Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
November 27, 2016
Visits : 1464

गाण्याच्या कलेची किंमत   एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने   तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं   मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत   भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 27, 2016
Visits : 1893

अनुकरण सोडा   अनुकरण करणे हा स्वभाव काय मग म्हणू मी त्याला हो...।।धृ।। स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी निर्णय शक्ती असते मनीं दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो....१, अनुकरण करणे हाच स्वभाव,   काय मग म्हणू मी त्याला हो ... त्याची स्थिती वेगळी होती म्हणून यश पडले हातीं वातावरण निराळे असती तुम्हास सारे हे कळते हो.....२, अनुकरण करणे हाच स्वभाव,  काय मग म्हणू मी त्याला हो ... यशस्वी ठरला कुणी एक जेव्हां केले प्रयत्न अनेक विसरू नका नशीब ठीक जे यशRead More

November 27, 2016
Visits : 1593

पेराल ते घ्याल   शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे  । सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे  ।।   बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे  । निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे  ।।   कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता  । क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता  ।।   शिवीगाळ स्वभाव असतां   आदरभाव कसा मिळे  । शत्रुत्वाचे नाते ठेवतां   सलोख्याचा सांधा ढळे  ।।   इच्छा मात्र असते सुखाची    सRead More

November 27, 2016
Visits : 1699

लोप पावू लागलेली स्त्रीलज्जा   खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत, कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ....१, भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही, नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही...२, कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून, एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून...३, गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे, प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे...४, स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली घराबाहेर पडून पाऊRead More

November 27, 2016
Visits : 2001

कर्तृत्वाला काळ न लागे   सुचले होते सारे कांहीं ,  ढळत्या आयुष्यीं  । संधिप्रकाश दिसत होता,  सूर्य अस्ताशीं  ।१। काळोखाची भिती उराशीं,  लांब आहे जाणे  । कळले नाहीं यौवनांत,  कशास म्हणावे जगणे  ।२। समजून आले जीवन ध्येय,  चाळीशीच्या पुढें  । खंत वाटली जाणता,  आयुष्य उरले केवढे  ।३। विषय सारे अथांग होते,  अवती भवती  । कसा पोहू या ज्ञान सागरीं,  विवंचना होती  ।४। निराश होऊं नकोस वेड्या,  कर्तृत्वाला काळ न लागे  । क्षणांत चमकूनी प्रकाश देणें,  हीच विजेची अंगे  ।५। वर्षा येRead More

November 27, 2016
Visits : 1679

प्रभू मिळण्याचे साधन   ध्येय मिळण्या तुमचे    योग्य लागते साधन कष्ट होतील व्यर्थचे    चूक मार्ग अनुसरुन   ।।   अंतराळातील शोध   महान बुद्धीचे प्रतीक घेण्या अचूक वेध   अवकाशयान असे एक   ।।   अनंत दूरचे तारे   न दिसती डोळ्यानी दुर्बिणीच्या नजरें   बघती सर्व कौतूकानी   ।।   सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ त्याचे मिळण्या ज्ञान   लागते सूक्ष्मदर्शक यंत्र   ।।   यंत्र असे साधन   जाणण्या कांहीं गोष्टी इंद्रियाना मर्यादा असून   न बघे सारी सृष्टी   ।।Read More

November 27, 2016
Visits : 1192

देह – एक महान वस्ती   सात कोटीची वस्ती असूनी,   सुंदर वसले शहर एक  । प्रत्येक जण  स्वतंत्र असूनी,   कार्ये चालती तेथे अनेक  ।।   सुसंगता शिस्तबद्ध    साह्य करिती एकमेकांना  । शत्रूची चाहूल येतां,   परतूनी लाविती त्या घटना  ।।   अप्रतिम  शहर असूनी,   नाव तयाचे असे  'पुरूष'  । 'पुरू' म्हणजेच गाव असूनी,   मालक त्याचा आहे 'ईश  ।।   अशीच अगणित शहरे, या अथांग विश्वाच्या शरीरी  । विधात्याची वास्तूकला,   अप्रतीम अजोड ठरे खरी  ।।   डॉRead More

