Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 30, 2013
Visits : 2369

कृष्ण कमळ- वलय   सतत फिरत राही, चक्र जीवनाचे   । विविधता पाही ,  रंग आयुष्याचे   ।।१।। सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी   ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार   ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय   ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.com                                        ६-०४१२८३   विवीध-अंगी     ***२८ एकदाRead More

May 30, 2013
Visits : 1683

बागेतील तारका- भावनेच्या आहारीं  ।   नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।।   प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी   प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी   बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं नकोस विसंबून    आत्मविश्वास गमवूनी नको जाऊस दारोदारी   ।।३।।Read More

May 30, 2013
Visits : 1411

जीवनाच्या रगाड्यातून-   'आनंद' हाच भगवंत   गेले सारे आयुष्य परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं   ।। बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता केली शरीरा करीता  ।। तरुणपणाची उमेद जिंकू वा मरुं ही जिद्द करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा बनवी जीवनमार्ग निष्ठा   ।। संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव  ।। काळ येता वृद्धत्वाचा दाखवी मार्ग अनुभवाचा भजन पूजेत जाई वेळ ज्ञान गोष्टीRead More

May 25, 2013
Visits : 2216

कृष्ण कमळ- ४१  मानवता धर्म   परमेश्वर अगाध ।  त्याच्या शक्तीचा नसे वाद ।। मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक  ।। नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।। प्रभु निराकार ।  निर्गुण असुनी होई साकार ।। आस्तिक प्रभु मानती ।  नास्तिक समजती शक्ति ।। ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।। ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।। वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती ।। धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक ।। हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां ।। झगडे मार्गासाठींRead More

May 25, 2013
Visits : 2090

बागेतील तारका-   ५८  मातीचा पुतळा   मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी   ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला   ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना    ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-   bknagapurkar@gmail.com     विवीध-अंगी     ***२७ दोन कान दोन डोळे असल्याने जास्त ऐकावे आणि बघावे जीभ मात्र एकच म्हणूRead More

May 25, 2013
Visits : 1124

जीवनाच्या रगाड्यातून-                                                                     ।।  भगवान श्री गौतम बुद्घ  ।।   माझे नमन बौद्धाला   सत्य अहिंसेच्या देवाला कोहिनुर हिरा चमकला   ह्या विश्वामध्यें   ।।१।। गौतमाचे जीवन   बौद्धाचे तत्वज्ञान दोन्ही असती महान   उद्धरुनी नेई जगातें   ।।२।। दाखवोनी जीवनाचे द्वार   सांगोनी आयुष्याचे सार भटकलेल्या व्यक्तींचा आधार   बौद्ध  होई   ।।३।। बौद्धाचे तत्वज्ञान   असे ते महान नेई उद्धरुन   सर्व जनांना   ।।४।। उद्धरुन जाती   जे बौदRead More

May 20, 2013
Visits : 2349

कृष्ण कमळ-   40  श्रद्धांजलि ।   सुळीं दिले येशूला   वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला   रागाच्या ओघांत   ।।१।। समर्पण केले देहाचे   परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे   हेच महत्व होय   ।।२।। सुळावरी तो जातांना   वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना    ते आहेत अज्ञानी   ।।३।। कळले नाहीं ज्ञान   अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान    उशीर केला त्यांत   ।।४।। उपयोग नाही आतां   वेळ गेली निघूनी जाण मनां येता    पक्षी गेला उडूनी   ।।५।। हरकत नाहीं कांहीं   उशRead More

May 20, 2013
Visits : 1326

बागेतील तारका - ← Older posts    *    57  आमचे खेळ या मित्रांनो सारे या,    सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते               खेळांना त्या    समजून घ्या – - –     1) या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी एकाच दमात    भिडू मारू या – - -       2) या मित्रांनो सारे या,  सर्व मिळूनी खेळू या  खो खो मध्ये चपRead More

May 20, 2013
Visits : 1109

जीवनाच्या रगाड्यातून-                      ।। श्री नृसिंह अवतारकथा  ।। ( भक्त प्रल्हाद )   प्रल्हादासी करितो नमन   बालक असुनी महान अणुरेणूंत असे भगवान   दाखवूनी देई जगाला   ।।१।। बघावी सृष्टी   ठेऊनी संत द्दष्टी त्यासी दिसेल जगत् जेठी   सर्व ठिकाणीं   ।।२।। प्रल्हादाचे तत्वज्ञान   प्रभुमय सारे जग् जीवन त्यासी घ्यावे ओळखून  श्रद्धा द्दष्टीनें   ।।३।। अपूर्व प्रभू भक्ति  उन्मत्त असूरी शक्ति संघर्षकथा होती   भक्त  प्रल्हादाची   ।।४।। बहूत महान वीर  प्रभुपुढे कोण टिकणारRead More

