Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 26, 2015
Visits : 3140

दिवसां दिसणारा चंद्र   रे चंद्रा तू कसा दिसतो,  अवचित या वेळीं, भास्कराच्या साम्राज्यीं,  दूर अशा त्या स्थळीं ।।१।।   कोठे आहेत असंख्य सैनिक,  साथ तुला जे देती, कां असा तूं एकटाच आहे,  दिवसा आकाशांती ।।२।।   शांत असूनी तुझा स्वभाव,  फिरे त्याच्या राज्यांत, एकटाच बघूनी तुजला, लक्ष्य न जाई त्यात ।।३।।   कडक स्वभाव तो भास्कराचा,  नियमानें चालतो, चुकून देखील तुझ्या राज्यीं,  कधी येत नसतो ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 26, 2015
Visits : 1375

एका मनाचे हे भाग   एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक  । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक  ।।१।। छोट्या भागावरी,  वेष्टण शरीराचे  । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे ।।२।। मनाचे स्वभाव,  सारखेच असती  । फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती ।।३।। अगणीत  मनें, कोठे नसे फरक  । अनेक बनली, जनक तिचा एक ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 26, 2015
Visits : 2446

'आनंद '   भावना   ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे 'आनंद ' हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  'सुख '  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते 'दुःख '  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   'आनंद ' भावना असे एकटी नसे तेथे दुजी भावना 'मोक्ष' तयाला म्हणती कुणी आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां   ।।४।।   व्यर्थ जातील प्रयRead More

July 26, 2015
Visits : 3984

सासरीं जाण्याऱ्या मुलीस उपदेश-   कोणते दुःख तुला छळते अकारण  कां व्यथित होते  ।।धृ।। प्रेमळ छत्र पित्याचे असतां गेले जीवन तुझे बागडतां लाड पुरविले आईने तव शिकवीत असतां आनंदी भाव आठव सारे याच क्षणीं ते  ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते बांधून घेतां राखी हातीं आश्वासन तुजला मिळती पाठीराखा भाऊ असूनी येईल तुजसाठीं धावूनी  कसली शंका मनांत येते  ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते संसार भरला सुख-दुःखानी घे शिरावर तुझ्याच समजूनी जीवन मार्गी होता बदल नकोRead More

July 26, 2015
Visits : 981

जीवन ध्येय   ईश्वरी लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळ करी, कुणी न जाणले तयापरी,  हाच त्याचा महिमा ।।१।। जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो, विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी ।।२।। मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन, अध्यात्म्याचे ज्ञान घेऊन,  विश्लेषण करती ईश्वराचे ।।३।। कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक, त्यांत काही ज्ञानीजन ,  चर्चा करीती प्रभूची ।।४।। सत्य परिस्थिती ऐसी,  कुणी न जाणले प्रभूसी, सर्वांची चालना तर्कासी,  ईश्वराच्या अस्तित्Read More

July 26, 2015
Visits : 2405

आमचे खेळ   या मित्रांनो सारे या,    सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे  । मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते  ।।  खेळांना त्या    समजून घ्या- १---  या मित्रांनो सारे या,    हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा  । स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी  ।। एकाच दमात   भिडू मारू या -२--- या मित्रांनो सारे या,    खो खो मध्ये चपळाई      चकमा देण्याची घाई  । उलट सुलट बसे           एकाच रांगेत दिसे  ।।  मिळRead More

July 26, 2015
Visits : 2259

बालपणीची भांडणें   मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें 'मला पाहीजे जास्त',  हेच मुख्य मागणें   इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार   क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें   राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी   बालपणीच्या प्रेमामध्यें,  थोडे भांडणें परवडते चव येण्या पदार्थाला,  तिखटमिठ लागते   लहान असतां भांडून घ्या,  तRead More

