Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
April 29, 2011
Visits : 4120

रवि – उदयाचे स्वागत उठा उठा हो सकळजन स्वागत करु या रविउदयाचे फूलून जाते जीवन ज्याने त्या सूर्य आगमनाचे //धृ// उषाराणीची चाहूल येता चंद्रतारका ढळल्या आतां चराचराना जागे करण्या चाळवी निद्रा हलके हाता वंदन करु या लिन होऊनी चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१// स्वागत करुया रविउदयाचे रंगबेरंगी सुमने फुलली वाऱ्यासंगे डोलू लागली दरवळूनी तो सुगंध सारा वातावरणी धुंदी आणली मकरंदापरि चंचल होऊनी स्वाद घेवूया त्याच फुलांचे //२// स्वागत करुया रविउदयाचे पक्षी येती किलबील करिती उठा उठा ते साRead More

April 27, 2011
Visits : 4187

निसर्गाची ध्यान प्रक्रिया खिडकीमधून बाहेर बघत होतो. झाडाच्या एका फांदीवर एक कबूतर बसले होते. त्याचे डोळे व चेहरा मला स्पष्ट दिसत होता. डोळे मिटून कसलीही हालचाल न करता ते बराच वेळपर्यन्त तेथे बसले होते. कबूतराचे शांत डोळे मिटून बसणे, मला त्याची त्याच्याच पद्घतीने केलेली ध्यान धारणा, वा समाधीयोग वाटला. ध्य़ान प्रक्रिया साध्य होण्यासाठी गुरुची अवशक्ता लागते कां ? सर्व साधारण साधकासाठी, व्यक्तिसाठी निश्चीत. परंतु शेवटी ही एक नैसर्गिक क्रिया ठरते. ज्याना उत्स्फूर्त शांतता प्राप्त करायची असते, ते शरीराला हालचालRead More

April 23, 2011
Visits : 3225

खोटा शिक्का कसे आले कुणास ठाऊक नाणे माझे हाती गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें कसा आला नशिबी निराशा मनी येते अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे केवळ त्याने स्पर्श करुनी जाणले माझे नशिब भाग्यवान ठरवूनी सांगे मिळेल धनलाभ खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने नीच मनाचा असूनRead More

April 20, 2011
Visits : 4029

काळपुरुष शहापूर जिल्हा ठाणे. शासकिय ग्रामीण रुग्णातयांत वैद्यकीय अधिकारी असतानाचा प्रसंग. शवविच्छेदनासाठी एका पन्नाशीतील व्यक्तीचा मृतदेह आणला होता. पोलीस पंचनामा रिपोर्ट वाचला. त्या प्रमाणे घटनेचा तपशील अंतर्मुख करायला लावणारा खचितच असा होता. भास्कर बहिर व त्याचा मित्र सुनील जाधव दोघेजण बागेतील एका बाकड्यावर बसले होते. मंद मंद वारे वाहत होते. भास्करला आळस आला होता. आळेपिळे देत शरिराला शिथील करण्यासाठी त्याने तोंड उघडून वर बघत जांभई दिली. अचानक त्याचक्षणी हवेमुळे उडत आलेली एक छोटी वसRead More

April 17, 2011
Visits : 4036

सासरी जाणारय़ा मुलीस थांबव गंगा यमुना मुली आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला मग ह्या कोठूनी आल्या ? // हांसत गेले जीवन तुझे फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें आशिर्वाद देतो शिरीं // समजतील दुःखी तुजला नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने फूलवित रहा भाव // जाणून घे स्वभाव सर्वांचे रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे तुझ्याच नव्या घरी // आई बाबा दुरावले बाळगु नकोस खंत पाहशील आम्हाला सासू सासरय़ाच्या रुपात // (कविता)Read More

April 14, 2011
Visits : 970

मच्छरांचे साम्राज्य नुकत्याच एका बातमीने संपूर्ण मुंबईकरांना हादरुन सोडले. डासांची संख्या प्रचंड झालेली आहे. सर्वत्र मलेरीयाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मृतांची संख्याही खूप वाढलेली आहे. सर्व अधुनिक वैद्यकिय शास्त्र आपल्या शक्तिनीशी त्याचा प्रतिकार करताना दिसला. कांही दिवस यश, वा कांही दिवस अपयश अर्थात रोगाचा फैलाव जास्त झाल्याचे कळून येते. जागतीक आरोग्य संघटना ( World Health Organization ) हीने देखील मलेरीयाच्या प्रसारा बद्दल चिंता व्यक्त केली. आपल्यापरी मदतही देवू केली. जगावर राज्य कुणाचेRead More

April 10, 2011
Visits : 4468

पतंग   एक पतंग वरी चालला,  डोलत आकाशी भाळी त्याच्या यश कोरले,  झेप घेई ती कशी   //   भरारी घेई पतंग, ज्याला आधार दोरीचा जाणीव होई येता प्रसंग,  त्याला कटण्याचा    //   धरतीवरी कोसळत असतां,  दृष्टी टाकी आकाशी इतर पतंग बघून बोलला,  तोच स्वतःशी   //   नभांग मोठे दाही दिशा,  संचारा स्वैरपणे आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळे जगणे   //   (कविता)Read More

April 07, 2011
Visits : 2217

मला देव दिसला भाग 3 परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जावून त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणीक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुण वा नंतर निर्गुण दिव्यतेची ओढ हे सारे मार्ग हलवले जात होतRead More

April 04, 2011
Visits : 2857

मला देव दिसला भाग २ त्या परमात्म्याच्या शोधात अनेक यात्रा केल्या. अनेक तीर्थस्थानाना भेटी दिल्या. जसे श्री कैलास मानसरोवर, चारधाम, दत्तधाम, सर्व ज्योतीर्लिंग स्थाने, वैष्णवदेवी अमरनाथ, रामेश्वर आणि अशी अनेक देवालये, मंदिरे यांना भेटी दिल्या. भारतातील जवळ जवळ सर्व प्रसिध्द मंदिराना भेटी दिल्या, देवदेवतांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. ही सारी महान देवस्थाने, लाखो करोडो भक्तांच्या भक्तीरसांत वाहून निघालेली होती. कित्येकांनी भक्ती व तपश्चर्या तेथे जाऊन अर्पण केलेली. ती भूमि, तो परिसर पवित्र करण्यात सहभाग घेतRead More

April 01, 2011
Visits : 1568

मला देव दिसला ! भाग १ बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला. जन्म, संस्कार आणि कौटूंबीक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरीत पगडा बसू लागला. जे आहे, जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो आणि त्या वयात प्राप्त झालेल्या ज्ञानाने जे समजतो ते सारे मान्यता पावू लागले. कसलाही विरोध नRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 31677 hits