींत दिसून येती ।।३।।   राग, लोभ, अहंकार,    षडरिपू हेच विकार, त्यांतच तो जगणार,   तमोगुण वाढवून ।।४।।   सत्व तमोगुणी पूर्ण, मिळणे फार कठीण, दोन्ही गुणांचे मिश्रण,Read More

October 30, 2016
Visits : 495

कवितेचे मूल्यमापन   काव्य रचनेचा छंद लागूनी,  कविता करू लागलो  । भाव तरंगाना आकार देऊनी,  शब्दांत गुंफू लागलो....१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो...२, अचानकपणे खंत वाटूनी,  निराशा आली मनी निरर्थक वेळ दवडिला,  हेच समजोनी ....३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा,  काळ हाच ठरवील...४, करूनी घेतले तुज कडूनी,  कोणत्या तरी शक्तीने कर्तेपणाचा भाव तुझ्यातील,  सोडून दे तू मनाने....५, असेल हे जर कृत्य त्याचे,Read More

October 30, 2016
Visits : 1353

भाव जाण तू देवा   कर पडले चरणीं भाव जाण देवा   ।।धृ।।   देह झुकला पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी  अंतरीचा दिसे ओलावा    १ कर पडले चरणी   भाव जाण  देवा,   प्रथम येई भावना, जागृत करते मनां मनाचा ताबा देहावरी तेच तुजला प्रणाम करी घे प्रभू जाणूनी   अत:करणातील ठेवा   २ कर पडले चरणी  भाव जाण  देवा   मुखीं नाम तुझे घेई देह सारा शहारून जाई आनंदाची फूटते उकळीRead More

October 30, 2016
Visits : 1633

क्लिष्ट ईश्वरी मार्ग   संसारातील ऐहिक सुखे,   धडपडीने मिळवीत असे प्रयत्नातील आनंद खरा,   भोगण्यांत तो दिसत नसे   उबग येई ह्याच सुखाची,   जीवन खर्चीले ज्या करितां त्या सुखांत समाधान नव्हते,  जाणवले तेच मिळतां   प्रभू मिलनाचा आनंद तो,   चिरंतर ते समाधान देयी ईश्वरी मार्ग खडतर असूनी,   क्लिष्टता येते मनाचे ठायीं   तसेच चाला उबग सोसूनी,   कठीण अशा त्या मार्गावरती यश येईल कष्टाचे परि,   संपूर्ण समर्पण जेव्हां होती   डॉ. भगवान नागापूरकर संपर्कRead More

October 30, 2016
Visits : 987

श्रद्धांजलि   सुळीं दिले येशूला   वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला   रागाच्या ओघांत   समर्पण केले देहाचे   परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे   हेच महत्व होय   सुळावरी तो जातांना   वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना    ते आहेत अज्ञानी   कळले नाहीं ज्ञान   अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान    उशीर केला त्यांत   उपयोग नाही आतां   वेळ गेली निघूनी जाण मनां येता    पक्षी गेला उडूनी   हरकत नाहीं कांहीं   उशीर झाला तरी तत्वामध्ये रस घेई   हीच श्रद्धांजली खरीRead More

October 30, 2016
Visits : 1092

शिखरावरी बांधली मंदिरे   विचारांच्या उठती लहरी,    वलये त्यांची होत असती  ।  सुविचारांची वलये सारी,   नभाकडे जात दिसती  ।।   पवित्र निर्मळ विचारांच्या,    तरल अशा लहरी असती  । अशुद्ध साऱ्या विचारांची,    जड लहरी तळात राहती  ।।   फार पूरातन काळी देखील,    उकल दिसते या गोष्टीची  । पवित्रतेच्या सर्व स्थळांनी,    शोधली जागा शिखरावरची  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 30, 2016
Visits : 2060

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार .                वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.                 मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो.  चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्यRead More

October 23, 2016
Visits : 1590

दृष्टीची भ्रमंति   बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला      ४   दृष्टीला परि पडले बंधन, एका दRead More

October 23, 2016
Visits : 1920

बाह्य अडथळे   एकाच दिशेने जातां,     प्रभू मिळेल सत्वरी, रेंगाळत बसाल तर,    गमवाल तो श्री हरी ।।१।।   तुम्ही चालत असतां,    अडथळे येती फार, चालण्यातील तुमचे,   लक्ष ते विचलणार ।।२।।   ऐष आरामी चमक,  शरिराला सुखावते, प्रेम, लोभ, मोह, माया,  मनाला ती आनंदते ।।३।।   शरिराचा दाह करी,    राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण,   षड् रिपू हे विकार ।।४।।   सुख असो वा ते दु:ख,    बाह्यातील अडथळे सारेच सारता दूर,     प्रभू तुम्हास मिळे ।।५।।Read More