July 26, 2015
Visits : 807

भिकाऱ्याची अनमोल मदत !   संध्याकाळी फिरण्यास निघालो. बागेच्या दारापाशी एक ग्रंथ विक्रेत्याचे वाहन उभे होते. विशेष पुस्तकांची विक्री चालू होती. माझी नजर एका दुर्मिळ ग्रंथावर पडली. गेली कित्येक दिवस ते पुस्तक मी मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. प्रकाशक, ग्रंथ भांडार, यांच्याकडून कळले होते कि त्याची नवीन आवृती येण्यास अवधी लागेल. मी ते विकत घेण्यासाठी पाकीट काढले. चार रुपये कमी पडत होते. हतबल झालो. पुस्तक विक्रेता नोकर माणूस होता. गाडी दूर गावची असून, लगेच जाणार होती. जवळपास कुणी परिचित दिसेना. सारे मार्गRead More

July 19, 2015
Visits : 5344

प्रवाही जीवन   वाहत असते जीवन सारे,  वाहने जीवनाचा गुणधर्म, स्तब्ध राहता जीवन आपले,  कसे घडेल हातून कर्म ।।१।।   वाहात होते, वाहात आहे, भविष्याते वहात जाईल, सतत चाले ही क्रिया,  जीवन करण्यास सफल ।।२।।   आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो,  निर्जिव वस्तूसुद्धा प्रवाही, अणूची ती बनली असूनी,  प्रचंड हालचाल आत होई ।।३।।   अणूत असूनी तीन भाग,  अतिशय वेगाने फिरती, केवळ त्यातील वेगामुळे,  स्थिर साऱ्या वस्तू त्या भासती ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknaRead More

July 19, 2015
Visits : 2907

प्रेम नाणे   तसेंच वागा इतरजणांशी,  वाटत असते ,तुमच्या मनीं   । अपेक्षा करता प्रेमाची,  सदैव इतरांकडूनी...१,   सहानूभुतीचा शब्द लागतो,  दैनंदिनीच्या जीवनीं  । क्षणा क्षणाला भासत असते,  जीवन तुमचे अवलंबूनी...२,   प्रेम वाटतां इतरांना, परत मिळते तेच तुम्हांला  । प्रेम नाण्याचे मूल्य जाणूनी चलनांत ठेवा हर घडीला...३,   याच नाण्यांनीं काम बनते, चटकन सारे बघा कसे  । दोन मनें सांधली जाऊनी,  आनंद सर्वत्र दिसत असे...४,   राग लोभ हे शत्रू आपले,  घालऊनी द्यावे तुम्ही त्यांRead More

July 19, 2015
Visits : 2680

आधार   वेलींना आधार होता,  वृक्ष वाटला दणकट परि बुंधा ज्याचा किडूनी गेला,  कोसळणार मग कधीतरी   नष्ट करिल तरूवेलींना,  धरणीवरती आडवा होता सौंदर्य दिले लताफूलांनी,  सारे कांहीं विसरूनी जाता   वेलींनो आणि झुडपानों,   सोडूनी घ्या आधार पोकळ स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या ,  स्वावलंबनाचे टाका पाऊल   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 19, 2015
Visits : 1233

संस्कारमय मन   प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा....१,   मनी आस ती राहत असते,  उचलून त्यास न्यावे शिखरावरती जाता क्षणी,  स्थितीरूप घ्यावे...२,   प्रयत्नात साथ न मिळता,  खाली कोसळते विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते...३,   विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे निर्मळ पवित्र मन ते,  अवलंबूनी विचारे...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 19, 2015
Visits : 2497

पिंडीतील ब्रह्मांड   विज्ञानाने शोधली,    अणुतील प्रचंड शक्ती, प्रथमच जगाला कळली,    अणूंतील उर्जा शक्ती ।।   सूक्ष्म असूनी अणु आकार,    सुप्त शक्ती अंगीं, प्रचंड उर्जा करी साकार,    फोडतां अणु मध्यभागीं ।।   विचार मनीं येई ,    कोठून शक्ती ही आली, निर्जीवातील अणूरेणूला,    कशी उर्जा लाभली ।।   समजोनी घ्या एक,    निसर्गाची श्रेष्ठता, लहान असून देखील,    प्रचंड त्याची योग्यता ।।   जीव देहाचे पिंड,   जीवंततेतील सुक्ष्मता, बाळगी ते ब्रह्मांड,   हीच त्याची महानताRead More

