Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
August 27, 2017
Visits : 1393

बालपणीची भांडणें   मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें 'मला पाहीजे जास्त',  हेच मुख्य मागणें   इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार   क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें   राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी   बालपणीच्या प्रेमामध्यें,  थोडे भांडणें परवडते चव येण्या पदार्थाला,  तिखटमिठ लागते   लहान असतां भांडून घ्या,  तेRead More

August 27, 2017
Visits : 1202

बहिणीची हाक   राखण करीतो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा, विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते ।।१।।   आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून, हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।   प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे, मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।   अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होऊन जाते बघ मी, दिसत  नाही कुणा हे बंधन,  जीव श्वासाचे अतूट स्पंदन ।।४।।   भांडत रूसत हासत होतो,  जगण्यामधला भाग असे तो, खेचRead More

August 27, 2017
Visits : 1938

वेडी   रस्त्यावरती उभी राहूनी,  हातवारे ती करित होती मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती...१, गर्दी जमली खूप बघ्यांची,  कुत्सीतपणे न्याहळू लागली, 'शिपाई आणा जावूनी कुणी',  ठाण्यात नेण्यास सांगू लागली...२ जीवनातील दु:खी चटका,  सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील तो ताबा सुटूनी,  वेडेपणा हा दिसून येतो...३ इतकी गर्दी जमून कुणीही,  तिच्या मनीचा ठाव न जाणला रूख रुख वाटली ती बघोनी,  सहानूभुती शून्य समाजाला...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gRead More

August 27, 2017
Visits : 1392

आनंद घट   देहमनाचा आनंद औरची,  नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे,  उरे न तेथे कसली तुलना  ।।  आनंदाचा घट भरूनी हा,  तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग,  अनेक घट अन् अनेक पाठी  ।। एक घटातूनी आनंद मिळता,  दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा,  लूटाल कसा तृप्त होवूनी  ।। दुजामध्ये समरस होवूनी,  लुटूनी घ्या तुम्ही आनंद सारा  । ‘मी’ ‘तू’ ह्यांच्या पलीकडला तो,  आनंद घटाचा भव्य पसारा  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gRead More

August 27, 2017
Visits : 1184

प्रतिक्रिया   क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी  । तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी  ।। फेकतां जोराने,  आदळे भिंतीवरी  । प्रवास परतीचा,  होई तुमचे उरीं  ।। शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी  । येऊनी धडकतील,  तुमचेच पाठीं  ।। प्रेमाने बोलणे,  सुंगध आणिते  । आनंदी लहरी,  मनां सुखावते  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 27, 2017
Visits : 219

देव ही संकल्पना   अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना त्याने आखलेली आहेत. सुक्ष्मापासून प्रचंड देहधारी व ज्ञानाच्या प्रातांत अत्यल्प ज्ञानापासून प्रचंड ज्ञान प्राप्त रचना निसर्गाने आखलेली आहेत. प्रत्येक सजीव हा आपापल्यापरी एक सर्वक्षम, परिपूर्ण असतो. स्वत:च्या जीवनाची चाकोरी व चक्र अतिशय काटेकोरपणे पूर्ण करण्याची  क्षमता प्राप्त अशी ही रचना आहे. जर अत्यंत बारकाईने त्याच्या ह्या जीवRead More

August 27, 2017
Visits : 131

स्फूर्ती दाता   तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही गात नाचत फुलत राहतो चैतन्याने कुणी स्फूर्ती देवता हवी तयाला येण्या उचंबळूनी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 27, 2017
Visits : 132

पुण्य संचय करा   ज्या ज्या वेळी येई संकट,   धांव घेत असे प्रभूकडे  । संकट निवारण करण्यासाठीं,  घालीत होता सांकडे  ।। चिंतन पूजन करूनी,  करीत होता प्रभू सेवा  । लाभत होती त्याची दया,  त्याला थोडी केव्हां केव्हां  ।। संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा  । कामी येईल पुण्य ,  विचार करीतां भविष्याचा  ।। संचित पुण्य आजवरचे,  कार्य सिद्धीला लागते  । सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 27, 2017
Visits : 215

