Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
May 28, 2017
Visits : 1501

घड्याळ   घड्याळ होते भिंतीवरती टिक टिक करुन चाले सतत दिसली चाल काट्यांची एकाच दिशेने हाले   धावत होता एक तुरु तरु दुजा हळूच धांवे छोटा जाड्या मंद असून पळणे ना ठावे   पळत असती पुढे पुढे समज देती काळ-वेळेचा किती राहीला शिलकीमध्ये प्रवास आपुला जीवनाचा   जीवन चक्रापरि फिरती घड्याळ्यामधले सारे काटे जाणीव करुन देती सतत आपण कोठे अन् जीवन कोठे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 28, 2017
Visits : 1975

बंदीस्त करा मनाला   वातावरणी वस्तू पडतां,   नाश पावते लवकर ती, हवा पाण्याच्या परिणामानें,   हलके हलके दूषित होती ।।१।।   ठेवूं नका उघडयावरती,   वस्तू टिकते निश्चितपणे, दूषितपणाला बांध घालता,   कसे येई मग त्यात उणे ।।२।।   बाह्य जगातील साऱ्या शक्ती,   आघात करती मनावरी, दूषिततेचे थर सांचूनी,   मनास सारे दुबळे करी ।।३।।   देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला, कांहीं न करता येते तेव्हां, राग लोभादी बाह्य गुणाला ।।४।।   डॉ. भगवान नागRead More

May 28, 2017
Visits : 1703

जीवन मार्गातील अडसर   जीवनातील वाटे वरती,  कडेकडेने उभे ठाकले परि वाटसरूंना सारे ते,  यशातील अडसर वाटले...१,   वाट चालतां क्रमाक्रमानें,  बाधा आणून वेग रोकती ध्येयावरल्या उच्च स्थळीं,  पोहचण्या आडकाठी करिती...२,   षडरिपूचे टप्पे असूनी,  भावनेवर आघांत होतो सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो...३,   पवित्र निर्मळ भावनेमध्ये,  रंगाच्या त्या छटा उमटती गढूळपणाच्या वातावरणीं,  सारे कांहीं गमवूनी बसती....४,   थोडे राहता गाफील तुम्ही,  जाळ्यामध्ये अडकूRead More

May 28, 2017
Visits : 486

देह मंदीर   शरीर एक साधन,  साध्य करण्या प्रभूला ठेवूनी ती आठवण,  चांगले ठेवा देहाला...१ व्यायाम व आहार,  असतां नियमित सुदृढ ते शरीर,  असते मग बनत...२ सुदृढ असता देह, करावे मनाला शांत टाळत असतां मोह, न येई तो भावनेत...३ षडरिपू हे विकार,  काढा विवेकांनी निर्मळ ठेवा शरीर,  पवित्रता राखूनी...४ देह आहे मंदीर,  गाभारा तो मन आत्मा तो ईश्वर,  आनंद देई आंतून...५   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 28, 2017
Visits : 654

विनम्रता   लीन दिन ती होवून पुढती, झुकली होती त्यावेळी  । हात पुढे आणि नजर खालती,   ज्यांत दिसे करूणा सगळी  ।।   लाचार बनूनी पोटासाठी,   हिंडे वणवण उन्हांत सारी  । वादळ वारा आणिक पाऊस, संगत घेवून फिरे बिचारी  ।।   मदतीचा हात दिसे, जागृत होता भूतदया   । जनसामान्यात असती मानवतेतील ही माया  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 28, 2017
Visits : 420

हट्टी अनु   एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 28, 2017
Visits : 846

राजमाता कैकयी   अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला  । चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला   ।।धृ।। जेव्हां दशरथ युद्धास जाई  । कैकयी त्याच्या सेवेत राही  ।। राजनीति अन् युद्धनीति ही  । अवगत झाली सारी तिजला   ।।१।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला नजीकच्या त्या देशामधूनी  । रावणादी असुरी शक्ती वाढूनी  ।। सामान्य जनाला जर्जर करुनी  । हा हाः कार तो माजविला   ।।२।। चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला परिस्थितीला जाणून घेतां  । केवळ चौदा वर्षाRead More

