Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

दुर्बल मन नको

October 08, 2017

Search by Tags:  मोरपिसारा

दुर्बलमन नको

सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति

वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती ।।१।।

विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली

समजोनी जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।।

मनाची सबलता हेचशक्तीचे मापन

काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।।

सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी

जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Search by Tags:  मोरपिसारा
Top

bhagwan nagapurkar's Blog

Blog Stats
  • 1051 hits