November 27, 2016
Visits : 1653

दासी मंथरेमधला विकल्प                        रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली. कदाचित् आजच्या अधुनिक विज्ञान युगांत असल्या प्रसंगाना सत्याच्या मोजमापात मान्यता मिळणे कठीण आहे. परंतु जेव्हां कोणत्याही कथानकातील करमणूक व योजना हाच आनंदाचा गाभा असतो, तेंव्हाच त्या प्रसंगाना पुढे पुढे नेत जाणे योग्य ठरते. फक्त घटनेतील मानसिकता उलगडलीRead More

November 20, 2016
Visits : 2431

गीता – जीवनाची एक उकल   रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी जीवनांची तत्वे सांगती       गीते द्वारे श्रीहरी           //धृ//   अर्जुन असूनी महारथी         द्विधा झाली मनःस्थिती सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी    //१// जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी   कुणीही नाही कुणाचे येथे        नाते गोते क्षणिक भासते सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते त्याची तूं आहेस अर्जुनRead More

November 20, 2016
Visits : 2361

गर्भावस्थेतील आनंद   जीवनातील परमानंद,    केंव्हां लाभतो त्या जीवना ? मातेच्या त्या उदरामध्ये,    शांत झोपला असताना ।।१।।   असीम ‘आनंद’ अनुभव,   घेत असे तो जीवात्मा सोsहं निनाद करूनी,   सांगतो मीच परमात्मा ।।२।।   आनंदाने नाचू लागतो,   मनांत येता केंव्हां तरी, मातेलाही सुखी करती,   त्याच्याच आनंदी लहरी ।।३।।   पुढे त्याचे प्रयत्न होती,  मिळवण्या तोच आनंद सुख, दु:खाच्या चक्रामध्ये,   विसरूनी जातो तो नाद ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्कRead More

November 20, 2016
Visits : 1844

मेणबत्ती   जळत होती मेणबत्ती,   मंद मंद प्रकाश देवूनी  । अंधकार भयाण असतां,   भोवताली उजेड पाडूनी...१,   बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं  । असूनी ज्योत मिणमिणती,   त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी....२,   वाटत नाहीं मूल्य कुणाला,   भरपूर पडल्या प्रकाशाचे  । मेणबत्तीची ज्योत शिकवी, साधे तत्त्व जीवनाचे....३   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 20, 2016
Visits : 1792

कवीची खंत   भटकतो आहे कवि   विचारांच्या सागरांत वाहात चालला आहे    व्यवहारी जगांत   आधार नाही त्याला    पैशाच्या शक्तीचा कुचकामी ठरत आहे    प्रयत्न त्याचा जगण्याचा   अर्धपोटी राहात असतो     भाकरीच्या अभावी लिहीत चालला आहे        काव्यरचना प्रभावी   उदासपणे बघतो आहे     " हाऊस फूलची " पाटी लिहीली होती नाट्यगीते     त्यानेच सर्वासाठी   टाळ्यांचा तो कडकडाट       बाहेर ऐकू येई उपाशी होते त्याचे पोट    खिन्नतेने निघून जाई   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क -Read More

November 20, 2016
Visits : 3002

स्वप्न दोष   भंग पावले पाहीजे    स्वप्न माझे रातचे  । तोडणे स्वप्न श्रृंखला   नसे मानवी हातचे  ।। शिथिल गात्र बनती   जाता निद्रेच्या आधीन  । उघडले जाते मग       विचारांचे दालन  ।। किती काळ भरारी घेई   निश्चीत नसे कांही  । विचार चक्र थांबता     स्वप्न दोष तो जाई   ।। रात किड्यानो जागवा    स्वप्नावस्थे मधूनी  । कुकुट कोकीळा येई      मदतीसाठी धावूनी   ।। वाऱ्याची थंड झुळुक    पुलकीत देहा करी  । उषा राणीचे प्रयत्न     यशस्वी सदैव ठरी  ।। प्रयत्न करितो निसर्ग    निद्रावस्थाRead More