May 28, 2017
Visits : 478

मानसिक तणाव    (क्रमशः पुढे ४ वर चालू )                               मी एका बँकेमध्ये गेलो होतो. पैसे काढायचे होते. इतर बरेच जण रांगेत होते. मी कॅशरकडे बघत होतो. पैसे घेणे, पैसे देणे, नोटा भराभर मोजणे, त्या एकत्र बांधणे,  बांधलेल्या गड्यामधून नोटा घेणे, मोजता मोजता गिऱ्हाईकांशी मध्येच बोलणे, फोन मोबाईल घेणे, बोलणे, कुणीतरी कर्मचारी मागून आला तर त्याच्याशी बोलणे. अशी अनेक छोटी छोटी व त्याच्या प्रमुख कामाना व्यत्यय आणणाऱ्या गोष्टी तो सहज करीत होता. हजारो नव्हे लाखोच्या नोटा तो हाताळत होता. कल्पनRead More

May 21, 2017
Visits : 1109

खरा आस्तिक   नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी // चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले // नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी समजूनी ह्याला "अंध विश्वास" , देई फेटाळूनी // आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता // काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति,  देखील ती नाव प्रभुचे त्या वातावरणी,  कुणी न घेती // प्रेमळ त्याचा स्वभाव असRead More

May 21, 2017
Visits : 554

सारेच खेळाडू   खेळाच्या त्या मैदानीं,    रंगात आला खेळ, मुरलेले खेळाडू, आनंदी जाई वेळ ।।१।।   खेळाच्या कांहीं क्षणी,   टाळ्या शिट्या वाजती, आनंदाच्या जल्लोषांत,   काही जण नाचती ।।२।।   निराशा डोकावते,   क्वचित त्या प्रसंगीं, हार- जीत असते,   खेळा मधल्या अंगी ।।३।।   सूज्ञ सारे प्रेक्षक,   टिपती प्रत्येक क्षण, खेळाडू असूनी ते,   होते खेळाचे ज्ञान ।।४।।   मैदानी उतरती,   ज्यांना असे सराव, जीत त्यांचीच होते,   ज्यांच्यात खिलाडू भाव ।।५Read More

May 21, 2017
Visits : 1270

मोहमाया दलदल   दलदल होता चिखल मातीची,  पाय जाती खोलांत प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी ,  न होई त्यावर मात...१, सावध होवूनी प्रथम पावूली,  टाळावे ते संकट मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर,  दिसत नाही वाट....२, मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली...३, जागृतपणाचा अभाव असतां,  गुरफूटूनी जातो मोहमायेच्या आकर्षक गुणाला,  बळी तोच पडतो....४, वेगवान त्या जीवन प्रवाही,  खिळ बसे मोहाने क्षणीक सुखाच्या मागे जातां,  दु:खी होई जीवने....५   डॉRead More

May 21, 2017
Visits : 2089

निसर्गावर अवलंबून   कितीही सारी धडपड करशी लाचार ठरतो अखेरी जाण माणसा मर्यादा तव आपल्या जीवनी परी ... ।। क्षणाक्षणाला अवलंबूनी जीवन असे तुझे सारे पतंगा परि उडत राहते जसे सुटत असे वारे... ।। निसर्गाच्याच दये वरती जागत राहतो सदैव कृतघ्न असूनी मनाचा तूं विसरून जातो ती ठेव... ।। निसर्गाच्या मदती वाचूनी जगणे शक्य नसे तुजला जीवन कर्में करीत असतां आठवित जा त्या प्रभूला...  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 21, 2017
Visits : 1347

निसर्गाचे खेळणे   धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी...१, बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे...२, नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे...३, जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी...४, प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची....५, मृत्यूच्या दाढे मधूनी,  एक सुटून जातां मृत्यूपाश टाकी दुजासाठी, स्वRead More

May 21, 2017
Visits : 1203

मयुरा तूं आहेस गुरु   मयुरा तूं आहेस गुरु,  तुला आम्हीं वंदन करु   ।।धृ।।   नदी कांठच्या वनीं थुई थुई नाचूनी पिसारा फुलवुनी तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु   ।।१।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु   मोरपिसे सुंदर रंग बहारदार दिसे चमकदार बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं   ।।२।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु   रुप डौलदार चाल ऐटदार भासे रुबाबदार बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगीकारुं   ।।३।।Read More

