Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 29, 2015
Visits : 1035

विष्ठा   विष्ठा बघूनी थुंकलो,   घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी,   लाखोली देई तिजला  ।।१।।   संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी,   अमंगळ ती ठरली।।२।।   आकर्षक रूप माझे,   लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी,   केले सारे तूंच फस्त ।।३।।   परि मिळतां तुझा तो,   अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी,   मिळे हा नरकवास ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 29, 2015
Visits : 2254

काजळी धरल्या वाती   तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देऊनी सर्व जनां, आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना ।।१।।   शांत जळते केंव्हां तरी, भडकून उठते कधी कधी, फडफड करीत मंदावते, इच्छा दाखवी घेण्या समाधी ।।२।।   जगदंबेच्या प्रतिमेवरती, प्रकाश टाकुनी हास्य टिपते, हास्य बघूनी त्या देवीचे, चरण स्पर्शण्या झेपावते ।।३।।   अजाणपणाच्या खेळामधली, स्वप्न तरंगे दिसती, दिव्यामधले तेल संपता, काजळी धरती वाती ।।४।।   डॉ. भगवान नागRead More

November 29, 2015
Visits : 3592

काळाची झडप   डोक्यावरी घिरट्या घालीत,  काळ सदा फिरतो, वेळ साधतां योग्य अशी ती,  त्वरित झेपावतो ।।१।। भरले आहे जीवन सारे,   संकटांनी परिपूर्ण, घटना घडूनी अघटीत,  होऊन जाते चूर्ण ।।२।। फुलांमधला रस शोषतां,  फुलपाखरू नाचते, झाडावरती सरडा बसला,  जाण त्यास नसते ।।३।। आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला, अपघात घडतां उंचावरी,  नष्ट करे सर्वाला ।।४।। खेळी मेळीच्या वातावरणी,  हसत गात नाचते, ठसका लागून कांहीं वेळी,  हृदय बंद पडते ।।५।। सतत जागृत असता तुम्हीं,  टाळता येई वेRead More

November 29, 2015
Visits : 6063

नियतीचा फटका (भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)   एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी  । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी  ।।१।।   मध्यरात्र  होऊन गेली, वातावरण  शांत होते  । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते  ।।२।।   तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी  । हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी  ।।३।।   कित्येक जनांचे बळी घेतले, काळ्या काळाने  । शRead More

November 29, 2015
Visits : 2784

कलेचे खरे मूल्य   पर्वत शिखरीं जाऊन  खोदून आणली माती, हातकौशल्यने  केला एक गणपती ।।१।।   मूर्ती बनली सुरेख    आनंद देई मनां, दाम मिळेल ठीक   हीच आली भावना ।।२।।   घेऊन गेलो बाजारीं   उल्हासाच्या भरांत, कुणी न त्यासी पसंत करी   निराश झालो मनांत ।।३।।   बहूत दिवस प्रयत्न केला   कुणी न घेई विकत, कंटाळून नेऊन दिला   गणपती शाळेत ।।४।।   भरले होते भव्य प्रदर्शन   हस्तकला कौशल्याचे, नवल वाटले गणपती बघून   दालनातील सुरवातीचे ।।५।।   चकीत झालो जाणूनीRead More

November 29, 2015
Visits : 3917

पूजा तयारी   रोज सकाळीं प्रात: समयीं,  पूजा करी देवाची  । पूजे मधल्या विधीत,  चूक न होई कधी त्याची  ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे,  देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा,  मंत्रपाठ गाई  ।। सहयोग देई पत्नी,  पूजा कर्मामध्ये त्याला  । आधींच उठोनी झाडूनी घेई,  स्वच्छ करी देव घराला  ।। करूनी सडा संमार्जन तेथें,  सारवोनी घेई जागा  । देवापुढती रांगोळी काढी,  दिसे कशी सुंदर बघा  ।। बागेमध्ये जाऊनी मग ती,  दुर्वा काढीत असे  । पुष्प करंडीत फुले निराळी,  ताजी सुंदर दिसे  ।।Read More

