Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

देहातील शक्ती

October 08, 2017

Search by Tags:  इंद्रधनु

देहातील शक्ती

नासिकेसमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा,

थंड हवा आंत जाते, गरम होऊन बाहेर येते ।।१।।

अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून,

आत्म्यापरि फुगते छाती, हवा आंत खेचूनी घेती ।।२।।

आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते,

भावना जेंव्हा जागृत होती, रोम रोम ते पुलकित होती ।।३।।

अवयवे सारी स्फुरुन जाती, देहामधूनी वीजा चमकती,

धनको ऋणको विद्युतसाठे, अलग अलग दिसती मोठे ।।४।।

विजातीय लिंग येतां जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी,

प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही ।।५।।

स्थीर करुन चंचल मना, प्रकाश दिसेल ह्रदयी सर्वांना,

उष्णता वीज प्रकाश शक्ती, हींच ईश्वरी रुपें असती ।।६।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Search by Tags:  इंद्रधनु
Top

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 827 hits