July 19, 2015
Visits : 855

शुद्धीसाठी गुरू   कितीक वेळा धुतला कोळसा, रंग न बदले त्याचा  । उगाळता झिजून जाई, परि काळेपणा कायमचा  ।।१।।   भट्टीत घालून त्यास जाळता, घेई रंग लाल कसा  । शुभ्रपणा हा दिसून येतो, राही न जेंव्हा कोळसा  ।।२।।   मलीनता ही मनामधली, खोल  रूजली असे  । विचारांतील तर्कज्ञान , शुद्धीसाठी पुरे नसे  ।।३।।   गुरू लागतो अग्नी सारखा, चित्त शुद्धी करिता  । ज्ञानभट्टी  पेटवून देई, जाळण्या अशुद्धता  ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagaRead More

July 19, 2015
Visits : 1208

बीज - वृक्षाचे चक्र कुणाचे ?   सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  फळांत असते बीज फिरवी कोण चक्र सहज ?   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 19, 2015
Visits : 1379

स्वाईन फ्लूचा भस्मासुर ! सकाळची देवपुजा आटोपून, दारात टाकलेले वर्तमानपत्र उचलून वाचू लागलो. प्रमुख बातम्यांनी मन विचलीत केले. स्वाईन फ्लू नावाच्या नवीनच उद्भवलेल्या रोगाने सर्व देशात आणि परदेशातही थैमान  घातले होते. अनेकांचे बळी घेतले गेल्याचा वृतांत होता. खिन्न मानाने खिडकीतून उगवणाऱ्या सूर्य प्रकाशाकडे बघत होतो. एक विचार मनामध्ये डोकावला.   मी त्या नारायाणालाच प्रश्न केला.  ” हे परमेश्वरा  काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ?  ” बघ किती माणसे  दगावलीत,  त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? कायRead More

July 12, 2015
Visits : 2227

जागृत आंतरात्मा   कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली हाक त्याची कानी ।।१।। चाळविली न निद्रा शरीरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।। निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले, प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजीले ।।३।। नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।। तोच अचानक जाग येऊनी बघे जगाला, कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला ।।५।। तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी, पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरRead More

July 12, 2015
Visits : 2378

सदैव जागृत रहा   झोप घ्या हो शांत, जागृत राहूनी तुम्ही, विचित्र वाटे ही रित, परि येई तुमचे कामी ...१ विश्रांती लागत असते, गरज म्हणून शरिराला ती तर मिळत नसते, केव्हांही तुमच्या मनाला ..२ चंचलता हा स्वभाव, आहे आपल्या मनाचा, शांत करण्या मना, उपाय नसे झोपेचा..३ एकाच दिशेने धावूनी, मिळवते मन विश्रांती एकाग्र चित्त असणे, उपाय हाच त्यावरती...४ चित्त करूनी एकाग्र, दिशा त्यास या प्रभूसाठीं मिळेल सारे तुम्हां, जागृत राहण्या पोटीं...५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bkRead More

July 12, 2015
Visits : 784

रचली जाते कविता   मिळता मजला बाह्य एकांत,  छळते गर्दी विचारांची, मन गुंतविण्या कुणी नसता,  चलबिचल होते भावनांची...१,   शब्द वर्णांचा घेवून आधार,  भावना काढी मार्ग आपला, आविष्कार घडविण्यासाठी, विचार करितो मदत तिला...२,   शब्दांना नटवी थटवी,  ध्वनी लहरी नि सूर गेयता, अलंकार मिळता अंगी,  रचली जाते एक कविता...३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 12, 2015
Visits : 1412