October 23, 2016
Visits : 1741

हिशोबातील शिल्लक   हिशोबाची वही घेवूनी बसलो,   हिशोब करण्यासाठीं  । जमाखार्च तो करित होतो,   जीवनाच्या सरत्या काठीं  ।।   घोड दौड ती चालूं असतां,    सुख दु:खानी भरले क्षण  । प्रसंग कांहीं असेही गेले,   सदैव त्याची राही आठवण  ।।   कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता  । उपयोग नव्हता त्याचा कांहीं,   जग सोडूनी देह जाता  ।।   कधी काळचा निवांतपणा,   घालविला दुजाच्या सेवेत । पुण्य राहिले शिल्लकीमध्ये,   वाटते तेवढेच हिशोब वहीत  ।।   डॉ. भगRead More

October 23, 2016
Visits : 1126

दोन मनें दे प्रभू इच्छा आहे प्रभू , तुझ्या नामस्मरणाची ऐकून घे कहाणी,  अडचणींची   ।।   नाम घ्यावे मुखीं, एकचित्ताने सार्थक होईल तेव्हां तप:साधने   ।।   संसार पाठी, लावलास तूं गुरफटून त्यांत,  साध्य न होई हेतू  ।।   मला पाहिजे दोन्हीं, संसार नि ईश्वर एकात गुंततां मन, दुसरे न होई साकार  ।।   दे प्रभू ,मनाची एक जोडी संसारांत राहून , घेईन प्रभूत गोडी   ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 23, 2016
Visits : 1385

जनटीका   घोड्यावरती बसू देईना,  चालू देईना पायी जगाची ही रीत ,  कशी समजत नाही ..१, सज्जनतेची वस्त्रे लेवूनी,  निर्मळ जीवन आले आपण बरे नि काम बरे,  तत्व अंगीकारले...२, मोठा झाला शिष्ठ समजोनी,  वाळीत टाकीले मला दुष्कृत्यामध्ये साथ हवी,  त्यातील कांहीं व्यक्तीला...३, जीवन जगणे कठीण होता,  मार्ग तो बदलला आगळी धडपड करूनी,  यश मिळाले मला....४, मिसळत होतो सर्वामध्ये,  अतिशय प्रेमानी तरीही ऐकला ‘शिष्ट’ शब्द ,  माझ्याच कानानी..५, व्यक्ती तितक्या प्रकृती , असती येथे भिन्नतेचे सRead More

October 23, 2016
Visits : 1873

आत्म गुरू   गुरूचा महीमा थोर I उघडूनी जीवनाचे द्वार सांगूनी आयुष्याचे सार I मार्ग दाखविती तुम्हां  १ वाटाड्या बनूनी I भटकणे थांबवूनी मार्गासी लावूनी I ध्येय दाखवी तुम्हां  २ न कळला ईश I न उमगले आयुष्य दु:ख देती जीवन पाश I बिना गुरू मुळे  ३ अंधारातील पाऊल वाट I ठेचाळण्याची शक्यता दाट प्रकाशाचा किरण झोत I योग्य रस्ता दाखवी  ४ तैसा गुरू तुमचा I पडदा फाडी अज्ञानाचा मार्ग दाखवी जीवनाचा । आनंद मिळण्यासाठी  ५ गुरूविना नाही ज्ञान I दूर करी तुमचे अज्ञान ज्ञान जRead More

October 23, 2016
Visits : 2240

खरा एकांत   निसर्गाचा अप्रतिम ठेवा,   नदीकाठच्या पर्वत शिखरीं  । बाह्य जगाचे वातावरण,   धुंदी आणिते मनास भारी  ।।   त्याच वनी एकटे असतां,   परि न लाभे एकांत तुम्हांला  । चित्तामध्यें वादळ उठतां,   महत्त्व नव्हते बाह्यांगाला  ।।   खडखडाट सारा होता,    दैनंदिनीच्या नित्य जीवनी  । समाधानी जर तुम्हीं असतां,   शांतता दिसते त्याच मनीं  ।।   एकांततेची खरी कल्पना,   मनावरती अवलंबूनी  । अंतर्मन शांत असतां,    बाह्य एकांत बघेना कुणी  ।।   डॉ. भगवान नागापूरकर सRead More

October 23, 2016
Visits : 1445

जीव ( प्राण-आत्मा )   वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेलRead More

