Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
September 25, 2016
Visits : 1215

निसर्ग व्याप्ती उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   किती घेशी झेप मानवा,       उंच उRead More

September 25, 2016
Visits : 1239

प्रभूची खंत   मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।   शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना, लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना  ।।२।।   तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी, माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी  ।।३।।   आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत,  सेवा शक्ति मला छळे,  तुला कांहीं न कळे,  ।।३।।   थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा, तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो  ।।४।।   उभा केलेस मजलाRead More

September 25, 2016
Visits : 2233

सुप्त शक्ती   खोलीमध्ये कोंडूनी मांजर,  हाती घेई काठी  । मारून टाकण्यासाठी तीला,  लागला तो पाठी  ।। अतिशय भीत्री असूनी ती,  जीवासाठी पळे  । हतबल होता पळून जाण्या,  मार्ग तो ना मिळे  ।। उपाय नसता हाती कांहीं,  चमत्कार घडे  । सर्व शक्तीनी त्याच्यावरती,  तुटून ती पडे  ।। उडी मारूनी नरडे धरले,  दोन्ही पंजानी  । मृत्यूचाच तिने गळा घोटला, शक्ती युक्तींनी  ।। प्रत्येकामध्ये सुप्त असते, शक्ती लपलेली  । अवचित वेळ पडता दिसे,  बाहेर आलेली  ।। मदत देतो निसर्ग तुम्हां, संधी बचRead More

September 25, 2016
Visits : 1365

उगवत्या सूर्याला नमस्कार   उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला   प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला   सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर,  असुनीया शिरजोर हांजी हांजी करती, बघता सत्तेला    ।।३।। उगवRead More

September 25, 2016
Visits : 2547

गतकर्माची विस्मृती   एके दिनीं निघून जाईन    निरोप घेवून ह्या जगताचा प्रवास माझा अनंतात    कसा असेल त्या वेळेचा   आकाशाच्या छाये खालती    विदेही स्थितींत  फिरत राहीन 'तू' आणि 'मी' च्या विरहीत मी   गत कर्माचे करिन मापन   बाल्यातील चुका उमगल्या     तरूणपणाच्या उंबरठ्यावरी सळसळणारे यौवन रक्त    वृधावस्तेतील खंत ठरी   पूनर्जन्म घेण्याकरितां    गर्भाची निवड करीन गत जन्मींच्या चुका टाळूनी    आदर्शमय  जीवन जगेन   शंकेची परि पाल चुकचुके    राहील का स्मृति गत जन्माचीRead More

September 25, 2016
Visits : 2629

वलय   सतत फिरत राही, चक्र जीवनाचे   विविधता पाही ,  रंग आयुष्याचे   सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी   लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार   जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय     डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 25, 2016
Visits : 2160

विनाश – ईश्वरी व मानवी   संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  । जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।। जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  । नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।। मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  । मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।। पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही संकटे  । मानव निर्मित युद्ध दंगली,  सूड भावना तेथे पेटे  ।। विनाश असता दोन्हीमध्ये, मान तुकवी निसर्गापुढे  । बिघडले घरRead More

September 25, 2016
Visits : 2890

मानव-जग-परमेश्वर   शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते. एक आकाश आणि पोकळी सर्वत्र जाणवते. बाहेर घरांत पेटीत डबीत आणि सुक्ष्म अशा अणूमध्येही. पोकळी तेथे हवा अर्थात आकाश. विशाल वा सुक्ष्म. ह्याच माध्यमातून जगRead More

September 18, 2016
Visits : 1462

बहिणीची एक इच्छा विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया  नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी  आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून  एके दिवशी    बांध राखी प्रेमाची स्वार्थी आहे रे मी      काढते तुझRead More

