Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 27, 2014
Visits : 1610

कृष्ण कमळ-                                        तुला लाभलेली निसर्ग देणगी   खळी पडून गालावरी   सुंदर तूं दिसते आनंदाचे भाव दर्शनी    मधूर तूं हांसते इवले इवले ओठ      फूलपाकळ्यांपरि लांब लांब केस काळे   भुर भुर उडती मानेवरी                                 मोत्यासारखे दांत भासे   कुंदकळ्या बदामाचा आकार मिळे   तुझ्या डोळ्या इंद्रधनुष्याचा बाक      दिसे भुवयाला चाफेकळीची शोभा मिळाली   नाकाला चमकते अंगकांती    फाटलेल्या झग्यातूनी दिसते निसर्गाची देणगी   तुझ्या गरीबीतूनRead More

July 27, 2014
Visits : 3816

बागेतील तारका-   धरणीकंप कांपू नकोस धरणीमाते      ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।। जागो जागी अत्याचार      सर्वत्र दिसे भ्रष्टाचार वाढले भयंकर अनाचार गरीब जनता त्रस्त होऊनी जाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।   रक्षण नाही स्त्रियांचे      प्रमाण वाढले बलात्काराचे प्रकार घडती विनयभंगाचे हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।   लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची खून पाडती अनेकांचे प्रेमभावना उरली नसे हRead More

July 27, 2014
Visits : 3673

जीवनाच्या रगाड्यातून-   एक आदर्श शिक्षिका   डॉ.देशमुख हे आम्हास Physiology  हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध दोन वेगवेगळ्या विषयावर दोन विश्वविद्यालयांत सादर करुन,  वेगवेगळ्या डॉक्टरेट पदव्या मिळविल्या होत्या.  विषयाचे जरी अथांग ज्ञान मिळाले असले तरी शिक्षकीपेशामध्ये ते अयशस्वी झालेले जाणवले. वर्गांत शिकवण्यासाठी येण्यापूर्वी नोकर १०-१२ पुस्तके टेबलावर ठेऊन जात असे. पुस्तकांत Book-Mark "  ठेवलेले असे. प्रRead More

July 20, 2014
Visits : 1534

कृष्ण कमळ- उदबत्ती एक आत्मसमर्पण   उदबत्तीचा सुगंध    दरवळे चोहोकडे कोठे लपलीस तूं      प्रश्न मजला पडे मंद मंद जळते     शांत तुझे जीवन धुंद मना करिते    दूर कोपरीं राहून जळून जातेस तूं    राख होऊनी सारी तुझे आत्मसमरपण    सर्वत्र सुगंध पसरी तुझेपण वाटते क्षुल्लक    दाम अति कमी आनंदी होती अनेक     जेव्हां येई तूं कामीं लाडकी तूं भक्तांना    तुजवीण पूजा नाहीं प्रफूल्ल करुन चेतना    प्रभू भाव मना येई   डॉ. भगवान नागापूरकर 9004079850 bknagapurkar@gmail.comRead More

July 20, 2014
Visits : 1399

बागेतील तारका-   विजेचे दुःख   चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी सारुनी दूर अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही, प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन 'क्षणिक'  लाभले तिला जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 20, 2014
Visits : 3973

जीवनाच्या रगाड्यातून- प्रेम- अहंकाराचे अंकुरण   संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाड्या बघताना करमणूक होत होती. तसा तो भाग निर्मनुष्य.          अचानक माझे लक्ष वेधलं गेल ते थोड्याशा अंतरावर खेळणाऱ्या कांहीं शाळकरी मुलांवर. पांच सात मुले पळापळी, पकडा पकडी, मस्ती करीत होती. मला त्यांच्या खेळामध्ये थोडासा विचित्रपणा दिसून येत होता. रेल्वेरुळाखाली टाकलेल्या खडीचेRead More