May 21, 2017
Visits : 1635

मर्यादा   मर्यादेचा बांध घालूनी,  मर्यादेतचि जगती सारे  । अनंत असता ईश्वर ,  मर्यादा घाली त्यास बिचारे  ।। जाण जगाची होई इंद्रियांनी,  त्याला असती मर्यादा  । विचार सारे झेपावती,  ज्ञान शक्ती बधूनी सदा  ।। अथांग वाटे विश्वमंडळ,  दाही दिशांचा भव्य पसारा  । ईश्वर आहे थोर त्याहूनी,  मोजमापाच्या उठती नजरा  ।। कशास करीतो तुलना सारी,  भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी  । अज्ञानाने पडती मर्यादा,  अनंत तत्वास त्याच क्षणी  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 21, 2017
Visits : 1323

मानसिक तणाव-   (क्रमशः  पुढे ३ वर चालू-)          एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर चालतो. त्याचे हात दुखू लागतात. त्याला दम लागतो. थकवा वाटू लागतो. कारण तो त्या त्या अवयवावर तान देत असतो.आणि ती अवयवे तसे दर्शवितात.मात्र मेंदूमध्ये प्रचंड वैचारीक क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मेंदूला क्षिणता आली हे लगेच होत नसते. मात्र क्षिण झालेला मेंदू ( Fatigued Brain) त्याचे परिणाम इतरत्र पसरवून इतर अवयवावर परिणाम करतो. त्यालाच ' मानसिक तणाव ' म्हणता येईल.                   आजकालचे वैद्यकिय शास्त्र तर असRead More

May 14, 2017
Visits : 2004

बाळाची निद्रा   चिंव चिंव करुं नकोस चिमणे,  बाळ माझे झोपले काय हवे तुज सांग मला ग,   देईन मी सगळे   कपाट सारे उघडून ठेवले,   समोर ओट्यावरी मेवा समजून लुटून न्यावे,   डाळ दाणे पोटभरी   घरटी बांध तूं माळ्यावरती,   काडी गवत आणूनी कचरा म्हणूनी काढणार नाही,   ही घे माझी वाणी   नाचून बागडून खेळ येथे,    निर्भय आनंदानें परि शांत न बसलीस तूं तर,   जागेल बाळ तान्हें   चिंव चिंव करणे गीत आहे कां ?   अंगाई तुमची गावूनी आपल्या पिल्ला करीतां    रमवी मने त्यांचीRead More

May 14, 2017
Visits : 597

वेळेचे मूल्य   मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे, गमावून टाकी,  जाणूनी फुकाचे ।।१।।   लागत नसते,    दाम वेळेसाठीं, म्हणून दवडे,   अकारणा पोटीं ।।२।।   वस्तूचे मूल्य ते,   पैशांनीच ठरते, परी वेळेची किंमत, कुणा न समजते ।।३।।   वेडे आहोत सारे,    कसे होई मूल्य वेळ जातां मग,   आयुष्य जाईल ।।४।।   आयुष्य खर्चणे, हेच वेळेचे मुल्य ठरते, जीवनांतील यश, त्यावरुन कळते ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmailRead More

May 14, 2017
Visits : 1290

उपयोगीता हेच मूल्य   चष्मा लावूनी करित होतां,  ज्ञानेश्वरीतील पारायण दृष्टीमधले दोष काढले,  चाळशीचा आधार घेवून....१, फूटूनी गेला एके दिवशीं,  चष्मा त्याच्या हातामधूनी पारायणे ती बंद पडली,  दृष्टीस त्याच्या बाध येवूनी...२, चालत असता सरळपणे,  दैनंदिनीचे कार्यक्रम खीळ पाडूनी बंद पाडी,  क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम...३, वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती तोलण्यास ते धन न लागे,  मूल्य मापन जेंव्हां होती....४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 14, 2017
Visits : 528

अपूर्ण जीवन   सोडून दे अहंकार तुझा लाचार आहेस आपल्या परि पूर्ण जीवन तुला न मिळे न्यूनता राहते कांहीं तरी...१ धनराशि मोजत असतां वेळ तुजला मिळत नसे शरीर संपदा हाती नसूनी मन सदा विचलित असे...२ शांत झोपला कामगार तो दगडावरी ठेवूनी डोके देह सुदृढ असूनी त्याचा पैशासाठी झुरतां देखे...३ उणीवतेचा कांटा सलूनी बाधा येत असे आनंदी म्हणून खरे समाधान ते लाभत नसते मग कधी...४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 14, 2017
Visits : 670