November 29, 2015
Visits : 1106

उदरांतील शेषशायी   मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन   शेषशायीचे चित्र बघतां,  साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल   शेषापरी वेटोळे असुनी,  ' नाळ ' तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें,  बालक ते निद्रिस्त असती   बालकाच्या नाभी मधुनी,  येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी,  ब्रह्मापरी दिसे अंग   ' सो हं ' निनादुनी सांगे,  ' मीच तोच ईश्वर आहे ' चुकीचा समज करुनी,  तयास सागरीं पाहे   विवीधतेनेंRead More

November 29, 2015
Visits : 1237

हा तर खरा बौद्धिक व्यायाम   नियमितपणे सकाळी फिरावयास जाणे हे ठरून गेलेले होते. निवृतीच्या काळात अत्यंत सोपा व चांगला शरीराच्या  सर्व अवयवांना पोषक असा हा  व्यायाम आहे. कित्येक वर्षे त्याचे नियमित पालन केले जात आहे.  एक दिवस सकाळी  फिरण्यास बाहेर पडलो असता,  रस्त्यामध्ये एक ९ ते १० वर्षाचा शाळकरी मुलगा रस्त्याच्या कडेला थांबून आपली नादुरुस्त सायकल ठीक करण्याचा प्रयत्न करीत होता. सायकलच्या पायड्ल जवळची साखळी ( चेन ) ही  बेरीन्गच्या चाकावरुन निसटली होती. मुलगा परेशान झालेला  होता . त्याची सर्व बोटेRead More

November 22, 2015
Visits : 2804

काळ घेई बळी   जात असता गाडी मधूनी, दुर्घटना ती घडली, अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली ।।१।।   प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले, वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले ।।२।।   घिरट्या घालीत काळ आला, झडप घातली त्याने, वेळ आली नव्हती म्हणूनी, बचावलो नशिबाने ।।३।।   अपमान झाला होता त्याचा, सुडाने तो पेटला, थोड्याशाच अंतरी जावूनी, दुजाच बळी घेतला ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmailRead More

November 22, 2015
Visits : 2752

वर्तमानीच करा   नियोजनाच्या लागून मागें,   भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट....१,   अनेक वाटा दिसूनी येती,   भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता,   जावे लागते एकाच दिशेला...२,   उठूनी करा त्याच क्षणीं ते,   वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां,   मनीं उमटती विचार द्विधा...३,   वर्तमान हा निश्चीत असता,   यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड,   साथ देईल ईश्वर सदा....४   डॉ.Read More

November 22, 2015
Visits : 1343

शांततेचा शोध   मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे । मन तुम्हांला । बोचती काटे । घेता तिजला ।। बाह्य असूनि  । त्वरित दिसे । चंचल मन । तिजला फसे ।। अशांती मनीं । येता तुमचRead More

November 22, 2015
Visits : 4164

जन्म स्वभाव   गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे  । शब्दांची भासली जाण,   नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान   ।।   भावनांचा उगम दिसला,   मनी व्यक्त होई हालचालीतूनी  । रागलोभ अहंकारादी गुण,   दिसून येती जन्मापासून  ।।   देश-वेष वा जात कुठली,   सर्व गुणांची बिजे दिसली  । हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी  ।।   प्रसंग घडता अवचित ,  बाह्य जगाते विसरत  । उफाळून येती सुप्त भावना, मानवी त्या जन्मखुणा  ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५०Read More