May 15, 2013
Visits : 1987

कृष्णकमळ-   ३९  नमन   नमन माझे श्री गणेशाला वंदितो मी कुलस्वामिनी श्री रेणुकेला भाव अर्पितो गुरु दत्तात्रयाला परमात्म्याची विविध रुपें   ।।१।।   परमेश्वराची लीला महान घ्यावी सर्वानी जाणून टाकून सारे ब्रह्मांड व्यापून चालवितसे खेळ जीवनाचा   ।।२।।   विश्वाचा तो अधिनायक जीवन धर्माचा तो पालक जीवन गाड्याचा तो चालक परब्रह्म परमात्मा   ।।३।।   नसे त्यासी मृत्यु- जन्म कार्य करी तो अवतार घेऊन कुणामध्यें अंशरुपे येऊन जीवनचक्र चालूं ठेवीRead More

May 15, 2013
Visits : 1019

बागेतील तारका- ५६   सासरीं जाणाऱ्या मुलीस   कोणते दुःख तुला छळते अकारण तूं कां व्यथित होते   ।।धृ।।   प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवित असतां आनंदी भाव आठव सारे ह्यांच क्षणी ते   ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते   बांधून घेतां राखी हातीं आश्वासन ते तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तो तुजसाठीं धावूनी मग कां तव मन संकोचते   ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते   संसार भरला सुख-दुःखानी घे शिरावर तRead More

May 10, 2013
Visits : 2095

कृष्ण कमळ-   38   शिळा झालोल्या अहिल्या   आजही बऱ्याच अहिल्या     पडल्या शिळा होऊनी कांहीं पडल्या वाटेवरी         कांही गेल्या उद्धरुनी   कित्येक होती अत्याचार     अबला स्त्रीयांवरी उध्वस्त करुनी जीवन        शिळा त्यांची करी   काय करील ती अबला    डाग पडता शिलावरी दगड होऊनी भावनेचा   फेकला जातो रस्त्यावरी   भेट होता तिची अवचित्    कुण्या एखाद्या रामाची शब्द मिळता सहाऱ्याचे      अंकुरे फुटती आशांची   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapRead More

May 10, 2013
Visits : 1974

बागेतील तारका- ५५  आईच्या प्रेमाचा निरोप   आई तुझे प्रेम    अनंत त्याचे दाम तुलनेसी ब्रह्मांडी    जड तुझीच पारडी पुंडलीक तुजसाठी   निसरला जगत् जेठी कळण्या तव प्रेमाचा अर्थ    शब्दांत नाही सामर्थ बलिदानाची तूं मुर्ती    'प्रेमाचे प्रतिक' हीच तुझी किर्ती कष्ट करुन वाढविले छोटे    विसरती तुला होऊन मोठे सोडून एकटे तुजसी    पंख फुटता उडे आकाशी उदात्त प्रेमभाव ह्रदयी    आशिर्वादीत निरोप दई तयासी   डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 e-mail-   bknagapurkar@gmail.comRead More

May 10, 2013
Visits : 3395

जीवनाच्या रगाड्यातून- स्त्री ईश्वराची एक अप्रतिम कलाकृती   **  मादी व नर ह्यांत फक्त मादीचीच खऱ्या अर्थाने योजना केलेली. तीला जीवन चक्रासाठी मातृत्व दिले.  नराची संकल्पना नंतरची. एक सहाय्यक, मदतनीस, रक्षक, ह्या भूमिकेंमध्ये **  मातृत्वाला अनुसरुन वात्सल्य, जीव्हाळा, प्रेम, माया, करुणा, त्याग वृत्ती, संसारीक कौटूंबीक ओढ दिली **  जगदंबा सर्व श्रेष्ठ देवता. तीची तीन रुपे. शक्ती, धन, ज्ञान. हे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती,  ह्यांच्या प्रतीकात्मक रुपाने दिसते.  जीवनाची त्रीकोणात्मक  रचRead More