देव ही संकल्पना   अनेक योनी ही निसर्गाची निर्मिती आहे. सजीव प्राण्यांमध्ये झाडे, वनस्पती, क्रिमी, किटक, पक्षी, जनावरे इत्यादी अनेक प्रकारचे सजीव आहेत. यांची चक्रमय योजना त्याने आखलेली आहेत. सुक्ष्मापासून प्रचंड देहधारी व ज्ञानाच्या प्रातांत अत्यल्प ज्ञानापासून प्रचंड ज्ञान प्राप्त रचना निसर्गाने आखलेली आहेत. प्रत्येक सजीव हा आपापल्यापरी एक सर्वक्षम, परिपूर्ण असतो. स्वत:च्या जीवनाची चाकोरी व चक्र अतिशय काटेकोरपणे पूर्ण करण्याची  क्षमता प्राप्त अशी ही रचना आहे. जर अत्यंत बारकाईने त्याच्या ह्या जीवRead More

August 22, 2017
Visits : 1153

बीज - वृक्षाचे चक्र कुणाचे ?   सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  फळांत असते बीज फिरवी कोण चक्र सहज ?   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 22, 2017
Visits : 1976

गतकाळ विसर   विसरून जा भूतकाळ तो,   नजर ठेवूनी भविष्यावरी, वर्तमानी राहून प्रवाही,   जीवन सारे यशस्वी करी ।।१।।   व्यर्थ होतील प्रयत्न तुझे,   उगाळता गत आठवणी, खीळ पडेल उत्साहाते,   अपयश आले हे जाणूनी ।।२।।   ज्ञान जगाचे मिळूनी तुला,   जन्म जहाला आजच खरा, अनुभवी नव बालक तूं,   वाहून नेई जीवन धुरा ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 22, 2017
Visits : 736

खरे ग्रह   तुमचे जीवन अवलंबूनी,   ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या,   जसे ग्रहमंडळ फिरती...१, मित्र मंडळी सगे सोयरे,  शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी,   परिणाम ते होई सर्वांचे...२, हेच सर्व ते ग्रह असूनी,  सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची,   वागण्यात तो फरक करती...३ अपयशाला कारणीभूत तो,  असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ,  ग्रहमान बनतो त्या घडीचा...४, यशाची चालता घौडदौड ती,  मदत लाभते काही जणांची हे तर सारे इष्ट ग्रह तेRead More

August 22, 2017
Visits : 1605

भावना उद्‍वेग   आकाशाला शब्द भिडले,  हृदयामधले भाव मनीचे चेतविता,  स्फोटक जे बनले देह जपतो हृदयाला,  सदा सर्व काळी धडकन त्या हृदयाची,  असे आगळी जमे भावना हलके तेथे,  एकवटूनी सुरंग लागता तीच येई,  उफाळूनी कंठ दाटता जीव गुदमरे आत रंग बदलती चेहऱ्यावरले, काही क्षणात उद्‌वेग बघूनी शरिर,  कंपीत होते हृदयातील भाव जावूनी,  मन हलके होते   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 22, 2017
Visits : 1726

चिमणीची निद्रा मोड   चिंगी 'पहाट झाली, चिव चिवते चिमणी उमज येईना, उठविले तिजला कोणी.....१, आई आहे कां ? जी उठवी शाळेसाठी, गुदगुदल्या करूनी कुरवाळिते हळूंच पाठी....२, घड्याळ उठवी घण घण करूनी नाद घरट्यामधुनी, नाही ऐकला असा निनाद.'..३,   चिमणी – ' उषाराणी  येते, साऱ्यांची आई बनूनी प्रेमानें मोडी झोंप, नाजूक करकमलांनी.....४, घड्याळ आमचे, दवबिंदू पडतां पानावरूनी चाळविती निद्रा, टपटप आवाज करूनी' .....५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९Read More

August 22, 2017
Visits : 1286

उदबत्ती एक आत्मसमर्पण   उदबत्तीचा सुगंध    दरवळे चोहोकडे कोठे लपलीस तूं      प्रश्न मजला पडे मंद मंद जळते     शांत तुझे जीवन धुंद मना करिते    दूर कोपरीं राहून जळून जातेस तूं    राख होऊनी सारी तुझे आत्मसमरपण    सर्वत्र सुगंध पसरी तुझेपण वाटते क्षुल्लक    दाम अति कमी आनंदी होती अनेक     जेव्हां येई तूं कामीं लाडकी तूं भक्तांना    तुजवीण पूजा नाहीं प्रफूल्ल करुन चेतना    प्रभू भाव मना येई   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 22, 2017
Visits : 1145