November 22, 2015
Visits : 4124

तपसाधनेतील परिक्षा (काव्य स्फूर्ती)   पूजित होतो प्रभूसी     ध्यान एकाग्र करुनी भाव भक्तिने तल्लीन       होत असे भजनी  ।।१।।   काव्यस्फूर्ति देऊनी    कवि बनविले मजला शब्दांची फुले गुंफवूनी    कवितेचा हार बनवविला   ।।२।।   सुंदर सुचली कविता      आनंदी झाले मन ध्यास मज लागता    गेलो त्यांतच रमून   ।।३।।   पुजेमधले लक्ष्य ढळले   काव्याच्या मागे जावूनी भजनांतील चित्त वेधले   तपोभंग तो होऊनी   ।।४।।   मधाचे बोट चाटवूनी   मोहात ओढले मजला दूर सारुनी अमृत घट   परिक्Read More

November 22, 2015
Visits : 2387

क्षण मुक्तीचा   तपसाधना करूनी मिळवी,   सत्वगुणाची शक्ती अंगी  । त्याच शक्तीच्या जोरावरती,   स्थान लाभे त्यांना स्वर्गी  ।।   शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा,   सारे सुख आणि भोग भोंवतीं  । परिणामी तो फेकला जाऊनी,   पुनरपी येई याच भूवरती  ।।   एक दया दाखवी ईश्वर,   वातावरणी देऊनी संधी  । जन्म मिळे ते त्याच ठिकाणी,   कमविले पुण्य ज्याने आधी  ।।   चक्र खेळ हा चाले सदैव,   स्वर्ग मृत्यू या लोकी त्याचा  । अंतिम ध्येय तेच ठरते,   मिळविणे क्षण तो मुक्तीचा  ।Read More

November 22, 2015
Visits : 3320

आई   कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला,    ' प्रेमची ' वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द,  उभारी त्यासी देई नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ तयाची होऊन जाते रक्ताचे नाते असतां, प्रेम बंधन दिसे ते काटा रुजतां तुमच्या पायी, डोळ्यांत तिच्या पाणी येते धन दौलत ही असता हाती, मिळेल तुम्हांRead More

November 22, 2015
Visits : 2956

चोरलेले पुस्तकच भेट म्हणून मिळते तेंव्हा – - – शालेय शिक्षण पुरे करून,  महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र. मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील  जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील  तो दिवस आठवतो.  सकाळची वेळ होती. विद्यालयाच्या एका   उघड्या दालनातून  मी दुसऱ्या जागी जात  होतो. अचानक जोराचा पावूस सुरु झाला. पळतच मी शेजारच्या खोलीत शिरलो. ती प्राध्यापकाची खोली होती. त्याRead More

November 15, 2015
Visits : 2312

तमोगुण   राज्य तमाचे येथें बाह्य जगावरती, म्हणून दिसे आम्हां, विध्वंसक प्रवृती ।।१।।   नाश करण्यासाठीं शक्तीच हवी येथे, हेच रुप शिवाचे, समजण्या अवघड जाते ।।२।।   जागा करु देई, नविन घटनांना, चक्र कसे चालेल, न मिटवता त्यांना ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 15, 2015
Visits : 2747

उभारी   कोपऱ्यांत तो पडला होता, शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह, सदैव उत्साही त्याचे मन...१,   झगडा देवूनी आयुष्याशीं, जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी, त्याग श्रमाचे लिंपन केले...२,   कर्तृत्वाचे शब्द उमटती, घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती, इच्छा शक्तीस जागवूनी...३,   गतकाळाच्या आठवणी त्या, जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें, अंत दशेतील क्लेश विसरला...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्Read More

November 15, 2015
Visits : 1077

माझा मीच गुरू   मीच माझा गुरू,  जे मनी ठरवू विचारांती तेच करू ....।।धृ।।   सल्ला घेईन सर्वांचा,  वाटे मज किंमतीचा मनाची कदर करूं...१ मीच माझा गुरु   निर्णय असे अनेक,  सारेच असती ठिक निवड एकाची करूं...२ मीच माझा गुरु,   इतरांना जे वाटते,  माझ्या सोईचे नसते सोईचा आग्रह धरूं...३ मीच माझा गुरू   शेवटीं माझ्या करिता,  गोष्टीची उपयोगिता स्वतःसाठीं योग्य करू...४ मीच माझा गुरू   ईश्वर वसतो मनीं, इच्छा त्याची समजोनी आदर त्याचाच करूं..Read More