November 20, 2016
Visits : 1197

संतुलन   आकाशीं सुर्य तळपला   तेजस्वी त्याची किरणें तप्त करुनी जमिनीला   वाळून टाकी जीवने   ।।   नभीं मेघ आच्छादतां    रोकती रविकिरणे तुफान पर्जन्य पडतां   महापूर त्याचा बने   ।।   सुटतां भयंकर वारा   निघून जाती ढग प्रचंड वादळाचा मारा   पर्जन्य कसे होईल मग   ।।   वादळास अडविती पर्वत   वलय त्याचे रोकूनी सारे करिती मदत   आनंदी करण्या धरणी   ।।   एकाची शक्ती बनते    दुसऱ्यास पुरक निसर्गचक्र शोधते   संतुलन त्यांत एक   ।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४Read More

November 20, 2016
Visits : 2339

क्षण भंगूर जीवन   ठसका लागून प्राण जातो,    घशांत अडकून काही तरी  । क्षणांत सारा खेळ आटपतो,    धडपड केली किती जरी  ।।   हृदय जेव्हा बंद पडते,    उसंत न मिळे एक क्षणाची  । केवळ तुम्हीं चालत असतां,    यात्रा संपते जीवनाची  ।।   कांचेचे  भांडे निसटता,    तुकडे त्याचे होऊन जाती  । देहाचा काय भरवसा,    जेव्हां सांपडे अपघाती  ।।   वाढ करण्या शरीराची,   पडत असती बहूत कष्ट  । क्षणभंगूर  देह असूनी, केव्हांही होऊन जाईल नष्ट  ।।   डRead More

November 20, 2016
Visits : 1686

चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी               रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव  निर्माण होतो. त्याच वेळी    त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.           आगदी बाल वयांतच रामायणातील कथा आपणास सांगितल्या गेल्या. त्यांत भव्यता, दिव्यता, गोडवा, आदर्शता, बरीच करमणूक, अनेक गुंता गुंतीच्या घटनांची उकल होती. त्यातून सर्वास मिRead More

November 13, 2016
Visits : 843

धन्य ती महाराष्ट्र माऊली !   धन्य ती महाराष्ट्र माऊली अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली     //धृ//   ज्ञानाचा तो मुकूटमणी, ग्रंथ रचिला ज्ञानेश्वरी ओवीबद्ध साज प्राकृतीं चढविला, भगवतगीतेवरी तेज चमकूनी सुर्यासम, दाही दिशा उजळली    //१// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   तुकाराम तो संत महान, अभंगाचा राजा हासंत खेळत शिकवली, जीवनातील मजा अभंगाची मधूर सुमने, सर्वत्र तुक्याने ऊधळली     //२// अनेक थोरा जन्म देऊनी पावन तू झाली   संवाद करुन विठोबाशी, नामदेव नRead More

November 13, 2016
Visits : 1515

गर्भातील अभिमंन्यू   श्रीकृष्ण सांगतो सुभद्रेला,   चक्रव्युंहामधली रचना, हुंकार मिळे त्याला,   सुभद्रा झोपली असताना ।।१।।   गर्भामधले तेजस्वी बाळ,   ऐकत होते सारे काही, जाण आली त्याची कृष्णाला,  वळूनी जेव्हा तो पाही ।।२।।   चक्रव्यूहांत शिरावे कसे,   हेच कळले अभिमन्यूला, अपूरे ज्ञान मिळोनी,  घात तयाचा झाला ।।३।।   गर्भामधला जीव देखील,   जागृत केंव्हां होवू शकतो, खरा ज्ञानी तोच असूनी,   सुप्तावस्थेत सदैव असतो ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकरRead More

November 13, 2016
Visits : 898

अणूतील ईश्वर   पदार्थाचे गुण जाणता,  एक गोष्ट दिसून येते, सूक्ष्म भाग अणू असूनी,  त्यांत सुप्त शक्ती असते...१, या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही, अधिक उणे नी सम,  विद्युतमय प्रवाही....२, हेच तत्त्व निसर्गाचे ,  तीन गुणांनी बनले, उत्पत्ती लय स्थिती,  यांनी सर्वत्र व्यापिले...३, ब्रह्मा विष्णू महेश,  प्रतिकात्मक ही रुपे अणूरेणूच्या भागांत,  समावताती स्वरूपे...४, याच विद्युत शक्तीला,  चेतना म्हणती कुणी, अणूरेणूत लपलेली,  ईश्वरमय गुणांनी...५   डॉ. भगवान नागापूरकरRead More