October 16, 2016
Visits : 1922

थांबव, विज्ञाना तुझे शोध   थांब विज्ञाना, नको लावूस शोध नष्ट करुनी भावना, नको गमवू आनंद   / धृ /   उंच मारुनी भरारी पोहंचला चंद्रावरी दाही दिशा संचारी नष्ट केलास तू , चांदण्यातील आनंद     १ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   फुलांतील सुवास फळांतील मधुर रस पक्षांचा रम्य सहवास नष्ट केलास तू,  निसर्गातील सुगंध     २ थांब विज्ञाना, नको लावूस शोध   नदीतील संथता ओढ्यातील चपळता धबधब्यातील प्रचंडता रोखलास प्रवाह तू, घालूनी बांध      ३ थांब विज्ञानाRead More

October 16, 2016
Visits : 1369

सर्व वेळ प्रभूसाठी   लक्ष आपले जात असते, सदैव प्रभूकडे, मार्ग सारे ठरलेले, जे मिळती तिकडे ।।१।।   ‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो, प्रथम मुखातून, जन्मताच तो प्रश्न विचारी,   “मी आहे कोण?” ।।२।।   मार्ग हा तर सुख दु:खाने,   भरला आहे सारा, राग लोभ मोह अंहकार,    याचा येथे पसारा ।।३।।   वाटचाल करिता यातून,   कठीण होवून जाते, जीवन सारे अपूरे पडून,   अपूर्ण ज्ञान मिळते ।।४।।   आयुष्य तुमचे थोडे असूनी,   काळ वेळीच जाणावा, मिळेल जो क्षण तुमRead More

October 16, 2016
Visits : 1150

जीवनाची उपयोगिता   अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची  । मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जीवनाची....१, वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरीर कुणाला  । मना मारूनी बसावे लागे,  एक जागी सर्वाला....२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन  । दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून...३, बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले  । दुजास मिळतां आनंद येई,  खरे तत्त्व आज जाणले....४, जेंव्हां असते स्वत: करीता,  स्वार्थी भाव लपला असे  । दुजासाठी करीता सारेRead More

October 16, 2016
Visits : 2049

रेणूके जगदंबे आई   रेणुके जगदंबे आई    दर्शन दे मजला तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।।   तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक न होई चित्त एक तूंच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।। रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला   जमदग्नीची कांता    परशूरामाची तूं माता मनीं तुजला भजतां आशिर्वाद तूं देई     आनंदानें सर्वांला  ।।२।। रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला   गेले माझे जीवन    तुझे नाम घेऊन कंठ आले दाटून चुका आमच्या होई     क्षमा कर अज्Read More

October 16, 2016
Visits : 2008

पक्षी भाषा   बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी...१, तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे....२, शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला...३, बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे...४, मानवप्राणी तूं एक असूनी बुद्धीमान आहे मधूर बोलूनी इतरावरती छाप पाडीत जाये...५ शिकून घेशील हलके हलके माझी ती भाषा पक्षावरती वर्चस्वRead More

October 16, 2016
Visits : 2309

दुःख   दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे     आपण कर्म केलेले आपणचि भोगतो फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो     आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना     इतरांसाठीं आहे ती भावना  उदरीं सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी     शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 16, 2016
Visits : 2227

दिलासा   ज्योतिष्याची चढूनी पायरी,    जन्म कुंडली दाखवी त्याला  । अडले घोडे नशिबाचे,    कोणते अनिष्ट ग्रह राशीला  ।।   नशिबाची चौकट जाणूनी,     आशा त्याची द्विगुणित झाली  । मनांत येतां खात्रीं यशाची,    जीव तोडूनी प्रयत्ने केली  ।।   प्रयत्नांती असतो ईश्वर,     म्हणूनी मिळाले यश त्याला  । आत्मविश्वास जागृत करण्या,   'भविष्य' शब्द  कामी आला  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 16, 2016
Visits : 2374

मला समजलेले कर्मफळ   प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो.  व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते अघात करतात. ह्यातून दोन गोष्टी निश्चीत स्वरुपाच्या कळतात. कर्म ही सतत घडणारी क्रिया व त्याप्रमाणेRead More

October 09, 2016
Visits : 486

तू लपलास गुणांत कुठे शोधू तुला,   ध्यास लागला मनी वाटे मजला,    तू बसलास लपुनी   इंद्र धनुष्याचे रंग,    आकर्षक वाटती बघण्यात दंग,    लक्ष वेधुनी घेती   ओढ्याची झुळझुळ,    पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ,    मना वेडे करी   फुलातील गंध,    तल्लीन करी मना होऊनी मी धुंद,    विसरे सर्वाना   फळातील रस,    देई मधुर स्वाद उल्हासी मनाला,    देऊनी आनंद   वाऱ्याची झुळूक,    रोमांचकारी देई देहा सुख,    अल्हाद्कारी   रंग, गंध, रस, स्पर्शात,    तुझ्या अस्तित्वाची जाणRead More