November 15, 2015
Visits : 3972

काळाची चाहूल   जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी....१,   भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल...२,   चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो, जो जो येई त्याच्या टापूत...३,   जरी दिसे मारक कुणीतरी, करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा  खेळ खेळविण्या, जन्म-मृत्यूचे चक्र फिरे....४   डॉ. भगवान नागापूरकर संRead More

November 15, 2015
Visits : 1677

पावन हो तू आई   पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।।   संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई   ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही   ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप पाही   ।।३।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   देह झिजविला दुर सारुनी सुखाला कां तप फळा न येई   ।।४।। पावन हो तू आई तव चरण शरण येई   सादRead More

November 15, 2015
Visits : 1174

दयेची दिशा   निसर्ग नियमें दया प्रभूची,   सदैव बरसत असते  । दयेचा तो सागर असता,   कमतरता ही पडत नसते  ।।   अज्ञानी ठरतो आम्हींच सारे,  झेलून घेण्या तीच दया  । लक्ष्य आमचे विचलित होते,   बघून भोवती फसवी माया  ।।   उपडे धरता पात्र अंगणीं,   कसे जमवाल वर्षा जल  । प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी,    निघून जाईल वेळ  ।।   भरेल भांडे काठोकाठ ,   केवळ धरता योग्य दिशेने  । टिपून घ्या तुम्ही दया प्रभूची,  अशीच केवळ शुद्ध मनानें  ।।  डॉ. भगवान नागापूरकर संRead More

November 15, 2015
Visits : 1588

कविता स्फूर्ति   पूर्णपणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो   घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो   एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो   गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत असे फक्त प्रभूचे नाम घेऊनी अर्पण त्याला करीत असे   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagRead More

November 15, 2015
Visits : 849

पोकळ तत्वज्ञान  कालेजच्या होस्टेल मध्ये  रहात होतो. सर्व विध्यार्थाना स्वत्तंत्र खोल्या होत्या माझ्या शेजारी  माझा मित्र नंदकिशोर यांची खोली होती. दुपारची जेवणाची   सुट्टी झाली की आम्ही रूमवर यायचो. माझ्याच  खोलीत आम्ही  मिळून जेवण घेत असू .घरून दोघांचे जेवणाचे डब्बे यायचे. नंद्कोशोरच्या  जेवणाची  पद्धतच कांही और होती .त्याच्या डब्ब्यात चार चपात्या असत. तो डब्यातले पूर्ण अन्न केव्हांच खात नसे. जेवण झाल्यावर एक चपाती आणि उरलेले सर्व अन्न गोळा करून चक्क खिडकीतून बाहेर फेकून देत असे. मला त्याचे हे वाRead More

November 08, 2015
Visits : 3138

आत्मा हाच ईश्वर   आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदैव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात समावतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर चांगले कर्म नसता    नविन देह घेणार   ।।५।। दोन प्रकारांनी आRead More

November 08, 2015
Visits : 4596

अवमूल्यन   उत्साहाने करित होता,  सारे कांहीं इतरांसाठी क्षीण होवूनी जाता शरीर,  आधार तयाला झाली काठी...१, धनाचा तो प्रवाह वाहतां,  गंगाजळीचे पाणी पाजले दुजाकरिता त्याग करूनी,  समाधानी ते इतरा केले....२, धन संपत्तीचे झरे आटतां,  प्रेमळपणाचे शब्द राहीले कालक्रमणाच्या ओघामधल्या,  दुर्बलतेस कुणी न जाणले...३, अपेक्षा ती सदैव असते,  मिळत रहावा सहयोग अवमूल्यन ते केले जाते,  दुर्लक्ष करूनी दुर्बल अंग...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmaiRead More