आला  !   आला रे पाऊस !   आला  !   आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस    //धृ//   गेली होती तापूनी      रखरखली सारी, अंग जाता वाळूनी     भेगा पडती शरीरी  ।। थकली ती सोसूनी     उकाड्याचे चार मास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    ।।१।।   पाणी गेले आटूनी     नदी नाले कोरडे, पहाटेच्या दवातूनी   झाडे जगती थोडे  ।। गेली हरळी जळूनी   बीजे टाकूनी आसपास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस   ।।२।।   आता येईल वनीं     चैतन्य लपलेले, तRead More

August 22, 2017
Visits : 961

हसत खेळत म्हातारपण जीवनातील अंतिम परंतु महान सत्य म्हणजेच “मृत्यू”.  जो ह्या विश्वात आला तो एक दिवस जाणारच ह्यात तिळमात्र शंका नाही. ज्ञान असो वा विज्ञान आजपर्यंत तरी कुणीही मृत्यूच्या सत्यतेविषयी आक्षेप घेतला नाही. अथवा हे सिद्ध करु शकला नाही की जो आला आहे तो येथेच स्थिर आहे. वा मृत्यूच्या आहारी तो गेला नाही. हा एक मात्र खरं आहे की येण्या व जाण्यामधला काळ हा सर्वसाधारण सर्वांसाठी वेगळा वेगळा व अनिश्चित असल्याचे मात्र दिसून येते.  ह्याच काळाला ‘जीवन रेखा’ हे नाव दिले गेले आहे.Read More

August 15, 2017
Visits : 1774

जुळे   दोघे मिळून आलां               हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात   दोघांची मिळूनी शक्ति         दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति           यशाची खात्री दिसे   एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे                 प्रकाशमान बनती   ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत   एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची मिळे एकत्र मिळूनी काम करा        तRead More

August 15, 2017
Visits : 1777

मिठापरी जीवन   खारेपणा हा अंगी असतां,   कोण खाईल केवळ मीठ, परि पदार्थाला चव येई,   मिसळत असता तेच नीट ।।१।।   जीवन सारे खडतर ते,   भासते मिठासम मजला, केवळ जीवन बघता तुम्हीं,  पेलणें अवघड सर्वाला ।।२।।   तेच जीवन सुसह्य होई, ‘आनंदात’ जेंव्हां मिसळते, हर घडीच्या प्रसंगामध्ये,   समाधानाचे अंकूर फुटते ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 15, 2017
Visits : 1348

जगणें अटळ असतां   वाट कुणाची बघतो आम्हीं,   ठावूक असते ते सर्वांना मृत्यू हा तर अटळ असूनी,  केव्हांही येई अवचित क्षणा....१,   आगमनाचा काळ तयाचा,   कल्पनेनें ठरविला जातो अचूक जरी ते शक्य नसले,   विचार त्यावरी करिता येतो...२,   जीवन म्हणती त्या काळाला,   जगणे आले मृत्यू येई तो जगण्यापुढे पर्याय नसतां,   सुसह्य करण्या प्रयत्न होतो...३,   तन मनाला सुख देवूनी,   जीवन काल वाढविती कांहीं सद्उपयोग तो केला जावा,   हीच इच्छा सदैव राही...४   डॉ. भगवान नागापूरकरRead More

August 15, 2017
Visits : 1383

दया प्रेम भाव   दया प्रेम हे भाव मनी,  जागृत कर तू भगवंता । तुला जाणण्या कामी येईल,  हृदयामधली आद्रता ।। शुश्क मन हे कुणा न जाणे,  धगधगणारे राही सदा । शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा ।। पाझर फुटण्या प्रेमाचा ,  भाव लागती एक वटूनी । उचंबळणारे ह्रदय तेथे,   चटकन येईल मग दाटूनी ।। दया प्रेम या भावांमध्ये,  दडला आहे ईश्वर तो । मनांत येता हेच भाव ,  दर्शन त्याचे घडवूनी जातो ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 15, 2017
Visits : 1349

