Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

खरी शांतता

October 08, 2017

Search by Tags:  कळप

खरीशांतता

वाटतहोता शांत मला तो, बघुनी त्याच्याहालचालींना

शिस्तबद्ध तेजीवन असूनी, हास्य उमलते त्याच्यामना....,

अल्पबोलणें अल्प चालणें, आहार तोहींअल्पची घेणे

प्रभू नाम ते मुखीअसूनी, चिंतन त्याचे सततकरणे....,

संघर्षालाटाळीत होता, परिस्थितीशी जुळतेघेवूनी

वातावरण ते शांत ठेवण्या, प्रयत्न चाले लक्ष देवूनी...,

अहंकारतो सुप्त असूनी, राग न दाखवीचेहऱ्यावरी

जगण्याचे ते प्रेमबघूनी, मोहाचे वेष्ठन दिसेशरिरी...,

दाबतासाऱ्या षढरिपूंना, बेगडी शांतताबाह्य दिसे

जिंकती त्यांनाचसहजपणे, खरी शांतता चित्तींवसे...

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Search by Tags:  कळप
Top

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 827 hits