Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
October 18, 2017
Visits : 5

मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   ईश्वराने शरीर दिलय,  ते मला वाढवायच मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ?   //धृ// **   शेजारचा छेड छाड करतो पोलिस स्टेशनला तक्रार करण्यास गेली पोलिसानेच बलात्कार केला म्हणून रडत घरीं आली रक्षक हाच भक्षक झाला   तर संरक्षण कुणाला मागायचं   //१// मी कसा जगू आता ?, ते तुम्हीच ठरवायच ? **    बापाने दिलेल्या फ्लॅटवर घर बांधण्याची योजना आखली नगरपालिकेच्या परवानग्या, ह्यातच जीवनाची कमाई संपली माझ्या श्रमाचा पैसा, दुजा खर्चताRead More

October 18, 2017
Visits : 3

लाडक्या नातीस   जन्मापासूनी बघतो तुला, परि जन्मापूर्वीच ओळखले, रोप लावले बागेमध्ये, फुल तयाने दिले ।।१।।   चमकत होती नभांत तेंव्हा, एक चांदणी म्हणूनी, दिवसाही मिळावा सहवास, हीच आशा मनी ।।२।।   तीच चमकती गोरी कांती, तसेच लुकलुकणे, मध्येच बघते मिश्कीलतेने, हासणे रडणे आणि फुलणे ।।३।।   चांदणीचा सहवास होता, केवळ रात्रीसाठी, दिवस उजाडतां निघून गेली, आठवणी ठेवून पाठी ।।४।।   नको जाऊस जरी ही इच्छा, परि जाशील सोडून दुजा घरी, आठवणीRead More

October 18, 2017
Visits : 4

स्वयंचे विस्मरण   बाह्य जगीं प्रभूसी शोधतो,   विसरे जेव्हा ' अहं ब्रह्मास्मि ' कांही काळची विस्मृती ही, ईश्वर चिंतनाच्या येई कामी...१, शरिर जेव्हां रोगी बनते,  सुदृढतेची येई आठवण प्रकाशाचे महत्त्व वाटते,  बघूनी अंध:कार भयाण...२, चालना देयी विस्मरण ते,  शोध घेण्या त्याच शक्तीचे उकलन होते मग प्रभूची,  स्मरण होता अंतर्यामीचे...३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 18, 2017
Visits : 5

न्याय देवते   कुठे तु गेलीस न्याय देवते,  जगास सोडूनी याच क्षणी  । अन्यायाची कशी मिळेल मग,  दाद आम्हाला या जीवनी  ।। परिस्थितीचे पडता फेरे,  गोंधळूनी गेलीस आज खरी  । उघड्या नजरे बघत होती,  सत्य लपवितो कुणीतरी  ।। दबाव येता चोहबाजूनी,  मुस्कटदाबी होती कशी  । शब्दांना परि ध्वनी न मिळता,  मनी विरताती, येती जशी  ।। बळी कुणाच्या पडली तू गे,  मार्ग रोखीले तुझे कसे ते  । अपयश येता सत्यालाही,  म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’  ।। आज न आले यश जरी,  न्याय येईल उफाळूनी  । अंतिम वRead More

October 18, 2017
Visits : 4

निरोप   तिक्ष्ण दृष्टी दे घारीसम, देवा तिजला  । दूरवर बघत राहीन, ती लेकीला  ।। लेक चालली निरोप घेवूनी, सासरी  । भरल्या नयनी माय उभी, शांत दारी  ।। जड पावले पडता दिसती, लेकीची  । ओढ लागली त्याच पावलांना, मायेची  ।। उंचावूनी हात हालवीत, चाले  लेक  । जलपडद्यामुळे दिसे, तीच अंधूक  ।। वाटेवरूनी जाता जाता, दृष्टीआड झाली  । अश्रूपूसून पदराने, माय घरात आली  ।। दूर गेले ते पाखरू, आकाशी उडून  । स्वैर जगण्या, आपलेच पंख फूटून   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurRead More