अजाणता घडलेला अपराध   स्फुर्ती येऊन कविता केली   आनंद झाला मनीं   । चटकन कागदावरी लिहिली   शब्द येतां ध्यानी   ।।   कवितेतील शब्दरचना   झाली बहारदार   । कौतुकाची येई भावना   बघुनी शब्द भांडार   ।।   पूर्ण करुनी कविता    टिपूनी घेतली वहीत   । काव्य रचना परत वाचतां   मग्न झालो आनंदात   ।।   फेकूनी दिला कागद    ज्यावरी रचिली  कविता   । विचारांत होतो धुंद    कृत्य केले मी अजाणतां   ।।   अघटित घटना झाली   काव्य स्फूर्ती गेली निघूनी   । नंतर मजला काव्य सुचेना    बेचैनRead More

July 12, 2015
Visits : 2094

जीवन एक   “जाते”   जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा  । दोन चाकांत येईल,   मोडेल त्याचा कणा  ।।१।।   जीवन मृत्यूची चाके,   सतत फिरत राही  । येई जो मध्ये त्याच्या,   मागे न उरेल काही  ।।२।।   मध्यभागी राही स्थिर,   आंस त्यास म्हणती  । वरचे चाक फिरे,   त्याच्या भोवती  ।।३।।   आंसाजवळील दाणा,   दूर तो चाकापासूनी  । परिणाम चाकाचा तो होईल,   मग कोठूनी  ।।४।।   जन्म मृत्यूची चाके,   ईश्वर हा फिरवतो  । जवळीक त्याची मिळता,   दु:खातूनRead More

July 12, 2015
Visits : 1643

श्रेष्ठत्वात न्युनता विसरते   विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग   नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते   अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी   सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार   आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे   कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती जRead More

July 12, 2015
Visits : 2131

सुप्त शास्त्रज्ञ !   बाबूची आज आठवण आली. संध्याकाळची वेळ होती. मावळत्या सूर्याची उन्हे व पाऊसाची झिम झिम सुरु होती. आकाशात इंद्र धनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसू लागली. बाबू एक चित्रकार होता. निसर्गाचा असला अविष्कार बघितला की त्याच्यातला कलाकार जागा होत असे. तो लगेच दिसणारे चित्र काढण्याचा प्रयत्न करी. बाबू माझा शालेय जीवनामधील मित्र. परंतु गरिबी मुळे  तो फक्त शालेय शिक्षणच पुरे करु शकला.  माझी आवड माझ्या स्वभावाची ठेवण  ही बऱ्याच अंशी त्याच्याशी  मिळती जुळती होती. म्हणून आमच्या दोघांचे बरेच सख्य जRead More

July 05, 2015
Visits : 1259

जागृत आंतरात्मा   कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी, न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।। चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी, नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।। निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले, प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजीले ।।३।। नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले, निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।। तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला, कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला ।।५।। तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी, पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी रRead More

July 05, 2015
Visits : 4847

मुरब्बी   लोणच्याला चव येते,  थोडे मुरल्यानंतर आंबाही स्वादिष्ट लागे,  आंबून गेल्यानंतर....१, विचारांची मजा वाटे,  ऐकता ज्ञानी विचार पक्वपणा त्याच्यातील,  देई आनंदाला धार...२, पक्वपणा येण्यासाठीं,  अनुभवाची भट्टी हवी ज्ञान तेव्हां चमकते,  जेव्हां तर्कज्ञान पाही....३, विचारांत मुरलेला,  मुरब्बी तो असतो अनुभवाच्या शक्तीनें,  योग्य पावूल टाकतो...४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 05, 2015
Visits : 1566

जगदंबे रक्षण कर   विश्वास माझा तव चरणी, भाव अपिर्तो तुझ्यावरी, जगदंबे अवती-भवती, राहून माझे रक्षण करी ... ।। ध्रु ।।   सावध नसे निद्रेच्या काळी, धीर देते राहूनी जवळी, झोपेमध्ये जगा विसरता,  सर्ववेळी तू जाग्रण करी...।।१।। जगदंबे अवती –भवती,  राहून माझे रक्षण करी,   धांवपळीत चाले जीवन,  संकट भोवऱ्यात फिरून दुर्घटनेची चाहूल देवून,  मनास आमच्या दक्ष करी...२ जगदंबे अवती -भवती राहून माझे रक्षण करी,   पसरता दु:खाचा सागर, सुख रत्ने कशी शोधणार, किरण दाखवूनRead More