स्थिर वा अस्थिर   स्थिर आहे जग म्हणूनी,  अस्थिर आम्ही जगू शकतो अस्थिर आहे जग म्हणून,  स्थिर आम्ही जगू शकतो....१,   पोटासाठी वणवण फिरे,  शोधीत कण कण अन्नाचे थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे....२,   धरणी फिरते रवि भोवतीं,  ऋतूचक्र हे बदलीत जाते जगण्यामधला प्राण बनूनी,  चैतन्य सारे फुलवून आणते....३,   पूरक बनती गुणधर्म परि,  स्थिर असतो वा अस्थिर ते विश्वचक्र फिरवित राहणे,  निसर्गाचे तत्वची असते......४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.coRead More

August 15, 2017
Visits : 1181

बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका   शंभर वर्षे जगा तूम्हीं,  काका आमच्यासाठीं बाबांच्या रुपांत रहा,  तुम्ही सर्वांच्या पाठीं   भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे   उशीर झाला होता,  जेंव्हा जीवन उमगले कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले   आंबा गेला मोहरुनी,  लाविली होती त्यांनी झाडे दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही ते फळाकडे   मध्येच सोडूनी गेले, नाटक चालू असतां रंगवूनी बाबांची भूमिका पूर्ण करांRead More

August 15, 2017
Visits : 1104

कठीण खेळ   चंचल केलंस मन,    स्थिर करण्यासांगे  । दिलेल्या गुणाची मग,   बदलेल कशी अंगे ? निसर्ग नियमाच्या,   कोण विरूद्ध जाईल  । फायद्याचे ते का त्याचे परि होईल ? चपळता जसा गुण,  स्थिरपणा असे दुजा  । आगळ्यातील आनंद,  हिच त्यातील मजा  ।। देहा ठेवून चंचल,  सांगे स्थिरावण्या मन  । हा उलटा खेळ कसा,  खेळण्या भासे कठीण  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 15, 2017
Visits : 1346

आत्याआजी                            ९४ वर्षे आयुष्य लाभलेली आत्याआजी नुकतीच वारली. चांगली प्रकृती, सुदृढ बांधा, अत्यंत कष्ट करणारी ती होती. ती उठते केंव्हा, झोपते केंव्हा, हे मला केव्हांच दिसले नव्हते. फक्त ती सतत कोणते ना कोणते घरकाम करण्यांत व्यस्त असायची. तीच्या कष्टामध्ये तीला व्यस्त राहण्याची कला साध्य झाली होती. मृत्यु आपल्या हाती नाही, म्हणून जगणे व जगावयाचे म्हणजे कष्ट करणे हे तीचे समिकरण होते. तसे तीचे आपले स्वतःचे कुणीही नव्हते. न मुलबाळ. नवरा तर ३०-३१ वर्षापुर्वीच वारला. काळ जबरदस्त धRead More

August 07, 2017
Visits : 1032

बाळाची भिती   खेळत होता बाळ अंगणीं    इकडूनी तिकडे मेघनृत्य ते बघत असतां    दृष्टी लागे नभाकडे उलटी सुलटी कशी पाऊले    घनांची पडत होती लय लागून हास्य चमकले     त्याच्या मुखावरती तोच अचानक गडगडाट झाला    एक नभांत दचकून गेले बाळ तत्क्षणी     होऊन भयभीत धावत जावून घरामध्यें    आईला बिलगले वाचविण्या त्या भीतीपासून     पदराखालीं दडले जरी थांबला गडगडाट    भीती कायम होती आवाजाचे नाद अद्यपि    कानीं त्याच्या घुमती भीतीने नजिक चिकटला    आईच्या जवळीं धडकन ऐकूं आली त्यालाRead More

