Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
June 21, 2011
Visits : 2593

घड्याळ   घड्याळ होते भिंतीवरती टिक टिक करुन चाले सतत दिसली चाल काट्यांची एकाच दिशेने हाले   धावत होता एक तुरु तरु दुजा हळूच धांवे छोटा जाड्या मंद असून पळणे ना ठावे   पळत असती पुढे पुढे समज देतो काळ-वेळेचा किती राहील शिलकीमध्ये प्रवास आपुला जीवनाचा   जीवन चक्रापरि फिरती घड्याळ्यामधले सारे काटे जाणीव करुन देती सतत आपण कोठे अन् जीवन कोठे(कविता)Read More

June 18, 2011
Visits : 3635

एक आदर्श शिक्षिका डॉ.देशमुख हे आम्हास Physiology  हा विषय शिकवणारे प्राध्यापक होते. अतिशय विद्वान. त्यांच्या विषयाचे प्रचंड ज्ञान संपादन केलेले. त्यांनी त्यांचे प्रबंध दोन वेगवेगळ्या विषयावर दोन विश्वविद्यालयांत सादर करुन,  वेगवेगळ्या डॉक्टरेट पदव्या मिळविल्या होत्या.  विषयाचे जरी अथांग ज्ञान मिळाले असले तरी शिक्षकीपेशामध्ये ते अयशस्वी झालेले जाणवले. वर्गांत शिकवण्यासाठी येण्यापूर्वी नोकर १०-१२ पुस्तके टेबलावर ठेऊन जात असे. पुस्तकांत Book-Mark "  ठेवलेले असे. प्राध्यापकांची शिकवण्याची पद्धत आगदीच वेRead More

June 15, 2011
Visits : 2317

लाडक्या नातीस   जन्मापासूनी बघतो तूला परि जन्मापूर्विच ओळखले रोप लावले बागेमध्ये फूल तयाने दिले   चमकत होती नभांत तेंव्हा एक चांदणी म्हणूनी दिवसाही मिळावा सहवास हीच आशा मनी   तीच चमकती गोरी कांती तसेच लुकलुकणे मध्येच बघते मिश्कीलतेने हासणे रडणे आणि फुलणे   चांदणीचा सहवास होता केवळ रात्रीसाठी दिवस उजाडतां निघून गेली आठवणी ठेवून पाठी   नको जाऊस जरी ही इच्छा परि जाशील सोडून दुजा घरी आठवणीसाठा देत जा मजला दिलासा तोच हे समाघान धरी(कविता)Read More

June 14, 2011
Visits : 4024

प्रेम- अहंकाराचे अंकुरण   संध्याकाळची वेळ होती. घराजवळच रेल्वे स्टेशन. तेथे रेल्वे रुळाच्या एका बाजूस असलेल्या दगडावर बसलो होतो. समोर रेल्वेचे ७-८ मार्ग आणि त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वेगाड्या बघताना करमणूक होत होती. तसा तो भाग निर्मनुष्य.          अचानक माझे लक्ष वेधलं गेल ते थोड्याशा अंतरावर खेळणाऱ्या कांहीं शाळकरी मुलांवर. पांच सात मुले पळापळी, पकडा पकडी, मस्ती करीत होती. मला त्यांच्या खेळामध्ये थोडासा विचित्रपणा दिसून येत होता. रेल्वेरुळाखाली टाकलेल्या खडीचे दगड उचलून ते रेल्वेच्याRead More

June 13, 2011
Visits : 1084

मोबदला   एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने   तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं   मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत   भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं  (कविता)Read More

June 09, 2011
Visits : 2847

अट्टाहास ?   एक गमतीचा प्रसंग आठवला. छोटीशी गोष्ट. दैनंदीन जीवनांत घडणारी. तीला आपण सामोरे कसे जातो, ह्यातच अनुभवाची परीपक्वता दिसून येते. असेच प्रसंग आत्मचिंतन करावयास लावणारे व परिस्थितीची जाणीव करण्याची गरज वाटण्यास लावते.                मी परिवाहनच्या बस मधून चाललो होतो. अचानक मला एका कामाची आठवण झाली. करण मी ज्या भागातून चाललो होतो, तेथेच माझे काम होते. आता येईल त्या थांब्यावर आपण उतरुन जावे, हा विचार मनांत आला. त्याच क्षणी माझे लक्ष एका बिल्डींगकडे गेले, जेथे मला जावयाचे होते. समोर  सRead More

June 07, 2011
Visits : 4279

मन तुझे कां गहिवरले ?   भाळी नसता कुंकंम तुझ्या गे विरचक्र हे हातीं आले मरणोत्तर हा किताब मळतां मन तुझे कां गहिवरले ?   शुर विराची अर्धांगिनी तू युद्धभूमिवर त्यास धाडीले ओवाळूनी निरोप देतां मन तुझे कां गहिवरले ?   देश सेवेत कामी यावे ब्रिद त्याचे मनी ठसविले सांगत असतां हेच दुजांना मन तुझे कां गहिवरले ?   सुर्वणाक्षरीं वाचून गाथा आदर्शमार्गी पडतील पाऊले तव रक्ताचे नाते उसळतां मन तुझे कां गहिवरले ?Read More

June 04, 2011
Visits : 2853

एक समाधानी योगदान- --      सकाळची वेळ, अचानक चौघेजण माझ्या घरी आले. त्यांचे चेहरे परिचीत होते. त्यानी पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा आणला होता.   " सर आज आम्ही चौघेही रुग्णालयामधून निवृत्त झालो. आमची नोकरी केवळ तुमच्यामुळेच होती. तुमचा आमच्या जीवनामधील सहभाग आम्ही केंव्हाही विसरु शकत नाही. "  त्यानी ती भेट देत वाकून नमस्कार केला. मी भारावून गेलो. गहीवरलो. माझे डोळे पाणावले. सहजगत्या घडलेले, सकारात्मक दृष्टीकोणातून केलेले एखादे काम, मानसामध्ये  ऋणानुबंधाची भावना निर्माण करु शकतात. हे प्रथमच जाणलRead More

June 01, 2011
Visits : 3382

त्यागवृत्ति   जीवनाच्या सांज समयीं उसंत मिळतां थोडीशी हिशोब केला स्वकर्माचा वर्षे गेली होती कशी   दिवसामागून वर्षे गेली नकळत अशा वेगानें सुख दुःखाच्या मिश्रणीं जीवन गेले क्रमाक्रमानें   आज वाटे खंत मनीं आयुष्य वाया दवडिले ऐहिक सुखाच्या मागे जातां हातीं न कांहीं राहीले   ' घेणे ' सारे आपल्यासाठीं करीत जीवन घालविले ' देण्या '  मधल्या आनंदाला मन सदा वंचित राहिले   सुधारुन घे आतां तरी अनुभवाने चूक आपली उर्वरित वर्षे जाऊं दे त्यागवृत्ति मRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 27014 hits