September 18, 2016
Visits : 2339

तप- शक्ती   तप आणि सत्याची,   महान असे शक्ती, वाढवूनी बघा तुम्ही, प्रभूस ती खेचती ।।१।।   तप वाढता तुमचे,   झुकेल तो ईश्वर, हतबल होत असे,   भक्त जणांसमोर ।।२।।   विश्वाचा तो मालक,   दिसत नाही कुणा, प्रयत्न होवूनी व्यर्थ, निराशा येई मना ।।३।।   मिळविण्यास जा तुम्ही,   मिळत नसे केव्हां तपशक्ती वाढविता, आपोआप येई तेव्हां ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 18, 2016
Visits : 1149

तप- शक्ती   तप आणि सत्याची,   महान असे शक्ती, वाढवूनी बघा तुम्ही, प्रभूस ती खेचती ।।१।।   तप वाढता तुमचे,   झुकेल तो ईश्वर, हतबल होत असे,   भक्त जणांसमोर ।।२।।   विश्वाचा तो मालक,   दिसत नाही कुणा, प्रयत्न होवूनी व्यर्थ, निराशा येई मना ।।३।।   मिळविण्यास जा तुम्ही,   मिळत नसे केव्हां तपशक्ती वाढविता, आपोआप येई तेव्हां ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 18, 2016
Visits : 1753

निसर्ग स्वभावाचे दर्शन   बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव उमटविती भाव    मनावर आमच्या     ||१|| चांदण्याची शितलता, मनाची प्रफूल्लता देहाची आल्हादकता    लाभली चंद्राचे ठायी ||२|| नाजूक सहवास, मधूर मिळे वास, कोमलतेचा भास    जाणविला फूलांनी    ||३|| रंगाची विविधता, छटाची आकर्षकता, मनाची वेधता    इंद्रधनुष्य देई    || ४|| पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता, वेगाची तीव्रता,    भासे हरिणाच्या पायी    ||५|| प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता, स्वभावाची निर्मलता,    समजRead More

September 18, 2016
Visits : 2632

प्राण्याचे मोल समजा   खरेदी केला सुंदर पक्षी,   दाम देवूनी योग्य असे ते । नक्षीदार  पिंजरा घेवूनी,   शोभिवान केले घरातें ।। प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं । पक्षानें मान टाकली,  पडला होता तळात मरूनी ।। क्षणभर मनी खंत वाटली,   राग आला स्वकृत्याचा । अकारण हौस म्हणूनी,   खरेदी केला पक्षी याचा ।। किती बरे निच मन हे    निराशा तयाला धन हानीची । पक्षानेतर प्राण गमविला,   विषण्णता परि दुय्यम याची ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurRead More

September 18, 2016
Visits : 1521

भावनेच्या आहारीं    नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।।   प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी   प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी   बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं नकोस विसंबून    आत्मविश्वास गमवूनी नको जाऊस दारोदारी   ।।३।। जाऊनी भाRead More

September 18, 2016
Visits : 2083

ध्यान स्थिती   जेव्हां मजला कळत होते,  निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची,  शरीर होते निकामीं  ।। निद्रेमधल्या स्थितीत जाता,  जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं,  एकत्र न येते  ।। निद्रावस्था नि जागेपणा,  याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी,  मध्य बिंदू साधते  ।। देह मनाला विश्रांती देई,  ध्यान अवस्था ही ध्यानामधली ऊर्जा सारी,  ईश्वरार्पण होई  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 18, 2016
Visits : 2336

अमेरिकेतील एक - - Dating Center (डेटींग --- मनाची उकल संकल्पना )                             अमेरीकेत मुलाकडे सहा महीन्याचा मुक्काम होता. रोज सकाळी मुलगा ऑफिसला जाताना मला जवळच्या वाचनालयांत सोडून देत असे. माझी सून मला तीन तासाने घेण्यासाठी येई. दररोजचा हा कार्याक्रम शिस्तबध्द चालू होता. एक दिवस कादंबरी वाचून संपली. वाचण्याचा कंटाळा आला. आणखी एक तास तेथेच थांबणे गरजेचे होते. थोडेसे पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडलो. समोर बाग होती. तेथे फेर फटका मारला.                 बागेच्या दुसऱ्या टोकाजRead More