त्यागवृत्ति   जीवनाच्या सांज समयीं  । उसंत मिळतां थोडीशी  ।। हिशोब केला स्वकर्माचा  । वर्षे गेली होती कशी  ।।   दिवसामागून वर्षे गेली  । नकळत अशा वेगानें  ।। सुख दुःखाच्या मिश्रणीं  । जीवन गेले क्रमाक्रमानें  ।।   आज वाटे खंत मनीं  । आयुष्य वाया दवडिले  ।। ऐहिक सुखाच्या मागे जातां  । हातीं न कांहीं राहीले  ।।   ' घेणे ' सारे आपल्यासाठीं  । करीत जीवन घालविले  ।। ' देण्या '  मधल्या आनंदाला  । मन सदा वंचित राहिले  ।।   सुधारुन घे आताRead More

May 14, 2017
Visits : 1324

ऊर्जेचा करा योग्य उपयोग   खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता   ।।धृ।।   बागेतील फुले सुंदर फुलपाखरांचे रंग बहारदार मोहक इंद्र धनुष्याकार निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता   ।।१।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता   भजन पुजन प्रभूचे भक्ति-भाव मनाचे उपवास करी देहशुद्धीचे तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता   ।।२।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता   गरिबासी मदतीचा भाव दुःखिRead More

May 14, 2017
Visits : 478

क्षण मुक्तीचा   तपसाधना करूनी मिळवी,  सत्वगुणाची शक्ती अंगी  । त्याच शक्तीच्या जोरावरती,  स्थान लाभे त्यांना स्वर्गी  ।। शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा,  सारे सुख आणि भोग भोंवतीं  । परिणामी तो फेकला जाऊनी,  पुनरपी येई याच भूवरती  ।। एक दया दाखवी ईश्वर,  वातावरणी देऊनी संधी  । जन्म मिळे ते त्याच ठिकाणी,  कमविले पुण्य ज्याने आधी  ।। चक्र खेळ हा चाले सदैव,  स्वर्ग मृत्यू या लोकी त्याचा  । अंतिम ध्येय तेच ठरते,  मिळविणे क्षण तो मुक्तीचा  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

May 14, 2017
Visits : 604

मानसिक तणाव-  (क्रमशः  पुढे २ वर चालू- - -)                दैनंदिनीच्या जीवनामध्ये एक प्रकार दिसून येतो. जेथे Repetition of action होत असते. तेथे काहीतरी खूणा पडतात. गावात बघितले असेल की विहिरीवरील दगडावर घर्षण होऊन दगड झिजून जातो. दगडावर फक्त ज्या ठिकाणी दोर घासली जाते त्याच ठिकाणी खूणा पडतात. मजूर वा शेतकरी कामे करत असताना, हातापायांच्या ठराविक भागी जेथे सततचे घर्षण होत राहते. भाग कठीण होतो. जाडसा होतो अथवा त्याचे पापूद्रे निघून - Pilling Off होत जाते. ह्याचा एकच अर्थ, जेव्हा त्या भागावर सतत त्Read More

May 08, 2017
Visits : 1947

फुलझाडाचे स्वातंत्र   उगवले होते जंगलात ते उंच माळावरी रंग आकर्षक फुलझाडांचे मन प्रसन्न करी // जरी होता उग्रवास तयाला मधूरता आगळी खेचित होते सौंदर्याने फुलपांखरे जवळी // वनराईचा पुष्कराज तो डोलत होता आनंदे ऐकत होता मान हलवूनी कोकिळेची पदें // वर्षा विपूल प्रकाश विपूल आणिक तो वारा स्वच्छंदाचे भाव उमटवित वाढवी स्वैर पसारा// कुणीतरी आला वाटसरु तो घेउन गेला त्याला बागेमधल्या कुंडीमध्ये मान तयाचा झाला // खतपाणी भरपूर असूनी मुंग्या किडे नव्हते आधूनिकतेची दृष्टीRead More