October 18, 2017
Visits : 3

कोण आहेस तूं कृष्णा ?   सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ? ।।धृ।।   जीवन तूझे 'बहूरंगी' सर्व क्षेत्री अग्रभागीं आवडतोस तूं सर्वाना   ।।१।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   दहीं दूध खाई लपून तूप लोणी नेई पळवून 'खादाड' वाटलास सर्वांना   ।।२।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   फळे चोरली बागेमधली गोपींची शिदोरी नेली 'चोर' वाटलास सर्वांना   ।।३।। सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा  ?   गौळणीचे उचली कपडे दगड मारुनी मटकी फोडे 'खोडकर' वाटलासRead More

October 18, 2017
Visits : 3

नाम मार्ग   ईश्वर आहे नामांत परि,  नाम कुणाचे घेता? विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां   ।।      असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान  । कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण  ।। आठवणीतच तो लपला आहे,  दिसत नाही कुणा  । रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना  ।। रंग रूप आणि आकार देणे,  असते सोई साठी  । एकाग्र करण्या चंचल चित्ता,  सारे कामी येती  ।। निर्गुण निराकार भासतो, एकाग्र होता चित्त  । नाम मार्ग हे लय आणूनी, हेच असते  साधीत  ।।   डॉ. भगवान नागापRead More

October 18, 2017
Visits : 3

समज आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म रक्षण व देवाची सेवा हे जणू त्यांचे ब्रिद होते. सारे ज्ञान फक्त कुणाकडून ऐकलेले, वा साधारण पुस्तके वाचलेले. अनुभव संपन्नता त्यांत मुळीच नव्हती. कोणतेही धर्माचRead More

October 08, 2017
Visits : 827

परावलंबी   जीवन हर घडिला अवलंबूनी तू, आहे दूजावरी व्यर्थ मग कां अभिमान, बाळगतोस उरी नऊ मास होता गर्भामध्यें, जेंव्हा आईच्या शोषण केले अन्न सारे, रक्तामधूनी तीच्या माता पित्याच्या कष्टाचा तो, घाम गळत होता तुझे बालपण फुलविण्या,  ओलावा देत होता घर गृहस्थीचे सुख भोवतीं,  पत्नी मुला पासूनी समाधान ते मिळतां तुजला, गेला बहरुनी वृद्धत्वाला काठी लागतें, स्थिरावण्या तोल सदा हातभार तो देईल कुणी, विवंचना हीच अनेकदा मृतदेह जर तसाच पडला,  किडे मुंग्या खाती त्याही क्षणी मदतRead More

October 08, 2017
Visits : 827

देहातील शक्ती   नासिकेसमोर हात ठेवा,    लागेल तुम्हां गरम हवा, थंड हवा आंत जाते,   गरम होऊन बाहेर येते ।।१।।   अन्न पाणी घेतो आपण,   ऊर्जा निघते त्याच्यातून, आत्म्यापरि फुगते छाती,   हवा आंत खेचूनी घेती ।।२।।   आतल्या ज्वलनास मदत होते,   उष्णता त्यातून बाहेर पडते, भावना जेंव्हा जागृत होती,   रोम रोम ते पुलकित होती ।।३।।   अवयवे सारी स्फुरुन जाती,   देहामधूनी वीजा चमकती, धनको ऋणको विद्युतसाठे,   अलग अलग दिसती मोठे ।।४।।   विजातीय लिंग येतां जवळी,   परिणाम दिसे विजेचRead More

October 08, 2017
Visits : 827

खरी शांतता   वाटत होता शांत मला तो,  बघुनी त्याच्या हालचालींना शिस्तबद्ध ते जीवन असूनी,  हास्य उमलते त्याच्या मना....१, अल्प बोलणें अल्प चालणें,  आहार तोहीं अल्पची घेणे प्रभू नाम ते मुखी असूनी,  चिंतन त्याचे सतत करणे....२, संघर्षाला टाळीत होता,  परिस्थितीशी जुळते घेवूनी वातावरण ते शांत ठेवण्या,  प्रयत्न चाले लक्ष देवूनी...३, अहंकार तो सुप्त असूनी,  राग न दाखवी चेहऱ्यावरी जगण्याचे ते प्रेम बघूनी,  मोहाचे वेष्ठन दिसे शरिरी...४, दाबता साऱ्या षढरिपूंना,  बेगडी शांततRead More

