Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 30, 2012
Visits : 2372

जगाचा निरोप   काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं पूर्ण कल्पना येई मनीं,   जगण्यात आंता तथ्य नाहीं उर्वरीत आयुष्याची रेखा,  मर्यादेतच आखूनी काढी समज येतां प्रभूचे सारे,   समर्पण करीत जग सोडीRead More

March 26, 2012
Visits : 3284

ह्रदयातील ईश्वर   महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला. द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानी त्याना कचाट्यात पकडले. शकुनी लबाडीने खेळला. पांडव  खेळांत सर्व गमावून बसले. इतके की भावनीक बेभानRead More

March 22, 2012
Visits : 1807

कविता स्फूर्ति   पूर्णणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो   घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो   एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो   गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत असे फक्त प्रभूचे नाम घेऊनी अर्पण त्याला करीत असे   (कविता)   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

March 18, 2012
Visits : 1834

बालपणीची भांडणें   मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें मला पाहीजे जास्त,  हेच मुख्य मागणें इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी बालपणीच्या प्रेमामध्यें,  थोडे भांडणें परवडते चव येण्या पदार्थाला,  तिखटमिठ लागते लहान असतां भांडून घ्या,  तेच वय भांडणाचे मोठेRead More

March 14, 2012
Visits : 1460

सिकंदरचे खंतावलेले मन राजा अँलेक्झॉंडर दी ग्रेट हा ग्रीस देशाचा. ज्याला युनान म्हणत. एक परकीय आक्रमक भारतात आला होता. तो महापराक्रमी, लढवय्या, शुरवीर जसा होता, तसाच सहिष्णू, प्रेमळ व अध्यात्मिक प्रवृतीच होता. ह्याचमुळे त्याला भारतातच सिकंदर ( ज्येता व नशीबवान )ही लोकपदवी मिळाली होती. तो त्याच्या घोडेस्वार सैनिकासह होता. रस्त्यात लागणारे प्रदेश पादाक्रांत करीत, लुटालुट करीत, तो पुढे पुढे चालला होता. रस्त्यांत भेटणारे गांवकरी भितीने  पळून रानावनांत धावत होते. जे कोणी समोर आले, ते त्याला अभिवादन करुRead More

March 10, 2012
Visits : 2415

कोण हा कलाकार ?   न पोंहचे झेप विचारांची,   टिपण्या त्याचेच सौंदर्य अप्रतीम सृष्टीचा तो कर्ता,   शोधण्या तयासी मन जाय थवेच्या थवे उडत जातां,   पक्षी दिसती आकाशीं विहंगम ते दृष्य भासे,   आनंदूनी टाकती मनासी बघतां संथ नदीकडे,   लय लागूनी जात असे प्रचंड बघूनी धबधबा,   चकीत सारे होत असे ऐटदार तो मयुर पक्षीं,   आकर्षक ते नृत्य दाखवी सप्तरंगाचे इंद्रधनुष्य,   काळजाचा ठाव घेई निसर्गातील प्रत्येक अंगी,   भरलाआहे सौंदर्य ठेवा आंस राहते लागून मनीं,   कलाकार श्रेष्ठ तो जाणावाRead More

March 06, 2012
Visits : 9519

होळीत जाळा दुष्ट भाव   एकत्र येऊं सारे जण   विसरुन जाऊं भेदभाव जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ//   ऐष आरामांत राहून    देह झाला मलीन शरीर सुखासाठीं     करती नाना खटपटीं आज आहे सण होळीचा   नष्ट करा आहीक भाव जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //१//   मन असे चंचल भारी   सर्व दिशेनी घेई भरारी राग लोभ अहंकार     मनाचे तर हे विकार टाकता मलीनता मनाची   पेटलेल्या होळीमध्यें, घे धांव जाळीन टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभावRead More

March 02, 2012
Visits : 1793

जेष्ठत्व हे श्रेष्ठत्व कसे ?   ज्येष्ठ नागरिकाना श्रेष्ठ समजले जाते.  व्यवहारी जगांत बालपण, तारुण्य, प्रौढत्व आणि वृद्धापकाळ ह्या जीवन चक्रामधल्या  विवीध अवस्था. त्यांमध्ये मान्यता पावलेला शेवटचा काळ, ज्याला ज्येष्ठ नागरिक संबोधीले गेले. केवढा मोठा सन्मान हा त्या वयाचा. ज्येष्ठ नागरिक एक महान आणि सर्वांत सन्मानाची उपाधी बनलेली आहे.               ज्येष्ठ नागरिक हे वयानी श्रेष्ठ असतात. प्रचंड अनुभव हे आपल्या पाठीशी बाळगुन समाजात वावरतात. कुटूंब वत्सल असतात. जीवन व व्यवहार ह्या दोन प्रमुखRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 24484 hits