July 05, 2015
Visits : 1010

प्रकाश आणि तम   प्रकाश आणि अध:कार तो,  दोन बाजू त्या नाण्याच्या सत्व आणि तमोगुणातील शक्ती,  ठरती त्या प्रभूच्या....१ सृष्टी दिसे समोर आपल्या,  नयन ठेवूनी ते उघडे अध:कार तो वाटे आम्हां,  त्याच मिटलेल्या डोळ्याकडे...२ जाण देई तो आंतून कुणी,  प्रकाश तमाच्या आस्तित्वाची आगळ्या नसूनी स्थिती दोन्हीं,  कल्पना ती केवळ विचारांची...३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 05, 2015
Visits : 3642

व्यर्थ झगडे   सारे धर्म मानव निर्मीत त्यांतच आणली जातपात   ।। सर्व धर्म महान तत्वज्ञानाची असे खाण   ।। प्रत्येकाचा धर्म निराळा जन्मताचि मिळाला   ।। व्यर्थ का भांडता धर्मावरुन तो तर मिळाला जन्मापासून   ।। भेदभाव जावे विसरुन त्यातच सर्वांचे कल्याण   ।। स्वधर्म तत्वे पाळा घरांत बाहेर एक मानवधर्म सर्वांत   ।। मानवधर्म फक्त मानवता त्यांतची मानवाची श्रेष्ठता   ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail-  bknagapurkar@gmail.comRead More

July 05, 2015
Visits : 1033

लोपलेले श्रेष्ठत्व   डोळे उघडून बघा तुम्हीं    आपल्या देशाला, महानतेची परंपरा ती    दिसेल तुम्हाला ।।१।। जगातील श्रेष्ठ देश म्हणूनी    नाव होते त्याचे, आज विसरलो महत्त्व सारे    आपल्या पूर्वजांचे ।।२।। दोष असेल त्यांचा कांहीं    सोडून तो घ्यावा, परि अभिमान हा परंपरेचा   मनात ठेवावा ।।३।। डोळ्यांनी जे बघतो सारे    सत्य ते समजता, कर्ण ऐकवी आम्हांस ज्ञान जे    चूक ते ठरविता ।।४।। कित्येक गोष्टीची उकलन होती   वेदामध्ये आपल्या, परि पुराणातील वांगी समजूनी    फेकून त्या दिल्याRead More

July 05, 2015
Visits : 1600

तुला लाभलेली निसर्ग देणगी   खळी पडून गालावरी   सुंदर तूं दिसते, आनंदाचे भाव दर्शनी    मधूर तूं हांसते ।।१।। इवले इवले ओठ      फूलपाकळ्यांपरि, लांब लांब केस काळे   भुर भुर उडती मानेवरी ।।२।। मोत्यासारखे दांत भासे   कुंदकळ्या, बदामाचा आकार मिळे   तुझ्या डोळ्या ।।३।। इंद्रधनुष्याचा बाक      दिसे भुवयाला, चाफेकळीची शोभा मिळाली   नाकाला ।।४।। चमकते अंगकांती    फाटलेल्या झग्यातूनी, दिसते निसर्गाची देणगी   तुझ्या गरीबीतूनी ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-maiRead More

July 05, 2015
Visits : 2078

दहाव्या वाढ दिवसाच्या सदिच्छा   मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे,  काका मामा आत्या मावशी ह्यांच्या कडील मंडळी नातेसंबंधी एकत्र जमली होती. प्रथम आपल्या पद्धतीने दिवा लावला. त्याला ओवाळले गेले. नंतर आधुनिक पद्धतीने केक ठेवला. त्यावरती दहा मेणबत्या लाऊन एकदम फुंकून  विझउन  टाकल्या. टाळ्यांचा कडकडाट Happy  Birth  Day  चे गाणे म्हंटले गेले. फुगे फोडणे, गाणे, नाचणे झाले. सर्वाना खाण्याच्या डिशेस दिल्या गेल्या. आनंदामध्ये सर्वांनी वेळ घालविला. नातRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 65204 hits