August 07, 2017
Visits : 1614

पुण्ण्याचा साठा   खिशांत माझ्या पडली होती,   सुटी नाणी काही, वस्तूंची ती खरेदी करण्या,  सर्व बाजार पाही ।।१।।   सराफ्याच्या दुकानी दिसला,   एक हिऱ्याचा हार, डोळे माझे चमकूनी गेले,  फिरती गरगर ।।२।।   दाम विक्रीचे जाणूनी घेता,   हताश मी झालो, हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो ।।३।।   दोन वेळची पूजा करूनी,   जप माळ जपती, खूप साचले पुण्य आपले,  हे कांहीं समजती ।।४।।   कसा मिळेल ईश्वर त्यांना,   तपोबलाच्या अभावी, जन्मोजन्मीचे पुण्य साRead More

August 07, 2017
Visits : 1350

भक्ष्य   नदिकाठच्या कपारीमध्ये,   बेडूक बसला दबा धरूनी उडणाऱ्या त्या माशी वरते,  लक्ष सारे केंद्रीत करूनी...१, नजीक येवूनी त्या माशीचे,  भक्ष त्याने करूनी टाकले परि दुर्दैव त्याचे बघा कसे,  सर्पानेही त्यास पकडले...२, बेडूक गिळूनी सर्प चालला,  हलके हलके वनामधूनी झेप मारूनी आकाशी नेले,   घारीने त्याला चोचित धरूनी...३, 'भक्ष्य बनने' दुजा करिता,   मृत्यूची ही चालते श्रृखंला जनक असता तोच सर्वांचा,  गमंत येई त्या खेळाला...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bRead More

August 07, 2017
Visits : 1515

पाषाणाच्या देवा   हादरून गेलो मनात पूरता,  ऐकून त्याची करूण कहानी केवळ एका दु:खी जीवाने,  हृदय दाटूनी आणीले पाणी असंख्य सारे जगांत येथे,  प्रत्येकाचे दु:ख निराळे सहन करिल का भार येवढा,  ऐकूनी घेता कुणी सगळे सर्व दुखांचा पडता डोंगर,  काळीज त्याचे जाईल फाटूनी कसाही असो निर्दयी कठोर,  आघात होता जाईल पिळवटूनी मर्म जाणीले आज परि मी, पाषाणरूप तुझे कां देवा सर्वजणाची दु:खे झेलण्या,  वज्र देह हा धारीला असवा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 07, 2017
Visits : 1762

जाळी   धागा धागा विणून,  केली तयार जाळी गोलाकार नि बहुकोनी घरे,  पडली निर निराळी....१, स्थिर सुबक घरे,  जसा स्थितप्रज्ञ वाटे सर्व दिशांचा तणाव,  न दिसे कुणा कोठे....२, तुटेल फूटेल तरी,  सैलपणा येणे नाही जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही....३, जगे तो अभिमानानें,  मान ठेवूनीया ताठ संसारामधील क्लेश,  झेलीत होती त्याची पाठ....४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 07, 2017
Visits : 924

भिकारीण   मधूर आवाज मिळूनी, उपकार झाले तिजवर सुंदर गाणे गाऊनी, आनंदीत करी इतर    // हातपाय दुबळे होते, दृष्टी नव्हती तिजला कष्ट करण्या शक्ति नव्हती, कसा मिळेल घास तिला    // परी ती होती आनंदी, गाण्याच्या ओघांत उचलित होती पैसे, पडता तिच्या पदरांत    // जरी झाला देह दुर्बल, जगण्याची होती आंस मनी मिळालेल्या आवाजाला, ऋणी समजे ती मनी   //   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 07, 2017
Visits : 935

गुणधर्म   करूं म्हटले करूं न शकलो   रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते    ठरले असते होईल ते ते बघूनी बाह्य जगला ठरवी   मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी   उमज न येई ती सगळी धडपड करीतो गडबड करीतो   त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले   उभारून ते येतील सगळे मात करूनी विचारावरती    सुप्त गुण हे विजयी होती गुणधर्म ही ईश्वरी योजना   घडते तेच म्हणूनी क्षणाक्षणा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

August 07, 2017
Visits : 1403

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ                                                                  (ईश्वर निर्मितीला जाणा) ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. पटवले गेले, सांगितले गेले. पुस्तके, ग्रंथ, वृत्तपत्रे, मासिके, रेडीओ, टीव्ही इत्यादी अनेक माध्यमे  वैचारिकRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 40191 hits