October 09, 2016
Visits : 568

गर्भातील आत्मा   मातेच्या उदरांत असतां, जाण असते त्या जीवाला, प्रभूचाच मी अंश आहे, सांगत असतो तो सर्वाला ।।१।।   सो s हं चा निनाद सतत,   कानास आमच्या ऐकूं येतो, 'तो' मीच आहे शब्दाने, आत्म्याचेच अस्तित्व सांगतो ।।२।।   मातेच्या उदरांतूनी बाहेरी, पडतां स्वतंत्र जन्म मिळे, नाश पावूनी साऱ्या स्मृति,   स्वत:सहित विसरे सगळे ।।३।।   आतां त्याचा निनाद ‘को..हं’,   प्रश्न युक्त तो भरला असे, “मी कोण आहे ?” विचारी सर्वां,    उलघडा त्यास होत नसे ।।४।।Read More

October 09, 2016
Visits : 469

नाशाची वृत्ती   जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता,  खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी,  देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी,  तोड मोड करिते लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते लय पावणे प्रतिक शिवाचे,  ईश्वरी असतो गुण ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव,  हे घ्या तुम्ही जाणून.   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 09, 2016
Visits : 705

आमचे ध्येय व दिशा   कोठे चाललो आम्ही,  जसे वाहती वारे, दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे   ।।१।। धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा, कोठे चाललास? विचारतां  हासत राहतो बावळा   ।।२।। नाही कुणा ध्येय  निश्चित असे एक, परिस्थितीच्या ओघांत, वाहत चालती अनेक ।।३।। जीवन कशासाठीं कळले नाही कुणां जन्मलो म्हणून जगावे  हेच वाटते सर्वांना ।।४।। तशातच तरले कांहीं  उध्दरुन ही गेले मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे   ।।६।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्कRead More

October 09, 2016
Visits : 751

चंद्र डाग   हे शशिधरा तूं प्रेमळ सखा    साऱ्या विश्वाचा सौंदर्याचे प्रतिक असूनी    राजा तूं नभाचा   लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी    काजळ लावी तुला काही वेडे त्यास समजती    तू डागाळला   डाग कसला तुम्ही मानतां    प्रेमामध्ये तो दोन मनांतील पवित्र नाते   हे आम्हीं विसरतो   समजूं शकतो नीती बंधन    समाज रचनेचे बळजबरीच्या कृत्यास तुम्ही    म्हणावे पापाचे   गुरू पत्नीशीं प्रेम करिता    लौकिक गेला तो दोघांची साथ ती मिळतां   गुन्हा कसा होतो ?   एक दिशेने प्रेम साधताRead More

October 09, 2016
Visits : 502

उपकार   उपकार करुन त्याने   मन माझे जिंकिले परि वेळ गेला निघूनी   आभार ना मानले   केली नाही परतफेड   उपकाराची मी कामाचे होते वेड   सतत मग्न कामी   कामाच्या मार्गांत   चालता पाऊल वाट प्रयत्न करुन कार्यांत   यश साधले अर्धवट    खंत वाटली मनां   आठवोनी उपकार पश्चाताप सांगु कुणा   उशीर झाला फार      डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 09, 2016
Visits : 455

पापाचा  हिशोब   वेगाने तो जात असता,  घटना एक घडली  ।  तुडवले गेले जीव जंतू ,  त्याच्या पाययदळी  ।। ज्ञात नव्हते कांहीं त्याला,  त्याच्या कृत्याचे  । स्वकर्मा मध्ये गुंतले होते,  एक चित्त त्याचे  ।। नजर गेली अवचित त्याची,  एका सरड्यावरती  । दगड मारूनी बळी घेतला,  असूनी अंतरावरी  ।। पापाचा बने भागीदार,  मारूनी सरड्याला  । अकारण  कृत्य जे केले,  पात्र ठरे शिक्षेला  ।। अगणित जिवाणू जेंव्हां मेले, कृत्य नव्हते त्याचे  । जाणतेपणातील कर्म आणिते,  हिशोब पाप पुण्ण्याचRead More

