Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 26, 2012
Visits : 4374

अनुभवात ईश्वरी दर्शन !  प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला  वा दिसला,  ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना  देखील सत्यता पटलेली नाही.  परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची, शक्तीची, कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे. आणि तो केवळ अनुभव जरी मिळाला तरी त्यात संपूर्ण समाधान व सार्थक असेल. ही भावना हेच ईश्वरी अनुभूतीचे दर्शन ठरविणारे असेल. ईश्वर निराकार अस्तित्त्वामध्ये समाजाला जातो. त्याच्या सगुण अंगाच्या  दRead More

August 22, 2012
Visits : 2356

विश्वामित्राची देणगी   छम छम बाजे पैंजण माझे मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची  ।। धृ ।।   स्वर्गामघुनी आले भूवरी धडधड होती तेव्हां उरी तपोभंग तो करण्यासाठीं आज्ञा होती इंद्राची ।। १।। मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची    तपोबलाच्या सामर्थ्यानी प्रतिसृष्टी बनविली ज्यांनी सत्वहरण ते अशा ऋषीचे परीक्षा ठरली दिव्यत्वाची  ।। २ ।। मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची    भाग्य माझे थोर कसे विश्वामित्राना जिंकले असेRead More

August 17, 2012
Visits : 15999

सौंदर्यातील एक दर्शन   वयाची पंचाहत्तरी सुरु झाली होती. डोळ्याला चश्मा, कानांत Hearing Aid, तोल सांभाळण्यासाठी हाती काठी घेऊन बँकेत गेलो होतो. दोन महीन्यापासून पेन्शन येणे बंद झाले होते, त्याची चौकशी करावयाची होती. मी सांगितलेल्या टेबलाजवळ जाताच समोर एक तरुण पंचविशीतील मुलगी सेक्क्षनवर होती. माझे तिने हसून स्वागत केले व खुर्चीवर बसण्यास विनविले. काय झाले कुणास ठाऊक. मी त्या मुलीकडे बघतच राहीतो. ती जे सांगत होती त्याकडे माझे लक्ष नव्हते. मी चमत्कारीकपणे तिच्याकडे बघतच राहीलो. मला ती त्यावेळी सौंदRead More

August 14, 2012
Visits : 993

सु्र्य-चंद्राचा लपंडाव   बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें   । पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने   ।।   युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे   । भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे   ।।   मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई   । लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई   ।।   संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी   । परि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी   ।।   लहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता   । नभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीताRead More

August 10, 2012
Visits : 2270

उतारवयांत जगतांना!   वृद्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते.  कदाचित् वाढत्या वयानुसार एका स्थरानंतर निर्माण होणारा शारिरीक विकलांगपणा, विसराळूपणा, हे कारणीभुत असावे.    त्यानी आपल्या पूर्व जीवनांत पहाडा एवढे कर्तव्य केलेलेRead More

August 05, 2012
Visits : 1760

श्रीकृष्ण जन्मकथा   श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो   ऐका विनवितो श्री विष्णु अवतार घेतो    ह्या सृष्टीवर   १ दुष्टांचा होई अनाचार    पृथ्वीते होई पापभार त्यांचा करण्या संहार    परमेश्र्वर अवतरती   २ कंस राजा दुष्ट    स्वतःस समजे श्रेष्ठ प्रजेला देई कष्ट    स्वार्थापोटी   ३ छळ करु लागला जनांचा    लुटमार अत्याचार छंद त्याचा खूनही करी साधूसंतांचा    दुष्टपणे   ४ कंसाची देवकी बहीण    चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन सात्विक होते तिचे मन    परमेश्र्वराठायीं   ५ देवकीचे लग्न ठरले    वसुRead More

August 04, 2012
Visits : 2989

डॉ. भगवान नागापूरकर याना मातृशोक   जीवनाच्या रगाडयातून ह्या मराठी ब्लॉगचे लेखक - डॉ. भगवान नागापूरकर यांच्या मातोश्री ति. लक्ष्मीबाई केशवराव नागापूरकर यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यु समयीं त्या औरंगाबादीं होत्या. सर्व मुले मुली नातवंड पतवंड सख्येनातेसंबंधी, मित्रपरीवार ह्यांच्या प्रचंड उपस्थितीने त्याना शेवटचा निरोप दिला. अतिशय शांत आणि धीरोदात्त वातावरणात त्यानी शेवटचा श्वास घेतला. त्याना शेवटपर्यंत कोणतीही व्याधी जडलेली नव्हती. जीवनाचे शतक अर्थात १०० वर्षे पूर्ण करीतच त्यानी सर्वांचा निरोपRead More

August 02, 2012
Visits : 2713

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या   मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत.  ' मनोरुग्ण ' हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ?  तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ?  गाणी म्हणतात कां ? नाचतात कां, ते नाचत असताना करमणूक होत असेल ना ?  त्यांची असंबद्ध भाषा ऐकून तुम्हाRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 33454 hits