May 08, 2017
Visits : 875

नशीब   का असा धांवतोस तूं ,    नशिबाच्या मागें मागें, यत्न होता भगिरथी,   नशीब येईल संगे ।।१।।   प्रयत्न होतां जोमाने,   दिशा दिसताती तेथें, यशाचे ध्येय सदैव,   योग्य मार्गानें मिळते ।।२।।   प्रयत्न करूनी बघा,  ईश्वर देखील मिळेल, इच्छा शक्ती प्रभावानें,    नशीबही बदलेल ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 08, 2017
Visits : 893

कवच   आघात होवूनी परिस्थितीचे,  सही सलामत सुटत असे संकटाची चाहूल लागूनी,  परिणाम शून्य तो ठरत असे...१, दु:खाची ती चटकती उन्हे,  संरक्षणाची छत्री येई कोणती तरी अदृष्य शक्ती,  त्यास वाचवोनी निघून जाई....३, दूर सारूनी षडरिपूला,  मनावरती ताबा मिळवी प्रेमभाव तो अंगी करूनी,  तपशक्तीला सतत वाढवी...३, तपोबलाचे बनूनी कवच,  फिरत होते अवती भवती दु:खाचे ते वार झेलूनी,  रक्षण त्याचे सदैव करिती.....४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 08, 2017
Visits : 2159

काळाची झडप   डोक्यावरी घिरट्या घालीत,  काळ सदा फिरतो वेळ साधतां योग्य अशी ती,  त्वरित झेपावतो...१ भरले आहे जीवन सारे,   संकटांनी परिपूर्ण घटना घडूनी अघटीत,  होऊन जाते चूर्ण...२ फुलांमधला रस शोषतां,  फूल पाखरू नाचते झाडावरती सरडा बसला,  जाण त्यास नसते...३ आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला अपघात घडतां उंचावरी,  नष्ट करे सर्वाला...४ खेळी मेळीच्या वातावरणी,  हसत गात नाचते ठसका लागून कांहीं वेळी,  हृदय बंद पडते...५, सतत जागृत असता तुम्हीं,  टाळता येई वेळ सावध तुमचे चितRead More

May 08, 2017
Visits : 1088

मेघ गर्व हारण   अंहकाराचा पेटून वणवा,  थैमान घातिले त्या मेघांनी तांडव नृत्यापरि भासली,  पाऊले त्यांची दाही दिशांनी...१, अक्राळ विक्राळ घन दाट,  नी रंग काळाभोर दिसला सूर्यालाही लपवित असता,  गर्वपणाचा भाव चमकला...२, पृथ्वीवरती छाया पसरवूनी,  चाहूल देई आगमनाची तोफेसम गडगडाट करूनी,  चमक दाखवी दिव्यत्वाची...३, मानवप्राणी तसेच जीवाणे,  टक लावती नभाकडे रूप भयानक बघून सारे,  कंपीत त्यांची मने धडधडे...४, त्याच वेळी वादळ सुटूनी,  देह घनाचा टाकी विखरूनी गर्व हरण होऊन जाता,  अश्रू पडतीRead More

May 08, 2017
Visits : 1477

जीवन मरणाची शर्यत   शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली,  हा विचार आला मनी जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत भक्ष्येRead More

May 08, 2017
Visits : 1367

प्रेमाचा उगम   दाखवू नकोस प्रेम तुझे उपरेपणाच्या भावनेने  । तसेच मिळेल परत तुला केवळ वाणीच्या शब्दाने  ।। कंठामधूनी भाष्य निघाले आदळे कर्णपटावरी  । प्रेमाचा बघूनी ओलावा परिणाम होई मनावरी  ।। शब्द निघता हृदयामधूनी झेप घेई हृदयस्थरावरी  । आत्म्याची तळमळ भिडते आत्म्याच्या गाभ्यावरी  ।। खोलवर आणिक जाता ईश्वर बिंदूत विलीन होतो  । सत्याचा शोध लागूनी आनंदाचा पाऊस पडतो  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 08, 2017
Visits : 547

प्रिय वाचक - - -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.    मानसिक तणाव -२   (हा लेख क्रमशः आहे )                                   माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.        अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.  शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे  ही संकल्पना. अदृष्यRead More