July 13, 2014
Visits : 2886

कृष्ण कमळ- सासरी जाणाऱ्या मुलीस   थांबव गंगा यमुना मुली   आपल्या नयनातल्या हंसण्यात जन्म घातला    मग ह्या कोठूनी आल्या ?   // हांसत गेले जीवन तुझे     फूलपाखरा परी तसेच जाईल भविष्यातें   आशिर्वाद देतो शिरीं   // समजतील दुःखी तुजला    नसता तो तुझा स्वभाव हासून खेळून आनंदाने      फूलवित रहा भाव   // जाणून घे स्वभाव सर्वांचे     रमुन जा संसारी चाली रितीचे पालन करावे     तुझ्याच नव्या घरी   // आई बाबा दुरावले      बाळगु नकोस खंत पाहशील आम्हाला     सासू सासऱ्याच्या रुपांत   //Read More

July 13, 2014
Visits : 1544

बागेतील तारका- जुळे   दोघे मिळून आलां               हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात   दोघांची मिळूनी शक्ति         दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति           यशाची खात्री दिसे   एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे                 प्रकाशमान बनती   ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत   एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची मिळे एकत्र मिळूनRead More

July 13, 2014
Visits : 3464

जीवनाच्या रगाड्यातून-अट्टाहास ?   एक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास लावणारे व परिस्थितीची जाणीव करण्याची गरज वाटण्यास लावते.                मी परिवाहनच्या बस मधून चाललो होतो. अचानक मला एका कामाची आठवण झाली. करण मी ज्या भागातून चाललो होतो, तेथेच माझे काम होते. आता येईल त्या थांब्यावर आपण उतरुन जावे, हा विचार मनांत आला. त्याच क्षणी माझे लक्ष एका बिल्डींगकडे गेले, जेथे मलाRead More

July 08, 2014
Visits : 1206

कृष्ण कमळ- बाबांच्या रुपांत, तुम्ही आहांत काका   शंभर वर्षे जगा तूम्हीं,  काका आमच्यासाठीं बाबांच्या रुपांत रहा,  तुम्ही सर्वांच्या पाठीं   भाऊ तुम्हीं त्यांचे असूनी, रुप लाभले बाबांचे तुम्हास बघतां दिवस आठवती, त्यांच्या सहवासाचे   उशीर झाला होता,  जेंव्हा जीवन उमगले कुणा दाखवूं वाट यशाची, बांबानी तर डोळे मिटले   आंबा गेला मोहरुनी,  लाविली होती त्यांनी झाडे दुर्दैवाने आमच्या, बघण्यास नाही ते फळाकडे   मध्येच सोडूनी गेले, नाटक चालू असतां रंगवूनी बाबांची भूमRead More

July 08, 2014
Visits : 2045

बागेतील तारका-   आशिर्वाद   घक्के देऊन आली   धरणीकंप करुन भावना मनीं चमकली    बनेल ही महान   ।। बालपणाची मुर्ति   गोंडस तुझें भाव तेज चेहऱ्यावरती   घेती मनाचे ठाव   ।। शाळेतील जीवन   दाखवी मार्ग विजयाचे सर्वामध्यें चमकून   प्रमाण मिळे यशाचे   ।। एकाग्रचित्त करुनी   मिळवलेस तूं यश प्रतिष्ठा टिकवूनी   असेच जा सावकाश   ।। विजे सारखी चमकूनी    झेप घे नभांत प्रकाशमान होऊनी   यशस्वी हो जीवनांत   ।। एका गोष्टीची जाण   असावी तुझ्या मनीं मिळण्यास हा मान    पाठीराखे आRead More

July 08, 2014
Visits : 2120

जीवनाच्या रगाड्यातून- एक समाधानी योगदान- --      सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता.   " सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. "  त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले. सहजगत्या घडलेले, सकारात्मक दृष्टीकोणातून केलेले एखादे काम, मानसामध्ये  ऋणानुबंधाची भावना निर्माणRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 29270 hits