September 13, 2016
Visits : 1445

पडछाया! चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती संगे माझ्या, माझी छाया,  मागून येत होती वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली समरस होण्या माझ्यामध्ये,  पायी घुटमळली ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला पडू लागले पावूल माझे मंद मंद आता श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी काळोखाच्या गर्भामघ्ये, गेली ती विरुनी एकटाच मी होतो तेथे,Read More

September 13, 2016
Visits : 2854

मोक्ष अंतीम फळ   मागील कर्म पुढे चालूनी, कर्माची होई शृखंला, फळ मिळते कर्मावरूनी, मदत होई मुक्तीला ।।१।।   चांगले कार्य करीतेवेळी, मृत्यू येता अवचित, पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां, खेचतो त्याच कार्यात ।।२।।   अपूरे झाले असतां कार्य,   ज्ञानेश्वराच्या हातून, पुनरपि येऊनी पूर्ण केले, आठरा वर्षे जगून ।।३।।   ध्रुव जगला पांच वर्षे, अढळ पद मिळवी, कित्येक जन्मीचे तपोबल, पांच वर्षांत पूर्ण होई ।।४।।   कर्म मुक्तता मिळे आत्म्याला,   जन्म-मृत्Read More

September 13, 2016
Visits : 2791

शब्द फुले   माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार, अर्पित जातो ते,  प्रभू चरणांवर....१, राम नाम जपत,  कुणी एक येतात घटकाभरासाठी,  विश्रांती ते घेतात....२, रोज देती मजला,  ओंजळभर फूले कोणत्या बागेतली,  कधी न सांगीतले....३, त्यांच्याच सांगण्याने,  हार मी गुंफीतो बघतात कौतुकें कसा मी अर्पितो....४, फूलांची ओंजळ ती,  नव्हे तो तर शब्दांचा ठेवा, कवितेच्या रचनी,  उपयोगी पडावा....५, शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो विषय  मिळूनी,  काव्य मी रचीतो....६   डॉ. भगवान नागापRead More

September 13, 2016
Visits : 1248

प्रभाते नाम घ्या जगदंबेचे   प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   ।।धृ।।   कांहीं काळासाठीं नव्हता जगाचे पाठीं कोठे तुम्हीं होता न कळे आठवता जाग येऊनी मिळाले   भांडार आठवणींचे   ।।१।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   विश्रांतीचा काळ हा शांततेने गेला पहा देह मनाची धावपळ थांवली कांहीं काळ पुनरपि लागते सर्वां   चैतन्य जीवनाचे   ।।२।। प्रभात झाली उठा हो मुखीं नाम घ्या जगदंबेचे   गेल्या होत्या स्मृतिं कांहीं काळांती संपुन छोटRead More

September 13, 2016
Visits : 2450

अंबेस दाखवी काव्य   पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने पित्याचे लक्ष वेधण्या,  हनवटी खेची हातानें....१, प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे अजाणपणा दाखवोनी,  दुर्लक्ष करी मुलाकडे...२, शब्दांची गुंफन करूनी,  कवितेचा संग्रह केला तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला...३, जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४, पाटीवरले अंक बघूनी,  हृदय पित्याचे गहीवरले रेणूका तर जननी विश्वाची, भRead More

September 13, 2016
Visits : 2566

मानवता धर्म   परमेश्वर अगाध ।  त्याच्या शक्तीचा नसे वाद । मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक ।। नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती । प्रभु निराकार ।  निर्गुण असुनी होई साकार ।। आस्तिक प्रभु मानती ।  नास्तिक समजती शक्ति । ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।। न प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून । वापरुन ज्ञान शक्ति । अनेक धर्म स्थापिती ।। धर्म मार्गदर्शक । सत्य सहिष्णुतेचा शोधक । हीच खरी मानवता । तीच विसरतो आतां ।। झगडे मार्गासाठीं । ध्येय मात्र  विसरती । धर्मासाRead More