November 08, 2015
Visits : 3579

कृष्ण बाललीला   चकित झाले गोकूळवासी बघून बाललीला सांगा कोण आहे तरी कृष्ण ? विचारी यशोदेला   ।।१।। प्रासादातील मोदक खातां तोंड ते उघडले मुखामध्ये मोदक नसूनी ब्रह्मांड ते दिसले   ।।२।। उच्छाद मांडूनी कालीयाने पाणी केले दुषित मर्दन करण्यासाठीं त्याचे उडी टाकी डोहात   ।।३।। पूतना असूनी राक्षसिण स्तनांत होते विष स्तनपान करुनी त्यानें तीला केले कासाविस   ।।४।। खोड्या बघूनी यशोदेनें उखळाला बांधले उखळासहीत झाडे पाडूनी चकीत त्यानीं कRead More

November 08, 2015
Visits : 6959

स्वप्नातली अपूरी इच्छा   दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४, आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५, येतRead More

November 08, 2015
Visits : 2087

स्मरण असू दे   हे जगदंबे !  सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे.....१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी....२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी....३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती....४ तगमग करूनी तेच मिळविता आज कल्पना विलास होता तो झाली ही समज....५ खिळवू नकोस मनास गे बाह्य जगाभोवती स्मरण असू दे तव नामाचे ओठावरती....६   डॉ. भगवान नागापूरकरRead More

November 08, 2015
Visits : 4345

पुनर्जन्म   संघर्षाची बिजें जळतील,  जाणतां तत्व पुनर्जन्माचे  । आपसांमधील हेवे-दावे,  मिटून जातील कायमचे  ।।१।। फिरत असते चक्र भोवती,  स्वार्थीपणाचे भाव आणिते  । त्यांनाच मिळावे सारे काही,  जाणता स्वरक्ताचे नाते  ।।२।। उगम झाला जाती धर्माचा,  स्वार्थीपणाच्या याच कल्पनी  । वाटीत सुटतो प्रेम तयांना,  केवळ सारे आपले समजूनी  ।।३।। कन्या जेव्हां सासरीं जाते,  नाती-गोती नवीन बनती  । वाटत होते परकीय जे,  आज आपले होवून जाती  ।।४।। आपलेपणाच्या भावामध्ये,  दडले असते प्रेम साRead More

November 08, 2015
Visits : 814

बहिरा ऐके कीर्तन   गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी ऐकत होता तRead More

November 08, 2015
Visits : 1634

समाधानाचे मूळ   १९९६ साली मी  जव्हार  गांवच्या सरकारी रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो. हाताखाली बराच कर्मचारी व अधिकारी  वर्ग होता.  एक तरुण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राठोड यांची नेमणूक नुकतीच  झालेली  होती.  ते M. B. B. S. शिकलेले होते. पुढे सर्जरी हा विषय घेऊन सर्जन होण्याची मह्त्वाकांक्षा  बाळगून  होते. आपल्या मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावाने रुग्णामध्ये थोड्याच काळात ते सर्वाना हवे हवेसे वाटू  लागले. वैद्यकीय कामकाजामध्ये अतिशय मेहनती,  उत्साही, सतर्क आणि निष्णात होते. सर्व प्रकारच्या केसेस  आत्मविश्Read More

November 01, 2015
Visits : 659

आत्म्याचे मिलन   आत्म्याचे मिलन परमात्म्याशी, हेच जीवनाचे ध्येय असे, आत्मा ईश्वरी अंश असूनी, त्यालाच मिळण्या उत्सुक असे ।।१।।   देह पिंजऱ्यांत अडकता, बाहेर येण्या झेप घेई तो, अवचित साधूनी वेळ ती, कुडी तोडूनी निघून जातो ।।२।।   कार्य आत्म्याचे अपूरे होता, पुनरपी पडते बंधन, चक्र आत्म्याचे चालत राही, मुक्त होण्याचा येई तो क्षण ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 01, 2015
Visits : 989

