Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

प्रथम शाहाणा कर

October 08, 2017

Search by Tags:  धबधबा

प्रथम शाहाणा कर

अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी

मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी ।।

ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझेठायी

भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येतनाही ।।

निर्धनासी धन मिळता, जाई हर्षूनी

हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी ।।

माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण

गैरउपयोग होई शक्तीचा, नसता सामान्य ज्ञान ।।

शब्द वाकतील तुझ्या कृपेने, भावना उफाळता

वेड्यापरी कोठेही पळतील मर्यादा सोडता ।।

जाण आहे एकची मजला, तुझ्या शक्तीची

वाल्मिकी, कालीदास, अज्ञानीना ज्ञानी केल्याची ।।

तसेच देऊन ज्ञान थोडेसे, शाहणा कर आधी

ठेवणार नाहीत नावे मजला, नंतर कुणी कधी ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Search by Tags:  धबधबा
Top

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 820 hits