Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
December 31, 2011
Visits : 5318

जन्म-मृत्युचे चक्र.   खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी. माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा घेतल्यामुळे. वेदना झाल्या व मी दुसऱ्या हाताने तीला मारले. मेलेली मुंगी मी झटकून टाकली. मी त्या मेलेल्या मुंगीकडे बघत होतRead More

December 26, 2011
Visits : 3669

बीज वृक्षाचे चक्र कुणाचे ?   सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार कोण देई हा आकार ? तूं तर दिसत नाही कुणाला,  घडते मग  कसे ? कोण हे घडवित असे ? प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष कोण देई ह्यांत लक्ष ? त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत ही किमया असे कुणांत ? तोच वृक्ष वाढूनी फळे देतो,  फळांत असते बीज फिरवी कोण चक्र सहज ?     डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०Read More

December 22, 2011
Visits : 3157

नाजूक वेली   नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   //धृ// हिरवी साडी अंगावरी      खडी रंगीत किनारी ठिपके चमकती पांढरे       त्या साडीवरती पसरे आकर्षक साडी नेसली   //१// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   शरीर तुझे बांकदार      रुप तुझे मनोहर चपळाईने तूं वाढते       दूर जाण्या झेपावते वाकड्या चालीत शोभली  //२// नाजूक नाजूक वेली मनीं तु माझ्या बसली   मिष्किलपणें तूं हासते      विनम्रतेने वाकून जाते पसरवूनी तुझा सुगंध       करी सर्वाना तूं धुंद राणी ठरतेस बागेमRead More

December 18, 2011
Visits : 2969

बाळाची भिती   खेळत होता बाळ अंगणीं    इकडूनी तिकडे मेघनृत्य ते बघत असतां    दृष्टी लागे नभाकडे उलटी सुलटी कशी पाऊले    घनांची पडत होती लय लागून हास्य चमकले     त्याच्या मुखावरती तोच अचानक गडगडाट झाला    एक नभांत दचकून गेले बाळ तत्क्षणी     होऊन भयभीत धावत जावून घरामध्यें    आईला बिलगले वाचविण्या त्या भीतीपासून     पदराखालीं दडले जरी थांबला गडगडाट    भीती कायम होती आवाजाचे नाद अद्यपि    कानीं त्याच्या घुमती भीतीने नजिक चिकटला    आईच्या जवळीं धडकन ऐकूRead More

December 14, 2011
Visits : 2860

आई कशासवे तुलना करुं गे आई, तव प्रेमाची कां शब्द न सुचतां म्हणू तुजला, ' प्रेमची ' वात्सल्याची देवता, करुणा दिसे नसानसातूनी हात फिरवीता ज्याचे वरती, ह्रदय येते उचंबळूनी जेव्हां पडते संकट, आठवण करितो आपली आई विश्वासाचे दोन शब्द, उभारी त्यासी देई नऊ मास असता उदरीं, शक्ति तेज आणि सत्व देई ते ह्याच ईश्वरी गुण बिजानी, वाढ तयाची होऊन जाते रक्ताचे नाते असतां, प्रेम बंधन दिसे ते काटा रुजतां तुमच्या पायी, डोळ्यांत तिच्या पाणी येते धन दौलत ही असता हाती, मिळेल तुम्हां सारे कांही आई तुमचRead More

December 10, 2011
Visits : 2628

कन्येस निराश बघून   कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटी झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं झेप तुझी आणि झेप आमची,  विसंगत राही असे उमलणारे फूल उद्याचे, तूं एक कळी धन संपत्ती परकिया करतां, आम्हा जवळी होऊं शकते उणीव त्यांत, कधीं असता आपले हेच मग दुजाचे समजतां, मन चरकलेRead More

December 07, 2011
Visits : 4122

हे देवकी माता ! काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला // राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले // कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी // ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस जनकल्याणा त्यागूनी तRead More

December 03, 2011
Visits : 2383

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार . वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो. मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो. चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचारRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 27106 hits