May 02, 2017
Visits : 2167

भूतदया जागविली चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली   वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे   घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा   भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला   काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो त्याच चिमण्या तसेच घरटे     पाहून चकित झाRead More

May 02, 2017
Visits : 1197

विष्ठा   विष्ठा बघूनी थुंकलो,   घाण वाटली मजला, अमंगल संबोधूनी,   लाखोली देई तिजला  ।।१।।   संतापूनी मजवर , कान उघडणी केली, तुझ्याचमुळें मूर्खा मी,   अमंगळ ती ठरली।।२।।   आकर्षक रूप माझे,   लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी,   केले सारे तूंच फस्त ।।३।।   परि मिळतां तुझा तो,   अमंगळ सहवास, रूप माझे पालटूनी,   मिळे हा नरकवास ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 02, 2017
Visits : 2084

काजळी धरल्या वाती   तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना, शांत जळते केंव्हां तरी,  भडकून उठते कधी कधी फडफड करित मंदावते,  इच्छा दाखवी घेण्या समाधी जगदंबेच्या प्रतिमेवरती,  प्रकाश टाकूनी हास्य टिपते हास्य बघूनी त्या देवीचे,  चरण स्पर्शण्या झेपावते अजाणपणाच्या खेळामधली,  स्वप्न तरंगे दिसूनी येती दिव्यामधले तेल संपता,  काजळी धरल्या दिसे वाती   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 02, 2017
Visits : 2113

शांततेचा शोध   मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे । मन तुम्हांला । बोचती काटे । घेता तिजला ।। बाह्य असूनि  । त्वरित दिसे । चंचल मन । तिजला फसे ।। अशांती मनीं । येता तुमचRead More

May 02, 2017
Visits : 1238

नियतीचा फटका (भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)   एक भयानक रात्र अशी,  सहस्त्रावधींचा घेई बळी  । नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी  ।। मध्यरात्र  होवून गेली, वातावरण  शांत होते  । गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते  ।। तोच अचानक विषारी वायू,  पसरला त्या वातावरणी  । हालचालींना वाव न देता,  श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी  ।। कित्येक जनांचे बळी घेतले,  सुलभ रितीने काळाने  । शांत निद्रेची महा निद्रा,  करूनRead More

May 02, 2017
Visits : 1616

कलेचे खरे मुल्य   पर्वत शिखरीं जाऊन    खोदून आणली माती कौशल्य पणास लावून   केला मी गणपती   ।।१।।   मुर्ती बनली सुरेख    आनंद देई मनां दाम मिळेल ठिक   हीच आली भावना   घेऊन गेलो बाजारीं   उल्हासाच्या भरांत कुणी न त्यासी पसंत करी   निराश झालो मनांत   बहूत दिवस प्रयत्न केला    कुणी न घेई विकत कंटाळून नेऊन दिला    गणपती मी शाळेत   भरले होते भव्य प्रदर्शन   हस्तकला कौशल्याचे नवल वाटले गणपती बघून   दालनातील सुरवातीचे   चकीत झालो जाणूनी    मिळाला राष्ट्रीय पुरस्कारRead More

May 02, 2017
Visits : 1240

संशयाचे भूत   हे भूत संशयाचे छळते कसे मनाला  । करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला  ।। एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे  । डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते  ।। गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा  । कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा  ।। येता मनी संशय आपलाच ज्या घडीला  । शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

May 02, 2017
Visits : 947

प्रिय वाचक - - -मानसिक तणाव ही लेखमाला मी आपणासाठी क्रमशः आठ भागात देत आहे. कृपया आपला अभिप्राय द्यावा. धन्यवाद.    मानसिक तणाव  -1   (हा लेख क्रमशः आहे )                                   माणसाच मन अतिशय चंचल आणि प्रचंड वेगवान असते.        अस्तित्वात असलेल्या ज्ञानानुसार त्याचा वेग, प्रकाश वेगापेक्षा कितीतरी जास्त असतो. त्याची मोजमाप कुणीही करु शकत नाही.  शरिरातील सर्व अवयवांचा शोध लागला, परंतु मन हा अवयव म्हणून सापडले नाही. ते एक विचारवाहक म्हणून आहे  ही संकल्पना. अदृष्यRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 49043 hits