October 08, 2017
Visits : 1051

दुर्बल मन नको   सारेच आहेत दुबळे    कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे    जे सबळ समजती  ।।१।। विचार मनी येतां     दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां    हार तुमची झाली ।।२।। मनाची सबलता    हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह    दुर्बल असतां मन ।।३।। सुदृढ देह व मन     यांची मिळून जोडी जीवनातील यश    तुमच्या पदरीं पाडी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 08, 2017
Visits : 820

प्रथम शाहाणा कर   अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी  । मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी  ।। ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझे ठायी  । भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येत नाही  ।। निर्धनासी धन मिळता,  जाई हर्षूनी  । हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी  ।। माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण  । गैरउपयोग होई शक्तीचा,  नसता सामान्य ज्ञान  ।। शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता  । वेड्यापरी कोठेही पळतील मर्यादा सोडता  ।। जाण आहे एकची मजला, तुझ्या शक्तीची  ।Read More

October 08, 2017
Visits : 618

श्री कृष्णाच्या हातांतील जादू   हे घनश्यामा श्रीकृष्णा कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   ।।धृ।।   बोटे फिरवूनी मुरलीवरी सप्तसुरांची वर्षा करी सर्वा नाचवी तालावरी रंगून जाती हे श्रीहरी बोटांमधली किमया तुझी,    नाहीं कळली कुणा   ।।१।। कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहना   बोटांत बोटे गुंतवी राधेला तूं नाचवी गोपींना तूं गुंगवी गोपांना तू खेळवी कशी लागते ओढ तुझी,    कळले नाही सर्वाना   ।।२।। कोणती जादू तुझ्यां हातीं    सांग रे मनमोहनाRead More

October 08, 2017
Visits : 816

नामस्मरणाचे कोडे   मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे, कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ? कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ ।।   श्वास चालतो रात्रदिनीं, लक्ष्य न  घेई खेचूनी, ऊर्जा मिळते देहातूनी, परि मनास बंधन नसावे....१,  कोडे हे उकलून घ्यावे   एकचि कार्य एके क्षणी, एकाग्रता येई दिसूनी, अवसर मिळे मग कोठूनी, त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२, कोडे हे उकलून घ्यावे,   संसाराचे ‘जू’ मानेवर, ओढण्यासांगे ईश्वर, मार्ग सारे असता खडतर, कसे त्यRead More

October 08, 2017
Visits : 626

'Percussion '     एक वैद्यकीय तपासनी पद्धत   विचार करणे हे मेंदूचे अत्यंत महत्वाचे कार्य.  त्यातही कांही व्यक्ती सतत नाविन्याचा विचार करीत असतात. निसर्ग कोणतीही गोष्ट तुमच्या समोर सोडून देतो. फक्त विचारवंतच त्याच प्रथःकरण करुन ती कोणती गोष्ट आहे, कां आहे, व त्याचा सर्वसामान्यासाठी कांही उपयोग होऊ शकेल कां ह्याचा विचार करतात. त्यानाच आपण महान, तत्वज्ञानी वा शास्त्रज्ञ म्हणतो. तुमच्या आमच्या सारखीच ती साधी माणसे. कांही वेगळी नसतात. परंतु सदैव सतर्कता व चौकसपणा बाळगुण असतात.              झाडाRead More

October 01, 2017
Visits : 308

मुक्तीसाठीं   रुजला पाहीजे    विचार मनांत सारेच प्रभुचे    असे ह्या जगांत   जो वरी आहे मी   माझे येथे असे त्या क्षणापर्यंत  स्वार्थ मनीं वसे   स्वार्थयुक्त मन   मुक्त होत नसे मुक्ती येई पर्यंत   पुनर्जन्म असे   बिंबता मनांत   माझे नाहीं कांहीं प्रभूचे समजता   आत्मा मुक्त होई   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 01, 2017
Visits : 1035