खेळण्या नसे पर्याय   दु:खाचे तूं देवूनी चटके,   सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी,  झगडत आम्हां ठेवतोस खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां,  जगण्याच्या मिटतील खुणा...२, खेळगडी तो असूनी तुम्हीं,  मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां,  खचितच यश तुम्हा येते...३, विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी,  गमवाल त्या अमूल्य वेळा....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gRead More

November 01, 2015
Visits : 1972

सुखाचा डब्बा   जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला...३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत...४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई...५ डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 01, 2015
Visits : 709

चुकीचे तर्क   मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता.....१, तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते...२, वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला...३, बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले...४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.cRead More

November 01, 2015
Visits : 926

जीवनाचा खरा आनंद   केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   ।।धृ।। बालपणाची रम्यता    मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला   नाद गेला खेळण्याचा   ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   तारुण्याचे सुख आगळे   मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला   दूर सारतां घट प्रेमाचा   ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   प्रौढत्वाची शानच न्यारी   श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला   उबग येई संसाराचा   ।।३।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   जीवनातील प्रत्येकRead More

November 01, 2015
Visits : 383

देह मनाचे द्वंद   दोन स्थरावर जगतो मानव,  आंत बाहेरी आगळा  । भिन्न भिन्न ते दर्शन घडते,  यास्तव कांहीं वेळा  ।।१।। एकच घटना परी विपरीत वागणे  । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो,  याच कारणे  ।।२।। देहा लागते ऐहिक सुख,  वस्तूमध्ये जे दडले  । अंतर्मन परि सांगत असते,  सोडून दे ते सगळे  ।।३३।। शोषण क्रियेत आनंद असतो,  ही देहाची धारणा  । त्यागमधला आनंद मग तो,  कसा कळे आत्म्याविणा  ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 01, 2015
Visits : 495

विरोघांत मुक्ति   भक्ति करुन प्रभूसी मिळवी, दिसले आम्हा ह्या जगती । परि त्याचाच विरोध करुनी, कांही पावन होऊन जाती ।।१।।   लंकाधिपती रावण याने, रोष घेतला श्रीरामाचा । जानकीस पळवून नेई,  विरोध करण्यास प्रभुचा ।।२।।   झाली इसतां आकाशवाणी,  कंसास सांगून मृत्यु त्याचा । तुटून पडता देवकीवरी,  नाश करण्या त्याच प्रभुचा ।।३।।   प्रभी अवताराचे ज्ञान होते,  परि विरोध करीत राही । होऊन गेले तेच प्रभूमय,  सतत त्याचाच ध्यास घेई ।।   रोम रोम तो शोधत होता,  कोठे लपला आहे ईश्वर ।Read More

November 01, 2015
Visits : 669

जीवन चक्र अमेरिकेमध्ये मिनियापोलीस ह्या शहरांत कांही काळ राहण्याचा योग  आला  होता. मुलगा तेथे नोकरीला होता. प्रशस्त बंगलावजा घर. सर्व कॉलनितली घरे स्वतंत्र. सर्व सभोवताल निसर्ग रम्य केलेला. बाग फुलझाडे, गवताचे गालिचे, सर्वत्र हिरवळ, झोपाळा, मुलांना खेळण्याची सोय, विखुरलेले पाण्याचे नळ. तेथे जे सर्व सामान्य नागरिकाला सहजपणे  उपभोगता येते, तसे भारतात  गर्भ श्रीमंतांना उपभोगता येत नसल्याचे  जाणवले. कारण तेथे जागा, हवा पाणी  उर्जा( वीज ) फळे फुले धान्य, आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक   सोई भरपूर.  सर्वाना आRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 95188 hits