November 13, 2016
Visits : 1426

सूर्योदय   प्रभात झाली रवी उगवला दाही दिशा उजळल्या रात्रीचा अंधार जावूनी नवीन आशा अंकूरल्या   १   बरसत आहे सूर्यकिरणे पृथ्वीच्या भूतली आनंदाने पुलकित होवून धरणीमाता शहारली   २   निघूनी गेला रात्रीचा गारवा त्याच्या आगमानाने उल्हासीत होवून प्राणी जीवन नाचत राही ऊबेने   ३   पुनरपि आता झाले सुरु चक्र जीवनाचे मिळवू आज काही तरी किरण चमकती आशेचे    ४   काळोखाची भयाणता आता गेली निघूनी प्रकाशाच्या मदतीने कामास लागती जोमानीRead More

November 13, 2016
Visits : 2872

पक्षी – मुलातले प्रेम   स्वैर मनानें भरारी घेई,  पक्षी दिसला आकाशीं  । स्वछंदामध्यें विसरला ,  काय चालते पृथ्वीशीं  ।१। एक शिकारी नेम धरूनी,  वेध घेई पक्षाचा  । छेदूनी त्याचा एक पंख,  मार्ग रोखी उडण्याचा  ।२। जायबंदी होवूनी पडला,  जमीनीवरी  । त्वरीत उचलून पक्षाचे,  पाय बांधे शिकारी  ।३। ओढ लागली त्यास घराची,  भेटन्या मुलाला  । आजारी असूनी पुत्र त्याचा,  चिडचिडा तो झाला  ।४। चकित झाला बघूनी मुलाला,  अंगणी खेळतांना  । बघत होता रोज त्याला रडत असतांना  ।५। झाडा वरती दोन पक्Read More

November 13, 2016
Visits : 1680

विजेचे दुःख   चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी सारुनी दूर अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही, प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन 'क्षणिक'  लाभले तिला जीवन   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 13, 2016
Visits : 1397

वातावरण   विचारांची उठती वादळे  । अशांत होते चित्त सदा  ।। आवर घालण्या चंचल मना  । अपयशी झालो अनेकदां  ।।   विषण्णतेच्या स्थितीमध्यें  । नदीकांठच्या किनारीं गेलो  ।। वटवृक्षाचे छायेखाली  । चौरस आसनावरी बसलो  ।।   डोळे मिटूनी शांत बसतां  । अवचित घटना  घडली  ।। विचारांतले दुःख जाऊनी  । आनंदी भावना येऊं लागली  ।।   एक साधूजन ध्यान लावीत  । बसत होता त्या आसनावरी  ।। पावित्र्याची वलये फिरती  । आसन दिसले रिकामें जरी  ।।   वातावरणाची ही किमया  ।Read More

November 13, 2016
Visits : 1736

शांतता ( Silence )   शांतता हा ईश्वरी गुणधर्म आहे. ईश्वरी देण आहे. जसे चैत्यन्य तशीच शांतता. ही मुळ शक्ती समजली जाते. प्रथम निर्माण झाली ती शांतता. नंतर आला तो आवाज (Sound). ह्याचा अर्थ आवाजाच्या निर्मीतीआधी शांतता होती. आवाजाच्या वा ध्वनीच्या नष्ट होण्यानंतर असेल ती पून्हा शांतता. दोन आवाजामधली विश्रांती भरुन काढते ती शांतता. आवाज ऐकण्यासाठी देखील हवी असते शांतता. शांत असाल तरच आवाज ऐकू शकाल. ध्यान धारणा ह्या प्रक्रियेमध्ये शांततेला अनन्यसाधारण महत्व असते. शांतता म्हणजे केवळ वातावरणातील शांततRead More