लाडकी चांदणी    एक चांदणी रोज बघे मी,      क्षितीजावरती, चमचम चमके, मिश्कील हासे,       लक्ष्य खेचून घेई ।।१।।   वाट बघे मी रोज रात्रीची,      बघण्या तिजला, दिवसभराचा विरह तिचा,           नाही सहन झाला ।।२।।   जवळी येउनी माझ्यासंगे,        खेळ तू अंगणी, होकार दिला चटकन तिने,         किंचित हास्य करुनी ।।३।।   नंतर मजला रोजच्या जागी,        पुन्हा न ती दिसली, सहवासातील वियोगाचा,          चटका लाऊन गेली ।।४।।   नजर पडता नातीवरी,Read More

October 01, 2017
Visits : 835

तयांना मृत्यूची वाटे भीति   अस्तित्वशक्तीला बाधा येणें,  अति भयंकर घटना ती तयांना मृत्यूची वाटे भीति....।।धृ।।   गरिबीत जगती कित्येक, भ्रांत पाडे ती भाकरी एक जगण्यासाठीं झगडा देती,  तयांना मृत्यूची वाटे भीति....१,   आरोग्याला धक्का बसतां शरिर जर्जर होवूनी जातां देह तारण्या धडपड होती,   तयांना मृत्यूची वाटे भीति....२,   समाज रचना बघा कशी, लौकिक जाई तो राही उपाशी कुणी न दाखवी सहानुभूती,   तयांना मृत्यूची वाटे भीति...३,   प्रवास करिता वाहनातूनीRead More

October 01, 2017
Visits : 860

स्मृति   जीवनाचा प्रवाह हा    भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं    काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर    रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा    आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी    विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित    जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो    जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.comRead More

October 01, 2017
Visits : 646

जखमांचे वण   किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे. पण सांगा रडून कुणाला ? कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे... निमRead More

October 01, 2017
Visits : 432

निसर्गाचे चक्र   सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे उत्पत्ति स्थीति लय ह्या कालकृमणाचे  ।।धृ।। एक एक पाकळी लहानशी कळी जाई उमलून फूल त्याचे बनून सुगंधी टपोरे फूल कांही वेळ राहील कोमेजून जाई देऊनी रुप बीजाचे परत अंकूरण होई दुजा एका झाडाचे  ।।१।। सतत फिरत राहते चक्र निसर्गाचे एक एक पाऊल टाकते मुल वाढते हसून बनते यौवन एटदार तो दहधारी कांही काळाची उभारी देह होई विलीन पेटवूनी दिवे वंशाचे होई अवतरण नव्या एका मानवाचे   ।।२।। सतत फिरत राहते चक्Read More

October 01, 2017
Visits : 817

रामाची व्याकूळता   सीतेकरीता व्याकुळ झाला अवतारी चक्रपाणी, अजब ही रामप्रभू कहाणी  ।।धृ।।   पत्नीहट्ट त्याला सांगे, कांचनमृग शोभेल अंगे, मृगयेच्या तो गेला मागे प्रसंग घेई रावण साधूनी  ।।१।। अजब ही रामप्रभू कहाणी   रावण नेई पळवूनी सीता दिसेना रामा कोठे आता तरुवेलींना पुसत होता वाहत होते अश्रू नयनीं   ।।२।। अजब ही रामप्रभू कहाणी   वाणी ज्याच्या शक्ती शिवाची ह्रदयामाजी दया सागराची त्यालाही दिसे नियती खेची सामान्यतेच्या मापी तोलूनी   ।।३।। अजब हीRead More

October 01, 2017
Visits : 230

खानदानी   मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर गप्पा मारीत बसलो. समोर बागेत दोन्ही नातवंडे खेळत होती. अचानक आमचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ते त्यांच्या भांडणामुळे. दोघेही हामरी तुमरीवर येऊन वाद विवाद व त्यांत मारामारी करु लागले. गणपत बेचैन झाला. तो लगेच उठून त्यांना आवरण्यासाठी जाऊ लागला. पण मी त्याला रोकले. " आरे जाऊ दे . मुले आहेत ती. भांडू देत त्याना. थोडीशी मस्ती करतील व शांRead More

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 11605 hits