October 09, 2016
Visits : 808

वर्तमान काळांत जगा.   काळाला तीन भागांत विभागले जाते. भविष्य, भूत आणि वर्तमान काळ. भविष्य काळ अर्थात येणारा भावी काळ आणि भूत काळ गेलेला अर्थात मागचा काळ. दोन्ही काळाच्या मध्यभागी येणाऱ्या व जाणाऱ्या सिमा रेषेवर ज्याचे अस्तित्व मानले गेले तो वर्तमानकाळ. त्यामुळे वर्तमानकाळाचे मोजमाप किती वेळेचा तो काळ ह्याचे परीमाण ठरवीणेकेवळ शक्य नाही. येणारा काळ जो ज्या क्षणाला जातो तेव्हांच भविष्यकाळाचा भूत काळ बनतो. आणि तो परिवर्तनाचा क्षण कदाचित् त्याला वर्तमान काळ नांव देता येईल. परंतु खऱ्या अर्थाने त्याचेRead More

October 02, 2016
Visits : 784

चिमण्यांनो शिकवा.   चिव् चिव् करित बोलतां   तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना     देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून     येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे      असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी    तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता     धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या       शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी      प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली       कौतूक करणारी शब्द मोजके असून देखील       भाव दाखविणारी चिमण्यानो तुम्ही शिकवा सारेRead More

October 02, 2016
Visits : 852

देह समजा सोय   जेव्हां मी म्हणतो माझे,  सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात ।।१।।   देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे ।।२।।   भजन करा प्रभूचे, सुख देवूनी देहाला परि केवल सुखासाठीं,   विसरूं नका हो त्याला  ।।३।।   देह चांगला म्हणजे, ऐष आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, त्यांने प्रभू मिळवावे ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 02, 2016
Visits : 1424

जीवन घटते सतत   क्षणा क्षणाला घटते जीवन ।   जाण त्याची येईल कोठून  ।। मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो । तेच सारे लक्षांत ठेवतो  ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता । मना विचारा काय राहता  ।। ढोबळतेचा विचार येता । सूक्ष्मपणाला विसरूनी जातो  ।। मृत्यू येई हर घडीला । जाण नसते त्याची कुणाला  ।। गेला क्षण  परत न येई । आयुष्य तेवढेच व्यर्थ होई  ।। समाधान जे मिळे तुम्हाला । देता किंमत प्रत्येक क्षणाला  ।। घटनांची क्रिया चाले सतत ।   झिजवावा देह ईश सेवेत  ।।   डॉ. भगRead More

October 02, 2016
Visits : 1886

एक शोषन   शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 02, 2016
Visits : 713

रसिक श्रेष्ठ   कवि होणें सुलभ असावे    रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला    हीच मंडळी खरी   भावनेचे उठतां वादळ    व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो    काव्य ते बनूनी   भाव येणे सहज गुण तो     मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे    खेळ हा कवीचा   शब्द पिंजरा नि भाव पक्षी    ओळखी को रसिक कवि मनाशीं 'स्व' भावांचे   करी जुळवणूक   कविते वरली टीका टिपणी    मूल्यमापन त्याचे खरी चेतना रसिक असूनी    भाव जागवी मनाचे   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क -Read More

October 02, 2016
Visits : 2019

मातीचा पुतळा   मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 02, 2016
Visits : 2277

चक्र   मरूनी पडला एक प्राणी,   जंगलामधल्या नदी किनारी  । कोल्ही कुत्री आणि गिधाडे,   ताव मारती त्या देहावरती  ।। एके काळी हेच जनावर । जगले इतर जीवांवरती  ।। आज गमवूनी प्राण आपला ।    तोच दुजाची भाकरी बनती  ।। निसर्गाचे चक्र कसे हे । चालत असते सदैव वेगे  ।। एक मारूनी जगवी दुजाला ।   हीच तयाची विशेष अंगे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 02, 2016
Visits : 1185

नदीच्या पाण्यातील ओंडके.   अमेरीकेला कांही महीने राहण्याचा योग आला होता. मुलाकडे गेलो होतो. छोटेसे, सुंदर आणि अद्यावत शहर. नदीच्या तीरावर वसलेले सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य. फक्त एकच खंत जाणवत होती. ती म्हणजे मन मोकळे करुन गप्पा मारण्यासाठी कुणी मित्र नव्हते. येथील लोक त्यांच्या आपसांत देखील गप्पा मारताना दिसत नव्हते. बागेत एकटे वा एखादा लहानसा कुत्रा बाळगणे. कुणाशी ही न बोलणे. नजरा नजर झालीच तर हाय म्हणणे. एकदम एकलकोंडे. स्वतःमध्येच राहून मनाला बंदीस्त कप्यात ठेवण्याची, कुणीही कांही न बोलण्याची विRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 55316 hits