November 06, 2016
Visits : 411

संधी   गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे   ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी   चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी   धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो   यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचाRead More

November 06, 2016
Visits : 624

जीवन गुलाबा परि   जीवन असावे गुलाबा सारखे, सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।।   सुगंध तयाचा दरवळत राही, मनास आमच्या समाधान होई ।।२।।   नाजूक पाकळ्या कोमल वाटती, सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।।   विसरूं नका ते काटे गुलाबाचे, बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।।   सुखाचे भोवती सावट दु:खाचे, जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क - ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

November 06, 2016
Visits : 453

वेळेची किमया   वेळ येता उकल होते,    साऱ्या प्रश्नांची  । जाणून घ्या तुम्ही,   रीत निसर्गाची...१, जेंव्हां यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी  ।। वेळ नसे योग्य आली,   हेच घ्यावे जाणूनी...२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे  । कांहीं काळासाठी थांबवा,   प्रयत्न सगळे...३, काळ लोटतां प्रयत्न होती,   पुनरपि सारे  । उकल होऊन गुंत्यांची,   आख्खे निघती दोरे...४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल,   ह्या घटनेला  । हीच तर वेळेची किमया,   कशी कळे कुणाला....५Read More

November 06, 2016
Visits : 684

ढोंगी साधू महाराज   सोडत नसतो केव्हाही,  निसर्ग आपुल्या मर्यादा, चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा   १ साधूबाबा महाराज    कित्येक आहेत ह्या जगती नांव घेवूनी प्रभूचे     चमत्कार दाखविती   २ अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा चमत्कार दाखविण्यामध्ये    हात नसतो प्रभूचा    ३ तो महान असूनी     क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी प्रेमभावना घेण्या   कशास पडेल कष्टी   ४ नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या भोंदूनी, दु:खींचे शोषण करती    वाम मार्गानेRead More

November 06, 2016
Visits : 409

उमलणारी फुले   चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मध शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास,  चैतन्यमय त्या लहरी हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी क्षणिक असले जीवन साRead More

November 06, 2016
Visits : 504

आशिर्वाद   घक्के देऊन आली   धरणीकंप करुन भावना मनीं चमकली    बनेल ही महान   ।। बालपणाची मुर्ति   गोंडस तुझें भाव तेज चेहऱ्यावरती   घेती मनाचे ठाव   ।। शाळेतील जीवन   दाखवी मार्ग विजयाचे सर्वामध्यें चमकून   प्रमाण मिळे यशाचे   ।। एकाग्रचित्त करुनी   मिळवलेस तूं यश प्रतिष्ठा टिकवूनी   असेच जा सावकाश   ।। विजे सारखी चमकूनी    झेप घे नभांत प्रकाशमान होऊनी   यशस्वी हो जीवनांत   ।। एका गोष्टीची जाण   असावी तुझ्या मनीं मिळण्यास हा मान    पाठीराखे आहेत इतर कुणी   ।।   डॉRead More

November 06, 2016
Visits : 423

देह ईश्वरी रूप   स्नान करूनी निर्मळ मनीं,    दर्पणापुढे  येऊन बसला  । जटा साऱ्या एकत्र बांधूनी,    भस्म लाविले सर्वांगाला  ।।   ओंकाराचा शब्द कोरला,    चंदन लावूनी भाळावरती  । रूद्राक्षाच्या माळा बांधल्या,    गळा हात नि शिरावरती  ।।   वेळेचे भान विसरूनी,    तन्मय झाला रूप रंगविण्या  । प्रभू नाम घेत मुखानें,   नयन आतूर छबी टिपण्यां  ।।   पवित्र आणि मंगलमय,   वाटत होते स्वरूप बघूनी  । सजविला होता देह त्यानें,   प्रभूचेच एक रूप समजRead More

November 06, 2016
Visits : 815

जन्म-मृत्युचे चक्र.   खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी. माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा घेतल्यामुळे. वेदना झाल्या व मी दुसऱ्या हाताने तीला मारले. मेलेली मुंगी मी झटकून टाकली. मी त्या मेलेल्या मुंगीकडे बघत होतोRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 46516 hits