September 13, 2016
Visits : 2776

व्यर्थची यात्रा   जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना  ।   कांहीं तरी मागत होते,  हात जोडूनी चरणा  ।। दयावान ती आहे समजता,  गर्दी होते तिजपाशीं  । कधी न दिले काहींहीं तिजला,  मग ही मागणी कशी ?  ।। जावू नका दर्शनास तिच्या,  रिक्त अशा त्या हाताने  । तिला पाहिजे ताट पूजेचे,  भरलेले भक्ती भावाने  ।। व्यर्थ होवून जाती ते श्रम,  भक्तीभावाच्या अभावी  । उभे आयुष्य  वाऱ्या करूनी,  हाती काही न येई  ।। मानव रूप देऊनी तिजला,  धनादी वस्तू अर्पिती  । पूजाविधींचा थाटRead More

September 13, 2016
Visits : 2445

आनंदी किटक.   सहसा घर सोडून जाण्याचा प्रसंग येत नसे. त्यामुळे दैनंदिन चालणारय़ा गोष्टीमध्ये बाधा येते ही खंत. असेच १५ दिवस घर बंद करुन सर्वानाच गांवाकडे जाणे भाग पडले. आज घरी परत आलो. घर सारे कड्या कुलपे लाऊन बंद करुन गेलो होतो. दारे उघडताच एक उग्र वास दरवळत असल्याचे जाणवले. थोडीशी मोकळी हवा येताच सर्व हवेचे वातावरण पूर्ववृत होऊ लागले.                     वयानुसार दररोज देवपूजा हा एक परिपाठ होता. जीवनाच्या व्यवहारामध्ये अर्धातास देवपूजेसाठी राखून ठेवला होता. केवळ समाधान व मनःशांती मिळण्यासाठीRead More

September 04, 2016
Visits : 1719

बागेतील्या तारका बागेमधला निसर्ग सारा          टिपत होतो मी रात्र पडूनी चंद्र आकाशी          बाग झाली रिकामी      १   बाकावरती बसून एकटा          मोजत होतो तारे लुकलुकणारा प्रकाश तो            अंक चुकवी सारे           २   अगणित बघुनी  संख्यावरी     प्रसन्न झाले मन किती वेळ तो निघूनी गेला        राहिले नाहीं भान         ३   शितलेतेच्या  वातावरणीं           शांत झोप लागली नयन उघडतां बघितले मी      पहांट ती झाली           ४   गेल्या निघूनी सर्व तारका       आकाशालाRead More

September 04, 2016
Visits : 3310

ध्यानस्त शिव   शिव कुणाचे चिंतन करितो ? प्रश्न पडला मनी, तोच तर आहे प्रभू जगाचा काय तयाचे ध्यानी...१,   जेव्हां आम्ही चिंतन करितो, ध्यान लावी प्रभूकडे, प्रयत्न करूनी जगास विसरे, लक्ष केंद्रितो त्याजकडे....२,   उलट दिशेने शिवाचे चिंतन, चालते जगतासाठीं ध्यानामध्यें स्वतःसी विसरे, लक्ष्य त्याचे इतरांसाठीं ....३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

September 04, 2016
Visits : 3195

आयुष्य वाया घालू नका   दवडू नका आयुष्य तुम्ही,  वेळ घालूनी असा तसा, पदरी येई निराशा तुमच्या,  गेला क्षण येईल कसा....१, मर्यादेतच जीवन असूनी,  गतीमान असते बघा, स्वत: भोवती केंद्रीत होता,  कसे जाणाल इतर जगा....२, ईच्छा असते वाया न जावे,  आयुष्य सारे विनाकारण, हर घडीला विचार असावा,  इतरांसाठी असते जीवन....३, जेंव्हां तुम्ही सेवा करीता,  इतर मनाचे भाव जाणूनी, तेच अर्पण होत असते,  सारे एकत्र ईश्वर चरणी .....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.coRead More