May 05, 2013
Visits : 2020

कृष्ण कमळ- ३७   प्रभू दर्शन   महिमा कसा प्रभू तुझा आगळा पावन करसी तूं भक्ताला नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   ।।धृ।।   पुंडलीकाची महान भक्ति माता पित्याचे चरणी होती त्याची सेवा तुजसी खेचती कसा उकलू मी ह्या कोड्याला   ।।१।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला   पातिव्रत्य हे दैवत समजूनी पतिसेवेला घेई वाहवूनी सावित्रीने दिले दाखवूनी प्रभू वाकती सती शब्दाला   ।।२।। नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटूनRead More

May 05, 2013
Visits : 1684

बागेतील तारका- ५४  कोणती स्फुर्ति देवता ?   मजला नव्हते ज्ञान कशाचे पद्यामधल्या काव्य रसाचे कोठून येते सारी शक्ति काव्य रचना करुन जाती   अवचित्पणें विचार येतो भावनेशी सांगड घालितो शब्दांचे ते बंधन पडूनी पद्यरुप ते जातो देवूनी   सतत वाटे शंका मनीं हे माझें, परि येई कोठूनी असेल कुणी महान विभूति माझे कडूनी करवूनी घेती   तळमळ आतां एक लागली जाणून ध्यावी ती, शक्ति आगळी अर्पिन माझे प्राण तयाला स्फुर्ति देवता जो मजसी झाला   डॉ. भगवानRead More

May 05, 2013
Visits : 1914

जीवनाच्या रगाड्यातून- *  असुरक्षीत जीवन आज कुणाच काय भरवसा रडते जीवन ढसाढसा    // धृ //   प्रेम दिसेना जगांत कोठे ह्रदया मधले सरले साठे ओढ कुणाची कुणा न वाटे ओरड करुनी कंठ न दाटे सुकुनी गेला घसा रडते जीवन ढसाढसा  - – - १   बाप ना भाऊ इथे कुणाचा लोप पावला कढ रक्ताचा मायमाउली सहज विसरते काळ तिचा तो नऊ मासाचा फुटला नात्याचा आरसा रडते जीवन ढसाढसा – - – 2   सुरक्षतेचे कवच दिसेना शब्दावरी विश्वास बसेना दुर्मिळ झाली त्याग भावना कदर कुणाची कुणी करेनाRead More

May 01, 2013
Visits : 865

कृष्ण कमळ-   ३६   शोधूं कोठे त्यास ?   शोधत होतो रुप प्रभूचें,  एक चित्त लावूनी अंवती भंवती नजर फिरवी,  श्वास रोखूनी   ।।१।।   शांत झाले चंचल चित्त,  शांत झाला श्वास ह्रदयनाडी मंद होऊनी,  चाले सावकाश   ।।२।।   पचनशक्ती हालकी झाली,  जठराग्नीची शिथील झाली गात्रे सारी,  देह चैत्यन्याची   ।।३।।   देहक्रियांतील प्राण बिंदू तो,  असे ईश्वर समरस होतां त्याच शक्तीशीं,  होई तो स्थिर   ।।४।।   शोधामध्ये चिंतन करतां,  ध्यान परि लागते समाधी स्थितीत येतांRead More

May 01, 2013
Visits : 869

बागेतील तारका- ५३  राजमाता कैकयी   अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला   ।।धृ।।   जेव्हां दशरथ युद्धास जाई कैकयी त्याच्या सेवेत राही राजनीति अन् युद्धनीति ही अवगत झाली सारी तिजला   ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला   नजीकच्या त्या देशामधूनी रावणादी असुरी शक्ती वाढूनी सामान्य जनाला जर्जर करुनी हा हाः कार तो माजविला   ।।२।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला   परिस्थितीला जाणूनRead More

May 01, 2013
Visits : 1462

जीवनाच्या रगाड्यातून- *  युगपुरुषाचे दर्शन  १९५५ सालचा प्रसंग आठवतो. औरंगाबादला मी शासकीय महाविद्यालयात इंटरला ( आजच्या बारावीला ) शिकत होतो. त्यावेळी तेथे दोनच महाविद्यालये होती. दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सिद्धार्थ महाविद्यालय  ( ज्याचे नामकरण नंतर  मिलिंद महाविद्यालय  असे बाबासाहेबानीच केले होते.)     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी  बरेच ऐकले होते. ते एक महामानव, युगपुरुष, असल्याचे कळले. ( त्यावेळी त्यांना भारतरत्न म्हणून संबोधित केले नव्हते.) अशा ह्या थोर पुरुषाला बघवे, दुरून का होईना दर्शनRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 34961 hits