Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

नामस्मरणाचे कोडे

October 08, 2017

नामस्मरणाचे कोडे

मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे,

कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ?

कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ।।

श्वास चालतो रात्रदिनीं,

लक्ष्य न घेई खेचूनी,

ऊर्जा मिळते देहातूनी,

परि मनास बंधन नसावे....१, कोडे हेउकलून घ्यावे

एकचि कार्य एके क्षणी,

एकाग्रता येई दिसूनी,

अवसर मिळे मग कोठूनी,

त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२, कोडेहे उकलून घ्यावे,

संसाराचे जू मानेवर,

ओढण्यासांगे ईश्वर,

मार्ग सारे असता खडतर,

कसे त्यास वळवावे पाहावे......३, कोडे हे उकलून घ्यावे.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 816 hits