September 04, 2016
Visits : 3447

योग्य वेळी   दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या कुणीतरी....१ शून्यामधले कितीकजण,  शून्यची सारे अवतीभवती परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती....२ आज हवे त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती सहानुभूतीचा शब्द,  निर्माण करील सहनशक्ति....३ क्षीण होता दृष्टी,  दिसेल कां धडपड श्रवणदोष येण्यापूर्वी,  ऐकून घे दु:खी ओरड...४ चपळ सारे अवयव असता,  धावपळीचे जीवन बघ तू संगे जावून जाण त्यांचा,  जगण्यामधला हेतू...५ जेवRead More

September 04, 2016
Visits : 1610

बडवे – पुरोहित   बडवे मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो भाविकामधील अज्ञानाचा,  उपयोग करूनी घेतो पूजेमधल्या विधी करिता,  आग्रह त्यांचा चालत असे भक्तीरसाचे महत्त्व असूनी,  त्याच्यांत त्यांना रस नसे व्यवहारीपणाचे रूप आणूनी,  बाजारी वृत्ति दाखविती धर्माचे नाव लावूनी,  भोळ्या भक्तांना लुटत असती पुरोहित असा असावा,  धर्माची करि उकलन भक्तीमार्गाच्या वाटसरूंना,  योग्य मार्ग  देयी दाखवून प्रभूचे मंदिरी नेवून त्यानें,  चिंतन करण्या सांगावे चंचल मनास प्रभू भजनीं, एकाग्रRead More

September 04, 2016
Visits : 3209

आनंदी भाव हाच भगवंत   गेले सारे आयुष्य    परि न कळला ईश । इच्छा राहिली अंतर्मनीं    प्रभू भेटावा एके दिनीं ।। बालपणाचा काळ    करुनी अभ्यास नि खेळ । मनाची एकाग्रता     केली शरीरा करिता  ।। तरुणपणाची उमेद    जिंकू वा मरु ही जिद्द । करुन प्रयत्नांची पराकाष्टा    बनवी जीवन मार्ग निष्ठा ।। संसारातील पदार्पण    इतरासाठी समर्पण । वाढविता आपसातील भाव    जाणले इतर मनाचे ठाव ।। काळ येता वृद्धत्वाचा    दाखवी मार्ग अनुभवाचा । भजन पुजेत जाई वेळ    ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।। आता झालोRead More

September 04, 2016
Visits : 2085

ज्ञान देणारे सर्वच गुरू   अवतीभोवती सारे तुझ्या,   आहेत गुरू बसलेले जाण तयांची येण्यासाठी,    प्रभूसी मी विनविले  ।।१।।   निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी,    काही तरी असे गुण आपणासची ज्ञान असावे,    घेण्यास ते समजून  ।।   उघडे ठेवूनी डोळे तुम्ही,    बघाल जेंव्हां शेजारी काही ना काही ज्ञान मिळते,  वस्तूच्या त्या गुणापरी  ।।   सारे सजिव निर्जिव वस्तू,    गुरू सारखे वाटावे तेच आहेत ईश्वरमय,    तुम्हीच  समजावे  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क -Read More

September 04, 2016
Visits : 2433

मी हे करीत नव्हतो   चार वर्षानंतर माझी मुलगी माहेरी आली होती. व्यवसायात व्यस्त असल्यामुळे तीला येणे जमले नव्हते. माझ्या नातीला म्हणजे तीच्या मुलीला घेऊन ती येणार असल्यामुळे, आम्ही सर्वजण उत्सुक होतो. मी आरामखुर्चीवर बसून त्यांची वाट बघत होतो. बेल वाजली. त्या दोघी सामानासहीत आल्या.                      नातीने आत येताच माझ्याकडे कटाक्ष टाकून " हाय " म्हणत स्मित केले व ती आत बाथरुममध्ये गेली. हात पाय धुऊन Fresh झाली व बाहेर आली. " हाय आजोबा "  म्हणत माझ्या जवळ आली. आपला हात पुढे करीत शेक हँडRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 71136 hits